माया
भाग -९
लेखन : अनुराग
अगदी काल घडल्यासारखं रावसाहेबांना सगळं आठवलं. गेल्या चार वर्षांत त्यांनी मायाला खुलून हसलेलं पाहिलं नव्हतं. तिच्या मनाची तगमग ते जाणून होते. आपल्या मागे तोच होता, जो तिचा सांभाळ करू शकत होता. त्याच्या अश्या जाण्याने ते पूर्णतः हतबल झाले होते. पण काल आलेला निरोप त्यांच्यासाठी आशेचा एक किरण घेऊन आला होता.
"खंडेराव, मनात एखाद्या गोष्टीचा सारखा विचार आला, की ती होतेच!"
"खरंय धनी..!"
"देवाची , एखाद्याच्या दृढ इच्छाशक्तीची पण..!"
बराच वेळ झाला. ऊन अंगावर येऊ लागलं. दोघांची काळजी वाढू लागली. " धनी, निरोप खात्रीचा होता न..!"
खंडेरावला संशय आला. रावसाहेब काहीही बोलले नाही. काही वेळानंतर टेकडीवरच्या झुडुपात हालचाली झाल्या. दोघांच्या भुवया उंचावल्या. खंडेराव खाली गेले आणि दुर्बीण घेऊन आले. रावसाहेबांनी त्यातून पाहिले, तसे त्यांचे डोळे चमकले.
" तोच ए, तोच आहे खंडेराव...!" त्यांनी दुर्बीण खंडेरावांकडे दिली.
" हो, तोच ए धनी..!" पण काही क्षणात त्यांचा चेहरा पार पडला. रावसाहेबांना संशय आला. त्यांनी दुर्बीण त्याच्याकडून हिसकावली. त्यांचा घसाच कोरडा पडला. घोड्यावरून येणाऱ्या सर्जाचा अंगरखा पूर्ण रक्ताने माखला होता. तो घोड्यावर निपचित बसला होता. पाठीत रुतलेली बाणाची टोकं छातीतून बाहेर आलेली होती. तो अत्यंत करुणतेने बंगल्याकडे बघत होता. कदाचित तिथे पोहोचण्याची त्याची स्वप्ने, त्या बाणांनी छेडली होती. रावसाहेब आणि खंडेराव घाईघाईने खाली उतरले. दिसेल त्या घोड्यावर मांड टाकून ते टेकडीच्या दिशेने निघाले. मायेने त्यांना बाहेर जाताना पाहिले, तिच्या प्रश्नांना कोणी काहीच उत्तरं दिली नाहीत.
टेकडी येईपर्यँत विल्सन चे शिपाई सर्जाला पार पुढे घेऊन गेले. तो गावात आल्याची खबर, तो येण्याआधी फुटली होती. जीवावर उदार होऊन रावसाहेब आणि खंडेराव गावाकडे निघाले. काहीतरी अघटित घडणार, हे वेधून मायाही एका घोड्यावर गावाकडे निघाली.
गावाच्या मध्यभागी विल्सन आपल्या फैजफाट्यासह आधीच तैनात होता. जखमी अवस्थेत सर्जाला त्या चैकाकडे आणलं गेलं. पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तो आसुसलेला होता. पाठीवर रुतलेले बाण काहीतरी वेगळी कहाणी सांगत होते. आणि त्याच्या मागच्या काळ्या घोड्यावर सुर्याजीच्या मुलगा सुभान होता. एका विराच्या पाठीवर वार करण्याचे भ्याड कृत्य करून मिशिवर ताव मारत तो हसत होता.
" लटकवा त्याला!" विल्सननी हुकूम सोडला.
" का रे भाड्या, छातीवर वार करण्याची हिमंत नव्हती का ? " तो पर्यंत रावसाहेब देखील तिथे दाखल झाले. ते नि:शस्त्र होते. तरी घोड्याच्या पुढच्या टाचेने त्यांनी ५-६ शिपाई जमिनीवर पाडले. विल्सन नी घोड्यास गोळी घातली. रावसाहेब पडले. त्यांना जबर मार लागला. खंडेराव त्यांना घेरून उभे राहिले.
चौकाच्या मध्यभागी असलेल्या फासाच्या मनोऱ्यावर जखमी सर्जाला टांगले. विल्सन आणि सुभानाच्या या क्रौर्याचा खेळ अख्खा गाव बघत होता.
