चॅलेंज -भाग क्र -- 2️⃣
पहिल्या भागाची लिंक ⬇️⬇️⬇️
कुमारला बघून ती बाई जागची उठली.....तोंडात जीभ फिरवून ती आपलं हसू दाबत होती.....काहीतरी वेगळाच अवतार होता तिचा....लाल साडी हाताला सापचं कातडं गुंडाळलेलं.....कपाळावर मोठं काळं कुंकू.....टीव्हीवर अश्या अवतारातील पात्रं भयानक दाखवतात....पण मरिना खूप सुंदर दिसत होती....सोनेरी लांबसडक केस....गोरा वर्ण एखाद्या विश्वसुंदरीलाही लाजवेल असा....तशी ती अमेरिकन होती.....पण भारतात काहीतरी शिकण्यासाठी आली होती.... जवळपास 40 वर्षे तरी तिने इथेच वास्तव्य केलं होतं.....न जाणे कसं पण अजूनही 25 ची दिसत होती...कुठलाही पुरुष तिला बघून वेडा व्हावा अशी मरिना....पण तिला बघून कुमार चिडले
"काय ग तुला दम धीर निघत नाही का?
जरासा चिडका आवाज ऐकून.....मरिना पायातील पैंजनाचा छम छम आवाज करीत कुमार जवळ आली.....अनिताच्या काळजीने रडून रडून त्यांचे डोळे लाल झाले होते.....मरिना कुमारच्या चेहऱ्याकडे बघत होती...तिने आपले एक लांब नख कुमारच्या गालावरून फिरवले
"अरे....अरे....अरे किती काळजी आहे तुम्हाला मुलीची......ह्या काळजी पोटी मरून जाल एकदिवस"
कुमारने आपला कोरडा पडलेला ओठ तोंडात दाबून ओला केला आणि मरिनाच्या नाजूक कंबरेत हात घालून तिला जवळ ओढले.....ती कुमारला चिटकली....काही वेळ दोघांच्या नजरा एकमेकांना बघून स्मितहास्य करत होत्या.....कुमारने खिश्यातून एक छोटी औषधाची बाटली काढली आणि जमिनीवर आपटली......तसे तिचे तुकडे होऊन फरशीवर पसरले
"हे xxx कंपनीवाले किती हार्ड केमिकल बनवतात...डोळ्यातून अश्रू यायचं केमिकल होतं....पण डोळे सुजवले ह्याने.....किती नाटकं करावी लागली मला रडण्याची...."
मरिना कुमारच्या अजून जवळ गेली
"तू आहेसच नाटकी म्हणून तू मला आवडतोस....तू हिरो बनला असतास ना तर 2,3 ऑस्कर घेऊन आला असतास नक्की"
"तू आहेसच नाटकी म्हणून तू मला आवडतोस....तू हिरो बनला असतास ना तर 2,3 ऑस्कर घेऊन आला असतास नक्की"
मरिनाच्या चेहऱ्यावर आलेले सोनेरी केस हलकेच बाजूला करत कुमारने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कानाजवळ आपले ओठ नेले
"वेडी आहेस का तू??.....ही अमाप संपत्ती....आणि तू...मला कुठल्या पुरस्कारापेक्षा कमी आहे का?......सगळा प्लॅन तुझाच होता....ह्या घरच्या एकुलत्या एक मुलीला प्रेमात फसवणे.....ती पण फसली नसती....तुझ्या दिलेल्या जादुई पाण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली.....तिच्या बरोबर लग्न करताना मला तुझाच विचार येत होता.....तिला पण आपणच आणि तुझ्या काळ्या जादूने वेडी करून मारलं.....वाटलं होतं सगळी संपत्ती तेव्हाच आपल्या हाती येईल पण त्या म्हाताऱ्याने माझ्या सासर्याने सगळी संपत्ती माझ्या पोरीच्या अनिताच्या नावावर केली.....अजून 22 वर्ष तुझ्यापासून लांब राहिलो.....पण आता आई सारखे पोरीचे पण हाल होणार.....पोरगी मरणार आणि सगळी संपत्ती आपली मग आपण दोघ इथले राजा राणी"..
