आत्महत्या
ऋचा हाडवळे
ऋचा हाडवळे
खुप प्रयत्न करून सुद्धा काही लोक हरतात, कदाचित म्हणुन का ते आत्महत्या करतात? काही प्रसंगच आयुष्यात असे येतात की त्याचे साक्षीदार फक्त आणि फक्त आपणच असतो. काॅलेज च्या टॉप फ्लोरला उभ राहुन मी हा विचार करत होते... अर्थात आत्महत्या करायला आले आहे.
फक्त एक उडी मारून, एका क्षणांत हा सगळा होणारा त्रास संपवायचा आहे. आत्महत्या करणारे घाबरट असतात, त्यांना आयुष्याचा अर्थ कळलेला नसतो अस मुळीच नसत. जगणं कठीण आणि आत्महत्या करण सोप्पं अस वाटत असेल तर ...ते चुकीच आहे...निदान माझ्या साठी तरी. कारण जगायच असुनही आत्महत्या करायची म्हणजे किती हिम्मत करावी लागते...हे माझ्या पेक्षा अजुन चांगल कोण सांगणार तुम्हाला?
कॉलेजला बंक मारून आम्हाचा ग्रुप नेहमीच ब्लॅक लीस्ट मध्ये असायचा. कधी कुठलाच लेक्चर पुर्ण अटेंड केला असेल माहित नाही. आमच्या ग्रुप ला सगळे बंक ग्रुप म्हणुन ओळखायचे. आदित्य, निशा, मोहित, मनोज, स्पना, मृण्मयी आणि मी (संपदा). सात जणांचा ग्रुप.
आपण ज्या गोष्टी नेहमी नेहमी करतो त्या कधी कधी शेवटच्या ठरतात. आमच्या सोबत ही असच झाले. आदित्य कडे कार होती व मोहित कडे बाईक म्हणुन आम्ही कॉलेज पासुन दोन ते तीन तासाच्या अंतरावर असलेल्या बीच वर जायचं ठरवल होतं, अर्थात कॉलेजला बंक मारून व घरी न सांगता.
सकाळी नऊ च्या सुमारास लाईब्ररी मध्ये जायच आहे असे सांगुन घरातुन निघाले...जो तो आपापल्या परीने कारणे सांगुन घरातुन लवकर निघाला.
सकाळी नऊ च्या सुमारास लाईब्ररी मध्ये जायच आहे असे सांगुन घरातुन निघाले...जो तो आपापल्या परीने कारणे सांगुन घरातुन लवकर निघाला.
ठरलेल्या ठिकाणी भेटुन, काही खायच सामान घेऊन आम्ही प्रवास सुरू केला....काही प्रवास हे शेवटचे ठरू शकतात.....ना!!!!!!. मृण्मयी व मनोज बाईक वरून तर कार मध्ये आम्ही बाकीचे...आदित्य ने छान गाणी लावली होती आणि ईथे सगळी मोहित व स्पना ला चिडवत होते...लव बर्ड होते ना ते ग्रुप मधले....
बीच वर एव्हाना आम्ही पोहोचलो होतो. खुप सुंदर बीच होता...गोळे वाला, पाणीपुरी भेलपुरीवाला , उन्हाळा असल्यामुळे ताडगोळे व ताडी माडी विकणारे माणसं होती बीच वर. नारळाची झाडे हवेवर मस्त डोलत होती. किती अथांग समुद्र होता डोळ्यांसमोर... पण त्याच्या येणार्या लाटा मनाला कुठेतरी घाबरवत होत्या. क्षणात गिळुन टाकतील आम्हाला अस भासवत होत्या. आपल्या चारही बाजुला पाणी आहे व आपण डुबत आहे अस वाटत आसतानाच आदित्य ने मला भानावर आणलं," काय ग!!! कसला एवढा विचार करत होती,चल... पाणीपुरी खाणार का तु..? " शब्दाने काहीही न बोलता मी डोळ्यांनीच हो...अस बोलले....
दुपार होत आली होती आणि आम्ही समुद्राच्या पाण्यात फिरत होतो, मस्ती करत होतो , कधी चालत होतो तर कधी पोहोत होतो..... पाण्यात पुर्णपणे भिजुन गेलो होतो... मोहित आणि स्पना पाण्याच्या जरा जास्तच आत गेले होते.. भरती वाढणार होती म्हणुन... पोलिस ही आम्हला दटावुन गेले होते पाण्याच्या बाहेर येण्यासाठी...मी पाण्याच्या भितीने जास्त आत नाही गेले आणि कोणीच बाहेर यायला मागत नव्हते... हळु हळु पाणी एवढं कधी वाढलं काही समजलच नाही , आता बाहेर निघणं कठीण वाटायला लागले....मोहित आणि स्पना तर समुद्राच्या खुप आत आडकले ह़ोते... मोहित ला पोहता येत होते म्हणुन तो स्पना ला घेऊन पोहत येत होता. लाटांचा जोर एवढा ह़ोता की स्पना चा हात सुटला...आणि ती समुद्रात वाहत गेली.. तस बाकीचे ही बाहेर न निघता त्यांच्या जवळ त्यांना वाचवायला साखळी करून जात होते पण मी भितीने बनवलेल्या साखळीतुन बाहेर आले. बाकी जण त्यांच्या जवळ पोहचत होतेच की अजुन एक लाट आली आणि क्षणांत सगळे समुद्रात वाहुन गेले. मी एकटी हे सगळ पाहुन जागीच पडले... पोलिस आणि बाकी मदत मिळे पर्यंत सगळ संपल होत. शोधकार्य सुरू झाले, पण कोणीच सापडले नाही. वार्या प्रमाणे सगळी बातमी घर, कॉलेज व न्युज चॅनल मध्ये पसरली.
काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये काढले कारण मानसिक धक्का बसल्यामुळे मी दोन दिवस बेशुद्ध होते. घरी आल्यावर समजले की, सगळ्यांच्या डेड बॉड्या फुगलेल्या व काही माश्यांनी खाललेल्या अवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी किना-यावर सापडल्या. थोडं फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेले आणि आधीपासून च कोणीतरी होते त्या बाथटब मध्ये. पडद्या मागुन फक्त सावली दिसत होती.
कोण आहे.......???? कककककककोण आहे?
कोणीच काही बोलत नव्हतं...म्हणुन पडदा सरकवला पण कोणीच नव्हते तिथे.... बाहेर येताना दरवाजा बंदच करत होते की , पुन्हा काही सावल्या दिसत होत्या ....बाथटब पुर्ण पाण्याने भरून वाहत होता. घाबरत जाऊन डायरेक्ट पडदा बाजुला केला आणि काळजी बाहेर येऊन आता आपण मरणार अस वाटले आणि हिम्मत करून जमेल तेवढ्या जोरात धावत खाली हॉल मध्ये गेले... सगळे विचारत होते काय झाल ,पण कस सांगू त्याना....की मी त्या सहा जणांना बाथटब मध्ये पाहिले..... फुगलेलं शरीर... अंगावरच्या जखमा....आणि त्यांच बोलणं...हो ते बोलत होते,"साखळी पुर्ण करररररर",. ............
रात्रभर झोप च नाही आली . सगळे जण जसे माझ्या रूम मध्ये आहेत अशी जाणीव होत होती. सकाळी कॉलेजमध्ये गेले तेव्हा तिथे ही, हे सहा जण पायर्यांनवर बसले होते. लेक्चर मध्ये ही मागच्या बेंचवर बसले होते. पुर्ण रस्त्यावर माझ्या मागे मागे यायचे. मला घाबरवायचे. जेवायला बसली की सहा जण समोरच असायचे. लोकांना वाटायच की मी वेडी झालेय. डॉक्टर व मांत्रिक करून झाले पण काहिच उपयोग झाला नाही. आणि आता तस पण अंगात बोलायला म्हणुन फक्त हडांचा सापळाच उरलाय.
कॉलेज च्या टॉप फ्लोर ला ऊभी असली तरी ते सहा जण खाली ऊभे आहेत. साखळी पुर्ण व्हायची वाट बघत. मला कळुन चुकलं आहे की, कॉलेज मध्ये बंक मारता मारता आता आयुष्याशी बंक मारायची वेळ आली आहे. काल पर्यंत घाबरून शांतपणे झोपच लागत नव्हती..आता झोपेण शांतपणे कधीही न उठण्यासाठी.... कारण ...
काही गोष्टी अश्याही घडतात आयुष्यात की , त्यातुन माणुस तर वाचतो, पण जिवंत राहत नाही.
(बातम्या......बीच वर अपघातात वाचलेल्या मुलीची कॉलेजमध्ये आत्महत्या....)
समाप्त. (कथा काल्पनिक असली तरी समुद्रात झालेला अपघात हा खरा आहे.)
समाप्त