" काय वाटलं तुला...? माझ्या बापाला भ्याडासारखा मारून गावातून पळून गेला...सुटला..?" सुभानाच्या अंगात आता पळपुटे बळ संचारले होते. पवाराच्या सुनेचे तोडलेले हाताचे पंजे दाखवत तो समोर आला." हे बघ, तुला लपवण्याचा धाडस कसं हिच्या अंगाशी आला...!"
'असं प्रत्येकाचं हुनार." असं म्हणत त्याने विल्सन च्या हातातली बंदूक घेतली आणि रावसाहेबांच्या मस्तकात गोळी घातली. तडफडत रावसाहेबांनी खंडेरावच्या मांडीवर जीव सोडला..! सर्जा सगळं बघत होता. त्याच्या अंगात ओरडण्याचे सुद्धा त्राण नव्हते. पुढे येऊन सुभानने फासाच्या चाप ओढला...! पायांची लटपट झाली. सर्जाच्या बोलक्या डोळ्यातून त्याचे प्राण उडाले. राक्षसी हास्य करीत सुभान आणि विल्सन तिथुन चालते झाले.
घोड्याचा पाय घसरल्याने मायाला यायला खूप उशीर झाला. गावकऱ्यानी रावसाहेब आणि सर्जाचे पार्थिव एका ठिकाणि आणून ठेवले. जिवापलीकडे जपलेल्या माणसांची प्रेतं पाहून मायाचा हुंदका आतल्याआत राहिला. तिला सर्जा चार वर्षांनी असा अपेक्षित नव्हता...! ती दोघांच्या मध्ये जाऊन बसली. बाजूला खंडेराव धाय मोकलून रडत होते. मायाच्या या स्थितीकडे त्यांनाही बघवलं नाहीच. ती काहीच बोलत नव्हती. तिचे दुःख अश्रूंच्या पलीकडे गेले होते. त्याचा वेग आणि आवेग सामान्य नव्हता.
....
" दोन दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही, ऐका माझं..! खाऊन घ्या काहीतरी..!" अंतविधी करून आली, तशी माया आपल्या खोलीच्या गच्चीतून खाली आलीच नव्हती. खंडेराव ही त्यांच्या दुःखा पूढे नतमस्तक झाले होते.

दिवस लोटले. लोकांच्या येण्याजाण्यानी भरून पावत असलेला बंगला हळू-हळू ओस पडू लागला. तासनतास उघड्या दारातून फक्त उदासीनता आत येत असे. कधीकाळी जगाची सगळी सुखे घेऊन इवल्याश्या पावलांनी घरात, बाहेरच्या अंगणात बागडणारी माया, आता त्या उंच भिंतीमध्ये बंदिस्त होऊन राहिली होती. सर्जाचं आणि तिचं बालपण तिच्या आठवणीत फेर धरून नाचू लागलं, की तिचा जीव गलबळायचा. रात्र-रात्र कंदिलाच्या त्या वातीची एकटीच सोबत तिला होती. बदलत्या ऋतूचे भान आणि उपयोग, दोन्ही तिला जाणवतही नव्हते. संध्याकाळी येऊन दोन कोसावर असलेल्या गावाकडे ती शून्याच्या नजरेने बघत बसायची. अश्यातच एक दिवस विल्यम आला.
" सरकारने या बंगल्याचा ताबा घेण्याचे ठरवलं आहे." तिच्यापुढे एक सरकारी कागद ठेवत तो म्हणाला. " कोणाला विचारून..?" मायाने देखील तितक्याच बाणेदारपणे त्याला विचारले.
"म्हणजे, हे तुम्ही नाही, सरकार ठरवतं."
" तुम्हाला आत येऊ दिलं, हे उपकार समजा..!" मायेच्या या उत्तराने बाजूला उभे असलेल्या खंडेरावनी तलवार उपसली. " आल्या पाऊली चालत जा, आणि त्या सुभानलाही सांग. चार पैश्याचा मोहापायी वाड-वडिलांनी कष्टाने कमावलेल्या जयदादी तुमच्या पायावर घालणारी आमची औलाद नाही ! जीवात जीव असे पर्यंत इथलं एक पान सुद्धा तुझ्या हाती लागणार नाही."
" उगाच चिडता तुम्ही..!" विल्सन एक पाऊल पुढे सरकला.
