माया
भाग -५
लेखन : अनुराग
भाग -५
लेखन : अनुराग
संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून नंदा पायऱ्या चढत होती.
" बोलायचंय तुमच्याशी..!" एकदम कीर्तिकर तिच्यासमोर उभे राहिले.
" काय झालं ?" हे नेहमीचं होतं, पण आज ती ही गोंधळली.
" या..!"
देवघरातील एका जुन्या कपटावरची लोखंडी पेटी खरखरत खाली आली. त्यातील धूळ साचलेल्या काही कुंडल्या बाहेर आल्या.
" अहो , तिन्हीसांजा झाल्या आहेत, आता कुठे कुंडल्या बघताय !"
" ही कुंडली सुर्यास्तानंतरच बघता येईल." बाकीची पेटी अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी जागेवर ठेवली.
ती कुंडली घेऊन कीर्तिकर देवापाशी आले. देवाजवळ तेलाचा दिवा लागला होता. किर्तीकरांनी ती कुंडली दिव्यावर धरली. नंदाला यात बरेच काही कळाले. दिव्याच्या उजेडात कुंडलीच्या पानांवर कोणाचे तरी काळे हात उमटलेले दिसले.
"म्हणजे..ही कुंडली!"
"हो."
कुंडली खाली ठेऊन कीर्तिकर खिन्न देवासमोर बसून राहिले.
" ब्रह्मदेवाने असुरांपैकी एका असुराला प्रत्येक अमावास्येला जन्माला येणाऱ्या मानवाची कुंडली लिहिण्याची मुभा दिली होती. कपटाने ती प्रथा आणि विद्या ते असुर कलियुगात घेऊन आले. आपल्या मर्जीने त्या नवजात शिशूच्या प्रारब्धाचे ग्रह, तारे, नक्षत्रांची व्यवस्था ते करू लागले. एखाद्याला अनिष्ट समयी जन्माला घालायचे ! त्याच्या नाशीबाशी वाटेल तसं खेळायचं आणि त्याचा दुर्दैवी शेवट करून मोकळं व्हायचं, एवढाच य सगळ्याचा उद्देश्य आहे."
नंदा शांतपणे ऐकत होती.
" माझ्या आयुष्यात, मी अशी एक कुंडली मांडलीये !" नंदाने नावाऱ्याकडे आश्चर्याने पाहिले.
" हो, आपण फक्त निमित्तमात्र असतो नंदा. आणि इथे करता-करविता एक दानव आहे. स्वतःच्या प्रजातीचा, स्वभावाचा , घृणेचा, मानवाशी आणि देवाशी असलेल्या वैराचा वारसा अखंडित सुरु असावा, म्हणून असुरांना ही विद्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यास सुरुवात केली. आजही अमावास्येला जन्म घेतलेल्या बालकांचे प्रारब्ध असुर ठरवत असतात."
"आणि ही अशीच एक कुंडली ...!" त्या कुंडलीत पाहिलेल्या तळव्याची सावली नंदाच्या डोळ्यासमोर आली. "आपण काही करत का नाहीत..?"
"इच्छा असूनही काही करता येण्यासारखं नाहीये. नक्षत्रांच्या या खेळात आपण मानव हस्तक्षेप नाही करू शकत. ज्याला त्याला ते भोगावे लागतेच. " देव्हाऱ्या खाली त्यांनी हात घातला. काही रंगीत दगडं असलेली टोपली त्यांनी बाहेर काढली. फरशीवर असणाऱ्या चौकटीत त्यांनी ती मांडली. मधोमध कुंडली ठेवली. त्यावर हळद लावली.
"ज्या दिवशी ही हळद लाल होईल, त्यादिवशी पासून नियती आपला खेळ सुरू करेल. तो पर्यंत आपण गप्प रहाणे इष्ट."
"ग्रहशांती..?"
" आहे शक्य, पण जो पर्यंत हे ग्रह, त्या असुरांच्या तालावर आपली स्थिती बदलत राहतील, तो पर्यंत नाहीच."
"ही कोणाची कुंडली आहे?"
काहीही न बोलता कीर्तिकर बाहेर निघून गेले.
" तुम्ही स्वतःला जवाबदार धरू नये. शेवटी हा प्रारब्धाचा खेळ आहे." नंदाही त्यांच्या मागोमाग गेली.
.....
आनंदने लेखाबद्दल पंतांना संगीतल्यापासून पंतांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. सुमनही चिंतेत होती.
" स्थळ चांगलं आहे, आणि पूढे मागे तो ही म्हणालाच ना ! मुंबईला जायचं म्हणून!"
"तसं नाहीये सुमन..! त्याच्या मागे आपण त्या पोरीच्या आयुष्याची माती नाही करू शकत. पाप आहे ते."
आनंद आत आला.
" मी गावात जाऊन येतो." दोघांच्या कपाळाला आठ्या आल्या.
" गाव आपलं आहे पंत..! त्यादिवशी घडला, तो अपघात होता. मला असं घरात डांबून काय होणार आहे ?"
"विठोबाला ने सोबत." पंतांनी परवानगी दिली.
बाहेर वाड्यात विठोबा कुठेच दिसला नाही. आनंद एकटाच पायी निघाला. हातात तीन-चार पत्र होतीच. गाव लहान आणि टुमदार होतं. पांढऱ्या चुन्यानी बांधलेल्या माड्या खूप कमी होत्या. सकाळी लवकर उठून अर्ध्याहून अधिक गाव पोरा-बाळांना घेऊन शेताकडे निघून जाई. सुर्यास्तापर्यँत बराचसा गाव ओस पडला असे. मातीची घरं जास्त असल्याने धुळीचे लोण उठत. पण आता पावसाळा असल्याने ते कमी होते. एखाद्या झोपडीपाशी बांधलेले एखादे जनावर दिसायचे, कुठे खाटेवर पहुडलेले म्हातारे. निमुळत्या गल्ल्या, मोठं-मोठाली झाडं. उन्हाचा ताप तसा कमी होता. गावात प्रत्येकजण पंतांना आणि सुमनला ओळखत होतं. आनंदलाही काही लोक ओळखत होते. अत्यंत सध्या कपड्यात बाहेर आलेला आनंद पाहून म्हाताऱ्या-कोताऱ्यांना आश्चर्य वाटत होते. आनंदलाही ते नवल वाटले.
"येऊ देता का बाहेर तुम्हाला ?" जाता-जाता एका झोपडीतून त्याला आवाज आला.
"होय, तुम्हीच !" पूढे सरकायच्या नादात असलेल्या आनंदला पुन्हा त्या आवाजाने रोखले. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीतून आवाज येत होता. आधीच वाढत चाललेल्या संशयात ही अजून एक भर...! आनंद त्या आवाजाच्या दिशेने चालत गेला. झोपडीला असणारा वाळ्याचा पडदा त्याने सरकवला. पण आत गेला नाही.
" यायचं तर आत या, इथे घाबरण्यासारखं नाहीये काहीच." आतला आवाज एखाद्या ५०-५५ वर्षाच्या म्हातारीचा होता. तरीही आनंद आत गेला नाही. आत देव्हारा होता. देवध्यानी माणसाचं घर होतं. आतून चंदनाचा एक छानसा सुगंध येत होता. कपाळावर भलं मोठं मळवट असणारी एक बाई बाहेर आली.प्रथमदर्शी कोणालाही धडकी भरेल, असाच तिचा अवतार होता. हिरवं नऊवारी पातळ, जागोजागी ठिगळ असलेलं ! त्वचा वयोमानानुसार कृश झालेली. पण डोळ्यात प्रचंड तेज. पायात जोडवी आणि गळ्यात पोत होती.
" हाच विचार करताय ना, गावातले लोक तुमच्याकडे नवख्यासारखे का बघतायत ते ?" तिने आनंदच्या मनातलं ओळखलं.
" प्रवृत्ती आहे ती माणसाची ! पूर्ण माहिती नसताना एखाद्याचे चरित्र, वर्तमान, स्वभाव आणि वागणं ठरवण्याची घाण सवय असते लोकांना. बसा." तिने आनंदला बसायला एक घोंगडी टाकून दिली.
" कोण तुम्ही !"
" माणसाचा भूतकाळ फक्त काल नसतो. काळ असतो. परमेश्वराने निर्माण केल्यापासून, त्याच्या प्रत्येक जन्माचं कर्म त्याच्या वर्तमानात त्याच्या मागे उभं असतं. कधी-कधी भविष्यात सुद्धा घात लावून बसलं असतं. "
"काही कळलं नाही मला !" आनंद अजून गोंधळला. त्याला पाणी देऊन ती आत गेली. येताना मुठीत हळद घेऊन आली.
" पंतांना मी आधीच बोलले होते. काहीही लपवू नका..! तरीही त्यांनी संकट दाराशी येईपर्यंत गुपितं दडवली." त्याच्या दोन्ही हाताने तिने तिच्या कडची हळद लावली. हाताला स्पर्श होताच हळद काळी झाली. आनंदला प्रचंड घाम फुटला. "त्या पोरीला तुम्ही सगळं सांगितलं, ते एक बरं केलं. तिने दुसऱ्या हाताने आनंदच्या हाताला स्पर्श करताच त्याच्या हाताला चंदनाचा वास येऊन वेदना नाहीशी झाली.
" कोण आहात तुम्ही...! तुम्हाला कसं माहिती हे सगळं. पंत आणि आई..?"
" धीर धरा. इतक्यात डोक्यात एवढे प्रश्न नका येऊ देऊ ! उत्तरं आत्ता मिळणार नाही. आत्ता फक्त एवढं लक्षात असू द्या. येत्या १५ दिवसात तुम्ही गावची वेस ओलांडू नका ! माझं नाव नर्मदा..! घरी पंतांना माझं नाव सांगा...!
अंतरात दडलेले हजारो प्रश्न वर मान काढून उभे होते. घरी जाऊन आधी पंतांना आणि आईला गाठणे भाग होते.तिच्याशी काहीही न बोलता आनंद तिथून निघाला.
" काही होणार नाही तुम्हाला, माणसं ओळखा आनंदराव ! गावाची वेस ओलांडू नका...! मी गावात आहे...!"
हे आनंदनी ऐकलं की नाही, माहित नाही.पण गावची वेस ओलांडायची नाही, हे तो ठरवून निघाला होता...

क्रमश:
अनुराग
माया
भाग - ६
लेखन : अनुराग
भाग - ६
लेखन : अनुराग
सुखी स्वप्नांची चादर ओढून लेखा झोपून गेली. पुढचा विचार तिने बाबांवर टाकला होता. ते कोणताही निर्णय अविचाराने घेणार नाहीत याची तिला खात्री होती. दोघांमध्ये नातेही तसे घट्ट होते. पहिल्या भेटीत झालेलं प्रेम असाही प्रकार नव्हता. खुपश्या भेटी-गाठी झाल्याने आज हे वळण लागले होते.
लेखाच्या आजूबाजूला अचानक काही विभत्स जिव नाचू लागले. एकाचे डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होता. एकाचे दात एखादे श्वापद खाऊन आल्यासारखे रक्ताळलेले होते. एकाचे हात खांद्याच्या खाली तुटून लोंबत होते, तर एकाचे पाय नसल्याने ते जमिनीवर फरफटत होते. प्रत्येकाच्या स्वभावात कमालीचा अधाशीपणा होता. ज्या जागी, संपूर्ण जीव असलेली फक्त लेखा होती. जिवाच्या आकांताने ती सैरावैरा धावत होती. कपडे फाटलेले, चेहऱ्यावर त्या श्वापादांनी बोचकल्याच्या खुणांमधून सुरु असलेला रक्तस्त्राव ! पळत असलेल्या रस्त्यावर फक्त काचा, काटे आणि पायाला घायाळ करू शकतील असे मोठे दगड होते. अचानक मागे पाहून पळताना ,ती कोणाला तरी धडकली. समोर पहाताच तिला एक अनोळखी इसम दिसला. " आमच्या जगात यायचा प्रयत्न करू नकोस. जगणे नरकाहून बत्तर होईल तुझं !" तो इसम सांगू लागला. त्याने आपले हात तिच्या गळ्याभवती आवळले आणि तिचा गळा दाबू लागला. तिचा जीव कासावीस होऊ लागला. शेवटचा पर्याय म्हणून तिने अत्यंत क्रूरपणे त्याच्या दोन्ही डोळ्यात बोटं घातली. त्याने झटक्यात तिला सोडले. लेखा त्याच्या तावडीतून सुटून पुन्हा जिवाच्या भितींने पळू लागली. काही अंतरावर तिला काही म्हातारी माणसं दिसली. त्यांचे चेहरे पूर्ण पांढरे पडले होते. त्यांच्यात आणि लेखातलं अंतर खरं आणि भासाइतकं सत्य होतं.
" वाटतं तितकं हे सोप्प नाहीये..!"
" यातून बाहेर पड लवकर, नाहीतर सगळं संपेल !"
" आम्ही सगळे तुझेच आहोत, या सगळ्याचा अंत फार विदारक आहे, पोरी..!"
लेखाला खाडकन जाग आली. ते स्वप्न होतं !" इतकं भयानक ? कोण होते ते लोक, इतके विभत्स, इतके करुण..! " ती पलंगाच्या खाली आली. जाता-जाता तिचे लक्ष, तिच्या खोलीतल्या मोठ्या अरश्याकडे गेलं. त्याला मधोमध एक मोठा तडा गेला होता. लेखाला तो सामान्य तडा वाटला नाहीच. खोलीचं दार उघडून ती बाहेर आली. बाहेर लांब पोर्च मध्ये एकच दिवा सुरु होता. तिने खोलीबाहेर पाऊल टाकलं. आपल्या बाबांच्या खोलीकडे ती जाऊ लागली. तिला तिच्या मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. पण मागे वळून तिने पाहिलं नाहीच.तेवढे बळ तिच्यात नव्हते. कपाळाच्या कडेतून घामाच्या धारा लागल्या. कोणाचे तरी श्वास तिला स्पष्ट ऐकू येत होता.
"बाबा...!" तिने जोरात आरोळी मारली. ते कोणाला ऐकू गेलेच नाही. तिच्या आजूबाजूला एक पोकळी तयार झाली होती. ज्यात ती आणि तिच्याआजूबाजूला होणारे प्रसंग घडत होते. तो श्वास तिला सोडत नव्हता. कदाचित कुठेतरी तो तिला नेण्याचा प्रयत्न करत होता. घराच्या मुख्य दारातून ती बाहेर आली. सगळी दारं आपोआप उघडत होती. श्वास लागल्याने ती कोसळली. हळू-हळू डोळे बंद होत होते, तेव्हा तिने दोन्ही पायात चांदीच्या जाडसर बेड्या असणारे पाय तिच्याकडे येताना पहिले.

" नाही, तसला काहीच त्रास नाहीये तिला !"
सकाळी काशी ने सगळा प्रकार पहिला. डॉक्टर घरी आले. लेखा अजूनही बेशुद्ध होती.
" चक्कर वगैरे तिला कधीच नाही आली, आणि ती एवढ्या रात्री काय करणार होती बाहेर ?" बाबांनी स्पष्ट केलं. सकाळी तिला आत उचलून आणणारी काशी एका कोपऱ्यात उभी होती. लेखाला सकाळी तिने पाहिलं होतं.
" साहेब, हे लक्षण आजारपणाचं नाहीये !"
डॉक्टर आणि बाबांनी तिच्याकडे पाहिलं.
" ताई जश्या पडल्या होत्या, हे लक्षण आजारी माणसाचं नाहीये !"
"मग..? काशाचं आहे ?" डॉक्टरांनी विचारलं.
" वेगळं आहे काहीतरी..!" काशी जवळ आली. लेखाच्या मानेवर असलेला गाऊनचा कोपरा तिने बाजूला केला. तिच्या मानेवर एक लालसर वळ उमटला होता. "हे सकाळीच पाहिलं मी !"
"हे पाळताना देखील लागू शकतात काशी."
" पाळताना , ज्या बाजूने माणसाला एखादी वस्तू लागते, त्याच ठिकाणी खूण उमटते न साहेब...? नीट बघा.." ती खूण पाहून बाबा आणि डॉक्टर, दोन्ही चपापले.
" काल बंगल्यात कोणीतरी शिरलंय, एखादा चोर, भामटा ? चांदेकर साहेब, मला वाटतंय तुम्ही एकदा पोलिसांना बोलवावं."
आपली बघ घेऊन, डॉक्टरांनी काही औषधं बाबांच्या हातात दिली. "मी उद्या सकाळी येऊन जाईन, काळजी घ्या."
आपलं काम करून डॉक्टर निघून गेले. बाबा आणि काशी पूर्ण घरात फिरले. साधी सुई सुद्धा जागची हलली नव्हती. दोघ पुन्हा खोलीत आले. लेखाचा चेहरा थोडासा काळवंडलेला त्यांनी पहिला. त्यांनी तिच्या हाताला हात लावला. अत्यंत थंड होता तिचा हात. खिडकीतून वाहणाऱ्या वाऱ्याने आनंदचं पत्र खोलीभर उडवायला सुरवात केली. बाबांना उगाच शंका आली.
.....
" काका, तुम्ही असं गप्प बसलात, तर मला काहीच नाही करता येणार." आठवडाभर दवाखान्यात उपचार घेतल्यावर , तिसऱ्या चोराची रवानगी शेखरच्या पोलीस ठाण्यावर झाली.
" काय बोलावं साहेब ? समोर सगळा अंधार आहे." अशीच मोघम उत्तर त्याच्याकडून येत होती.
"घरी कोण-कोण असतं तुमच्या ?" विषय बदलावा म्हणून शेखरनी विचारलं.
" पोरगी आहे, वाट बघत असंल घरी माझी..!" त्याच्या जखमी डोळ्यातून पाणी यायला लागलं. " सरकारचा सारा भरू-भरू शेती करायची इच्छाच मेली आमची. खायची ददात झाली, गावाकडे मी आणि पोरगी एकटेच ! तुमची माणसं यायची.पोरीला एकटं ठेवणं अवघड झालं." शेखर सगळं ऐकत होता. दिगंबर तिघांचं जेवणाचं घेऊन आला.
" चोऱ्या करायचं ठरवलं नव्हतं. पण इथे काही काम मिळेना. ते दोघ पण माझ्यासारखेच..!"
"त्या दिवशी रात्री काय...?" शेखरनी मुद्द्याला हात घातला.
"खूप दिवसांपासून आमची त्यावर नजर होती. बाळा, माझा एक जोडीदार एकदा येऊन बघून गेला होता. आतल्या महागड्या वस्तू, सोनं-चांदी, पितळ, जे सापडेल ते घ्यायचं आणि गावाकडं निघायचं. चोरीच्या रात्री आम्ही तिघं त्या बागेत जमलो. मला लांबून तो बंगला काही बरा नाही वाटला ! मी बोललो, नकोय जायला आत ! बाळा आणि शिवाने मला वेड्यात काढलं. पाळत ठेवायचं निमित्त करून मी बाहेर थांबलो. मिळाला, तर थोडासा कमी वाटा घेण्याच्या बोलीवर."
सगळं पोलीस ठाणं एव्हाना पिंजऱ्याच्या आजूबाजूला गोळा झालं. प्रत्येकाच्याच माथ्यावर आठ्या होत्या.
" बराच वेळ आतून काहीच आवाज आला नाही. मोठी हिमंत करून मी डाव्या अंगाच्या खिडकीपाशी गेलो. चढून आत गेलो. आत शांत होतं सगळं. महाल होता जणू, एखाद्या राजाचा. मोठ्या खुर्च्या, तांब्या-पितल्याच्या फुल दाण्या, नकक्षीदार कालीन...! बाळा आणि शिवा कुठे घावले नाही. मला भीती वाटू लागली. एक एक पाऊल टाकत मी अंधारात पूढे सरकू लागलो. एकदम मला शिवाचा किंचाळल्याचा आवाज आला. मला घाम फुटला. आवाज आला तिकडे माझी कुऱ्हाड सरसावून निघालो. पायाला एकदम काहीतरी लागलं. मी खाली पाहिलं...!" एकदम तो शांत झाला.
" काय होतं... खाली?" बाजी ने विचारलं.
" शिवा... मरून पडला होता." प्रत्येकाच्या अंगावर सरसरून काटा आला. " मान वर आणि शरीर खाली...!" बाजीच्या हातून पेला सुटला, तसा आवाजानेच सगळे घाबरले..!
"गेलाच होता, त्याला काय विचारायचं?"
"मग...पूढे..!" आता शेखरही घाबरू लागला होता. "त्याला असं कसं सोडायचं, म्हणून मी ओढून बाहेर आणलं. बाळाला आवाज द्यायचे धाडस माझ्यात नव्हतेच. बाजूच्या लाकडी खोलीतून काहीतरी सरकण्याचा आवाज आला. शिवाच्या प्रेतापाशी मी दबा धरून बसलो. जवळ काडीपीटी होती. सरकण्याचा आवाज जवळ आला, तसा एक काडी मोठ्या हिमतीने ओढली...! बाळ्या सरकत सरकत येत होता. ते पाहून माझी उरली-सुरली हिमंतही गेली. मी उठून त्याच्या जवळ गेलो. ' बाबा, मला वाचीव रे..! मला नाही मरायचं..!' बाळा ओरडू लागला, त्याला वाचवायचा म्हणून त्याच्या जवळ गेलो. त्याचे दोन्ही पाय, हात मोडलेले होते. तसा त्याला खांद्यावर टाकला, खिडकीबाहेर नेऊन ठेवला. ' शिवाला मरू दे, आत चांगलं नाहीये, जीव घेईल ते..! ' बाळा ओरडू लागला. पण मी पुन्हा आत गेलो. शिवा मेल्याचं बाळाला सांगितलं नाही. प्रेत असं वाऱ्यावर सोडणं बरं नाही वाटलं. ते उचललं आणि खिडकी बाहेर टाकलं. तेवढ्यात मला कोणीतरी आत ओढलं. माझ्या गल्याभवती फास पडला. मला मृत्यू जवळ भासू लागला. पोरीच्या आठवणीत काळवळलो. एकदम कानापाशी कोणीतरी ओरडलं 'पोरीची काळजी घे..!' माझं एक डोळा मात्र घेऊन गेलं..!"
सगळे थंडगार उभे होते. कोणी काहीही बोललं नाही.
" आवाज माणसाचा होता की बाईचा ?" दिगंबरनी विचारलं. "साहेब, जीवावरचं एका डोळ्यावर भागलं, इतकंच सांगतो...! जास्त तपास काढायचा भानगडीत नका पडु. तुम्ही साहेब लोकं, पण चार पावसाळे मी पहिले आहेत...!" एवढं बोलून बाबानी पहिला घास चाचपडत पोटात ढकलला.
चार पावसाळे कसे पाहिले, याचा अंदाज शेखरला आला. हा पावसाळा मात्र म्हातारा कधीच विसरणार नव्हता. बाहेर विजा कडकडत होत्या. सगळे एकत्र जेवले. झोपलं मात्र कुणीच नाही...!