मरिना ने कुमारची मिठी सोडवली
"अरे माहीत आहे रे मला सगळं....किती वेळा सांगशील हे.....तू मला खूप आधीपासूनच आवडत होतास जेव्हा तू कॉलेज ला जात होतास तेव्हापासून.....पण प्रेम सगळं नसत ना....म्हणून तुला सोबतीला घेऊन माझ्या काळ्या विद्येच्या आधारे आपण आता श्रीमंत व्हायच्या मार्गावर आहोत....आता आज रात्री त्या पोरगीचा खेळ खल्लास.....मग इथे आपलंच राज्य.....ए कुमार....मी काळी विद्या तर वापरली....पण लोकांना संशय नाही ना येणार?....सगळं प्लॅन प्रमाणे झालंय ना??"
कुमारने खिश्यातून फोन काढला...आणि खाली मान घालून एक नंबर शोधू लागला
"तू टेन्शन नको घेऊ ग मारी.....मी सगळी फिल्डिंग अगदी व्यवस्थित लावली आहे......(कुमार ने कानाला फोन लावला)
"ए सुबोध....हा...हा तुझं काम नीट झालं आहे.....तू अनिताला बरोबर आम्ही ठरवलेल्या ठिकाणी आणलंस....हो हो तुझे पैसे तुला मिळतील.....पण याद राख ह्याबद्दल कुणाला बोललास तर तुझं हाड पण जागेवर ठेवणार नाही....कळलं काय....हा...हा लगेच पाठवतो पैसे....चल ठेव"
"ए सुबोध....हा...हा तुझं काम नीट झालं आहे.....तू अनिताला बरोबर आम्ही ठरवलेल्या ठिकाणी आणलंस....हो हो तुझे पैसे तुला मिळतील.....पण याद राख ह्याबद्दल कुणाला बोललास तर तुझं हाड पण जागेवर ठेवणार नाही....कळलं काय....हा...हा लगेच पाठवतो पैसे....चल ठेव"
कुमारने कानावरून फोन काढला....आणि दुसरा एक नंबर सिलेक्ट करून कॉल केला
"हा डॉक्टर.....वेळ झाली आहे....तुम्ही आणि तुमचा स्टाफ तिथून बाजूला व्ह्या.....अनिताला बाहेर जाऊ दे....आणि उद्या पोलीस आल्यावर काय बोंब मारायची हे मी तुम्हाला आधी सांगितले आहेच....सो....सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे"
कुमारने फोन खिश्यात ठेवला
"मरिना सगळं व्यवस्थित आहे.....काल अनिताने रस्त्यावर जो तमाशा केला आहे त्यामुळे सिद्ध होईल की ती वेडी झाली होती.....सोबत डॉक्टर पण जबाब देईल...आपल्यावर कोणताही आरोप होणार नाही"
मरिना कुमारकडे बघून हसली......
"आता माझं कामं"
अस बोलून तिने आपल्या जवळचे पाच खडे हातात घेतले....त्यावर छोट्या बाटलीतुन आणलेलं रक्त टाकलं.....आणि आपली मूठ आवळून ती त्या मुठी जवळ आपले ओठ नेऊन मंत्र म्हणू लागली.....तिच्या मुठीतून रक्ताचा ओघळ तिच्या गोऱ्या हातावरून वाहत होता.....तिचे पुटपुटणारे ओठ अचानक शांत झाले.....आणि तिच्या हातावरून ओघळणारे रक्त परत तिच्या मुठीत जाऊ लागलं.....मरिना हसली....त्या दगडांनी सगळं रक्त शोषून घेतलं होतं.....तिने ते दगड आपल्या हातात घट्ट पकडले....आणि परत कुमारच्या मिठीत गेली.....कुमार तिला सावरत स्मितहास्य करीत बोलला....."आता परत मला उद्या रडण्याचं नाटक केलं पाहिजे"....दोघांच्या हसण्याखिदळल्याचा आवाज सगळ्या बंगल्यात घुमत होता