" तुम्ही एकट्या, आम्ही एकटे..! या वयात..." एवढं वाक्य पूर्ण होत नाही, तोच मायाने तिच्या कुपीत लपवलेलं सर्जाचं खंजीर बाहेर काढलं आणि सपकन हवेत फिरवलं. विल्सन च्या डोळ्याखालून खंजीर फिरला. त्याला अंदाज सुद्धा आला नाही. पण स्वतःच्या जखमेतून भळाभळा वाहणारं रक्त पाहून त्याचा घसा कोरडा पडला.
" भाड्या, गप गुमानं निघायचं, नाहीतर या तुझ्या कुत्र्यांच्या हातात तुझे हातपाय आणि मुंडकं धाडालं जाईल." खंडेरावनी तलवार त्याच्या मानेला लावली.
बंगल्यातले दिवे विझले. माया आपल्या खोलीत बसून होती. पुढचा अंधार तिला स्पष्ट दिसत होता. खिडकीतून नेहमी सुंदर होऊन वाहणारा वारा, आज जहाल वाटत होता. अशीही आज अमावस्या होती. बाहेरच्या मशाली केव्हाच शांत होऊन बसल्या होत्या. अचानक तिला काहीतरी वजनदार वस्तू जमिनीवर पडल्याचा भास झाला. असला आवाज तिने आधी नव्हता ऐकला. बंगल्यात ती आणि खंडेराव दोघ, आणि बाहेर दोन पहारेकरी होते. कुठे काहीच हालचाल नव्हती. तिने खिडकीच्या बाहेर पाहिलं. अंधाराशिवाय काहीच नव्हतं.
बंगल्याच्या खालच्या बाजूला एक मोठं भांडं गडगडायचा आवाज झाला. दारापाशी लावून ठेवलेलं पितळ्याचं गंगाळ गडगडलं. खडेराव ते भांडं मुद्दाम रात्री लावून ठेवत असत.
" खंडेराव..!" मायाने वरूनच त्यांना आवाज दिला.काहीही प्रतिउत्तर आले नाही. सावध होऊन तिने उशी खालचा खंजीर बाहेर काढला. आवाज न करता तिने दाराची कडी काढली आणि एक पाऊल बाहेर काढले. आवाज नको, म्हणून पायातील पैंजण ही काढून ठेवले. अंधारातदेखील ती चुकणार नव्हती. दोन्ही बाजूनी खोल्या आणि एक सरळ खाली उतरत येणार ११ पायऱ्या असलेला जिना, असं साधं सोप्प गणित होतं. जिन्याच्या वरून मात्र बाहेरचा दरवाजा दिसत नव्हता. एक एक पायरी, मोठ्या धीराने ती उतरून आली. शेवटच्या पायरीवर आली. तिला कळले, की खंडेराव दिवाणखान्यात नाहीयेत. तिने खंजरीची मूठ आवळली. मनात भीती दाटून आली. बाहेर एकही मशाल पेटली नव्हती, याचे तिला आश्चर्य वाटले. अचानक समोरून वाहणाऱ्या वाऱ्याचा ओघ कुठेतरी अडवला गेला. कोणीतरी मध्ये उभं असल्याचा भास तिला झाला. दोघांमध्ये खूप अंतर होते. तिने स्वतःचा श्वास रोखून धरला. समोरच्या हालचालींचा अंदाज घेऊ लागली. बाहेरून आलेली व्यक्ती निश्चितच नवीन असल्याने कशाला तरी धडकणार होती. अचानक तिच्या अंगावर समोरून काहीतरी पडले. कोणाचे तरी शरीर होते. जिवाच्या आकांताने ती ओरडली. चाचपडून पहाताच तिला कळले, की ते खंडेराव होते. तिने त्यांच्या हाताला हात लावला. तिला लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवणारे त्यांचे ते राठ हात...! मायेने तिला कडेवर उचलून घेणारे, रानात हात धरून फिरवणारे ते हात ! तिचा इवला हात हातात घेऊन तिला गिरवायला शिकवणारे हात. तिने आपला हंबरडा आतल्याआत दाबला. पण चूक आधीच झाली होती. आवाज आधीच झाला होता. तरीही ती स्थिर राहिली. काळ किती अंतरावर आहे, हे तिला अजूनही माहिती नव्हते. खंडेरावांच्या जखमांमधून वाहणारे रक्त , त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तीव्रता सांगत होते.
