कथा :- नत्तुरी
लेखक :- चेतन साळकर
भाग :- ९
Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
लेखक :- चेतन साळकर
भाग :- ९
Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
💥 सूचना :-
• कथेचा उद्याचा शेवटचा भाग असेल
• कथा "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
• कथा "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ८ ची लिंक खाली दिलेली आहे.
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
आता माझ्यासमोर उरलं होतं ते मोठं प्रश्नचिन्ह ? पहिली ओळ समजली आता दुसऱ्या ओळीचा अर्थ कोण सांगणार . . . .??
रात्र वाढली , चंद्राची अनोळखी काय तेजून निघत होती. तिथल्याच एका बाजूच्या खोल भागात विष्णु चा मृतदेह मी बुजवून टाकला. वाईट तर वाटणारच . माझ्यासाठी ती व्यक्ती मदतीला आली पण शेवटी तिचा ही निभाव लागला नाही.
भरात आलेली रात्र कड काढत तो सगळा कार्यक्रम पाहणार होती. माझे हातपाय गळून गेले होते. जो मधला दुवा होता, ज्यांच्यावर विश्वास ठेऊन ह्या प्रकरणात हात घातलं होता त्याच सगळं पाणी पाणी झाल होतं.हौसा तोपर्यंत त्या बाळाला उचलून घेऊन थोपटत होती. करायचे काय ? आपण माणसं ? साधी सामान्य ? ना देवाची साथ ? ना भुताची ? कोणाच्या जीवावर हा सगळा खेळ संपवायचा ? अनेक विचार घेरून मला नकोस करू लागले. विष्णु बोलून गेला की हौसा ला त्या बाळापर्यंत पोहोचू देऊ नकोस पण तेव्हा हौसा कधीच पोहोचली होती. तिची ताकद वाढली. बाळाला हातात घेताच ती जिकडेतिकडे नुसती धावत सुटली. मोकळ्या मैदानात काळ्याकभिन्न अंधारातून मोठं गोलाकार रिंगण घेऊ लागली. त्या मैदानाच्या चारही बाजूने तिने गोलाकार रिंगण घेतले. मला कळेना हीच काय चाललंय. मला संशय आला की " सात विहिरी , एका फुलाप्रमाणे" म्हणजे एखाद फुल कसं असतं ! मध्यभाग , त्याच्या गोलाकार पसरलेल्या पाकळ्या , त्यात ही हौसा त्या मैदानात गोलाकार फिरते ! कशावरून हाच संदर्भ नसेल ? मला हळूहळू जाणवायला लागलं ! म्हणजे हे मोकळं मैदान, मध्यभाग आणि ह्या मैदानाच्या चहूबाजूंनी गोलाकार सात विहिरी असतील तर ?
मी कामाला लागलो, रात्रीचे १० वाजले होते. जिथे हौसा बसली होती म्हणजे मधले रिंगण होते तो मध्यभाग धरला तर बाजूने विहिरी असं गरजेचं होत. एकंदरीत अंदाज लावून मी कामाला लागलो. मला त्या बाजूने पाहणी करणं गरजेचं होतं. रात्र भराला आलेली होती. इतक्यात हौसा आहे त्या ठिकाणी खाली बसली. हातात बाळ घेतल्याचं नाटक करीत तिने एका हाताने मला बोलवल्याची खूण केली. मी आधी घबरलोच . काय केले तर ? मला जाणे भाग होते. हौसा आपल्या शुध्दीत नव्हती. वेगळ्या रूपाने तिच्या शरीरात प्रवेश केला होता. शेवटी मी तिच्यासमोर हात जोडून उभा राहिलो आणि म्हणालो
मी - तू जे कोणी आहेस, मला माफ कर पण तुला काय हवं आहे ते मिळवण्यासाठी मला मदत कर !
हौसा शांतपणे ऐकून घेत होती. ती जराही हालचाल करीत नव्हती. मी खूप केविलवाण्या चेहऱ्याने तिला मनापासून मदत करण्याची मागणी केली. तिने देखील मोठ्या मनाने ती स्वीकारली आणि हौसा धावत जाऊन त्या मध्यभागावर बसली. मी ही तिच्या मागोमाग जाऊन बसलो. ती फक्त इशाऱ्याने बोलत होती. मी तिला विचारायला प्रारंभ केला
मी - इथे सात विहिरींचा काय संबंध आहे ?
( ती एक नाही की दोन नाही )
मी - त्या सात विहिरी गावात कुठे आहेत ?
( ती एक नाही की दोन नाही )
मी - इथे बाजूला त्या सात विहिरी आहेत का ?
