माया
भाग - ७
लेखन : अनुराग
भाग - ७
लेखन : अनुराग
पहाटे एकदम नर्मदेच्या झोप खाडकन उडाली. कसलंस दुर्दैवी स्वप्न आडवं आलं. बाहेर अंधार होता. मध्यरात्रीनंतर पावसाची रिपरिप पुन्हा सुरु झाली होती. ती तशीच उठली. खुंटीवर टांगलेला कंदील लावला आणि बाहेर पडली. बाहेर प्रचंड अंधार होता. दाराची कडी लावली आणि आपली चप्पल हातात घेऊन निघाली, थेट वाड्यावर आली.
"उठवता का पंतांना?" देवडीवरच्या सदाला तिने जागं केलं.
"आत्ता ? काय झालं माय ?" सदाही तिला पाहून चपापला. " तुला नाही सांगता येणार !" नर्मदेला कोणी नाही म्हणत नव्हतं. ती तशीच देवडीवर उभी राहिली. पंत पेटला कंदील घेऊन बाहेर आले.
" काय गं ? एवढ्या अंधारात !"
" पंत, आनंदराव कुठे आहेत?"
"झोपला आहे. काय झालं काय ?" देवडीवर उजेड पाहून सुमनही बाहेर आली.
" त्यांना बोलावतील, पण त्यांना वेस सोडून जाऊ देऊ नका."
" नर्मदे , अगं झालंय तरी काय ? सांगशील का ? कोण बोलवतयं ?"
"पंत, त्या पोरीला त्रास व्हायला लागलाय...!" पंत एकदम चपापले.
"म्हणजे...!" त्यांना लेखाचा अंदाज आला.
" हो, तीच ! पंत, आपल्याला जपायला पाहिजे. थोडा उजेड झाल्यावर मी येईल."
पंत आणि सुमनला अस्वस्थ करून नर्मदा निघून गेली. अजूनही आभाळात, एका कोपऱ्यात विजा होत होत्या.
"कसं असतं बघ सुमन ! आपल्या डोळ्यासमोर काहीतरी घडतंय, घडणार ए, आणि आपण हतबल होण्याखेरीज काहीच नाही करू शकत." पंत आत येऊन पायरीवरच बसले. "यालाच नशीब म्हणतात..." सुमनचेही अवसान गळायला लागले होते. " ज्या गोष्टी डोळ्याला दिसत नाही, आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. ज्या गोष्टी डोळ्यासमोर घडतात, त्या गोष्टी सुद्धा आपण निव्वळ विश्वास नाही म्हणून टाळतो, किंवा पर्यायी , सोयीस्कर कारणं शोधतो. पण जे सत्य आहे, ते दर्पासारखं गावभर पसरतं !"
" उद्या आनंद ने विचारल्यावर त्याला काय सांगायचं ?" सुमन च्या डोक्यात वेगळी चक्र फिरू लागली.
" उद्या नाही, आजच ! पहाट झालीये सुमन, उजाडेल थोड्या वेळात...! "दोघ आत गेले ,कडी लागक्याचा उदास आवाज पहाट अधिक भयावह करून गेला.
....
काशीने चहा चा कप हातात घेतला. लेखाच्या खोलीकडे येता-येता तिच्या कानावर एक वेगळाच आवाज पडला. कोणीतरी अतिशय उद्विग्नतेने काहितरी खरडत होते. तिने चालता-चालता तिच्या मालकांना आवाज दिला. दोघही दबक्या पावलांनी आवाजाच्या दिशेने निघाले. लेखाच्या खोलीच्या खिडकीतून त्यांनी तिच्याकडे पाहिले. मेजावर कागद ठेऊन ती त्यावर काहितरी खरडत होती. याआधी त्यांनी लेखाला कधीही असं पाहिलं नव्हतं. खोलीचे दार, खिडक्या सगळंच बंद होतं. चहाचा कप बाबांच्या हाती देऊन ती आत यायला निघाली. तिने धाडकन दार उघडलं. लेखाचं अजूनही तिच्याकडे लक्ष गेलं नाहीच. ती आपल्या कामात व्यस्त होती. काशीने खिडकीचे पडदे बाजूला केले, तशी ती बसल्याजगीच बेशुद्ध झाली. काशीने मेजावर ठेवलेला कागद पाहिला. आनंदचा एक फोटो लेखाने कात्रीने पार खरडून काढला होता. बाबाही एव्हाना मध्ये आले होते.