अचानक तिच्या मागून कोणीतरी तिचे केस धरले. भीतीने आणि वेदनेने ती जोरात किंचाळली. तिचे केस धरणारे दोन हात होते, आणि इतर दोन हातांनी तिला उचलण्याचा प्रयत्न होत होता. एका हातातलं खंजीर तिने अंदाजाने वर फिरवलं. एकाच्या खांद्यावर ते फिरलं. त्याच्या कण्हन्यातून तो आपलाच पहारेकरी असल्याचं तिला कळलं.
दुःख आणि प्रतिकार एकत्र करता येत नसतो. मायाचं इथेच चुकलं, आणि हाच डाव त्या दोघांनी साधला.आपलेच विश्वासातले शिलेदार ,आपल्या जीवावर उठल्याचे दुःख मायेला पहिले झाले. त्यांनी तिला ओढत बंगल्याच्या बाहेर आणलं..!
पहाट झाली. बंगल्याच्या दारावर मायेचं निपचित पडलेलं शरीर उगवत्या सूर्याला बेरात्री घडलेलं सारं काही सांगत होतं. आधीच मनावर असलेले घाव भरता भरत नव्हते. त्यात त्या अंधाराने शरीरावर सुद्धा कौर्याचे आसूड ओढले. आजपर्यंत शौर्याची कथा सांगून तिला झोपवणारं तिचं अंगण, आज तिचं पाशवाने तोडलेले शरीर कवेत घेऊन रडत होतं. संगमरवरी पायऱ्या रक्ताने लाल होऊन पडल्या होत्या. बंगल्यातील प्रत्येक खांब, आज आपल्या निर्जीव असल्यावर टाहो फोडत होता. झाडं-झुडपं मुक्याने साक्ष द्यायला तयार होती. पण ऐकणारं आणि शिक्षा देणारं कोणी नव्हतं. रावसाहेब नाही, खंडेराव नाही, आणि फक्त तिच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवपुरीत आलेला सर्जाही नाही ! अत्यंत जड अंतःकरणाने गावकऱ्यांनी शरीरं चितेवर ठेवले. खडेरावांना झालेल्या जखमा, त्या भ्याडाचं नाव कोरून गेल्या होत्या. आणि मायेच्या वेदनांनी माणसातील उरल्या-सुरल्या माणुसकीची तमाही सोडली होती.
वर्षे उलटली. गाव वाढू लागले. जमेल ते उपाय करून झाले. सुभान शेवटच्या काही दिवसांत एका दुर्धर आजाराने त्रस्त झाला. ज्वराने अंगाची लाही-लाही होत असे. इतकी की, अंगावरचे कपडे त्याला नकोसे होत. रात्री बेरात्री कुठल्याश्या चाहुलीने, आवाजाने तो आकांत करत सुटत होता. संपूर्ण कातडी हिरवी-निळी पडल्याने त्याच्या जवळ कोणी जात नसे. त्याच्या पापाची हीच शिक्षा, म्हणून त्याला गावकाऱ्यांनीही वाळीत टाकले. विल्सनही एकदा शिकारीला गेला, तो परत आलाच नाही. तीन दिवसांनी त्याचे प्रेत गावाच्या बाहेर, एका वडाला टांगलेले आढळले. विशेष म्हणजे, ते झाड बंगल्याच्या अगदी जवळ होते.

क्रमश:
अनुराग
माया
भाग -१०
लेखन : अनुराग
लेखाची परिस्थिती काही ताळ्यावर येत नव्हती. चांदेकरांनी ३ डॉक्टर बदलून पाहिले. आज साधारण आठवडा झाला असेल, अन्न-पाण्याला तोड दाखवून.
" साहेब, एकदा त्यांना बोलवायचं का ?" काशीने उपाय सुचवला.
" मनात येतं माझ्या बाई, पण हिमंत नाही होत."
" कधी-कधी आपण विचार करतो, तसं काहीच नसतं. आपण न घडलेल्या गोष्टीचा धाक मनात बाळगून असतो, त्यामुळे आहे त्याचा विचार पण नीट नाही करता येत !"
चांदेकरांनी बाजूची कागदं काढली आणि आनंदच्या नावाने पत्र निघाले. संध्याकाळी भर पावसात एक टांगा किर्तीकरांच्या दाराशी येऊन थांबला.
