"गोव्याच्या किनाऱ्यावर" ( सत्यघटना )
भूत असतं की नसतं?
हा प्रश्न अजून प्रश्नच आहे... अनेकांना त्यांचं अस्तित्व स्वीकार आहे, तर बरेच जण अशेही आहेत ज्यांना यावर काहीच विश्वास नाही...
आता मी जो फोटो पाठवलाय, त्यात एक काळी सावली दिसत आहे.. नीट बघितल तर एखादा माणूस उभा असल्यासारखं वाटेल...

2019 ची थंडी चालू होती... सगळेजण व्हॉटसअपवर गप्पा मारत होते... एकाच कॉलनीमध्ये राहणाऱ्या मुलांनी ग्रुप तयार केला होता, सुट्टीच्या दिवशी पुण्याजवळ असलेले गडकिल्ले, प्राचीन वास्तू, थंड हवेची ठिकाणं फिरणे असा यांचा नित्याचा कार्यक्रम...
पण आता सर्वजण मिळून लांब कुठेतरी फिरायला जाव, अस सांगत होते... मग सगळ्यांनी मिळून "गोवा" हे ठिकाण ठरवलं....

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पहाटेच सगळेजण आवरून निघाले गोव्याकडे...
अवी खुष होता, कारण खूप दिवसांनी मोठा प्रवास करायला भेटणार होता...
सगळेजण उत्सुक होते.... काहींची पहिलीच वेळ होती तर काही लोक बरेच वेळा जाऊन आलेले... अवि मात्र पहिल्यांदा चालला होता...
सगळेजण तिथं पोचले तोपर्यंत संध्याकाळ झाली होती.. थंडीही बरीच वाढली होती.... संध्याकाळी तिथं काय करायचं असतं, हे सगळ्यांना माहीत होत...
सगळ्यांनी बाटल्या फोडल्या.. म्हणजेच दारू प्यायला सुरुवात केली... अवि दारू पीत नव्हता, म्हणून त्याला रीतिरिवाजाप्रमाने कोक आणला...

विकासच्या मावस भावाच फार्महाऊस तिथं बांधून ठेवलं होत, वर्षातून एकदा त्याचा मावस भाऊ आणि त्याच कुटुंब तिथं जायचं... इतरवेळी तिथं कोणीच नसायचं... आणि तो बंगला समुद्र किनऱ्यापासून काही पावले दूर होता...
यांचा धिंगाणा सुरू झाला... सगळ्यांना दारू चढली होती.. आणि तिथं आजूबाजूला जास्त घर नव्हती म्हणून यांनी गाणी लावून नाचायला सुरुवात केली... विकासने जास्त घेतली नव्हती कारण फार्महाऊसची जबाबदारी त्याच्यावर होती, म्हणून किंचित काळजी का होईना पण त्याने लिमिटमध्ये घेतलेली....
रात्री १-२ पर्यंत सगळे तळीराम थकून गेले आणि जो जिथ जागा भेटेल तिथं लोळत पडला...
विकास आणि अवि जागे होते...
दोघांनापण झोप येत नव्हती म्हणून त्यांनी किनाऱ्यावर फेरी मारून यायचं ठरवलं....

समुद्र किनारा बघून दोघं जण भान विसरून गेले.. कारण समुद्राच ते रूप त्यांना खूप भावल... अविने विकासचे काही फोटो काढले... नंतर विकासने अविचे काही फोटो काढले आणि ते तिथून फिरून पुन्हा बंगल्याकडे येऊ लागले...
रस्त्यात अवि काढलेले सगळे फोटो व्हॉटसअपवर स्टेटस् ठेवत होता...
काहीच वेळात त्याला त्याच्या मित्राचा मेसेज आला, आणि ते ऐकुन आणि बघून अवि खूप घाबरला.....
आणि पुढच्याच दिवशी सगळे तातडीने पुण्याला निघून आले...

तर झालं अस की, मीच अविला मेसेज केलेला... कारण त्याच्या मागे कोणीतरी उभ असल्यासारखं धूसर दिसत होत... म्हणून मी त्याला विचारलं जी तिथं फोटो काढणारा आणि अवि सोडून कोणी होत का? तर तो नाही म्हणाला.. आणि ज्या वेळी फोटो काढला, त्या दिवशी अमावस्या सुरू झालेली...
आता बरेच लोकांना हे खोटं वाटेल... पण हा फोटो बघून मला तेव्हा वेगळं जाणवलं आणि ते त्याला सांगितलं... त्यालाही ते पटलं...
तिकडून आल्यानंतर त्याची तब्येत काही दिवस ठीक नव्हती..

(आणि हो, जेव्हा मी हा फोटो पाहिला तेव्हा ती सावली खूप प्रखरपणे जाणवत होती... आता एक वर्ष होईल काही दिवसात पण ती सावली थोडी थोडी गायब झाल्यासारखी मला जाणवते... हा विषय ऐकला आणि हा फोटो पाठवू वाटला..)
समाप्त