" मी बोलले होते न, हा प्रकार डाक्टर ने बरा होणारा नाहीये !" चांदेकर काहीही बोलले नाही. त्यांनी आनंदचा फोटो हातात घेतला. क्षणभर विचार करत ते तिच्या कपाटाकडे गेले. काही कागडपत्रांमध्ये त्यांना आनंदचे पत्र सापडले. त्यावरचं लिखाण पुसट झालं होतं. काही वाचता येतं आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी ते पत्र उन्हात धरलं. काशीही त्यांच्या जवळ आली. पत्राला ऊन लागताच त्यावर जुने हात उमटले.
चांदेकर कपाळाला हात लावून खाली बसले.
" काशी, माझं डोकं चालेनासं झालाय...!" चांदेकर अत्यंत हतबल दिसत होते. " या पोरीचा काय दोष या सगळ्यात?"
" साहेब, या जन्मी नाशीबात आलेलं, बऱ्याचदा मागच्या जन्मीचं कर्म पण असतं !" काशीलाही भरून आलं. " कधी-कधी माणसाच्या हातून घडलेलं पाप त्याच्या पूर्ण घरादाराला भोगावं लागत. माझं ऐका...!" काशीने त्यांच्या कानात काहीतरी संगीतलं, ज्याने त्यांना थोडासा दिलासा मिळाला. त्यांनी ते पत्र हातात घेतलं आणि दोघ खोलीच्या बाहेर पडले.
......
ग्रहांचा खेळ मोठा अजब होत चालला होता. कोणाला काहीही संदर्भ लागत नव्हता. शिवपुरीला अचानक बदली होऊन आलेला शेखर, त्याचवेळी शिक्षण संपवून गावात आलेला आनंद आणि लेखा ! कीर्तिकर आणि नर्मदाला माहित असलेले , पण ज्याबद्दल ते काहीही करू शकत नव्हते, असे सत्य ! पंत, सुमन आणि चांदेकर यांच्याभवती वाढत चाललेलं कोडं, आणि त्यांच्या पोरांभवती वाढत चाललेला एक अज्ञात विळखा ! दिगंबर, विठोबा, रुक्मि हे साक्ष होत होते एका अश्या नियतीला, जी कोणी लिहिली हे माहिती देखील नव्हतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भय थैमान घालत होते. त्या भुरट्या चोराचा काय दोष ? अश्यात ,आतल्याआत गुपितं दडवून निवांत बसला होता, ते बंगला..." माया"
प्रतिशोध एखाद्या वणव्यासारखा असतो. जितका तो दीर्घ होतो, तितकी त्याची व्याप्ती वाढत जाते. कालानुरूप, त्याच्या विळख्यात येणाऱ्यांची गणती ही जळत जाते. दोष असो नसो, एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत येणारी पाखरे निष्कारण भसमसात व्हावी, तसंच असतं. अकाल, अनैसर्गिक, अनैच्छीक मृत्यू आत्म्याला उर्वरित कार्य सिद्धीस नेण्यासाठी या भूतलावर अडकवून ठेवतो. मनुष्ययोनी, प्रेतयोनी यामध्ये येणारी पिशाच्च योनी , आणि त्यात येणारा प्रतिशोध, हा दांडीताला पुनर्जन्मात येण्यास भाग पाडतो.