"हे बघा..!" पंतांनी ते पत्र किर्तीकरांच्या समोर ठेवलं. ते नेमके देवासमोर होते. देव्हाऱ्यासमोरची हळद उचलून त्यांनी पत्रावर टाकली. पत्र हळू-हळू लाल होऊन त्यावर काळे हात, अगदी तसेच उमटले. ते पाहून पंतांना घाम फुटला.
" बुवा, हे काय आहे ?"
" नशीब..!" कीर्तिकर या पूढे काहीच बोलले नाही.
"म्हणजे?"
" पंत, तुम्हाला मी आधीच बोललो होतो, वेळेवर सांगा त्याला. तुम्ही आणि सुमननी माझं नाही ऐकलं..! आता जेव्हा कुंडलीनुरूप हालचाली सुरु झाल्या, तेव्हा तुम्हाला जाग येते आहे...!" त्यांचा वाढलेला आवाज ऐकून नंदा बाहेर आली.
" हा त्याचा पूर्वजन्म आहे, ज्याचा उत्तरार्ध या जन्मी पदरी आला आहे."
पंत काही काळ त्यांच्यासमोर खिन्न बसले.
"एक करता येण्यासारखे आहे...पण ते यथोचित झाले पाहिजे."
" काय? वाटेल ते करायला मी तयार आहे, तूम्ही फक्त सांगा." एक आशेचा किरण दिसला, तरी माणसाचा जीव भांड्यात पडतो.
थोडेसे समाधान घेऊन पंत घरी परतले.
" काय होते हे सगळे, कसला एवढा आगडोंब उठला आहे. काही कळेल का ?" न राहून नंदाने किर्तीकरांनी विचारलेच.
" आमचे सामान बांधा...आम्ही उद्या पहाटे मुंबईला निघणार."
......
"कसला एवढा विचार करता साहेब..?"
जेवणात लक्ष नसलेल्या शेखरला दिगंबरनं टोकलं.
" तो बंगला..! त्यात घडलेलं ते सगळं काही...खरं सांगत असेल का तो म्हातारा..?"
" जीवावर बेतलेला आहे त्याच्या. तो नाही खोटं बोलायचा."
" काहीही असो दिगंबरराव, आपल्याला त्याचा छडा लावावाच लागेल."
" साहेब, होणारं होऊन गेलं. आता त्याचा तपास करून काय मिळणार आहे?"
शेखर ताटावरून उठला. सरळ खिडकीकडे चालत गेला.
" मी आल्यापासून बघतोय. त्या बंगल्याच्या आवारात गेलं, की अंगात कापरं भरतं. इतरांना वाटते तशी भीती ही वाटते, पण तिथे खूप विचलित करणारे काहीतरी घडले असावे ! त्या बंगल्याच्या आवारातली एक एक सजीव-निर्जीव गोष्ट, एक दारुण सत्य लपवत अनंतकाळापासून जशीच्या तशी, स्तब्ध उभी आहे, असंच वाटतं. आपण उघडुयात का तो बंगला..?"
" साहेब, माझा जन्म गेलाय या गावात, नका उगाच विंचवाच्या नांगीवर बोट ठेऊ..!" दिगंबरनी त्याला वडीलकीचा सल्ला दिला. त्या रात्री शेखरला झोप आलीच नाही. सारखंच तो बंगला त्याला डोळ्यासमोर दिसू लागला. शेवटी तो ब्राह्मसमयी उठला, अंघोळ केली आणि बाहेर पडला.
