#कथा :- नत्तुरी
#लेखक :- चेतन साळकर
#महाभाग :- १०
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
#लेखक :- चेतन साळकर
#महाभाग :- १०
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ९ ची लिंक खाली दिलेली आहे.
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
इतक्यात खाली पडलेल्या हौसा ला सुध्दा जाग आली. ती उठून बसली. समोरची ती आकृती दिसताच ती हौसा सुध्दा रडू लागली आणि तिने जोरदार एक आरोळी ठोकली "शिद्रा" नावाची. . . . .
ती सावली हौसा च्या शरीरात शिरली आणि हौसा बोलू लागली. . . .सांगू लागली तीची विराणी . . . . .
ती बोलू लागली. डोळ्यात संतत पाण्याची धार आणून ती आपल्या गतकाळातल्या घडलेल्या घटनांची मांदियाळी भरू पाहू लागली. एकेक क्षण माझ्यासमोर असा उभा करू लागली की , जस की माझ्याशी काहीतरी जुने संबंध असावे किंवा मी मधला दुवा असावा. तिच्या एकेका शब्दाबरोबर सार अंग शहारून जात होतं. कितीतरी शब्दांची कुंपण आजूबाजूने दाटी करून उभी राहिली आणि स्मरू लागली प्रत्येक शब्दातून खूप दिवसांआधी घडलेल्या घटनांची विराणी.. . . . .हौसा बोलू लागली . . . . .
हौसा ( तिच्या अंगातली आत्मा ) - मी शिद्रा . . .
मी - पण तुझा आणि हौसा चा संबंध काय ?
ती - मी शिद्रा , हौसा ची मुलगी !
मी मागच्या मागे उडालो. काय भयंकर शब्द ते. पायाखालची जमीन क्षणात सरकली. म्हणजे मी जीच्यासोबत संबंध ठेवले तिला मुलगी होती. माझं मन सुन्न झालं होतं.
मी - पण हौसा कधी बोलली नाही ? तुझ्या आणि तिच्याबद्दल ?
ती - कशी बोलेल , मी तिची ह्या जन्मीची मुलगी नाही मागच्या जन्मी ची मुलगी आहे .
मी - काय ! पण मग असे कित्येक जण प्रत्येक जन्मी कोणाचे न कोणाचे संबंधी असतात , मागच्या जन्मीचे कोणीच असे आत्मा बनून येत नाहीत.
ती - मी आले , कारण ती घटना घडली ते वर्ष आणि हौसा ने जन्म घेतला त्यातले अंतर जास्त नसून "तीस" वर्षाचं आहे. म्हणजे त्या घटनेला 60 वर्षे झाली असतील.
मी - कोणती घटना ?
ती - आता हे जे गाव आहे , तिथेच साठ वर्षांपूर्वी एका "यमन" राजाची नगरी होती. तिथे मी आणि माझी आई म्हणजे ही आताची हौसा, आम्ही राहत होतो. आम्ही दोघी राजाच्या खाश्या महालात चाकरीला होतो. एकदा मी राजाच्या महालात विशेष ऐवज , दागदागिने , पैसा , मोहरा , सोने , मोती, हिरे चोरत असताना राजाच्या बायकोने म्हणजे राणीने पाहिले. ती जाऊन राजाला सांगणार तर राजा मला जिवंत ठेवणार नाही हे नक्की. शेवटी निरुपाय म्हणून मी बाजूला असलेला सोन्याचा मोठा हंडा उचलला आणि राणीच्या डोक्यात घातला. राणीला तो इतका प्रचंड वेदनादायी झाला की तिचा जागीच मृत्यू झाला. ही गोष्ट राजाला कळली तेव्हा तो रागाने तप्त होऊन माझ्यावर चालून आला. मी घाबरले होते. आता तो काहीतरी भयंकर करण्यापेक्षा महालाच्य वरच्या दालनातून खाली उडी घेतली आणि स्वतःला संपवलं.. .
घरी आईला ही गोष्ट कळली तेव्हा आई धावत आली. आमची शेवटची भेट ही झाली नव्हती. मी चूक केली त्याची शिक्षा मी स्वतःला केली होती पण राजाच्या मनातून तो राग काही केल्या जात नव्हता. तो संतप्त झालं होता. त्याने एका मोठ्या तांत्रिकाला बोलावले आणि माझी सुटका होऊ दिली नाही. मला आत्मा स्वरूपात त्याने कैद केले आणि या कुवाड मध्ये डांबून ठेवले. कुठल्याही प्रकारे मला मुक्ती नाही मिळाली पाहिजे हे त्याचे ध्येय होते. त्याने मला इथे विहिरीत बंद केले आत्मा स्वरूपात. देह जळला पण माझी आत्मा मात्र मुक्तीसाठी तळमळते आहे अजूनही. . . . आणि त्याने स्वतःचे काही पहारेकरी देखील ठेवले माझ्या देखरेख साठी. ते आजही माझ्या भोवती पहारा देत आहेत. माझा आत्मा इथे अडकून पडला आहे , जोपर्यंत तो मुक्त होत नाही तोपर्यंत मला सुटका नाही.