जुळून आलेले अनिष्ट योग आहेत हे ! यांचे प्रारब्ध, यांच्या ग्रहांच्या दशा आणि दिशा, थोडक्यात यांच्या कुंडल्यांमध्ये असलेलं दोष, हे यांनी कधीकाळी केलेल्या पापांची एक काळी सावली आहे. ती आज जरी, धूसर आणि निष्कारण दिसत असली, तरी ती पुढे येणाऱ्या काळात त्यांना सगळं काही आठवण्यास भाग पाडेल...!

क्रमश:
अनुराग
माया
भाग - ८
लेखन : अनुराग
भाग - ८
लेखन : अनुराग
१८५७ च्या उठवानंतर चा उजागर झालेला हिंदुस्थान खूप वेगळा होता. आज पर्यंत झालेल्या कोणत्याच परकीय आक्रमणात इतकी एकता दिसली नव्हती. मेरठला पेटलेली ही क्रांतीज्योती अख्या देशभर वणवा होऊन प्रत्येक देशवासियास जागृत करून गेली. घरा-घरात क्रांतिकारी जन्म घेऊ लागले.इंग्रजसरकारनी जबरदस्तीने वंतनं खालसा केली. वतनदार आणि जनतेमध्ये फूट पडण्याचा हा कुटील डाव त्यांच्या अधिकारी लोकांनी आपल्या स्तरावर अत्यंत घृणास्पद खेळला होता. बांदलांकडील शस्त्रसाठा, घोडे, तीन हत्ती, बरीचशी मौल्यवान चीजवस्तू ते उचलून घेऊन गेले. ८ वर्षाच्या मायेला, आपल्या मेघ नावाचा हत्ती ही मुकावा लागला होता. याची सल रावांच्या मनात खूप खोलवर होती.
आज पहाटे अंधारातच ते वरच्या गच्चीत आले. बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवर सारखे त्यांचे लक्ष जात होते. त्यांचा अत्यंत जवळचा ,त्यांचा रक्षक खंडेराव ही त्यांच्या सोबत वर होताच.
" राव, काही बातमी आहे का ?"
"हो, काल संध्याकाळी पवारांची सून आली होती. सर्जा येईल म्हणून बोलली."
" काय सांगता..!" खंडेराव एकदम चमकले.
" चार वर्ष झाली, खंडेराव ! पोरगं कुठं गेलंय, काही पत्ता नाही! आला तर चांगलंच आहे." अचानक रावसाहेबांसमोर तो दिवस जसाच्या तसा उभा राहिला.
शिवपुरीत नव्याने पोलीस-चौकी झाली होती. उठावानंतर सरकारने देशभरात हजारो नवीन चौक्या लावल्या होत्या. त्यातली ही एक ! बांदलांची एकहाती सत्ता असलेल्या शिवपुरीत विल्सन साहेबांचं कोणी ऐकत नव्हतं.याचा बदला त्यांनी गावकाऱ्यांकडून घेतला होता.
" सर्जा, बा कुटं हाय तुजा?" विल्सनने गावात पाळलेलं हे दोन पायाचं गांडूळ, सूर्याजी सकाळीच शेतावर येऊन उभा राहिला.
" रानात ए, पाणी द्यायला गेलंय..!" पिळदार मिश्या, राकट, कोणालाही पाहून पहिल्यांदाच किळस निर्माण होईल, असा घाणेरडा चेहरा, तितकीच घाण प्रवृत्ती असलेला सूर्याजी घोड्याखाली उतरला. गोठयात बांधलेली बैलांची जोडी दिसली त्याला ! " हरामयांनो, बैलं घ्यायला पैसा असतोय, सरकारचा सारा द्यायला जीवावर येतीय व्हय रं !" त्याचा एक-एक पाय गोठ्याकडे सरकू लागला. तेवढ्यात एक गूळगुळीत गोटा सनसन करत त्याच्या फेटा टाळून कपाळावर बसला. क्षणभर सुर्याजीला कळलं नाहीच काय झालं. पण रक्ताची लागलेली धार पाहून तो घाबरला. गोठ्याकडे वाळलेले पाय त्याच्याकडे धारदार नजर रोखून उभ्या असलेल्या सर्जाकडे गेली.
