राक्षस भाग 3
- विनोद जांभळीकर
- विनोद जांभळीकर
रात्रीच्या अंधारावर मात करून सूर्याची कोवळी, सोनेरी किरणं सर्व परिसरात पसरली होती. डोंगराच्या मागून सूर्य हळुवारपणे डोकावत होता. थंड हवेची झुळूक, धुक्याची चादर आणि पक्षांच्या किलबिलाटाने सर्व वातावरणात प्रसन्नता होती.
पहाटेच सर्व आवराआवर करून पाचही जण निघायची तयारी करत होते. तेथून निघण्याआधी ते सर्व जण मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. दर्शन घेऊन सगळे आता गाडीकडे जाऊ लागले, पण स्वप्निल मात्र मंदिराच्या बाजूला असलेल्या त्या दुकानाकडे पाहू लागला. आज दुकानात दुसरा व्यक्ती बसलेला होता. स्वप्निल दुकानाकडे गेला आणि त्या वक्तीला विष्णू बाबा बद्दल विचारू लागला.
स्वप्निल :- काल येथे विष्णू बाबा म्हणून एक आजोबा होते, त्यांनी आम्हाला काही माळी दिल्या होत्या आणि पैसे पण घेतले नव्हते.
स्वप्निल आपल्या व्हॉलेट मधून पैसे काढत बोलू लागला.
तो वक्ती स्वप्निल कडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, साहेब म्याच विष्णू बाबा हाय, अन मी कधी तुमास्नी काय दिल. मी तर तुम्हाला पहिल्यांदाच इथं बघतोय.
स्वप्निल पार गोंधळात पडला, तेव्हड्यात शंकर गाडीचा हॉर्न वाजवत स्वप्निल ला हाका मारू लागला.
गाडीचा हॉर्न एकूण स्वप्निल शुद्धीवर आला आणि गाडीकडे जाऊ लागला...
गाडी आता पुढच्या प्रवासासाठी निघाली. गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी चालू होती, सर्व जण धिंगाणा घालत होते. पण स्वप्निल मात्र अजून त्याच विचारात होता. काही अंतर कच्च्या रस्त्यावर चालून गाडी आता हायवे ला लागली होती. पुढे एका धाब्यावर थांबून सर्वांनी नाष्टा केला व थोड्या वेळ थांबून ते तेथून निघाले. अमोल ने gps चालू केला व लोकेशन पाहू लागला. थोड्याच वेळात गाडी एका वळणावर थांबली. हायवेला लागूनच पुढे जंगलात जाणाऱ्या रस्त्याकडे पाहून अमोल म्हणाला, हा शॉर्टकट आहे आपण ह्या रस्त्याने जाऊया. हायवे वर गाड्यांची वर्दळ होती, आणि हा रस्ता तसा मोकळा शिवाय घनदाट जंगलातून जाणारा, एक ऍडव्हेंचर म्हणून अगदी साजेसा म्हणून सर्वांनी होकार दर्शवला. पण विनोद मध्येच बोलला, "नका रे आपण हायवेनेच जाऊ, हा रस्ता जंगलातून जाणारा आहे शिवाय एकही गाडी ह्या रस्त्यावरून जाताना दिसत नाहीये. जर भर जंगलात गाडी बंद पडली तर कोणी मदतीलाही नसणार.
शुभम :- तू नेहमी निगेटिव्हच विचार का करतो रे, आपण एन्जॉय करायला आलो आहोत ना इकडे मग एन्जॉय कर ना उगाच कशाला नको ते विचार करतो. रस्त्याच्या बाजूला असलेला,रात्री 8 वाजे नंतर प्रवेश निषेध असा फलक स्वप्निल ने बघितला व सर्वाना तो फलक दाखविला.
विनोद :- अरे मी सांगतोय ह्या रस्त्याने नको जाऊया.
अमोल :- अरे खुळ्या येथे रात्री 8नंतर प्रवेश निषेध आहे, आता सकाळचे 11 वाजलेत.आपण 1 तासात हे जंगल पार करू.
