कथा :- नत्तुरी
लेखक :- चेतन साळकर
भाग :- ८
Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
लेखक :- चेतन साळकर
भाग :- ८
Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
💥 सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ७ ची लिंक खाली दिलेली आहे.
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
तिला बांधून ठेवलं कारण विष्णु त्यादिवशी तिथेच राहणार होता कारण दुसरा दिवस खूप महत्त्वाचा होता. अमावस्या होती. . . .
रात्रभर हौसा ने धिंगाणा केला. ओढून ओढून सगळी दोरी ती उखडायला लागली. जोरजोरात किंचाळत , ओरडत रात्री जंगलात थैमान घातलं. पायाने जमिनीवर लोळण घेऊन तेवढं भाग खणून काढला. मला तिची अवस्था पाहवत ही नव्हती. तिचे रक्तबंबाळ झालेले पाय पाहून मनात चर्र झालं. नखांमंधून , हातांमधून रक्ताचे थर साचले होते. मला झोप लागली नव्हती. संपूर्ण रात्र मी तिच्याकडे बघण्यात घालवली होती. डोळे जळजळ होते. डोळ्यातली झोप काही केल्या सरली नव्हती. हौसा तशीच रात्रभर बाहेर तडफडत होती पण मी काहीच करू शकत नव्हतो. रात्र रात्र रडत तिने डोळ्यातील प्रत्येक पाण्याला वाट मोकळी केली होती. मी मात्र बघण्याचा कार्यक्रम केला होता. हळूहळू पहाट झाली. विष्णु उठला. त्याने हौसा ची मलमपट्टी केली. त्याला बऱ्याच औषधी वनस्पतींच ज्ञान होतं. कसल्या बसल्या पानांचे काढे करून त्याने तिला बरे केले. तिचा शारीरिक दाह कमी केला.. शेवटी तो मी माणूस आणि हौसा देखील माणूसच. त्याची लढाई हौसा शी नव्हती ,ती होती एका अज्ञात आत्म्याशी. कोण असावा तो आत्मा ? काय असेल त्याच रहस्य ? बरेच प्रश्न तसेच खितपत पडले होते. त्या दिवशीची रात्र सार काही उलगडणार होती. आपल्या गर्भात असणारी सगळी रहस्य ती लख्ख करून आणणार होती. सुर्य डोक्यावर आला. आम्ही म्हणजे मी आणि विष्णु जेवून रानात गेलो. . . .
मी विष्णु ला रानात जिथे जिथे हौसा विचित्र पण करीत ,भयानक अवतारात बसत असे शिवाय तिने जिथे जिथे ओरखाडून चित्रविचित्र नक्षी किंवा आकृत्या काढल्या होत्या त्या दाखवल्या. विष्णु देखील आपल्या विचारात गडून गेला होता. विष्णु च्या चेहऱ्यावर साफ दिसत होते की , बरीच रहस्य ह्यात अवलंबून असणार आहेत. संपूर्ण रान आम्ही पालथं घातलं. मला विष्णु ने मध्येच विचारले
विष्णु - गाव सोडून इथ का ?
( कधी जास्त ना बोलणारा विष्णु अचानक बोलल्यावर मी थबकलो )
मी - मी जाणारच होतो , पण हौसा साठी मग. . . . ?
विष्णु - गोंडी पोर आवडली ? ( त्याने ओळखले )
आता मला शब्द नव्हते. खरंच होतं, एवढ्या मोठ्या पर्यावरण समीक्षण संस्थेचा कर्मचारी असून ह्या नसत्या उठाठेव सांगितल्या कोणी होत्या ? प्रेम . . . . विचित्र असते हेच खरे !
अचानक विष्णु एके ठिकाणी थांबला आणि मागे वळला. बघता बघता अचानक एका झाडीत आत गेला. मी तिथेच उभ राहिलो. पुढील काही मिनिटांत तो बाहेर आला. त्याच्या हातात कुठलस झाडाची फांदी होती. ती उखडत उखडत तो बाहेर आला. मी n राहवून विचारले तर म्हणाला "धोतरा". का त्याने ते झाड तोडले होते मला कळले नाही पण मी गप्प त्या मागून घालत सुटलो. अंधाराला प्रारंभ झाला होता. सांजेच्या सावल्या रानाला झाकू लागल्या. सुर्य उंच डोंगरी जाऊन लपू लागला. काळोख दाटून येऊ लागला. ती रात्र आमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार होती. नेमक त्या रात्री काय घडणार होतं कोणास ठाऊक ? काय निकाल लागणार होता ? दैव जिंकणार होतं की राक्षसी प्रवृत्ती ? सांज झाकोळून आली. . ..काळोख झाला . . . !!