त्या काळोखात सुद्धा त्याला तो बंगला स्पष्ट दिसला. आज त्याच्या अंगात एवढे धाडस कुठून आले, हे त्यालाही कळले नाही. त्याच्या चामडी बुटांच्या चर्मराटीखाली पाचोळा कोलाहल करत होता. वारा अजिबात नव्हता, तरी मोठ्या झाडांच्या फांद्या उगाच त्याला भीती दाखवत होत्या. आपल्याला कोणीतरी चहूबाजूंनी पहात असल्याची जाणीव त्याला पावलो पावली होत होती. पण त्याच्या अंगात आज खूप धीर भरला होता. त्याला भास झाला, की तो नाही, तर तो बंगला एक-एक पाऊल त्याच्याकडे सरकतो आहे. किती पावले तो चालला, हे कळलं नाही, पण आता त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या विरुद्ध टोकांत, फक्त तो बंगला दिसत होता. त्याचा श्वास फुलला, रक्त प्रवाह दुपटीने वाढू लागला. नजर धूसर व्हायला लागली आणि अचानक त्याला चक्कर आली. कोणीतरी जोरात त्याच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तूने वार केला. मागे वळून बघताना त्याला तोच म्हातारा दिसला...! पहिल्यांदा त्याच्या घरातल्या न्हाणीघरात दिसला होता, तोच. शेखरची वाचाच गेली. तो धाडकन जमिनीवर कोसळला. काही कळायच्या आत त्याचे डोळे बंद झाले. एका गोष्टीचे समाधान मात्र त्याला होते, की गुपित बाहेर येणार होते...!
पावसाची रिप-रिप चेहऱ्यावर पडली, तशी शेखरला शुद्ध आली. त्याचा उजवा हात जड झाला होता. त्याने कशी-बशी मान वळवून उजव्या हाताकडे पाहिलं, तेव्हा त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला...! त्याच्या हातात एक खंजीर होतं..! कोणाचं आहे हे, कुठून आलं, कोणी ठेवलं, का ठेवलं ? असे अनेक प्रश्न त्याला पडले. तो कसाबसा उठला. त्याला आठवत होता, तो म्हातारा ! त्याच्या अंगात अजिबात त्राण उरले नव्हते. पण त्याला उठून उभं राहणं भाग होतं. तसाच चालत तो बंगल्याच्या लोखंडी फाटकाजवळ आला. ते लावलेले होते. ते उघडून तो बाहेर आला आणि पून्हा पडला...!
शेखरने डोळे उघडले ते सरकारी दवाखान्यातच ! बाजूला दिगंबर, त्याची बायको ही होते.
" केव्हा उठून गेले कळलंच नाही, मला तरी न्यायचं..!"
तो खडबडून उठला. " माझ्या हातात...?"
" हे होतं साहेब..." दिगंबरच्या बायकोने तो सुरा त्याच्यासमोर धरला.
" कोणाचं असेल हे ?" शेखरने विचारलं.
" जुनं आहे, आणि ज्याचं असेल, त्याला याचा पूर्ण सराव झाला असेल." मागून एक राठ, पण प्रेमळ आवाज आला.
" मी दामोदर, कदाचित गावातला दुसरा माणूस, ज्याला त्या बंगल्याबद्दल काहीतरी वाटतं."
त्याने तो सुरा शेखरच्या हातातून घेतला. त्याचे लोह अजूनही गंजले नव्हते. पण मुठीवर असलेली झीज लपत नव्हती.
" तो तुमच्या हातात कसा आला, प्रश्न हा आहे!" दामोदर नी आपल्या पिशवीतून एक वही बाहेर काढली. काही पानं चाळळ्यावर एक चित्र त्याने शेखर समोर धरलं. ते रावसाहेबांचं चित्र होतं.
" यांना पाहिलं आहे कधी तुम्ही ? "
" नाही...!"
" यांना" दुसरं चित्र विल्सन चं होतं.
" हे तर..." शेखरला विल्सन चा इतिहास माहित नव्हता, पण विल्सन माहित होता.
" हा तुमचाच अधिकारी, विल्सन. एकेकाळी त्यांनी या गावात जो कौर्याचा इतिहास रचला, तो ही माती कधीच विसरली नाहीये."
शेखर त्या चित्राकडे बघत होता. दामोदर नी पान मोडलं. त्यावरचं चित्र पाहून शेखर खाडकन उठून बसला.
" हा, हाच तो, बघा, मी बोललो होतो ना ! खरा आहे हा..!"
सगळ्यांनी त्या फोटोकडे निरखून पाहिलं. ते चित्र भीमाचं होतं. क्षणभर दामोदर ही स्तंभित झाला.
" कोण हे...तुम्हाला कसं माहित..!"
" मला दिसले, आणि यांनीच मला काळ रात्री डोक्यावर...!"
