माया
भाग - १३
लेखन : अनुराग
" पूर्वीच्या काळाची इशारा घंटा असेल ती ! " शेखरने ती दोरी एका खुंटीला बांधून ठेवली. त्याच्या पायाला काहीतरी लागलं. लागताच त्याचा छन-छन असा आवाज झाला. खाली वाकून त्याने ते पैंजण उचलले...! चांदी पार काळी पडली होती. थोड्याच अंतरावर दुसरेही होते.
" इथे कोणीतरी स्त्री रहात होती...!" तो पर्यंत दामोदर वर आला.
" हो, बंगल्यात कोणीतरी अज्ञात शिरलं असावं, आवाज होऊ नये, म्हणून तिने...!" शेखरच्या तोंडून निघालेले हे तिसरे वाक्य होते, ज्याचा मनातल्या-मनात दामोदर संदर्भ लावत होता. इच्छा असूनही त्याने शेखरला याबद्दल काही विचारले नाही. दोघांनी वरून खालचा दिवाणखाना पूर्ण पहिला. फारसे विस्कटलेले काही नव्हते, पण मानसिकता उद्धवस्त करणारे बरेच काही या बंद दाराच्या आड घडले आहे, हा अंदाज दोघांनी मांडला. वर असलेल्या सहा खोल्यांपैकी एकंच खोली अर्धी उघडी होती.
दारावरच्या रंगापासून ते खिडकीच्या पदड्यापर्यंत, सगळेच तिथे वेगळे होते. यातल्याही खिडक्या अर्ध्या उघड्या होत्या पण धूळ कुठेही नव्हती. खोलीच्या मध्यावर एक मोठा सागवानी पलंग होता. एका कोपऱ्यात एक अरश्याचे मोठे कपाट. शेखरने त्या आरश्यात स्वतःला पाहिले. एका कडेला ओळीत खूप साऱ्या टिकल्या लावून ठेवल्या होत्या. अजुंनही त्या भक्कम चिकटल्या होत्या. त्याने कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बाहेरून कुलूप होते. शेजारी एका खिडकीला टेकून एक मेज आणि खुर्ची होती. वाळलेली दौत आणि बोरूही बाजूला होते. एका रेशमी रुमाला खाली एक कागद फडफडत होता. शेखरनी तो कागद बाजूला केला. तो फडफडणारा कागद अतिशय जीर्ण झाला होता. जास्त हाताळला असता, तर कदाचित त्याचे तुकडे पडले असते. त्याने बाजूची खुर्ची बाहेर ओढताच मोठा आवाज झाला. त्यावर बसून तो ते वाचू लागला.
" जन्म नकोसा झाला, तरी श्वास सूरु आहेत, तो पर्यंत जगावं लागतं. स्वतःसाठी सुख-दुःख संपले, म्हणजे सगळेच संपले असे नाही. रावसाहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या जिवाभावाची काही मोजकी माणसं माझ्याकडून अपेक्षा लावून आहेत. त्यांची जवाबदारी आहे माझ्यावर. या वास्तूच्या आवारात अहोरात्र वावरणारी ही माणसंच आता काय ती उरली आहेत. उरल्या गावात फक्त भय, घृणा आहे.
काळाच्या गर्भात काय असते, हे फक्त लिहिणाऱ्याला ठाऊक असते. आपण फक्त त्यावर चालु शकतो. घडणाऱ्या गोष्टींमागे माणूस आणि नियतीचा काय हेतू आहे, हे कधी उमगत नाही. खुपशे प्रश्न घेऊन देवासमोर उभे राहिले, तरी येणारा काळंच उत्तरं देईल, हे आपल्यालाही माहित असतं. जे काही घडलं , ते टाळता आलं असतं, हे घडून गेल्यावर कळलं, की वेदना तीव्र होतात. त्याने झालेले नुकसान भरून येणारं नसतं, पण ते एक सत्य म्हणून स्वीकारून पुढे चालावे लागतेच !
माझा एकांत हा शेवटचा सोबती उरला आहे. त्याने कमी काळात खूप काही शिकवले. गेलेल्या माणसांच्या चांगल्या आठवणीत तासनतास चिंतन करत राहणे, लिहिणे, निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्याशी बोलणे, हे सगळे त्यात आलेच. डोळ्याला दिसणाऱ्या , ऐकू येणाऱ्या, आजूबाजूला वावरणाऱ्या कोणाचं विषयी माझी तक्रार नाहीये, पण त्यांना त्यांच्या मर्यादा आणि त्यांचे स्वजीवन आहेच. माझ्या एकांतातल्या जगण्याला , माझ्या शब्दांना मर्यादा नाहीये ! डोक्यात असणाऱ्या भविष्यातल्या त्या कल्पनांना मर्यादा नाहीये ! निसर्ग भरभरून देतोय, त्याला मर्यादा नाहीये ! मनातं असलेल्या त्या दुःखाला मात्र मर्यादा पडल्या आहेत. ते कमी होतंय ! कदाचित, ते आतल्या-आत विरतंय ! एखादा आजार बरा व्हावा, तसं ते बरं होतंय...! आणि मी त्यात समाधानी आहे. इतरांना ते कळण्याइतपत मी ते जाहीर नाही करू शकत.