हौसा रात्र झाली की वेगळया रुपात येत होती. प्रत्येक रात्री तीची शक्ती वाढत होती हे मला विष्णु ने रानात चालत असताना सांगितले त्यामुळे ती रात्र खूप भयंकर पण रहस्य उलगडणारी असणार ह्यात शंका नाही ! रात्र झाली . रात्रीचे साधारण 8 वाजले होते. मी आणि विष्णु ने काही सामान बरोबर घेतले. हौसा ला बरोबर घेतले आणि आम्ही त्या जागेवर निघालो. त्या जागेवर काहीतरी वेगळा प्रकार आहे जिथून काही मुद्दे सुटणार होते. रानातून वाट काढत आम्ही तिघेही तिथे पोहोचलो. तोपर्यंत हौसा ने आपला अवतार बदलला होता. तिच्या डोळ्यांतून खूप जळजळीत नजर आरपार बाहेर पडत होती. त्या जागेवर पोहोचताच हौसा वेडीपिसी झाली .ती इतरत्र धावू लागली. मोठमोठ्याने ओरडू लागली. कींचाळू लागली. एका मध्यभागी जाऊन ती खाली कोसळली आणि ती जोरजोरात त्या जागी हातपाय आपटू लागली. तिने डाव्या पायात बांधलेला तो काळा धागा एका झटक्यात तोडून टाकला. ती अचानक शांत झाली आणि मांडी घालून त्या जागेवर बसली. तिने दोन्ही हाताने दोन्ही बाजूची मती उचलली. दोन्ही हात समोर धरून एकमेकात मिसळवली. दोन्ही मुठी गच्च दाबून धरल्या आणि एक गगनभेदी किंकाळी आसमंतात घुमवली. बघता बघता चारही बाजूंनी पुन्हा वारा भणानला, चारही दिशांनी घोंगावत तो फेर धरू लागला. रात्र वाढली आणि चंद्र आज नाहीसा झाला होता. विष्णु ने पाहिले की हौसा च्या पायावरची चंद्राची खूण तेव्हा चमकत होती. तो संदेश होता की आजची ही अमावस्या फार महत्त्वाची असणार आहे. धुळीचे लोट उठून धूळ इकडे तिकडे फेकली जात होती. सर्वांच्या डोळ्यात धूळ गेली होती. . . . . .
विष्णु ने एक काम केले. त्याने सोबत आणलेली धोतरा ची फांदी बाहेर काढली. विष्णु ने मला सांगितले की एका दगडाने मोठं रिंगण हौसा क्या भोवती मार. मी सांगितल्या प्रमाणे मोठं रिंगण हौसा बसली होती तिच्या बाजूने आखले. विष्णु पुढे सरसावला. त्याने धोतरा च पान तोडल आणि ती फांदी त्या रिंगणात टाकली. तोडलेले पान विष्णु च्या हातात होते. त्याने ते रिंगणाच्या बाहेरून हौसा च्या डोक्यावर ठेवले. हौसा विव्हळू लागली. तिने आकांडतांडव केला. हातपाय झाडून ती पेटून उठली होती. चारही दिशांना चालणार वाऱ्याचा थैमान वाढायला लागला. अचानक एका कोपऱ्यातून प्रचंड सैन्य दिसू लागले. घोडेस्वार घोड्यांना लगाम खेचत , घोडे उधळत बाजूने फिरू लागले. हातात तळपत्या तलवारी होत्या. काय करावे ? विष्णु लाही लाही क्षण समजेना तो काय प्रकार चाललाय तो ? त्याने बघ्याची भूमिका स्वीकारली. ते घोडेस्वार बाजूने घोडे घेऊन टापांनी जमीन उखरत सुटले. ते गाव आताच्या काळातल ? ऐतिहासिक दृष्यांचा काय संबंध ? घोडे ? तलवारी ? ह्याचा काय संबंध ? विष्णु देखील इरेला पेटला. त्याने त्याच्या सर्व बाजूंनी शर्थ करायचं ठाम केलं होतं. इतक्यात मोठमोठ्याने ओरडत हौसा पेटली. "राजा. . . राजा. . . .राजा"... करीत ती रागाने लालेलाल झाली. भर काळोखात ही तिच्या डोळ्यातले जळते भाव स्पष्ट दिसत होते. कुठल्यातरी भयंकर संतापाने पेटलेली एखादी रणरागिणी दिसत होती. वाघीण चवताळून उठावी आणि सार रान पेटवून लावावं अस ती करीत होती. इतक्यात घटना घडली. . . ..