मरिनाने केलेल्या काळ्या जादूचा परिणाम इकडे हॉस्पिटलमध्ये अनितावर होऊ लागला....ती तडफडू लागली......तिच्या जवळ कोणीही नव्हतं.....ती तळमळत होती तिच्या तळमळण्याने पूर्ण बेड हालत होता....सलाईनचे पाईप तिने उपसून काढले होते.....काही उपकरणे अनिताने खाली पडली होती.....सलाईनच्या सुया बाहेर निघाल्यामुळे हलकस रक्त तिच्या हातातून वाहत होत.....अनिता परत गुरगुरु लागली......तिने आजूबाजूला बघितलं.....टिक टिक आवाज करणारा कॉम्प्युटर तिच्या डोक्याला त्रास देत होता....आनिताने तो कॉम्प्युटर उचलून जोरात आपटला.....गुरगुरत ती हॉस्पिटल बाहेर पडली.....आपल्या काचेच्या केबिनमधून डॉक्टरांनी तिला बाहेर जाताना बघितलं आणि कुमारला फोन लावून सांगितलं......इकडे कुमार प्रचंड खुश झाला......कुमार आणि मरिना दारूच्या नशेत आनंदाने झिंगत होते
अंधारी रात्र....त्यात दवाखान्याच्या कपड्यात अनिता तळपाय घासत रस्त्यावरून चालली होती....रात्र गडद झाली होती.....आपल्या केसातून हात फिरवत येतील तेवढे केस ओढीत अनिता रस्त्यावरून चालली होती.....सलाईनच्या पाईप ओढून काढल्यामुळे रक्त वाहत होत....अधून मधून रस्त्यावरचे सडकछाप मजनू मागून शिट्टी मारत यायचे आणि अनिता समोर उभे राहिल्यावर तिने स्वतः केस उपटून केलेले अर्धे टक्कल बघून तशीच गाडी फिरवून पळून जायचे.....काहीशी रस्त्यामधून अनिता चालली होती
"ए बाई मरायचं आहे का "
असे निदान 5,6 डायलॉग तिने ऐकले होते पण प्रत्येक डायलॉगला दात विचकून अनिता पुढे चालत होती.....हायवे लागला....हायवे वरून पाय घाशीत काहीतरी बडबडत अनिता एकदम संथ चालत होती.....काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबली....आणि हायवे वरून खाली त्या माळरानावर जाऊ लागली.....ह्याची सुरवात तर तिथूनच झाली होती.....त्या माळरानावर चिटपाखरूही दिसायचं नाही....हायवेवर लावलेल्या लाईटीचा हलकासा उजेड त्या माळरानावर होता...वाटेत पडलेल्या अणकुचीदार दगडांनी आणि बाभळीच्या काट्यानी अनिताच्या पायाला जखमा केल्या होत्या....पण आतल्या अमानवी शक्तीला कुठली आलीय पर्वा.....त्यांनाही काहीतरी टार्गेट मिळालं होतं.....मरिनाच्या काळ्या शक्तीपुढे त्यांनाही झुकावं लागलं होतं.....काहीकाळ त्यांनीही मरिनाची गुलामी पत्करली होती.....आणि हे काम करून त्यांना मरिनाच्या बंधनातून मुक्त व्हायचं होत.....पाच माणसांनी एकाच तोंडून बोलावं तसा काहीसा त्यांचा संवाद सुरू झाला होता.....समोर एक खड्डा आधीपासूनच खणला होता त्याची माती बाजूला पडली होती.....अनिता पायाला येणाऱ्या रक्ताची लाली दगडावर सोडीत त्या खड्ड्यापर्यंत गेली आणि स्वतःला खड्ड्यात झोकून दिलं.....तिच्या आत असलेल्या अमानवी शक्तीला घाई होती.....अनिता खड्ड्यात धपकन पडली आणि तिने आपल्या शरीरावर माती ओढून घ्यायला सुरुवात केली.....तीच निम्मं शरीर त्या मातीखाली गेलं होतं.....अनिता दोन्ही हातानी माती ओढत होती...हाताने माती ओढण्याचा वेग प्रचंड होता..