"तुज्यायला...!" कंबरेचा पट्टा उपसत सूर्याजी सर्जाकडे चाल करून गेला. " थांब तितंच भाड्या..! पोराकडे एकजरी पाऊल टाकलं, तर हा तिर माणेतून आरपार करीन." सर्जचा बाप भीमा धावत आल्याने पुढचा अनर्थ आटोक्यात आला. पण तोवर सर्ज्याच्या पाठीवर चामडी पट्याचा एक वार बसला. १४-१५ वर्षाचं कोवळं पोर ते ! जागेवर जमिनीवर कोसळलं. भिमाचा तिर पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. कोल्हे, लांडगे, रानडुकरं अचूक टिपत असे. दिवसा शेती आणि रात्री रावसाहेबांकडे दोघ बाप-बेटे राखण करायला जात होती.
" सुर्या, आल्या पाऊली माघारी जा, नाहीतर तुझं मढं बांबूला टांगून सायबकडे धाडलं म्हणून समज..!" भीमाने तार ओढला. " लैच जोर हाय की, रावसाहेबांच्या कुत्र्यांना.!" सुर्याजीलाही चेव चढला. "वाघ हाईत वाघ, तुज्या सारखी स्वतःची इभ्रत नाही बांधली सायबाच्या दावणीला! " भीमाचा आवाज वाढत होता. सुर्याजीने गुमान घोडा हाती धरला.
" किती दिवस रग धरशील, अरे, ते सायब ए सायब ! तुझ्या सकट रावसाहेबांना नाही जमीन चाटायला लावली...!" तारेत फसलेला तिर सनकन सुटला. सुर्याजीच्या डोळ्यासमोरून गेला. त्याने घोड्याला टाच मारली आणि क्षणात दिसेनासा झाला.
"माया बेटा, सर्जाला हळद लावा पाठीला..!" भीमा लगेच पोराला रावसाहेबांकडे घेऊन आला. " धनी, कशाला, झाड-पाला लावून होतंय की बरं !"
" भीमा, तू घरचा माणूस आहेस, सर्जा आम्हाला पोरासारखा आहे. बहाद्दूर आहे !" रावसाहेबांच्या लेखी माणूस हा फक्त माणूस होता. जात,कुल,त्याचे काम , पैसा याची काहीच गणती नव्हती. आणि त्यामुळे अख्खा गाव त्यांना देव मानीत. बंगल्यासमोरून जाताना हात जोडीत.
" फारच बहाद्दूर म्हणायचं की..!" सर्जाच्या पाठीवर हळद लावत माया त्याला छेडू लागली." एखादा पट्टा जोरात लागला असता तर..?"
" असा कसा लागेल, त्या भाड्याचा डोलाच काढला असता बा न.! "
" काय बाई भाषा...!" माया ला त्याचा रांगडा स्वभाव आवडायचा.
" भीमा, आमच्या मनात एक विचार येतोय..!"
" धनी, तुमचा विचार आमच्यासाठी हुकूम आहे.!"
" भीमा...!" रावसाहेब एकदम जागेवरून उठले. "सर्जाला आजपासून बंगल्यावर असू दे."
" धनी...!" भीमाला एकदम गहिवरून आले.
" त्याला हत्यार चालवणे, अभ्यास, बंदूक, घोडा चालवणे, हे सगळं आम्ही शिकवतो. पुढचा काळ काय घेऊन येणार आहे, कोणास माहित. त्याने स्वतःसाठी आणि आपल्यासाठी तयार असलेलं बरं ! कदाचित आम्हाला शिवपुरी सोडण्याची वेळ आली. तर मायासोबत कोणीतरी विश्वासू...!" भीमा एकदम धन्याच्या पायावर पडला. "धनी, आमचा अख्खा जलम तुमच्यासाठी आहे, वाटेल ते करा...!"