तिने क्षणात मान हलवली आणि होकार दर्शवला. माझा अंदाज योग्य ठरला. हौसा बसली होती तो मध्यभाग धरला तर त्या उरलेल्या विहिरी इथेच आजूबाजूला असणार. झालं मी माझं काम सुरू केलं. खरतर तेव्हा कुठलही पर्याय माझ्याकडे शिल्लक नव्हता. ना मी त्यावेळेला कोणाला बोलावू शकत होतो , ना दुसऱ्या दिवशी मजूर आणून खोदून घेऊ शकत होतो. माझ्यासाठी एकेक क्षण फार महत्त्वाचा होता कारण हौसा फार काळ नाही राहू शकत होती. ती आत्मा तिला भारी पडली असती. मी स्वतः खोदायला घेतले. रात्री १० वाजता खोदायला घेतले. साधारण पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी खोदत होतो. खरतर एकट्याने एवढ्या विहिरी खोदणे अशक्य काम होते. मी इरेला पेटलो होतो. काही ही करून मला मुळात ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा होता. मला त्या बाजूला सहा विहिरी सापडल्या होत्या पण एक विहीर बाकी होती ती कुठे असेल ? असा प्रश्न मनात आला ! हौसा जोरजोरात कींकळत होती. बाजूला असणारे घोडेस्वार अदृश्य झाले होते. त्यांनी एक वेगळाच चंग बांधला होता. ते त्या सात विहिरीचं बाजूने फिरत होते. अचानक हौसा विचित्र आवाजात बोलू लागली .
हौसा - कुश्मा, रेगा, अवतुंड, जांभा , शीर्जा, बकी
मला कळेना ती काय म्हणत होती ते. हे कसले शब्द ? काय संबंध ? काय अर्थ त्याचा ? कितीतरी प्रश्न अडकून पडले होते.
मी - हे सगळी कसली नाव आहेत ?
ती - त्या बाव ची नावं !
मी हादरलो होतो. म्हणजे मला समजून न उमजल्या सारखे झाले. ही सगळी नावं त्या विहिरींची होती. गंमत अशी होती की तिने नाव घेतली ती सुध्दा सहा विहिरींची च फक्त. मग सातवी विहिरीचं काय ? जोपर्यंत सात विहिरीचं शोध लागत नाही तोपर्यंत पुढे जाण्यात अर्थच नव्हता. मी कामाला लागलो. इतक्यात विष्णु ने जे रिंगण आखून ठेवले होते त्या रिंगणात हौसा बसलेली होती ती अचानक शांत झाली. मला कळेना काय झालं ते. माझ्या सर्वांगत कळ उठली. आता ती नेमकी काय चाल चालणार आहे ते. ती जोरजोरात ओरडायला लागली. . .
हौसा - नत्तुरी . . . . . . नत्तुरी. . . . . . . . नत्तुरी !!
मी चमकुन गेलो कारण विष्णूने दिलेल्या पानावरच्या ओळींमध्ये दुसऱ्या ओळीत हा शब्द शेवटाला होता. ह्याचा कर्थ काय घ्यायचा ? हौसा ला विचारावं तर ती त्या मनःस्थितीत च नाही .ती हौसा नाहीच होती. मी प्रचंड चिडलो. माझं मलाच इतकं वाईट वाटू लागलं त्यात स्वतःचा राग ही तितकाच आला होता. काही घेण देण नसताना मुर्खासारखे त्या एका मुलीसाठी स्वतचं आयुष्य बरबाद करून मी का थांबलो ? ह्याचा पश्र्चाताप होत होता. रात्र वाढली होती. मध्यरात्र झाली होती. हे जरी असल तरी रात्रीनंतर उद्याची पहाट ही होणारच होती. त्या निसर्गाच्या नियमाला आठवून मी धैर्याने उठलो. आता बस , आता झुंजायच ! निश्चय पक्का करून मी कामाला लागलो. माझ्याकडे के पर्याय उरला होता. प्रत्येक विहिरीत उतरून काही सापडत आहे का ते बघायचं. म्हणून मी चालत सुटलो. अर्ध्या पावली गेल्यावर मला कसलातरी आवाज ऐकू आला. तो आवाज होता रडण्याचा. . . . . !!
मी मागे वळलो तर मागे हौसा गोलात पडली होती. तिच्या बाहेर एक पांढरी सावली उभी होती. ती मुस्मुसून रडत होती. देवा, ह्या भूतांना सुध्दा भावना असतात तर. त्यांच्याही मनात काहीतरी सलत असतच तर. ती सावली मला इकडे तिकडे हात करून काही सांगू पाहत होती. तिच्या डोळ्यातील पाण्याने सार काही समजावलं होतं , कुठल्यातरी जुनाट जखमेने तिला त्रस्त आणि भंडावून सोडलं असावं. इतक्यात मला माझ्या कानाजवळ सूक्ष्म स्वरूपात एक शब्द ऐकू आला. तो शब्द होता "मुक्ती". म्हणजे नक्की ती आत्मा मोक्ष मागत असावी असा माझा अंदाज पक्का झाला पण माझ्यासमोर एक पेच होता. मी त्यांची मदत करायची म्हटलं तरी कशी करणार. त्यामागे काय घडले होते , ते मला कळणे खूप गरजेचे होते.
इतक्यात खाली पडलेल्या हौसा ला सुध्दा जाग आली. ती उठून बसली. समोरची ती आकृती दिसताच ती हौसा सुध्दा रडू लागली आणि तिने जोरदार एक आरोळी ठोकली "शिद्रा" नावाची. . . . .
ती सावली हौसा च्या शरीरात शिरली आणि हौसा बोलू लागली. . . .सांगू लागली तीची विराणी . . . . .
महाभाग - १० पुढील टप्प्यात