बरीचशी माती तिच्या तोंडात गेली होती......तिचा हात आपल्या शरीरावर वेगाने माती ओढत होता......तिचा हात अचानक संथ झाला.....अनिता इकडे तिकडे बघू लागली.....माती ओढणारा हात अचानक शांत झाला....तिचं निम्मं शरीर छातीपर्यंतच मातीखाली गेलं होतं.....त्याच ढिगाऱ्यावर अनिताने त्याला बघितलं आणि ती जोरात किंचाळली....तोंडातली माती कुणावरती तरी फेकून मारावी तशी त्यांच्या अंगावर उडाली...नरडं फोडून तिची शांतता भंग करणारी किंचाळी बाहेर पडली
"ए बाई मरायचं आहे का "
असे निदान 5,6 डायलॉग तिने ऐकले होते पण प्रत्येक डायलॉगला दात विचकून अनिता पुढे चालत होती.....हायवे लागला....हायवे वरून पाय घाशीत काहीतरी बडबडत अनिता एकदम संथ चालत होती.....काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ती थांबली....आणि हायवे वरून खाली त्या माळरानावर जाऊ लागली.....ह्याची सुरवात तर तिथूनच झाली होती.....त्या माळरानावर चिटपाखरूही दिसायचं नाही....हायवेवर लावलेल्या लाईटीचा हलकासा उजेड त्या माळरानावर होता...वाटेत पडलेल्या अणकुचीदार दगडांनी आणि बाभळीच्या काट्यानी अनिताच्या पायाला जखमा केल्या होत्या....पण आतल्या अमानवी शक्तीला कुठली आलीय पर्वा.....त्यांनाही काहीतरी टार्गेट मिळालं होतं.....मरिनाच्या काळ्या शक्तीपुढे त्यांनाही झुकावं लागलं होतं.....काहीकाळ त्यांनीही मरिनाची गुलामी पत्करली होती.....आणि हे काम करून त्यांना मरिनाच्या बंधनातून मुक्त व्हायचं होत.....पाच माणसांनी एकाच तोंडून बोलावं तसा काहीसा त्यांचा संवाद सुरू झाला होता.....समोर एक खड्डा आधीपासूनच खणला होता त्याची माती बाजूला पडली होती.....अनिता पायाला येणाऱ्या रक्ताची लाली दगडावर सोडीत त्या खड्ड्यापर्यंत गेली आणि स्वतःला खड्ड्यात झोकून दिलं.....तिच्या आत असलेल्या अमानवी शक्तीला घाई होती.....अनिता खड्ड्यात धपकन पडली आणि तिने आपल्या शरीरावर माती ओढून घ्यायला सुरुवात केली.....तीच निम्मं शरीर त्या मातीखाली गेलं होतं.....अनिता दोन्ही हातानी माती ओढत होती...हाताने माती ओढण्याचा वेग प्रचंड होता..बरीचशी माती तिच्या तोंडात गेली होती......तिचा हात आपल्या शरीरावर वेगाने माती ओढत होता......तिचा हात अचानक संथ झाला.....अनिता इकडे तिकडे बघू लागली.....माती ओढणारा हात अचानक शांत झाला....तिचं निम्मं शरीर छातीपर्यंतच मातीखाली गेलं होतं.....त्याच ढिगाऱ्यावर अनिताने त्याला बघितलं आणि ती जोरात किंचाळली....तोंडातली माती कुणावरती तरी फेकून मारावी तशी त्यांच्या अंगावर उडाली...नरडं फोडून तिची शांतता भंग करणारी किंचाळी बाहेर पडली