शंकर ने विनोदच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी जंगलाकडे वळवली. गाडीने आता जंगलात प्रवेश केला होता. अरुंद रस्त्यावरुन सावकाश गतीने शंकर गाडी चालवत होता. घनदाट झाडांमुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नव्हता त्यामुळे भर दिवसाही थोडा अंधार दाटला होता. सर्व जण गाडीतून ते घनदाट जंगल पाहत होते. तेव्हड्यात विनोदला जंगलाच्या थोड्या आतमध्ये एक सुंदर पिसारा फुलवलेला मोर दिसला. त्या मोराला पाहून विनोदने शंकरला गाडी थांबवायला सांगितली व सर्वाना तो मोर दाखवला पण झुडपांमुळे कोणालाही काही दिसत नव्हते. म्हणून शंकरने एका भल्या मोठ्या जुनाट वडाच्या झाडाखाली गाडी थांबवली आणि पाठीवर बॅग अडकून सगळ्यांसोबत थोडं जंगलाच्या आत गेला. जंगल आतून फार विशाल आणि घनदाट होते. अमोल कॅमेरॅतून त्या जंगलातील दृश्य टिपत होता. दिवस माथ्यावर आला होता, थोडा वेळ जंगलात थांबूया ह्यावर सगळ्यांचं एकमत झालं. विशेष म्हणजे जंगलात येण्यास नकार देणारा विनोद सुद्धा आता येथे रमला होता. ते सर्व जण जंगलाच्या अगदी थोडं आतमध्ये गेले होते, त्यांना आतून रोडवर असणारी त्यांची गाडीही सहज दिसत होती.
कोणत्याही नवीन ठिकाणी पुढे असणारा आणि जिज्ञासू वृत्तीचा स्वप्निल म्हणाला, " चला मित्रांनो आपण थोडं अजून जंगलाच्या आतमध्ये जाऊया आणि अंधार पडायच्या आत परत येऊया. ह्यावर सगळ्यांनी सहमती दर्शवली, आणि सगळे जंगलाच्या आत मध्ये जाऊ लागले. स्वप्निल सर्वात पुढे होता, अमोल आणि विनोद हे दोघे मागे होते. परत येताना वाट चुकू नये म्हणून अमोल दगडाने झाडाच्या खोडांवर खुणा करत होता. थोडं अंतर चालून आत मध्ये गेल्यावर त्यांना एक छोटासा तलाव दिसला, एवढ्या घनदाट जंगलात एव्हडा सुंदर तलाव पाहून सगळे खुश झाले, तलावाच्या बाजूला सुंदर अशी फुलांची वेल होती, तळ्यात कमळाची फुले अगदी थाटात उभे होती, आजूबाजूला वेगवेगळ्या पक्षांचे थवे होते.एखाद्या चित्रकाराणे आपले सर्व रंग ओतून एक सुंदर अस चित्र रेखाटाव तस हे दृश्य पाहून सगळे आंनदी झाले.पण तेथील वातावरणात प्रसन्नता नव्हती,जशी प्रसन्नता त्यांना मंदिराजवळच्या त्या धबधब्या जवळ जाणवली. असं वाटत होत कि तेथील पशुपक्षी कोणाच्यातरी दबावाखाली जगत आहेत.जंगलातील हे सौंदर्य शापित असल्यासारखं जाणवत होत, सतत कोणीतरी आपल्यावर नजर ठेऊन आहे असं वाटत होत.ह्याकडे दुर्लक्ष करत सर्वांनी तलावात उड्या मारल्या. सर्व जण तलावात मजा करत होते, ह्यामध्ये वेळ कसा गेला हे कोणालाही कळालंच नाही. दिवस मावळतिला आला होता, आधीच जंगलात घनदाट झाडांमुळे कमी प्रकाश पसरलेला होता त्यात आता संध्याकाळ होत होती त्यामुळे आता जंगलात हळूहळू अंधार दाटत होता. आता सर्व जण भानावर आले, आणि जंगलाच्या बाहेर निघण्यासाठी रस्ता शोधू लागले.अमोल ने झाडाच्या खोडांवर खुणा केल्या होत्या. त्याआधारे ते जंगलाच्या बाहेर जाऊ लागले.खूप वेळ झाला तरी अजून काही ते जंगलाच्या बाहेर पडत नव्हते. रस्त्यापासून तलावापर्यंत येण्यासाठी केवळ त्यांना 20 ते 25 मिनिट लागले होते पण आता जवळजवळ एक तास होत होता आणि अजून ते जंगलाच्या बाहेर निघाले नव्हते.
शुभम :- आमल्या तू झाडावर खुणा केल्या होत्या ना, तरी पण आपण रस्ता कसा काय चुकलो, शुभम रागाने अमोल वर ओरडला.
अमोल :- अरे मी केल्या होत्या खुणा, आणि आपण त्याच खुणा पाहत चालतोय.