मी - कुवाड म्हणजे ?
ती - जिथे आपण उभे आहोत तिथे खाली मुख्य विहीर आहे. तीच नाव कूवाड !
हौसा ने सगळं ऐकलं होतं. काही झालं , वयाने कमी असली , लग्न झालेली नसली , आईपण बघितले नसले तरी तिच्या मनात शिद्रा विषयी ममतेची भावना उफाळून आली. कमी वयात सुध्दा प्रेमाचा , भावनेचा, पान्हा फुटला.
म्हणजे ती सगळी सहा नाव त्या विहिरींची होती आणि कुवाड ही सातवी विहीर. सगळ्या विहिरी कालांतराने बुजून गेल्या होत्या. इतके बोलुन शिद्रा ने आपले अंग सोडले हौसा खाली कोसळली. शिद्रा रिंगणातून बाजूला झाली. मला आता ती जागा खणून काढायची होती करणं ती विहीर तिथेच खाली असणार ह्यात शंका नाही. फुलाप्रमाणे असलेल्या विहिरीच्या आकृतीत मध्यभाग हा राहिला होतं. तो म्हणजे तोच जिथे हौसा पडली होती. मी खणायला घेतले. माझ्याकडे वेळ फार कमी होता. सकाळ झाली तर साऱ्या नकारात्मक गोष्टींचा नायनाट होतो पण मला त्यांच्या उपस्थितीत गोष्टींच्या मुळात पोहोचायचे होते. मी खणायला प्रारंभ केला. खणत असताना अनेक विघ्ने आली. बाजूला असलेली राजाची भुतावळ मला ती जागा खणायला अडथळा उत्पन्न करू लागली. विविध आवाज काढत, घाबरवत ती मला रोखू लागली. खरतर विष्णु ने ते रिंगण आखल्यामुळे त्यांचा इतका त्रास माझ्यापर्यंत पोहचू शकत नव्हता. मी खणत राहिलो आणि साधारण 1 तासाच्या अंतराने मला खाली खाई वाजलेला आवाज आला. मी थबकलो. अजुन खणत राहिलो
बघता बघता बराचसा भाग खणून झाला. खाली होता एक लोखंडी गंजेलेला पिंजरा. . . . .
बघता बघता बराचसा भाग खणून झाला. खाली होता एक लोखंडी गंजेलेला पिंजरा. . . . .
त्या पिंजऱ्यात होता एका कपड्यात गुंडाळून ठेवलेला ऐवज. त्यावर भयाण काळ्या रंगांचे , लाल रंगांचे पट्टे ओढले होते. तो पिंजरा मी एका क्षणात तोडला. इतक्या वर्षांच्या अंतराने तो इतका जून झालं होता की एका घावात तुटला. आतील ऐवज मी उचलायला गेलो तर मागच्या मागे उडालो गेलो. भयंकर वेदनादायी कळ माझ्या हाताला बसली. मी तो ऐवज पेटविण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर जोरात काहीतरी घाव घालण्याच्या प्रयत्न केला, त्याला ह्या ना त्या मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ पुढची पाच मिनिटं मी तेच करीत होतो. मला मार्ग मिळत नव्हता. मी बाहेर येऊ लागलो. बाहेर येताच बाहेरील वातावरण वेगळे झाले होते. बाहेर अदृश्य स्वरूपात विहारणारे सगळे घोडेस्वार आपली पूर्ण ताकद वापरून आत येण्याचं प्रयत्न करीत होते परंतु त्या विष्णु ने आखलेल्या रिंगणाच्या आत येऊ शकत नव्हते. मला ही काही उपाय नव्हता. इतक्यात हौसा किंकाळली. . . .
मला कळेना काय झालं मी पाहिले वर तर हौसा च्या बाजूला शिद्रा उभी होती आणि ती तळमळत होती. कदाचित तिला काहीतरी सांगायचं होतं मला पण त्या अदृश्य स्वरूपातल्या सैन्याने तिला जखडून टाकले होते. तिला हौसा च्या शरीरात जाऊ देत नव्हते कारण ती त्या शरीराचा साहाय्याने मुळ मुद्द्यात हात घालू शकत होती. हौसा तळमळत होती. तिला ही शरीर आता दाह देऊ लागला होता. वातावरण पेटले. सारे कसे जंग पुकरल्यासारखे थैमान घालू लागले. मी बाहेर जाऊ शकत नव्हतो, शिद्रा बाहेर राहून आत जाण्यासाठी , मुक्तीसाठी तळमळत होती, हौसा एकंदरीत जाचासाठी कंटाळली होती. तेव्हा मात्र झाले वारे फिरले , काही तो सोक्षमोक्ष लागणार होता. असाही तेव्हा पहाट व्हायला काही काळ शिल्लक होता. पहाट म्हणजे प्रकाश, उजेड, अंधारावर मात, वाईटाचा नाश , सत्याचा विजय. . . . . अचानक एक जोरदार धक्का मला लागला आणि बघताबघता मी उडालो गेलो विहिरीच्या बाहेर. रिंगण तोडून मी त्याच्याही बाहेर पडलो. बघता बघता सगळे अदृश्य स्वरूपातले घोडेस्वार तळपत्या तलवारी घेऊन माझ्या अंगावर धावले. मला कसही करून बचाव करायचा होता पण मला त्या लोखंडी पिंजऱ्यात असलेल्या शिद्रा च्या आत्म्याला मुक्ती द्यायची होती. मला कळत नव्हत मी कसं ठरवू आणि तिला मुक्ती देऊ. अचानक मला एक गोष्ट आठवली. विष्णु ने दिलेल्या कागदाच्या ओळीतली दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आठवला. तो होता "नत्तुरी".
