राक्षस भाग 2
-विनोद जांभळीकर
-विनोद जांभळीकर
3 वर्षा पूर्वी :-
एक गाडी भरधाव वेगाने रात्री चा अंधार चिरत रस्त्यावर चालली होती. गाडीमध्ये FM चालू होता.

अनावृष्ट्या विनङ्क्ष्यन्ति दुर्भिक्षकरपीडिताः
शीतवातातपप्रावृड् हिमैरन्योन्यतः प्रजाः ॥

अर्थ :- बदलणाऱ्या वेळेत निसर्गामधेही बदल होत जातील. कलयुगात कुठे जास्त पाऊस तर कुठे भीषण दुष्काळ असेल, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे भयंकर ऊन. कधी वादळ तर कधी महापूर येईल. ह्यामुळे लोक त्रस्त होतील आणि हळूहळू सर्व नष्ट होईल....
हे सर्व ऐकून दिपक गालात हसला आणि त्याने F. M. बंद केला. अक्षय गाडी चालवत बोलला, काय रे दिपक FM का बंद केला. कलयुगाच भाकीत ऐकून घाबरलास कि काय?
दिपक :- छे रे! असल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. विज्ञानाणे इतकी प्रगती केली, अन तू अजून हे जुने ग्रंथ वाचण्यात आपला वेळ घालवतोस.

अक्षय :- मित्रा जिथे विज्ञानाची व्याप्ती संपते तेथून आध्यत्म सुरु होतो. तुम्ही लोकांनी विज्ञानाची पट्टी डोळ्यावरन काढली तर तुम्हाला नक्की आध्यत्म समजेल.
दोघांचा वाद चालू होता, बाहेर मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर जास्त गाड्यांची वर्दळ नव्हती, त्यामुळे गाडी भरधाव वेगाने अंतर कापत होती.
अक्षय आणि दिपक दोघे बिझनेस पार्टनर, पण दोघांचा स्वभाव मात्र निव्वळ विरुद्ध. अक्षय हा अध्यात्मिक तर दिपक हा नवीन विज्ञानवादी विचारांचा.दोघेही एका मीटिंग साठी दुसऱ्या शहरात जात होते.प्रवास खूप लांबचा होता, शिवाय रस्ता ही अनोळखी आणि त्यात ही पावसाची भर त्यामुळे दोघेही खूप वैतागले होते. लवकर पोहचण्यासाठी दिपक ने गुगल मॅप चालू केला आणि शॉर्टकट शोधू लागला.
दिपक :- गाडी ह्या बाजूच्या रस्त्याने घे अक्षय, हा रोड जवळजवळ आपला 45 km चा प्रवास कमी करेल.
अक्षय :- नको, रात्र आहे शिवाय हा मुसळधार पाऊस.अश्या परिस्थितीत महामार्ग सोडणे बरोबर नाही. अन माझं मन सुद्धा सांगतय कि हा रस्ता बरोबर नाहीये.
दिपक :- मुर्खा सारखं बोलू नकोस, तुझ्या मनाचं मला माहित नाही पण हे बघ गुगल मॅप ह्यावर स्पष्ट दिसतय कि हा शॉर्टकट आपल्या कामाचा आहे. दिपक चिडून बोलला.
अक्षय :- शांत पणे, मित्रा तुझी टेकनॉलॉजि दगा देऊ शकते, पण माझं मन मला कधीच दगा देणार नाही.
ह्या गोष्टी वरून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. शेवटी अक्षय ने नाईलाजाणे गाडी महामार्गा वरून खाली उतरवली व मेन रोडला समांतर व पुढे जंगलातुन जाणाऱ्या रस्त्याकडे गाडी वळवली. रोड च्या बाजूला 8 वाजेनंतर प्रवेश निषेध असणाऱ्या फलकाकडे दोघंचही लक्ष गेलं नाही.
रात्रीचे 12 वाजत आले होते. रोड वर फक्त ह्यांची गाडी धावत होती. आजूबाजूला घनदाट जंगल, गाडीच्या हेडलाईट चा तेवढा प्रकाश पडत होता. दोघांच्याही मनात एक अनामिक भीती होती. एरव्ही गप्पागोष्टी, वाद घालणारे दोघे, शांत होते. अक्षय गाडी सुसाट वेगाने पळवात होता. लवकरात लवकर त्याना हे जंगल पार करायचे होते. अचानक गाडी समोर कोणीतरी आलं, अक्षय ने जोरात ब्रेक मारला.कर्रर्रर्र आवाज करत गाडी थाबली. दोघेही एकमेकांकडे आचर्याने पाहत होते, हिम्मत करून दोघे गाडी बाहेर आले. दोघानीं आजूबाजूला बघितले पण कुठेही काहीच दिसलं नाही. त्यांना काहीही समजत नव्हतं ते परत गाडीत बसले. अक्षय गाडी स्टार्ट करत होता, पण गाडी चालू होत नव्हती. एका भव्य आणि जुन्या वडाच्या झाडाखाली त्याची गाडी बंद पडली होती. मोबाईल ला नेटवर्क पण नव्हते म्हूणन दोघेही गाडी बाहेर आले. बाजूच्या झुडपातुन कोणीतरी त्यांची प्रत्येक हालचाल लक्ष देऊन पाहत होते. दिपक लघुशंके साठी रोड च्या खाली उतरून थोडं जंगलाच्या आत गेला. अक्षय मोबाईलच्या उजेडात गाडीचं इंजिन बघत होता. खूप वेळ झाला दिपक अजून आला नाही म्हणून अक्षय त्याला आवाज देत होता पण कोणतेही प्रतिउत्तर त्याला मिळत नसल्याने तो ही जंगलात गेला.ते परत कधीही न येण्यासाठी......