मी डोळ्यादेखत माझ्या जिवाभावाच्या माणसांचे पाहिलेले मृत्यू मला एक-एक श्वास देतात. आज माझ्या नासण्याने कोणाला फारसा फरक पडणार नाहीये. कपाटातून एक शिशी काढायची, आणि मृत्यूची वाट पहात पलंगावर आरामात निद्रिस्त व्हायचं.पण नियतीच्या विरोधात जाणे, म्हणजे परमेश्वराच्या विरोधात जाण्यासारखं आहे. जीव जाण्याआधी, हे सगळं विश्व कोणाच्या तरी उपयोगी पडेल, अशी व्यवस्था अजून झाली नाहीये. एखाद्या शरीरातून फक्त प्राण जाणे म्हणजे मृत्यू नाही. इहलोकाशी असलेले सगळे लागेबांधे तोडणे, प्रत्येक आवडती-नावडती गोष्ट इथल्या-इथे सोडणे म्हणजेच मृत्यू नाही. असलेल्या, येणाऱ्या सकटांतून कायमचा पळ काढणे म्हणजे मृत्यू आहे. भावनांच्या आहारी जाऊन एखाद दिवशी मी अशी गेले, तर आत्म्याला होणाऱ्या वेदना अधिक क्लेश देतील. त्याला काही दिवस अजून इथे रहायचे असल्याची सल, मृत शरीराकडे पाहून उजागर होईल. त्यापेक्षा विधीने लिहिलं आहे, तो पर्यंत सगळ्याचा सामना करत जगण्याची रोज नवी आणि सुंदर कारणे शोधणे, म्हणजे जगणे ,हे मला रावसाहेब आणि सर्जाच्या एकाचवेळी झालेल्या मृत्यूतून उमगले. अकाल मृत्यू भय निर्माण करतो. "
" किती वेदना..?" मागून दामोदरही वाचत होता.
" भय मृत्यूचेही नाहीये, तो कसा येईल, किती त्रास देईल, किती कष्ट होतील, याचेही नाहीये. तो येईल, या एकाच सत्यात एक सुखदता दडली आहे. हे प्राण शरीर सोडून गेल्यावरच , सत्याचा खरा शोध लागतो. गत जन्मीची कर्मे समोर येऊन, पुढचा जन्म येईपर्यंत शिक्षा भोगावी लागते हे खरंय ! मग जे मी गेल्या काही दिवसात अनुभवलं आहे, तर काय होते...? "
" हे एक पान नाहीये...तिने खूप काही लिहून ठेवलं असणार...अगदी सुरवातीपासून...!" शेखरनी घाई-घाईत खालचे लागून असलेले कपाट उघडायचा प्रयत्न केला. पण ते बंद होते.
" जगण्याची किती तीव्र इच्छा होती तिच्यात...!" दामोदर ने त्या पत्रावर तो रुमाल टाकला.
"हो, एखाद्याचे आयुष्य खूप सुंदर असते, पण मृत्यू, प्रत्येकाचाच दुख:दायी असतो.ज्या दिवशी तिने हे लिहिलं , त्याच दिवशी तिचा...!"
" रात्र होती...!" दामोदर च्या विधानाला शेखरने दुरुस्त केले.
" हे तुला कसं कळलं?"
" कोणाला चालण्याचा आवाज येऊ नये, म्हणून तिने पैंजण काढून ठेवले होते." शेखरने ते पैंजण समोरच्या मेजावर ठेवले.
एव्हाना बरंच चित्र स्पष्ट होऊ लागलं होतं. दोघांच्या मनातली भीती केव्हाच नाहीशी झाली होती. त्या पानाची उरलेली पानं कुठे सापडतायत का, म्हणून शोध सुरु झाला. खोलीत फारसा उजेड नव्हता. खिडकी असावी, म्हणून दोन पडदे दामोदर ने बाजूला केले. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना.
सोन्याचं पाणी चढवलेल्या लाकडी पट्ट्यांची एक तसबीर त्यांच्या समोर उभी होती. रंगाने फारशी गोरी नव्हती, पण सावळा रंग तासबीरीत देखील उजळत होता. कोणाची कसब जास्त कसबी होती. निर्माण करणाऱ्या परमेश्वराची, की तासबीरीत तिला जशीच्या तशी उतरवणाऱ्या त्या चित्रकाराची, याचा अंदाज लागणं कठीण होतं. डोळ्यांमध्ये दाटून आलेले भाव, सुख आणि दुखातल्या मधले होते. निळसर डोळे आणि त्यावर अर्धवट झाकलेल्या गुलाबी पापण्या ! एखाद्या अर्धवट फुललेल्या पाकळी सारखे तिचे ओठही खूप सुंदर होते. उजव्या हातात तिने धरलेली बासरी अजून सापडली नव्हती. दामोदर च्या मागे उभा असलेला शेखर, तिचे ते रूप बघतच राहिला. ती होतीच तशी !
" हिचेच अक्षर आहे हे...!" दामोदर म्हणाला.