" साहेब, मी दोन-तीन वर्षे झाली, या भागातल्या जुन्या हवेल्या, बंगले,त्यांचा इतिहास, यावर संशोधन करतोय. जुन्या लोकांना विचारून, काही कथांचे संदर्भ, काही लोकांची असलेली वर्णने, यातून हे चित्र मी काढून घेतले आहे. याचं नाव भीमा आहे...! इथला एक शेतकरी...!" दामोदर नी त्याला असलेली माहिती सांगितली. शेखरनी ते चित्र पुन्हा हातात घेतलं. बाकीची चित्रंही त्याने आलटून पालटून पहिली. त्याला त्यापैकी कोणीच ओळखीचं किंवा या आधी पाहिलेलं आठवलं नाही.पण काहीतरी दडलं आहे, ही खात्री त्याला होती.
" पण या सगळ्यांशी माझा काय संबंध?"
" साहेब, या जगातल्या प्रत्येक राहास्यामागे, एक चांगलं किंवा वाईट कर्म लपलेलं असतं, तसंच प्रत्येक प्रसंगाशी एक किंवा अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या असतात. प्रत्येक घटना काही पडसाद सोडून जात असते. काही परिणाम, आधीच्या कर्माचे ! कदाचित जगासाठी अनुरात्तीत असणारा तो बंगला, तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल. इतके दिवस, इतर कोणालाही तिथे काहीच अनुभव आले नाहीत. तुम्ही मात्र आपुलकीने तिथपर्यँत चालत गेलात, शोध घेण्याचा प्रयत्न केलाय..!"
" ते जीवावर सुद्धा बेतलं असतं साहेबांच्या..!" दिगंबरची बायको म्हणाली.
" जर तसं असतं, तर आत्तापर्यंत..!"
दामोदर आपली पिशवी आवरू लागला. "काही मदत लागली तर सांगा. यांना माझं गजर माहिती आहे." दिगंबरकडे बोट दाखवत दामोदर तिथून निघून गेला.
" आपण पहिल्यांदा भेटतो आहोत. मी तुमच्यावर विश्वास का ठेवावा ?" चांदेकरांच्या घरी कीर्तिकर सकाळीच येऊन धडकले.
"खरंय, माणसाचा ज्यावर विश्वास नसतो, ते डोळ्यासमोर सिद्ध झाल्याशिवाय त्याचा विश्वास नाही बसत. पण हे सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. ही तुमच्याच मुलीची कुंडली न ?" त्यांनी आल्या-आल्या लेखाची कुंडली मागवली होती. "हो!"
"ती तेरा वर्षाची असताना तिला एक मोठा अपघात झाला होता. थोडक्यात वाचली होती."
" हो , पण हे कोणीही सांगू शकेल, कुंडली बघून.!"
" साहेब, मी इथेच थांबतो. ही हळद तिच्या कपाळावर लावून, तुम्ही खाली परत या..!" किर्तीकरांनी हळद त्यांच्या हातात दिली, आणि उजव्या हाताने थोडी त्यांच्याही कपाळाला लावली.
चांदेकर तिच्या खोलीत गेले. ती शांत झोपलेली होती. हळदीचा वास तिच्या नाकापर्यंत पोहोचला, तसे तिने एकदम डोळे उघडले.
" काय ए हे..?" तिने बाबांना विचारले.
" हळद ए बेटा !"
" त्या खाली बसलेल्या म्हाताऱ्याने दिली न !" चांदेकर एकदम चमकले...!
"हो." त्यांना जरा धक्काच बसला.
" त्याला सांगा, हे बालिशधंदे बंद करा. उगाच जीवाला मुकाल..!"
" लेखा..!" हे चांदेकरांसाठी अगदीच नवीन होतं.
" अजून जिवंत आहे, आणि तिचा जीव परत हवा असेल, तर खालच्या म्हाताऱ्याला सांगा, त्याला माहितेय मला काय हवंय..!"
चांदेकर एकदम धावत खाली आले. जायच्या आधी त्यांनी ती हळद लेखाच्या डोक्यावर अक्षरश: फेकली. झप-झप पायऱ्या उतरून ते किर्तीकरांसमोर उभे राहिले.