चालू वर्ष :-
येथे पाचही जण आपापल्या तयारीत होते. उद्या सकाळी निघायचं होते. पावसाळ्याची सुरुवात नेमकीच झाली होती. त्या मुळे निसर्गरम्य वातावरणात फिरता यावं त्यासाठी विनोद ने आणखी दोन स्पॉट सुचवले व सगळयांनी संमतीही दर्शवली. सकाळी सर्व जण शुभम च्या घरी जमले, आणि प्रवासाचा श्रीगणेशा झाला.
शंकर गाडी चालवत होता, स्वप्निल त्याच्या बाजूला बसलेला होता. अमोल व शुभम गप्पा मारत होते, विनोद काहीतरी वाचत बसलेला होता. तासभरात गाडी शहराच्या बाहेर आली. शहराच्या वर्दळीतुन गाडी आता निसर्गाच्या सानिध्यात मस्त वळण घेत निघाली होती.मृगनक्षत्राचे आगमन होऊन संपूर्ण निसर्ग सजला होता.थंडगार वारा अंगाला झोंबत होता, सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. गाडी मध्ये सर्व जण गप्पा मारत होते, पण विनोद मात्र काहीतरी वाचत होता. स्वप्निल ने अमोल ला नजरेने खुणावलं आणि सगळ्यांनी विनोद कडे मोर्चा वळवला.
अमोल :- इकडे सर्व जण एन्जॉय करतायेत अन तू काय ह्या पुस्तकात तोंड घालून बसला रे.
विनोद :- काही नाही रे मित्रा टाइम पास म्हणून हे बुक वाचतोय.
शुभम :- काय वाचतो आम्हाला पण सांग कि.
विनोद :- काही नाही रे ह्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे मंत्र आहेत.
हे ऐकून स्वप्निल हसू लागला. आणि म्हणाला, ह्या असल्या गोष्टी वाचून एक दिवस वेड लागेल तुला.
विनोद :- स्वप्निल तुझा ह्या गोष्टीवर विश्वस नाही माहित आहे मला, ह्याचा अर्थ असा होतं नाही कि ह्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. चल तुला एक गोष्ट सांगतो खुप जुनी. विनोद गोष्ट सांगू लागला, सगळे मन लावून गोष्ट एकत होते.
ही गोष्ट समुद्रमंथनाच्या आधीची आहे. तेव्हा देव आणि राक्षस हे दोघेही नश्वर होते म्हणजे तेव्हा देवतांनी अमृत प्राशन केल नव्हतं त्यामुळे त्यांंचाही मृत्यू व्हायचा. त्यावेळी राक्षस हे देवांपेक्षा तुलनेने जास्त बलवान होते. तेव्हा देव आणि राक्षसांमध्ये सदैव युद्धे व्हायची, ह्यामध्ये देवता आणि राक्षस हे दोघेही आपला प्राण गमवायचे. पण राक्षसांचे गुरु शुक्राचार्य त्यांना एक मंत्र अवगत होता. त्या मंत्राच्या साहाय्याने ते पुन्हा मृत राक्षसांना जिवंत करत असत. राक्षस मारायचे व पुन्हा जिवंत व्हायचे. तो मंत्र होता “मृत संजीवनी मंत्र “ त्यालाच मृत्युन्जय मंत्र असेही म्हणतात..
कोणालाही ह्या असल्या गोष्टींमध्ये जराही रुची नव्हती पण सगळे ध्यान देऊन ऐकत होते.