सकाळी उठून सर्जा जाण्यास सज्ज झाला. " बाळा, बा इथंच हाये ! पण धनी आपलं देवमाणूस ! अंगात रंगात हाय, तो पावोत त्याची जीव देऊन रक्षा करायचा आपला धर्म नाही सोडायचा...! " पोरानं नशिब काढलं, बापानं त्याला छातीशी धरलं. रोज सकाळी उठून सूर्य नमस्कार, नंतर शस्त्रविद्या, माया कडून अक्षर ओळख, असा अभ्यासाचा नित्यक्रम सुरु झाला. सर्जाही शिकण्यात तरबेज होता. दिवसातून दोनदा घोड्यावरून बापाला भेटायला यायचा. अश्याच एका दुपारी त्याला लांबूनच त्याच्या शेतावर धूर दिसला. तो टाचेवर शेताकडे पळत सुटला. त्याचा वेग पाहून रावसाहेबही त्याच्या मागे घोड्यावर धावत सुटले. पण सर्जाचा आजचा वेग घोड्यालाही आवरत नव्हता.
शेतावर आल्या-आल्या त्याला भयानक चित्र दिसलं. अख्खं शेत जळून राख होत होतं. आगीचे मोठे लोण पसरत, सापडेल त्याला कवेत घेत होते. ज्या मातीत त्याला बापाने चालायला-पळायला शिकवलं, ती माती राखेने पार काळी झाली होती. मागून रावसाहेब आणि खंडेरावही आले.
सगळंच रान आगीत धगधगत होतं. गोठ्यात जनावरंही नव्हती. "बाबा" सर्जा एकदम सगळं बळ एकवटून ओरडला आणि सैरावैरा धावत सुटला. त्याचा बाबा त्याला कुठंही सापडत नव्हता. त्या तापलेल्या जमिनीने त्यच्या पायाची सालं निघायला लागली. त्याची तडफड पाहून कोणाला काहीच सुचत नव्हतं.
"बाबा" , रानातल्या मैदानात अर्धमेल्या अवस्थेत भीमा आपल्या पोराच्या किंचाळ्या ऐकत पडला होता. कदाचित नजर भरून पोराला बघण्यासाठीच थोडा वेळ त्याने मृत्यूकडून मागून घेतला असावा. अंगभर तलवारी आणि कोयत्याचे वार होते. आजूबाजूची जमीनसुद्धा सांडलेल्या रक्ताने लालबुंद झाली होती. सगळेच त्याच्यापाशी पळत गेले. सर्जाने बापाला कवटाळले.
"बाबा, काय झालं,"
" सर्जा, लेकरा...!" रक्ताने माखलेले हात आपल्या पोराच्या चेहऱ्यावर फिरवता-फिरवता भिमाचे प्राण डोळ्यातूनच बाहेर पडले.
"बाबा...!" सर्ज्याच्या त्या हंबड्याने अख्ख्या रानातलं रोम-रोम हादरले. रावसाहेबांना त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण तो बापाचं प्रेत सोडायला तयारच नव्हता. तिथे असलेल्या दगडालाही पाझर फुटेल असा तो प्रसंग होता. सूर्य अस्ताला आला होता. रानातंच भीमाच्या उरल्या शरीराला अग्नी देण्यात आला. त्या चितेच्या सावलीत रावसाहेब सर्जाला हात धरून आपल्या सोबत नेऊ लागले, ते पाहून कदाचित भीमाच्या आत्म्याला शांती मिळणार होती.
"धनी, अस्तनातलाच साप आहे..!" खंडेराव दुसऱ्यादिवशी सकाळी एका हातात सुर्याजीच्या अर्धवट जळलेला पट्टा घेऊन आला. तिथेच कोपऱ्यात बसलेल्या सर्जाला जगण्याचे एक ध्येय मिळाले. कोवळ्या वयात एकुलतेएक छत्र हरपलेल्या सर्जाला माया हा एकमेव आधार उरला होता. उरले-सुरले आयुष्य धन्यासाठी द्यायचे, या निश्चयाने सर्जा दुपटीने सराव करू लागला. कधी-कधी रावसाहेबांना सुद्धा त्याची तलवारबाजी पाहून धडकी भरायची. बापाने दिलेल्या तिर-कामटा तर त्याच्या सवयीचा झाला होता. त्याच्यासोबत माया सुद्धा तयार होत होती. वाढत्या वयासोबत बदलत जाणारे ऋतू नात्याची नवी पालवी घेऊन येत होत्या खऱ्या ! पण जुन्या जखमां तश्याच ताज्या रहात होत्या.
दिवसांमागून दिवस जात होते. विल्सन नावाच्या नराधमाचा वरदहस्त डोक्याखाली घेऊन तो शांत झोपी जात असे. विल्सन आहे तोपर्यंत आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाहीये, असा भास त्याला असला, तरी दारापाशी दोन पहारेकरी जागे ठेवूनच तो झोपायचा. त्या रात्री सुद्धा तो निवांत झोपला होता. विल्सन नी त्याला एक विदेशी मद्याची बारकी बाटली दिली होती. तिचा परिणाम जरा बरा होता. डोक्या व्यतिरिक्त इतर सगळे अवयव शुद्धीत असायचे.
बाहेरच्या वाड्याच्या भिंतीवर काळ घात लावून बसला होता. अंधार झाला होता, पण थोडा अजून गडद व्हावा म्हणून त्याने सर्वांगाला राख फासली होती. उगाच गोंधळ नको, म्हणून शेजारच्या पवारांची कुत्री आणि कोंबड्या आज संध्याकाळीच रानाकडे रवाना झाल्या होत्या. सुमारे दीड तास तो निपचित , अल्प श्वासावर दबा धरून बसला होता. सुर्याजीच्या घरात झोपाझोप झाली. त्याची बायको आणि पोरगं वरच्या मजल्यावर जाऊन केव्हाच दिवे घालवून बसले होते.
तो अतिशय शांत डोक्याने खाली उतरला. कमरेला विषारी कट्यार, पाठीवर बापाच्या भात्यातले काही विषारी तिर त्याने आधीच चढवले होते. घसरताना आवाज नव्हता होऊ द्यायचा, पडताना हत्यारं नव्हती मोडू द्यायची. गडद झाडीत वाडा निवांत लपलेला होता. आवाज नको, म्हणून वहाणा सुद्धा नव्हत्या. त्याने भिंतीचा अंदाज घेऊन, स्वतःला अंगणात सोडले. सुमारे ५० फूट चालत जायचे आणि दारावरच्या दोघांना मारायचे एक आव्हान त्याने सोप्पे केले. हाताला आलेली झाडाची फांदी त्याने हलवली.
"कोण ए रे !" एकाला संशय आला.
" कोण येतंय मरायला इथे ? " दुसऱ्याने फेटाळून लावला. हे नव्हतं व्हायला. त्याने पून्हा फांदी, पाहिले पेक्षा अधिक जोरात हलवली. या वेळी, ही हालचाल माणसाने केलीये असे भासले पाहिजे, याचे भान ठेवून ! संशयाचा अंदाज खरा करत, एक पहारेकरी त्याच्याकडे येऊ लागला. हाताच्या अंदाजाला आल्यावर त्याने त्याचा चेहरा हातात घेतला आणि खरकन आत झाडीत ओढला. काही कळायच्या आत, त्याच्या मानेवर धारदार विषारी सुरा फिरला ! त्याचा शेवटचा श्वास बाहेर निघाला, आणि तो जमिनीवर कोसळला. ठरलेल्या वेळेत पहिला न आल्याने, दुसरा ही त्याच मार्गाने निघाला आणि यमसदनी पोहोचला.
पुढचा मार्ग सोप्पा होता. पण त्याला स्वतःला लापावणं भाग होतं. सुर्याजीच्या दाराला लाथ मारून उघडल्यावर तो अंधारात गडप झाला. आधीच नशेत असलेला सूर्याजी जरा बावरून उठला. त्याची बायको आणि मुलगाही आवाजाने सचेत झाले, पण खाली नाही आले. सूर्याजी टप्यात आल्यावर त्याने त्याच्याकडिल भात्यातल्या एक बाण काढून त्याच्या मानेत खोचला.
" कोण ए, भाड्या, समोर ये !" सूर्याजी चेकाळला.
" बघ, बघ नीट..!" अंधारातही त्याला सर्जाचा चेहरा स्पष्ट दिसला. आता आपली घटका भरली हे सुर्याजीला कळून चुकले. क्षमा मागण्यात काहीच अर्थ नव्हता. खालचा आवाज ऐकून सुर्याजीचा मुलगा खाली आला. त्याला अंधारात काहीच दिसलं नाही. " सरड्याची जात ए तुझी ! एकवेळ सापाला जितं सोडावं, पण तुझ्यासारख्याला नाहीच नाही..!" आणि आधीच गड्याच्या रक्ताने लाल झालेला सुरा मालकाच्या मानेवर थंड डोक्याने फिरला...!
......
सकाळी सकाळी घोड्यावर बसून विल्यम आणि त्याचे शिपाई बंगल्यावर येताना पाहून रावसाहेबांना संशय आलाच. सकाळपासून कुठेच दिसला नव्हता.
" कुठंय तो?" इंग्रजाळलेल्या मराठीत विल्यमने सरळ रावसाहेबांना प्रश्न केला.
" कोण?"
" तोच, काल रात्री सुर्याजीला मारून पळालेला!!"
" तुंम्हीच सांगताय साहेब, पळाला म्हणून..!"
" रावसाहेब, त्याला जितकं लपवाल, तितका तडफडून मरेल तो..!"
" ते नंतर बघू, आधी इथून चालत व्हायचं." रावसाहेबांनी त्याला घरात सुद्धा घेतला नाही.
विल्यम तिथून गेला खरा, पण त्याने अख्ख्या शिवपुरी बेचिराख केली. सर्जाचा काका, त्याचे भाऊबंद त्याने क्रांतिकारी ठरवून भर वस्तीत फासावर दिले. त्याच्या वस्तीला आग लावून सगळेच लोक त्याने गावातून हाकलून लावले.
एक दिवस रात्री रावसाहेबांची भिंत लांघून सर्जा वर आला.
" कुठे जाशील, काय खाशील..!"
" इथे राहिलो, तर तो सायब सगळ्यांना असाच त्रास देत राहील."
"देऊ देत, करू आम्ही त्रास सहन, पण तू गेलास, तर आबांचं काय होईल, माझं काय होईल...!"
" मी येईल, पण केव्हा, ते नाही सांगत ! ते माझ्या नशीबालाच माहिती आहे...!" तिच्या हातावर हात ठेवून त्याने मोठ्या धैर्याने तिला विचारलं-" एक काम कराल का माझं...?"
"काय?" तिच्या डोळ्यांत हजारो प्रश्न दाटून आले.
" आबांना सांगून उद्या माझ्या प्रेताला गावसमोर अग्निडाग द्या...!"
" काय..?" तिला एकदम धक्का बसला.
त्याने तिला वाकून भिंती खाली दाखवले. त्याचे नेहमीचे कपडे घातलेले एक प्रेत तिला दिसले. बाजूला काही बाण पडले होते. चेहरा मात्र दगडाने पूर्ण ठेचलेला होता. काही कळायच्या आत, भावनांनी त्याची वाट अडवायच्या आत त्याने भिंतीवरून उडी मारली आणि मागच्या टेकडीवर तो चालून गेला. माया झाडीतली हालचाल बंद होईपर्यँत बघत राहिली. लहानपाणीपासून एक क्षणही त्याच्या शिवाय न घालवू शकणाऱ्या मायेच्या नशिबाला , त्याचा अनिश्चित विरह आला...!