हौसा बसली होती त्यापासून दहा पावलं लांब एक लहान बाळ दिसू लागलं. रडणार ते बाळ पाहून हौसा आहे त्या ठिकाणी , आहे त्या अवस्थेत शांत झाली. ती हळूहळू रडू लागली. हौसा उठू लागली. ती रिंगणाच्या बाहेर पडू लागली इतक्यात मला विष्णु ने सांगितले "ती बाहेर पडता कामा नये". विष्णु चा शब्द ऐकणं मला महत्त्वाचं होतं. मी पुढे सरसावलो आणि हौसा ला धरण्याचा प्रयत्न करू लागलो. हौसा एकट्या मला ऐकत नव्हती. तिच्यात इतकी प्रचंड ताकद आली होती की स्त्री म्हणून ती कमी पडतच नव्हती. शेवटी मला विष्णु ने बोलावून घेतलं आणि सांगितलं तो कागद बाहेर काढ. त्यातल्या ओळी वाच. . .
"साता बाव दश गोलीला , पुंगार जी भूम"
"अद शिदुर डांबी एटी, रगु सियाना नत्तुरी"
"अद शिदुर डांबी एटी, रगु सियाना नत्तुरी"
विष्णु - कसही करून ह्यात जे लिहिलंय ते करावे लागेल नाहीतर , आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही ( मराठी भाषांतर )
मी - विष्णु तुला जर हे माहीत होतं तर आधीच का नाही केलं आपण ?
विष्णु - नाही करू शकत होतो कारण ती जी शांती आहे ती गुप्त स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरत होती.
मी - मग आता सांग ह्याचा अर्थ ?
विष्णु अर्थ सांगायला घेतला पण तोपर्यंत हौसा हट्टाला पेटली होती. ती बाहेर जाऊन त्या बाळाला घेण्याचा प्रयत्न करीत होती. तिला त्या बाळाला मिठीत घ्यायचे होते. विष्णु अर्थ सांगू लागला.
विष्णु - साता बाव म्हणजी " सात विहीर", दश गोलिला म्हणजी " गोलाकार" , पुंगार जी भुम म्हणजी " पृथ्वीवरील एखाद्या फुलासारखे"
मी शांतपणे त्याचे अर्थ ऐकत असताना ,पुढची ओळ सांगणार उठतो विष्णु अचानक धावत पुढे गेला. हौसा रिंगण सोडून बाहेर पडली होती. ती रिंगण ओलांडणार इतक्यात पाठून विष्णु ने जाऊन तिला धरले पण त्या 80 वर्षाच्या वया समोर ती अतिप्रचंड ताकदीची हौसा रिंगणाच्या बाहेर पडली आणि विष्णु रिंगणात तोंडावर आपटला. तोंडातून रक्त आल. हौसा मागे वळली आणि बाजूचा मोठा दगड उचलून तिने लांबूनच रिंगणात विष्णु च्या अंगावर फेकला. वयाच्या शेवटाला आलेला विष्णु दगडाच्या एका घावातच पंचत्वात विलीन झाला. संपलं सगळं . . . .ते इतकं क्षणार्धात झालं की मी जागचा हललो सुध्दा नाही. विष्णु नावाचं एक आशेच किरण लुप्त झाल. . . .
आता माझ्यासमोर उरलं होतं ते मोठं प्रश्नचिन्ह ? पहिली ओळ समजली आता दुसऱ्या ओळीचा अर्थ कोण सांगणार . . . .??
भाग - ९ पुढील टप्प्यात
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Part 9 and 10 please. A ver interesting story...post it fast please
ReplyDeleteWaiting eagerly for part 9. Please post fast
ReplyDelete