शुभम :- मग अजून आपण बाहेर का नाही आलो.
अमोल :- कोणीतरी माझ्या सारख्याच झाडावर खुणा करून आपला रस्ता चूकवला, अमोल निराश होऊन म्हणाला.
स्वप्निल :- आपआपसात भांडण्यापेक्षा रस्ता शोधा, स्वप्निल रागाने म्हणाला.
दिवसभर धिंगाणा मजामस्ती करून सगळे जण दमले होते आणि भूकही लागली होती, त्यामुळे सर्वांची आता चिडचिड होत होती.
रस्ता चुकून, जंगलाच्या बाहेर पडण्या ऐवजी ते खूप आतमध्ये पोहचले होते. जंगलात आता अंधार पसरला होता. रात्रीच्या अंधारात काहीही दिसत नव्हतं.त्यामुळे सर्वांनी आजची रात्र जंगलात काढायचीे असे ठरवले. दिवसा जंगल जेव्हढं सुंदर दिसत होत तेव्हडेच रात्रीच्या अंधारात भयान वाटत होते. एक मोकळी जागा शोधून सर्वांनी तेथे थांबायचं असं ठरवलं. शंकरने खिशातून लाईटर काढून आग पेटवली, आणि सगळे त्या आगीभोवती बसले. सगळे जण खूप दमले होते आणि भूकही लागलेली होती.मोबाईलला पण नेटवर्क नव्हतं कोणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
शंकरने आपल्या बॅगेतुन थोडे व्हेपर्स, फळे आणि त्या मंदिरातून घेतलेला प्रसाद काढला तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक आली.नेहमी सगळ्यांच्या शिव्या खाणाऱ्या शंकरची आज पहिली वेळेस सर्वांनी तोंडभरून स्तुती केली. थोडं पोट भरलं कि परत सगळ्यांची बडबड सुरु झाली.फक्त कधी एकदाची सकाळ होते ह्याची वाट सर्व जण बघत होते.
आता रात्रीचे 11 वाजून गेले होते सर्वांना झोप येत होती.
विनोद :- आपल्या पैकी कोणी एक जण जागी राहून पहारा देईन आणि बाकीचे झोपतील. मी थोडा वेळ जागी राहतो तुम्ही झोपा.
सर्वांना विनोदची गोष्ट पटली आणि सगळ्यांनी थोडा वेळ झोप घेण्याचे ठरवले. काही वेळानंतर विनोदने शंकरला उठवले व स्वतः झोपला. शंकर आता एकटाच जागी होता. जंगलात काळोखाचे साम्राज्य पसरले होते, सगळीकडे स्मशान शांतता होती. तेव्हड्यात त्याला समोरच्या झुडपात काहीतरी हालचाल जाणवली. कोणतीतरी त्या झुडपाच्या मागे आहे असे शंकर ला वाटले.शंकर आता सावध झाला, तो दबक्या पावलांनी त्या झुडपाकडे जाऊ लागला. शंकर आता झुडपाच्या अगदी समोर होता.घाबरत त्याने झुडपात एक दगड मारला, अचानक त्या झुडपातून एक ससा शंकरच्या पायाखालून पळत जंगलात दिसेनासा झाला. शंकर खुप घाबरला होता पण सश्याला पाहून त्याला स्वतःच्या मूर्खपणावर हसू आले. शंकर आता मागे वळणार तोच त्याला थोड्या अंतरावर कोणीतरी हातात पेटती मशाल घेऊन उभा असलेलं दिसले. शंकर ला वाटलं तो कोणीतरी फ़ॉरेस्ट गार्ड आहे, शंकर त्या व्यक्तीला आवाज देऊ लागला पण तो व्यक्ती तसाच पुढे जंगलात जाऊ लागला. शंकरला वाटले कि सगळ्यांना जाऊन उठवावे, पण लगेच त्याला विचार आला कि, तो व्यक्ती जर निघून गेला तर आपण इथेच अडकून राहू म्हणून शंकर त्या व्यक्तीच्या मागे गेला.शंकर धावत होता आणि तो व्यक्ती संथ गतीने चालत होता तरीपण शंकर त्या व्यक्ती जवळ पोहचत नव्हता. आणि अचानक तो व्यक्ती दिसेनासा झाला. शंकरला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, तो पूर्ण गोंधळून गेला. तो आता परत मागे फिरला पण त्याला परतिचा रस्ता सापडत नव्हता, त्याला स्वतःचा खूप राग आला , " झक मारली अन त्या माणसाच्या मागे आलो, असं तो स्वतःशीच बोलत वाट शोधू लागला. शंकर आपल्या मित्रांना आवाज देत पुढे चालू लागला, थोडं अंतर चालत गेल्यावर त्याला समोर काहीतरी हालचाल जाणवली. अंधार खूप असल्याने नीट काही दिसत नव्हते पण नक्की तेथे कोणीतरी होते.