समोर कमरेला वाघाचं कातडं गुंडाळलेला अघोरी साधू उभा होता....त्याच्या हातात एक काठी होती त्यावर पितळी नागाचे शिल्प कोरले होते....लांबच लांब जटा....अंगावर चिताभस्म चापून फसले होते त्याच चिताभस्माने त्याची दाढी पांढरी फेक पडली होती....एका जिवंत विषारी सापाने त्याच्या हाताला विळखा घातला होता जणू तो त्याचा पाळीवच होता....त्याने आपल्या हातातील काठी मातीच्या ढिगाऱ्यावर आपटली "शंभू शंकर" मंत्राच्या उच्चाने ती काठी त्या भुसभुशीत मातीत रुतली.....इकडे अनिताची हालचाल बंद झाली....थंडगार बर्फाच्या लाटेने शरीर गोठवे तशी ती गोठल्यासारखी स्तब्ध झाली.....अनिताचे तोंड उघडले आणि अघोरीने वाकून सरळ आपली बोटं अनिताच्या तोंडात घातली....काहीतरी त्याच्या हाताला लागलं होतं....अघोरीच्या हाताच्या शिरा ताणल्या....काहीतरी रबरासारख चिकट त्याच्या हाताला लागलं....अघोरी आपली सगळी ताकत लावून ते काळं ओढून काढत होता......बाहेर येणारा तो पदार्थ सापासारखा वळवळत होता.....अघोरीने सगळा ओढून बाहेर काढला.....इकडे अनिता बेशुद्ध झाली.....अघोरीने उजवीकडे बघितलं "वाचवलं बघ मी" अस बोलून आपल्या हातातली काठी त्या काळ्या अमानवी पदार्था समोर नेली.....पितळेच्या नागाच्या शिल्पात अचानक जीव यावा तसे त्याचे डोळे लकाकले....आणि तो नाग ती अमानवी ताकतील अक्षरशः गिळू लागला.....अनिताच्या आतून निघालेली काळी शक्ती नागाने संपूर्ण गिळून टाकली.....अघोरीची काठी 5 इंच अजून मोठी झाली....अघोरीने हसून दाढीवरून हात फिरवला....."शंभू शंकर" ......अनिता बेशुद्ध झाली होती......अघोरीने आपल्या कमंडलू मधले पाणी मंत्रोच्चार करीत अनिताला पाजले.....तशी ती काही वेळातच शुद्धीवर आली....अघोरीने तिला ओढून वर काढले....अनिता अघोरील बघून घाबरली....त्याच्या डोळ्याच्या खाचा झाल्या होत्या.....पण आपल्या बरोबर जे झालंय त्याची तिला पुसटशी कल्पनाही होती....तिने अघोरी समोर हात जोडले......त्या पाण्यामुळे तिच्या वेदना जराश्या थंड झाल्या होत्या....एका डोळ्याने अघोरीने हात जोडून उभ्या असलेल्या अनिताकडे बघितले
"अरे नही नही बेटा.....आभार मानायचे असतील तर तुझ्या आईचे मान....."
अनिता गोंधळली...."आई??...माझी आई तर........"
अघोरीने तिला आपल्या बटव्यातला मलम दिला...आणि हसत म्हणाला
अघोरीने तिला आपल्या बटव्यातला मलम दिला...आणि हसत म्हणाला
"तुझ्या आईचं शरीर जरी ह्या जगात नसलं तरी तीच लक्ष नेहमी तुझ्यावर होतं....अशीच मेली नाहीय ती....कुठल्यातरी चांडाळनीच्या काळ्या जादूचा बळी गेलीय ती....दिसतंय मला सगळं...अग त्या डोंगरावरच्या शंकराच्या मंदिरात तपस्या करत होतो मी.....भूत प्रेतांना माझ्या काठीने गुलाम केलंय मी....तरीही न मला न घाबरणारा करुणामय आवाज मला आला...."माझ्या पोरीला वाचवा" ह्या आर्त हाकेपुढे मला नमावं लागलं.....माझ्या जवळपास भूतप्रेत टिकू शकत नाही तरी तुझ्या आईची आत्मा माझ्या जवळ आली.....हे धाडस फक्त एक आईच करू शकते बाळ....फक्त आई"
अनिताच्या डोळ्यात अश्रू आले....तिला त्या समोर काहीच दिसत नव्हतं तरी तिने हात जोडले....अघोरी उजवीकडे बघून हसू लागला
"तुझी आई तुला आशीर्वाद देत आहे बाळ......"
अघोरीने उजवीकडे बघितलं
"घाबरू नको माते.....सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय.....मी देतो तुला शक्ती....जा माते तुझ्या पोरीच्या जीवावर उठणाऱ्या नराधमांना शिक्षा कर"
अघोरीने उजवीकडे बघितलं
"घाबरू नको माते.....सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय.....मी देतो तुला शक्ती....जा माते तुझ्या पोरीच्या जीवावर उठणाऱ्या नराधमांना शिक्षा कर"
"शंभू शंकर" मंत्राबरोबर अघोरीने हवेत चिताभस्म उडवला.....तो भस्म काही वेळ हवेत तरंगत राहिला आणि वाऱ्याच्या वेगाने हवेत उडत शहराकडे गेला
मरिना आणि कुमार दोघेही नशेत सोफ्यावर लोळत पडले होते.....मरिनाची मूठ अचानक आवळली गेली आणि ती जागी झाली....तिने आपल्या हाताकडे अर्धवट उघड्या डोळ्यांनी बघितलं....ती ताडकन उभी राहिली....तिच्या हातातील पाच खड्यांची राख झाली होती....तिला काही समजेना....तिने कुमार कडे बघितले.....कुमार सोफ्यावर उठून एकटक मरिनाकडे बघत होता.....ही नजर काहीशी वेगळी होती....सताड उघडे डोळे...हे ते नशेचे डोळे नव्हतेच....मरिना सावध झाली....तिने एक मंत्र पुटपुटला आणि आपल्या पर्समधून आणलेल्या राखेचे रिंगण आपल्या भोवती आखलं......मरिना घाबरली होती कारण तिला समोर कुमारची बायको अर्चना दिसत होती.....मरिनाला घाम फुटला होता....कुणीतरी तिच्या काळ्याशक्तींना आव्हान देत होत....कुमार जवळ येत होता.....समोरच्या टेबलावर ठेवलेला सफरचंदाबरोबर असलेला चाकू त्याने उचलला....मरिना काहीसे विचित्र मंत्र पुटपुटत उभी होती.....कुमार मरिनाने आखलेल्या रिंगणाच्या बाहेर उभा होता....मरिना हसली
"तू....तू मला टच पण नाही करू शकत...."
"तू....तू मला टच पण नाही करू शकत...."
कुमार रिंगणाबाहेर उभा होता....काहीश्या मऊ आणि बाईच्या आवाजात तो बोलला
"एकदा फसले परत नाही फसणार....माझ्या पोरीला हातही नाही लावू देणार"
अस बोलून ती सरळ त्या रिंगणात गेली....अनेक वर्षे तपस्या करून सिद्ध केलेल्या अघोरीच्या शक्ती पुढे मरिनाची ताकत हारली.....मरिनाने आखलेल्या रिंगणाला आग लागली....काही कळायच्या आत कुमारने चाकू सरळ मरिनाच्या पोटात खुपसला....सपासप वार होताच मरिना जोरात किंचाळली....आवाज ऐकून किचनमधून नोकर रामू धावत धावत आला....रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मरिना बघून तो घाबरला.....कुमार मागे फिरला....रामुला बघून जोर जोरात हसला.....कुमारने आपल्या हातातील मरिनाच्या रक्ताने लालभडक धारदार चाकू आपल्या गळ्यावरून फिरवला.....रामू हे सगळं बघत होता.....कुमारच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या...पण तो आपल्या शरीरावर वार करतच होता.....रामू बाहेर पळाला.....कुमार हसत हसत खाली पडला.....निपचित पडलेल्या कुमारच्या तोंडातून पांढरासा धूर बाहेर पडला....समोर त्याला अर्चना दिसली.....त्याने एकनजर आपल्या शरीराकडे बघितलं.....सगळ्या अंगाला चाकूने भोकसून काढलं होतं.....रक्ताचे पाट मरिनाच्या आणि कुमारच्या शरीरातून वाहत होते...मरिना कधीच डोळे उघडे करून निपचित पडली होती..जड डोळ्यांनी कुमारने स्मितहास्य करणाऱ्या अर्चनाकडे बघत जीव सोडला.......
रामुने पोलीस स्टेशनला फोन लावला....पोलीस येईपर्यंत सगळा खेळ संपला होता....सगळं रामुच्या समोर घडलं होतं...रामुने आपला जवाब नोंदवला होता.....पोलिसांनी आत्महत्याचा शिक्का लावून केस क्लोज केली.....अर्चनाने अघोरी कडून सगळी हकीकत अनिताला सांगितली......दुसऱ्या दिवशी अनिता घरी आली......त्या मोठ्या बंगल्यात तिला एकटीला रहायचं होतं......तिने काही दिवसात स्वतःला सावरलं.....पुढचं आयुष्य जगायला ती तयार होती....आणि अघोरीचे ते शब्द तिच्या कायम लक्षात होते........"तुझी आई नेहमी तुझ्या बरोबर आहे"
(समाप्त)
(समाप्त)
✍️लेखन -- शशांक सुर्वे
(कथा कशी वाटली ह्याबाबत आपला बहुमूल्य अभिप्राय कमेन्ट बॉक्समध्ये जरूर नोंदवा......धन्यवाद)