गोष्ट संपली आणि त्यांचा प्रवासही, ते नियोजित ठिकाणी पोहचले. सर्व जण गाडीतून उतरू लागले.
शुभम :- ह्या कहाणी मध्ये जरी राक्षस अमर असले तरी काळानंतने देवतांनी सर्व राक्षसांचा नाश केला. सगळ्यांचा मृत्यू झाला.
विनोद :- थोडं गालात हसून, मित्रा राक्षस कधीच मरत नाही.......
ते ज्या ठिकाणी पोहचले ते एक खूप जून आणि प्रसिद्ध असं श्रीकृष्णा चं मंदिर होते. सर्वांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरा च्या मागे एक मोठा धबधबा होता.पावसाळा होता म्हणून खूप पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येत असत. सगळे जण तो धबधबा पाहण्यासाठी गेले. एका विशाल अश्या टेकडीवरून पांढरा शुभ्र,फेसाळलेला धबधबा खाली कोसळत होता. ते दृश्य पाहण्यासाठी खुप पर्यटक तेथे आले होते. सगळ्यांनी येथे खुप मज्जा मस्ती केली. दिवस मावळत आला होता सर्व जण आता मंदिरासमोर आले.मंदिरासमोर एक छोटस दुकान होत, दुकानात देवांचे फोटो, लॉकेट, अंगठ्या इत्यादी साहित्य होते. सर्व जण दुकाना जवळ गेले, एक वृद्ध व्यक्ती कॉउंटरमागे बसला होता. तेथील लोक त्यांना विष्णू बाबा म्हणत त्यांचं वय जरी झालं असलं तरी चेहऱ्यावर एक स्मित हास्य व कमालीचं तेज होत. त्या तेजस्वी व्यक्तीने सर्वांकडे एक नजर फिरवली आणि सगळ्यांना न विचारता एक चमकनाऱ्या माळा दिल्या.
विनोद :- बाबा आम्हाला नकोत ह्या माळी.
विष्णू बाबा :- घ्या पोरांनो तुम्हाला याची गरज पडेल.
सर्व जण चकित होऊन त्या व्यक्ती कडे बघत होते. आणि संमोहित झाल्यासारखं त्या माळा सर्वांनी उचलल्या.
शुभम :- किती रुपये झाले बाबा?
बाबाच्या च्या चेहऱ्यावर फक्त एक स्मित हास्य होत..
स्वप्निल :- बाबाने घेतली वाटतं, आणि सगळे हसू लागले.
रात्र झाली होती, सगळ्यांनी मंदिराच्या आवरत असणाऱ्या एका हॉटेल मध्ये जेवण केले आणि तेथेच एका लॉज वर झोपले. उद्या सकाळी उठून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते.
इकडे जंगलात रात्रीच्या अंधारात, एका मोठ्या अग्नीकुंडा समोर कोणीतरी भारदस्त आवाजात मंत्र म्हणतं होतं.

“ऊँ हौं जूं स: ऊँ भूर्भुव: स्व: ऊँ ˜त्र्यंबकंयजामहे ऊँ तत्सर्वितुर्वरेण्यं ऊँ सुगन्धिंपुष्टिवर्धनम ऊँ भर्गोदेवस्य धीमहि ऊँ उर्वारूकमिव बंधनान ऊँ धियो योन: प्रचोदयात ऊँ मृत्योर्मुक्षीय मामृतात ऊँ स्व: ऊँ भुव: ऊँ भू: ऊँ स: ऊँ जूं ऊँ हौं ऊँ”
हा तोच मंत्र होता मृत्युन्जय मंत्र......
क्रमश....