शंकर हळूहळू त्या दिशेने जाऊ लागला, नाही म्हटलं तरी एक अनामिक भीती त्याच्या मनात होती.थोडं पुढ आल्यावर त्याला जे दिसलं ते बघून त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. समोरच दृश्य अगदी किळसवाणं आणि भयानक होत. काळे वस्त्र परिधान केलेला एक राक्षस, होय राक्षसच होता तो. देह जरी माणसाचा असला तरी माणुसकीचा लवलेशही त्याच्यात नव्हता. हातामध्ये एक धारदार शस्त्र घेऊन खाली पडलेल्या एका व्यक्तीवर तो जोरजोरात वार करत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या व्यक्तीचा प्राण केव्हाच गेला होता तरीसुद्धा तो राक्षस थांबत नव्हता.अगदी निर्घृण पणे तो त्या व्यक्तीवर वार करत होता, त्यात त्याला कदाचित एक असुरी आनंद मिळत असावा.सगळीकडे रक्ताचा सडा, त्या व्यक्तीच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.पोट फाटून आतडे बाहेर आले होते. बाजूला असलेल्या माशालीच्या प्रकाशात शंकर हे भयाण दृश्य बघत होता.तेव्हड्यात त्या राक्षसाने शंकर कडे बघितले.शंकरच्या पायाखालील जमीन सरकली, त्या राक्षसाचा चेहरा पूर्ण रक्ताने माखलेला होता. त्याने शंकर कडे बघून एक क्रूर हास्य केल आणि त्याच्याकडे जाऊ लागला. शंकरला समोर आपला मृत्यू दिसत होता, त्याला तेथून जोरात पळ काढायचा होता पण संमोहित झाल्यासारखा तो तिथेच उभा राहिला.तो राक्षस आता त्याच्या जवळ येत होता, शंकर जोरात ओरडला आणि तेथून सैरावैरा धावत सुटला. एखादा शिकार जसं शिकाऱ्याला पाहून जीव मुठीत धरून धावत सुटतो तशी अवस्था शंकरची झाली होती.अंधारात वाट दिसेल तसा तो धावत,पडत एका झाडाच्या खोडाजवळ तो बसला. खूप धावल्याने त्याला दम लागला होता, अचानक एक हात शंकर च्या खांद्यावर पडला. भीतीन त्याच्या काळजाच पाणी-पाणी झालं. मागे वळून बघायची त्याची हिम्मत होत नव्हती. खूप हिम्मत करून शंकरने आपली मान वळवली, आणि मागे तोच उभा होता. तो राक्षस....
जवळून त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता. त्या राक्षसाने एका हाताने शंकरची मान पकडली, शंकर खूप झटापटा करत होता पण त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. एखाद्या कसाई जसा कोंबडी हलाल करण्यासाठी घेतो तशी अवस्था शंकरची झाली होती.मृत्यू त्याला समोर दिसत होता पण शंकरने त्या राक्षसाला ओळखले होते. शंकर काही बोलणार तोच त्या राक्षसाने एक जोरदार वार शंकरच्या मांडीवर केला.चरररकन रक्ताची धर उडाली, शंकर जीवाच्या एकांताने ओरडला आणि वेदनेने विव्हळू लागला.त्या राक्षसाने त्याला जमिनीवर जोरात आपटले. शंकर धावण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला, पण त्याच्या मांडीला झालेल्या दुखापती मुळे त्याला धावता येत नव्हते.एखाद्या पिंजऱ्यातल्या पक्ष्याप्रमाणे शंकर तडफडत होता, आपल्या प्राणाची भीक मागत होता. पण त्या पाषाण हृदयी असुराला त्याची तिळमात्रही दया येत नव्हती. एका झटक्यात त्याने शंकरला बाजूला असलेल्या झाडावर आपटले, शंकरच्या डोक्याला जोरात मार बसला आणि त्याची शुद्ध हरपली.तो राक्षस त्याला फरफटत घेऊन गेला....

क्रमश: