मनी...
ही कथा भुताची नाही येणाऱ्या संकट संकेताची आहे आणि मी पहिल्यांदा पोस्ट करत आहे कृपया समजून घेणे...
प्रथम वाडेकर सरांची चिमी ही कथा वाचताना आमची मनी आठवली माझे वडील ही मनी ला खूप जीव लावायचे तिला अंधोळ घालण्याचा पासून तिच्या खाण्यापिण्याचं सगळंच..
वडील ऑफिस मधून यायची वेळ झाली कीं मनिला कस काय समजायचं नाही माहिती पण ही सारखी गेट वर घुटमळत बसायची रोजच... असं बराच काही या दोघांच्या जिवाभावाच्या गोष्टी आहेत ....
तर मुद्दा असा की
एकदा नेहमीप्रमाणे वडील ऑफिस मधून आले आणि मित्रा सोबत त्यांना बाहेर जायचे होते पण मनी त्यांना जाऊ देत न्हवती वडिलांना वाटले हिला भूक लागली असेल म्हणून तिला दूध बिस्कीट दिले तरी हि सारखी त्यांच्या पायात घुटमळत होती आणि ओरडत होती पॅन्ट ओढत होती जवळ घेतलं कीं शांत आणि खाली सोडली कीं परत तेच सुरु शेवटी वडील आईला म्हणाले की मी निघतो बाहेर गेलो कीं लगेच दरवाजा बंद कर पण तिला बहुतेक समजलं तिला खाली ठेवताच मनी ताडकन गेट वर गेली तिथून वडिलांना जाऊन देत न्हवती शेवटी सगळे शेजारी बघायला लागले म्हणून आई म्हणाली मनी ला घेऊन घरी या नका जाऊ इतकं करतेय तर थांबा....
मग काय थांबले वडील घरी.... मित्राला फोन करून (लँडलाईन वरून तेव्हा मोबाईल न्हवते) सांगिलते मला यायला जमणार नाही तू जाऊन ये आणि आलास की मला फोन कर मित्रा हो म्हणाला झालं वडील घरी थांबले..
संध्याकाळी जेवायची वेळ झाली तरी मित्राचा फोन नाही आला म्हणून शेवटी वडिलांनी फोन केला त्यांच्या घरी आणि फोन वरच काकू चे बोलणं ऐकून वडिलांना धक्का बसला कीं ते ज्या ठिकाणी जाणार होते तिथे जायचा आधी त्यांचा मित्राचा ऍक्सीडेन्ट झाला........
खूप दुखापत झालेली म्हणून ऍडमिट केलेले पण या गडबडीत काकू सांगायचं विसरल्या वडील तडक निघाले पण यावेळी मात्र मनी शांत बसून होती.....
शेवटी सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा पासून मनीने थांबलं की वडील कुठेच जात नसतं कारण जेव्हा जेव्हा मनी अडवायची असं काही अनुभव यायला लागले..
म्हणूनच म्हणतात मुक्या प्राण्यांना जीव लावला की तेही त्याबदल्यात त्यांचं कर्तव्यं प्रामाणीक पणे निभावतात त्यांच्यावर केलेलं निस्वार्थी प्रेम तेही वाया जाऊ देत नाहीत.....
पण काही वर्षांनी मनी गेली वडील खूप रडले आम्ही लहान होतो त्यामुळे त्यातलं गांभीर्य आम्हाला समजलं नाही मनीचे सगळे अनुभव आम्हीही घेत होतो.....
म्हणूनच म्हणतात मुक्या प्राण्यांना जीव लावला की तेही त्याबदल्यात त्यांचं कर्तव्यं प्रामाणीक पणे निभावतात त्यांच्यावर केलेलं निस्वार्थी प्रेम तेही वाया जाऊ देत नाहीत.....
पण काही वर्षांनी मनी गेली वडील खूप रडले आम्ही लहान होतो त्यामुळे त्यातलं गांभीर्य आम्हाला समजलं नाही मनीचे सगळे अनुभव आम्हीही घेत होतो.....
मला ही अनुभव शेयर करायचा होता असेच काही सत्यघटना ही आहेत भुतांच्या पण आज निवांत वेळ आणि प्रथम सरांची कथा वाचताना शब्द जुळून आले आणि आमचाही अनुभव इथे शेयर केला.....
पहिल्यांदा अनुभव शेयर करतेय कृपया काही शाब्दिक चुका असतील तर समजून घेणे
धन्यवाद...
पहिल्यांदा अनुभव शेयर करतेय कृपया काही शाब्दिक चुका असतील तर समजून घेणे
धन्यवाद...