मी घाईघाईने धावत हौसा कडे गेलो. तिला गदागदा हलवून मी विचारू लागलो. नत्तुरी म्हणजे काय ? नत्तुरी म्हणजे काय ? नत्तूरी. . . . . .?? हौसा शुध्दीवर नव्हती. मी तिला चार पाच कानाखाली वाजवल्या . माझ्याकडे पर्याय नव्हता. मला कसही करून त्या शब्दाचा अर्थ कळण गरजेचं होत. तो शब्द काही वेळापूर्वी हौसा ने उच्चारला होता. तिला तो नक्कीच माहीत असणार. तिची अवस्था इतकी बिकट होती की शरीरात अगदीच प्राण शिल्लक राहिले नव्हते. तरीही मी तील खांदा हलवून हलवून विचारू लागलो , ओरडू लागलो. पाठून ते सैन्य माझ्या अंगावर येऊ लागलं. हौसा ने डोळे किंचित उघडले आणि अस्पष्ट आवाजात शब्द सोडला "रगुत" म्हणजे "रक्त"... ..मी मागे असलेल्या शिद्रा च्या चेहऱ्याकडे पाहिले. तिची देखील संमती आहे का पाहिले तर तिने मान हलवून होकार दिला. असंख्य अश्रूंचा बांध फोडून ती हास्य देत होती. . . . . .
मी पेटलो होतो. मला कळले होते मला काय करायचे आहे ते. मी रिंगण पार करून विहिरीच्या तोंडावर आलो. आता रक्त द्यायचं म्हणजे टोकदार काहीतरी हवं पण तिथे कसं शक्य आहे. शेवटी पर्याय नव्हता म्हणून मी टोकदार दगड घेतला आणि आपल्या तळहातावर तीक्ष्ण टोक घासले. बघता बघता एक चिळकांडी रक्ताची गरज धार करून त्या लोखंडी पिंजऱ्यात असलेल्या कपड्यातल्या वस्तूवर पडली. काही वेळातच तो कपडा संपूर्ण भिजला. बघता बघता सगळे वातावरण शांत झाले. पहाट झाली. प्रकाश पसरू लागला. सगळे घोडेस्वार गायब झाले , कदाचित त्यांनाही पर्यायाने मुक्ती मिळाली असावी. ती वस्तू रक्ताने भिजली. आतल्या वस्तीला जसा स्पर्श झालं इकडे शिद्रा हळहळली. डोळ्यातून कितीतरी वर्षांची दुःख रिमझिम सुखात न्हात होती. तिने डोळ्यांनी मिटून आपल्या पुढील प्रवासाची मनोमन तयारी केली. सुखावली होती. आनंदी होती, पण जन्मांची नाळ तुटत नाही हेच खरे. तिने हौसा च्या मांडीवर डोकं टेकवले. हौसा ने ही जवळ घेऊन आपल्या मागच्या जन्मीच्या मुलीला प्रेमाने कवटाळले. झाली आई लेकीची भेट ही अशी झाली...एक कटाक्ष माझ्याकडे टाकून डोळ्यांनी आभार मानून शिद्रा मुक्त होऊन क्षणात लुप्त झाली. . . .. कायमची.. . . . !!
दोन जीवांची भेट घडवून आणून मी ही धान्य झालो होतो. खरतर जिंकणे कठीण होते पण आम्ही जिंकलो होतो. शिद्रा मुक्त झाली आणि हौसा देखील. शिद्रा ला आपला मार्ग मिळाला आणि हौसा आणि मला देखील आमच्या जीवनाचा मार्ग मिळाला. . . . . आम्ही निघालो आमच्या वाटेल.. . . सूर्योदय झाला होता.. . .आम्ही सूर्यास्त बघून नवीन गावाची वाट धरली. . . ..
!! समाप्त !!
लेखकाचे मनोगत :-
कशी वाटली कथा ? आवडली असेलच ? तुमच्यासारखे वाचक असले की लिहायला ला ही उत्साह येतो आणि पर्यायाने तुम्हाला वाचायला ही आनंद येतो.
मग भेटू नवीन कथा घेऊन
लवकरच . . !!
तोपर्यंत. . . . . .!!
नमस्कार . . . . . . .🙏
मग भेटू नवीन कथा घेऊन
लवकरच . . !!
तोपर्यंत. . . . . .!!
नमस्कार . . . . . . .🙏
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
"परतीची बकुळी - ते बघ मरण - हिमालयाचे पुरुष आम्ही - त्रीगंधा"
या कथा वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा