माया
भाग - ३
लेखन : अनुराग
भाग - ३
लेखन : अनुराग
चार वर्षांनी समोर मुलगा उभा राहिला. सुमनच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ थांबत नव्हता. नजर त्याच्या निरागस गोऱ्या चेहऱ्यावर खिळून होती. आधीच भाबडा दिसणारा चेहरा, थकल्याने जरा मलूल झाला होता.
"दृष्ट लागली पोराला !"
" व्हय, थांबा, संध्याकाळी मीठ-मोहरीने काढते. आणि परवा अमोशेला कोंबडं ववाळून टाकूया!"
रुक्मिने आपले जालीम उपाय सांगितले.
" कोंबडं कशाला ! उगाच मुक्या जीवांचे बळी नाही घ्यायचे. त्यांने नाही होत काही..!" खाता-खाताच आनंद म्हणाला.
" तुला नाही माहित, बघणाऱ्या प्रत्येकाची नजर चांगलीच असते असं नाहीये." सुमन मधली आई बोलली.
" अगं आई...!"
" मोठी मांन्स सांगतायत ते ऐकायचं ! छान बुक शिकून आला आहेस विलायतेहून, ते ठीकए सगळं, पण इथे नाहीये तसं..!"
आईपुढे आनंदाची मात्रा चालेना झाली.
दुपारी सगळेच आनंदच्या खोलीत जमले. आपण सोडून गेलो होतो, तशीच खोली ठेवलेली पाहून त्यालाही बरं वाटलं. त्याच्या अत्यंत खासगी बाबींपैकी एक त्याची खोली होती. आज सकाळीच ती रुक्मिने झाडून पुसून ठेवली होती.
" हे घ्या, पंत, हे तुम्हाला ! "
चांदीच्या मुठीची एक सागाची काठी आनंदनी त्यांच्या हातात ठेवली.
"छान ए, नाहीतरी माझी जुनी झालीच आहे."
"हो, ही handmade आहे, एकही यंत्र लागलेलं नाहीये !"
"अरे वा ! सुरेख नक्षीकाम आहे रे..!"
सुमन पोरानं तिला आणलेली मऊ गादी , उशी आणि पांघरूण बघत होती.
तिघांमध्ये असलेल्या संवादात एक अपूर्णता होती. पंत आणि सुमन अंतरंगात गुपितं दडवून थकली होती. नियातीपेक्षा वेळंच भलते-सलते खेळ खेळत होती. ताऱ्यांचा खेळ खूप वेगळा आणि विक्षिप्त होता. पण आनंद अनभिज्ञ होता. एखाद्याने मन लावून एखादी नक्षी तयार करावी तशी आनंदची ठेवण होती. आनंद कसा असतो, हे त्याच्याकडे पाहून सहज कळले असते. निरागस चेहरा , आवाजही तितकाच लोभस. प्रथमदर्शी पहावं आणि सरळ प्रेमात पडावं असाच शांत. एखाद्या उगवत्या झर्यासारखं स्वच्छ वागणं. कोणताही भेदभाव नाही, कोणाविषयी कपट नाही, छ्ल नाही. त्याला दीर्घकाळापासून ओळखणारे, त्याला ओळखण्यात मोठी धन्यता मानत. देवानेच स्वतःहून घडवलेली ही मूर्ती, नियतीने नशीब लिहिताना विदारक झाली होती.
"प्रिय लेखास,
सुखरूप पोहोचलो. काळजी करू नकोस. वाड्यात सगळं काही ठीक आहे. आई माझ्या येण्याची आतुरतेने वाट पहात होती. मला ४ वर्षांनी पाहिल्यावर तिची झालेली घालमेल बघायला तू समोर हवी होतीस. ते शब्दात सांगता येणे शक्य नाही. पंत ही ठीक आहेत. म्हातारपणाच्या खुणा दिसू लागल्या आहेत. मी जसा सोडून लंडन ला गेलो होतो, अगदी तसाच वाडा त्यांनी ठेवला आहे. रंग सुद्धा बदलला नाहीये. आज दुपारी दोघही माझ्या खोलीत आले होते. इतकं खुलून काहीही बोलले नाहीत. मी ही त्यांना काहीही बोललो नाहीये. जे काही घडले, घडेल त्याच्यासमोर खंबीरपणे उभं रहायला मी तयार आहे. पण या वयात त्या दोघांना याचा मनस्ताप खूप होईल.
तू नेहमी म्हणतेस, भय ही एक मनाची स्थिती आहे. एखादी अनपेक्षित, कधीही समोर न आलेली गोष्ट घडायला लागली, की त्यातून भय निर्माण होतो. पण इथे काहीतरी वेगळं आहे. इथे भय भविष्याचं आहे. जे घडणार आहे, ते घडेल की नाही, याची शंका असून सुद्धा त्याचे भय मात्र खूप गहिरे आहे. येऊन काही तास झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उगवला आणि नकळत मावळलाही. ते दोघे एखाद्या हतबळासारखे हात बांधून येणाऱ्या काळासमोर उभे असलेले मला दिसले.
असो, आपल्याबद्दल यथावकाश मी दोघांना सांगेन. ते नाही म्हणणार नाही. खाली पत्ता लिहिला आहे. पत्र पाठवत रहा. मी ही कळवीन.

तुझाच
आनंद..!
" चला..!"
मागून विठोबा बोलवायला आला. आनंदने न विसरता त्याच्यासाठी आणि रुक्मिणी साठी एक-एक स्वेटर आणले होते.
" जाऊया...! हे घालून दाखवा आधी."
" मालक, हे काय ए, अहो आम्ही गडी-माणसं. उगाच जीव लावून आम्हाला उपकारात नका टाकू. ! "
" उगाच मनाला येईल ते नका बोलू. तुम्ही जे काही माझ्यासाठी आणि या घरासाठी केलं आहे, ते करायला काळीज लागतं!"
विठोबाच्या डोळ्यात एकदम पाणी तरळलं. कदाचित भूतकाळातले काहीतरी त्याला आठवले असावे. आनंदने त्याला मारलेल्या मिठीत त्यावेळी सगळेच भरून आले. दोघेही खोलीचे दार लावून निघून गेले. खिडकीच्या वाऱ्यावर लेखाला लिहिलेलं पत्र उडत राहिलं, आणि अचानक थांबलं. एका पाकिटावर तिचा मुंबईचा पत्ता लिहिला होता. कोणीतरी तो खूप सावधरित्या तो वाचला होता...!
----
आज कीर्तिकर पहाटेपासून जागे होते. नंदाला काही कळेनासे झाले होते. त्यांनी सांगितले, तसे तिने त्यांना पहाटे चहा करून दिला. त्यावेळीही ते अस्वस्थ होते.
" काय झालंय तरी काय? तास झाला, झुलता आहात झोपाळ्यावर!"
त्यांनी न ऐकल्यासारखं केलं.
"अहो..! बरे नाही का, वैद्यबोवांना बोलावणे धाडू का ? "
" नंदा, तू थोडं गप्प बस, मी कोणाची तरी वाट पहातोय."
" कोणाची..?"
" कळेल, पण तो पर्यंत जरा गप्प बस." नंदा खिन्न होऊन आत गेली. तिने बऱ्याचदा त्यांना उगाच असवस्थ झालेलं पाहिलं होतं. थोडावेळ अस्वस्थ झाले, की बरे व्हायचे. इतक्या दीर्घकाळ अस्वस्थ रहाणे, त्यांना देखील आवडत नसे.
मुख्य दरवाजाची कडी वाजली. कोपरी, पागोटे घातलेला एक मध्यवयीन इसम चालत आत आला. कीर्तिकर अजूनही झुलत होते. पण त्याला पहाताच ते लगबगीने उठून खाली आले.
"काय रे, किती उशीर..!"
" पावसामुळे वाटा नीट सापडत नाही. रात्रीचा प्रवास धोक्याचा आहे." बोलता-बोलता त्याने कमरेला असलेली एका मळक्या कागदाची गुंडाळी त्यांच्या हातात दिली. बाहेर तिसरा आवाज ऐकल्यावर नंदा ही काम टाकून बाहेर आली. किर्तीकरांनी गुंडाळी उघडली. तिथेच पायरीवर बसले.
" अनावधाने झालेल्या पापाची परतफेड करण्यासाठी दोषी जमा होतायत. त्यांचा दोष माहित नसताना सुद्धा, त्यांना बळी जावे लागेल. त्यांच्या चिकित्सेला आणि प्रश्नांना काय उत्तर द्यावे ? आल्या-आल्या अकस्मात त्यांना काळाने अघोरी दर्शन दिले. मी तिथेच होतो. फार काळ सत्य लपून रहाणार नाही, या न त्या मार्गाने ते अक्राळ रुपात समोर येईलच. आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांना सावध करेन. "
किर्तीकरांचे एकदम डोळे गरगर फिरायला लागले.
" थांब तू इथेच. नंदा, याला पाणी दे, मी आलोच !" आणि ते देवघरात गेले. एका कापडी पुरचुंडीत महाकाळाची रक्षा त्यांनी बांधली.
" कळतंय मला, निरोप मिळाला. रक्षा पाठवली आहे. पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाकून ठेवावी. घरात महादेवाचे एखादे स्थान करून ठेवावे. घरात देव नसणे ,जीवावर बेतू शकते." थोडावेळ थांबून तो निरोप्या निघून गेला.
-----
पावसाने क्षणभर विश्रांती नंतर पून्हा पाय पसरायला सुरवात केली. आपल्या खोलीत जवळपास चार वर्षांनी आनंद निवांत झोपला होता. कितीही सांगितलं, तरी तो खिडक्या बंद करत नसे. अचानक कसल्याशा चाहुलीने त्याला जाग आले. खिडकीच्या बाहेरून कोणीतरी आत डोकावून बघत असल्याची पूर्ण जाणीव त्याला झाली.
"कोण ए?" त्याने पलंगावरून हाक मारली.डाव्या हाताने चिंमणीची वात वर केली. त्याच्यापुरती उजेड झाला होता.
" विठोबा, तुम्ही आहात का ?" तरीही काही हालचाल झाली नाही. पलंगावरून त्याने दोन्ही पाय खाली ठेवले. वहाणा घालून तो उघड्या खिडकीकडे चालू लागला. बाहेर आडोश्याला ठेवलेल्या मशालीत फारसे दिसत नव्हते. खिडकीची दारं मंद वाऱ्याच्या सुरांवर डोलत होती. एक एक पाऊल पुढे टाकत आनंद खिडकीपाशी आला. गजांना हात लावून तो बाहेर पाहू लागला. कोणीच नव्हते. त्याने नजरेच्या विळख्यात येईल ते दोनदा पहिले. हात बाहेर काढून दार ओढणार तितक्यात कुठुनशे एक वटवाघूळ उडत येऊन त्याच्या हातात अडकले. जिवाच्या आकांताने आनंद मागे सरकला. वटवाघूळाने त्याचा डावा हात आपल्या दोन्ही पंजात पूर्ण अडकवला.तो चोचीने त्याला टोचू लागला. उजव्या हाताने आनंदने त्याला ओढायचा प्रयत्न केला, पण त्या पक्षाचे पंख त्याच्या डोळ्यावर फडफडू लागले. आनंद खाली पडला. बाजूच्या मेजाला धक्का लागल्याने पाण्याने भरलेले तांब्या-पेला खाली पडले. आवाज झाल्याने बाहेर पाहऱ्याला असणारा विठोबा खाडकन दार उघडून आत आला. अजस्त्र वटवाघूळाची आणि आनंदाची झटापट पाहून त्याला क्षणभर काय होतंय, हे कळलेच नाही. सावरून त्याने दोन्ही हाताने ते पाखरू ओरबाडले आणि भिंतीवर आदळले. आपल्या बलदंड दांडूक्याने त्याच्या डोक्यावर वार केला. ते तिथेच तडफडत गेले. आनंद जमिनीवर पडला होता. एव्हाना धावत पंत आणि सुमनही वर आले. आनंदचा डावा हात रक्तबंबाळ झाला होता. डोळा थोडक्यात वाचला होता. पुढच्या दारावर पाहऱ्याला असणारी गडी माणसं मशाली घेऊन धावत सुटले.कोणास काहीच सापडले नाही. अचानक झालेल्या या हल्ल्याने आनंद पूरता घामाघूम झाला. ते काय होते, आले कुठून, घरात कसे शिरले...!!! गतप्राण झालेले तर पाखरू, निपचित, निरुत्तर, पडून राहिले. त्याचा आत्मा डोळ्याने गेला होता. आनंदला पुन्हा जागेवर बसून विठोबा त्या वटवाघूळाकडे आला. त्याने त्याच्या डोळ्यात पहिले. अत्यंत केविलवाणे डोळे होते. सांगत होते, मी फक्त सावध करायला , खूप लांबून आलो होते...!

क्रमश:
अनुराग
माया...
भाग - ४
लेखन : अनुराग
भाग - ४
लेखन : अनुराग
पावसाचे रौद्र वाढत जात होते. परिसरात ओढे, नदी-नाल्यांमध्ये वाढतं पाणी दळण-वळण विस्कळीत करून जात होते. शेखर काही पत्रांची उत्तर लिहून गाढ झोपला होता. त्या घटनेनंतर विचलित होण्यासारखं काहीही न घडल्याने, तो एक भास समजून शेखर सगळं विसरला.
अचानक कोणीतरी जोरात थाप मारली. कोणीतरी खूप घाबरले असावे, किंवा आतातायी झालेले असावे. एकदम त्याची गाढ झोप कुठल्या-कुठे उडून गेली. त्याने घाईने जाऊन दाराची कडी काढली.
" बाजी, काय झालं, इतक्या रात्रीचं?"
" साहेब, लवकर चला, चावडीपाशी ! " त्यांच्याच ठाण्यात काम करणारा एक हवालदार निरोप सांगायला आला होता. बाहेर चिखल बघून ते पायीच निघाले. आभाळ भरलेलं असल्याने चांदण्याचा काही उपयोग नव्हताच. रस्त्यावरचे दिवे केव्हाच विझले होते. बाजीच्या हातातल्या कंदिलाच्या वाटेने दोघे चालत होते.
चावडी चौकापासून काही अंतरात झुडपे होती. तिथे दोन शिपाई उभेच होते. दोघेही घाबरलेले होते. शेखर आणि बाजी त्यांच्याजवळ जाताच, त्यातील एकाने डोळ्यानेच शेखरला इशारा केला. शेखर ने उजवीकडे पाहिले. काही अंतरावर दोन प्रेतं पडलेली होती. शेखर जवळ जाऊ लागला. " नका जाऊ साहेब ! उद्या सकाळी बघा. बेकार हालत ए !!" थोडासा सावध होत शेखर एक एक पाऊल पुढे टाकू लागला. तिघांपैकी एकही हवालदार त्याच्यासोबत पूढे आला नाही. एका झुडपा मागे त्याने पहिले. त्याचा स्वतःवरच विश्वास बसला नाही. प्रेतं अत्यंत क्रूर अवस्थेत होती. एकाचा डावा पाय मागे पूर्ण वाकवून तो कमरेपासून वेगळा केला होता. दुसऱ्याची मान पूर्ण वाळवून त्याचा जिव घेतला होता. वय २८-२९ वर्ष असलेल्या शेखरने आज पर्यंत एवढा भयंकर प्रकार पहिला नव्हता. बाजूला, अजून थोडं पुढे, कोणीतरी घोंगडी पांघरून रडत होतं. पावसाने त्याची घोंगडी पार ओली झाली होती. शेखर दबकत त्याच्या जवळ गेला. प्रेतांची छिन्न-विच्छिन्न अवस्था पाहून आता शेखरलाही भीती वाटू लागली होती. वातावरणामुळे घटना अधिकच भयानक भासत होती.
"बाबा..!" घोंगडीतल्या माणसाने काहीच उत्तर दिले नाही.
" कसं झालं हे ? आणि तुम्ही..?" शेखरनी आपलं काम सुरु केलं.
" बोललो होतो मी त्यांना..!" त्या माणसाने एकंच टाहो फोडला. त्यांच्या त्या ओरडण्याने तिथल्या झुडपांना सुद्धा कापरं भरलं असेल.
"बोललो होतो, नका जाऊ, नाहीये तिथे काहीच...!" शेखर गुपचूप ऐकत होता. घोंगडीत असलेला माणूस बोलायला लागलेला पाहून अत्तपर्यंत बाजूला उभे असलेले शिपाई जवळ यायला लागले.
"आम्ही तीन जण होतो. चोरी वाटमारी करत पोट भरायचो. बरेच दिवस इथे कोणी नाही पाहून आम्ही आज आलो. पण मला शंका आली ! मी या दोघांना म्हणालो, नका जाऊ ! नाही ऐकलं साहेब यांनी.!" त्याचं रडणं थांबत नव्हतं. " मला शिव्या देऊन ,दोघ निघून गेले. बराच वेळ त्यांचा काहीच आवाज आला नाही. मी जागचा हललो नाहीच..! बऱ्याच वेळाने दोघांच्या किंकाळ्या ऐकू आल्या."
"त्यांना इथे आणलं कोणी ?"
"मी आणलं ओढून, एक एक करत..! " शेखर ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वाऱ्याचा एक जोरकस मारा झाला आणि त्या माणसाची घोंगडी त्याच्या डोक्यावरून खाली सरकली. समोरचं दृश्य पाहून शेखर भीतीने लांब फेकला गेला. त्या माणसाचे दोन्ही डोळे कोणीतरी अत्यंत क्रूरपणे फोडले होते. दोन्ही डोळ्यांमधून रक्त वहात होतं. शेखर लांब पडलेला पाहून शिपाई धावत आले. त्यांनी ही ते दृश्य पाहिलं. दोघांनी चिखलात पडलेल्या शेखरला उचललं, तिसऱ्याने ती चिखलाने माखलेली घोंगडी त्या माणसावर टाकण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली होती. कसंबसं सावरत ते तिथून जाऊ लागले.
" त्या माणसाला सरकारी दवाखान्यात न्या. उद्या सकाळी पून्हा येऊ तपासाला." शेखरला सुद्धा आता तिथून लांब पळायचे होते. दोन शिपाई मोठ्या हिमतीने त्या माणसाजवळ गेले. त्याला उभं करून सोबत चालतं केलं.
शेखर रात्री पोलीस ठाण्यातच झोपला. सकाळी लवकर बाजी सोबत कालच्या घटना स्थळी आला. काही माणसं सोबत होती. त्यांनी बैलगाडीत भिजलेली प्रेतं ठेवली.
"साहेब, हे माणसाचं काम नाहीये !" बाजी प्रेतांकडे पाहून बोलला. शेखर शांत होता. घटना घडली ते ठिकाण पाहून त्याच्या मनात कापरं दाटून आलं. तो तोच बंगला होता. कालच्या घटनेला मुक्याने दुजोरा देत तसाच शांत, निपचित उभा होता.
" मग...कोणाचं काम आहे.!" शेखरने खूप वेळाने बाजीला विचारलं. बाजीने बंगल्याकडे बोट दाखवलं.
तास-दोन तास अख्खा परिसर पिंजून काढला. कोणाला काहीही सापडलं नाही. दिगंबर सुद्धा सोबत आला होता. सोबत असलेली ती माणसं निघून गेली होती. हतबल शिपाई शेखर च्या आजूबाजूला गोळा झाली.
" साहेब, एक इंचभर सुद्धा पुरावा सापडला नाहीये. आता काय करायचं?"
"काही नाही." अजुंनही शेखर शांत होता. चालत-चालत तो बंगल्याच्या मुख्य दारापाशी गेला. त्याने कुलुपाला हात लावला. खूप जुनं कुलूप होतं. अर्ध्याहून अधिक गँजलेलें. दाराची कडीही जड झाली होती.
" डाव्याबाजूच्या खिडकीची काच तोडून आत गेले." बाजी म्हणाला. " जे काही घडलंय, ते आत घडलंय. कुणी बाहेरून आलंच नाहीये. त्या बाबानी या दोघांना ओढून कसं आणलं ?" शेखरचा प्रश्न वाजवी होता. "घराला लावलेलं कुलूप , बंद दारं खिडक्या...?" शेखर डाव्या बाजूला गेला. एक खिडकी अर्धी उघडी होती. एक माणूस सहज आत जाईल, इतकी ती मोठी होती. आतलं ही बऱ्यापैकी दिसत होतं. बाजी आणि शेखरनी आत पाहिलं. आतलं सगळं समान, जसंच्या तसं होतं. झटपटीची साधी खुणही तिथे नव्हती. आतून जन्मलेले प्रश्न , त्याची उत्तरंही आतंच होती. आत काहीतरी होते , जे श्वास घेत होते...!
.....
" अगं, पत्र झिजेल आता..!" अचानक बाबा खोलीत आलेले पाहून लेखा बावरली. आल्यापासून कित्येकदा तिने त्याचे पत्र वाचले होते. "बोलवायचं नाही का त्याला घरी ?" बाबा पलंगावर येऊन बसले.
" बाबा, तो इथे मुंबईला येऊनच प्रॅक्टिस करेल. एकदा सगळं सुरळीत झालं, की पुढंच !"
" चांगलं आहे. पण एकदा त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना मुंबईला बोलवून घेऊ. मुंबई आणि माणसं, दोन्ही बघता येतील त्यांना." चांदेकरांनी लेकीला अत्यंत लाडात वाढवले होते. लेखा सुद्धा अत्यंत हुशार, आज्ञाधारक मुलगी होती. आनंद भेटल्यापासून, ते आजपर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी तिने त्यांना सांगितल्या होत्या. बाप-लेकीचा एकमेकांवर खूप विश्वास होता. तिच्या डोक्यावर हात फिरवून ते उठले आणि चालायला लागले. दारापाशी येऊन कसलासा प्रश्न आला, म्हणून ते थांबले.
" लेखा..!"
"काय बाबा?"
" ते खरं होतं ? जे तू मला इंग्लंड ला असताना पत्राने लिहून कळवलं होतंस ! " लेखा पलंगावरून उठली.
"हो..! माझ्यासमोर घडलं नव्हतं, पण खोटं नव्हतं..! का बाबा, काय झालं?"
" नाही, सहज विचारलं."
लेखा पून्हा मागे आली. बाबा बाहेर निघून गेले.
ब्रिस्टल च्या विधीशाळेत दोघांची भेट झाली. भारतातील मोजके, त्यातही मराठी भाषिकांची संख्या कमीच! आनंद कॉलेज जवळ एका गर्भश्रीमंत वृद्ध जोडप्याने त्याला भाड्याने दिलेल्या छोट्या टुमदार घरात एकटाच रहात होता. घरात स्वयंपाक ही तोच करायचा. लेखा तिच्या काकांकडे रहात असे. एकाच वर्गात असल्याने दोघे जवळ आले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लेखाच्या घरून काहीही हरकत नव्हती. आणि इकडे पंतांना आणि सुमनला हे कळलं, तेव्हा त्यांच्या पाचावर धारण बसली.