" त्या पोराचे वडील माझ्याकडे आले होते. पत्रावरूनच मला कळले, की तुमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे. पण घाबरू नका. तिच्या या सगळ्याशी काडीमात्र संबंध नाहीये. तिचा केस सुद्धा वाकडा होणार नाही. मी इथेच मारुतीच्या धर्मशाळेत राहील दोन दिवस. " चांदेकर बसल्याजागी गार पडले. बागेतूनच त्यांनी वर , लेखाच्या खोलीकडे पहिले. जेव्हाही तिच्या खोलीत जायचे...हळद डोक्याला लावूनच, असे कीर्तिकर बजावून गेले होते. वादळात उडणाऱ्या पाचोळ्यासारखी स्थिती होती. कोणास काहीच कळत नव्हते. पूर्व जन्मीचं कर्म, या जन्मी फेडायचे होते, चांगले, वाईट दोन्ही.
वाड्याच्या बाहेरच्या खोलीत नर्मदाच्या रहाण्याची पंतांनी केली. अगदी विठोबा-रुक्मिच्या झोपडी शेजारीच. एक बैलगाडी भरून समान तिने येताना आणलं होतं. आजची रात्र जरा अवघड होती. आनंदला बाहेरचे दरवाजे बंद केले होते.
" काय ए हे सगळं पंत..? अजून तुम्ही या सगळ्यातून बाहेर कसे येत नाही. " मध्यरात्री चिडून त्याने पंतांना प्रश्न केलाच. सुमन तिथेच होती.
" बाहेर जायचंय मला...आत्ता !!" अचानक दारातून नर्मदा बाहेर आली.
" अमोशा आहे म्हणून जायचं न तुला बाहेर...!" तिच्या या बोलण्याने आनंद चपापला. " तुझ्यासारखे छप्पन लावलेत मी कडेला...!" असे म्हणून तिने गंगेचं थोडं पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं. अंगावर तेजाब फेकल्यासारखा आनंद तिथून उडाला. बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळला.
" तुला काय वाटलं, लपून राहशील, कोणाला कळणार नाही..!" नर्मदा पूर्ण तयारी निशी आली होती. तिने तिच्या बोटातली एक अंगठी काढली आणि बळजबरीने आनंदचा हात हातात घेऊन, तळव्यावर ठेवली. त्याचा तळवा भाजू लागला.
" कोण आहेस, कुठून आलाय, सांग, या पोराने काय वाईट केलंय रे तुझं..?" नर्मदेनी त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. आनंद जागच्या जागी जोर-जोरात ओरडत होता.
"पंत, आई, कोण ए ही बाई ?" आनंदचा हा थयथयाट सुमन आणि पंत बघत होते.
" ए भाड्या, कोणाला गुंडाळतोय ? तू माणसात असता, तर अशी कातडी जळाली नसती...! गुमान सांग, कोण, कुठून आलाय..?"
आता एकदम पारडं बदलू लागलं. आत्तापर्यंत किंकाळ्या मारणारा आनंद, आता रूप बदलू लागला. त्याचे डोळे लाल होऊ लागले होते. ते पाहून मात्र सुमनला गरगरायला झालं.
" मी....शोध न, शोध मी कोण ए ते !" त्याच्या आवाजात आता एक कानठळ्या बसणारा, घोगरा आणि चिचिरणारा आवाज घोळू लागला. " माझं काम होऊ दे, माझ्या रस्त्यात येशील, तर तुझ्यासकट यांनाही घेऊन जाईन मी." आणि त्याने जोरात हात झटकला. तरी नर्मदाने त्याचा हात सोडला नाही. त्याने मग त्याचा पाशवी जोर लावायला सुरवात केली. दोन्ही हाताने त्याने नर्मदाला उचलले आणि भिंतीकडे फेकले. वयाने क्षिण झालेली नर्मदा आदळताच थोडी मूर्च्छित झाली. तोच आनंद पूर्ण जोरानीशी दाराकडे धावला. दाराची एक फळी तोडून तो गच्चीकडे धावू लागला. पंत ही मोठ्या हिंमतीने त्याच्यामागे धावले. गच्चीवर पोहोचताच आकाशाकडे बघून तो ओरडू लागला.
" अरे मूर्खानो, मी कुणी बाहेरचा नाहीये, हे माझंच शरीर आहे..! माझंच शरीर आहे..!" आणि जोरजोरात हसू लागला. पंतांना क्षणभर काही सुचलेच नाही. पण त्यांना ठाऊक होतं, काय करायचंय. त्यांनी कुपीत लपवलेला शंख बाहेर काढला आणि फुंकला. त्याचा आवाज होताच आनंद जमिनीवर कोसळला...!