" हो, इतके सुंदर , दुसऱ्या कोणाचे असूच शकत नाही."
" काय घडलं आहे, याचा छडा लावलाच पाहीजे."
" पण, नाव नाहीये काही..!" शेखरची उत्सुकता आता वाढू लागली होती. तिथली एकही वस्तू त्यांनी सोबत घेतली नाही. पायऱ्या उतरून ते खाली आले. दुपार होत आली होती. काहीतरी ठरवून शेखर आपल्या घरी आला. पण दामोदरला त्याने एका छोट्या मोहीमेवर पाठवायचे ठरवले. सोबत बाजीही होताच.
रात्री जेवून दामोदर आणि बाजी निघाले. आभाळ दाटून आले होते. पण हवेत गारठा असल्याने पावसाची शक्यता कमी होती. दामोदर मागे बसला. तासभर टांगा दौडत शिवपुरीच्या त्या टेकडीमागे असलेल्या जगलांत पोहोचला.
" बाजी, रस्ता बरोबर आहे ना ?" दामोदर याआधी कधी या वाटेवर आला नव्हता.
" हो , जवळचा रस्ता आहे. पावसापाण्याचं बरं पडतं. जंगलाच्या तोंडावर असलेलं वडाचं झाड लांबून दामोदरला दिसून आलं. भयाण शांततेत घड्यांच्या टापा, घुंगरं आणि टांग्याच्या आवाजाने अख्ख जंगल संशयास्पद वाटत होतं. टांग्याच्या पुढील आणि मागील बाजूस लागलेले मोठे कंदील फक्त डोळ्यापुढची वाट दाखवत होते. अचानक पुढचा कंदील विझला. समोर पूर्ण काळोख झाला, तरी घोडे मात्र वेग कमी करायला तयार नव्हते.
" त्यांना दिसतंय का काही पूढे?" दामोदरला पुढचं काहीएक दिसत नव्हतं. " या रस्त्यावर आलेत का कधी तुमचे घोडे..?"
" खाली उतरून आधी कंदील लावता का ? उगाच घोड्यांचा पाय घसरला तर आपली फजिती होईल, त्यांनाही मार लागू शकतो ! " लगाम ओढून बाजी खाली उतरला. त्याने कंदीलाचा काच काढून त्यावरची काजळी पुसली. थोडी वात वर करून त्याने काढी ओढून ती पेटवली. अचानक दोन्ही घोडे खिंखळू लागले. त्यांचे लगाम टांग्याच्या खाली पडले. काय घडतंय, हे कळायच्या आत दामोदरला त्या उजेडात काहीतरी दिसले. तसा तो मागे लावलेला कंदील घेऊन घनदाट काळ्या जंगलात पसार झाला.
पळता-पळता त्याला धाप लागली. त्याने बाटलीतून प्यायचे पाणी काढले आणि तो पिऊ लागला. तो टेकलेल्या झाडामागून दोन हात बाहेर आले, आणि त्याचा गळा आवळू लागले. जिवाच्या आकांताने दामोदर ओरडू लागला. त्याला काहीच सुचेना. झाडामागून त्याचा गळा अवळणारा बाजी त्याला कसा दिसणार.
" काही नाही मिळणार बंगल्यात..!" बाजीच्या आवाजात एक भयानक राकट आणि असुरी आवाज मिसळला होता. " दोघ जाल जीवानिशी. माझ्या मार्गावर जो येईल, त्याला जीवाला मुकावं लागेल, हे कळत नाही का तुम्हाला ?"
" कोण आहेस तू..!" दामोदरला कळून चुकले, की हा मानव नाहीये. " हिमंत असेल तर समोर ये ना ! भ्याड आहेस, भ्याडासारखाच मागून हलाल करशील का ? " गळ्याभवती हात तसेच अवळते ठेऊन बाजी समोर आला. तो बाजी नव्हताच मुळी. त्या चेहऱ्यावर कोणीतरी ओरबाडल्याचे वार होते. त्याने पूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. त्याचे डोळे देखील फुटले होते. अंगावरचा अंगरखा पूर्ण फाटला होता.
" तुम्हाला फार हौस आहे न, काय घडले, ते जाणून घ्यायची." असे म्हणून त्याने दामोदरला उचलले आणि हवेत भिरकावले. दामोदर त्याच्या पासून दहा-बारा फुट जमिनीवर पडला. बाजी पाय आपटत त्याच्याकडे येऊ लागला. येऊन तो सरळ दामोदरच्या छातीवर बसला. जास्त वाट पहाण्यात काहीच अर्थ नव्हता. दामोदरनी आपल्या कमरेचा सुरा काढला आणि त्याच्या छातीत घातला. सुरा छातीत शिरताच असाह्य कळीने बाजी कळवळला. तो छातीवरून उठला, उठल्यावर त्याचा तोल जाऊन तो पडू लागला. दामोदर सावरून उठला.
" आता बोल...!" दामोदर त्याच्याकडे पाहून बोलू लागला. पण काहीही उत्तर आले नाही. बाजीच्या आतून तो पाशवी आत्मा केव्हाच निघून गेली होती. बाजीच्या अंगातले उरलेले प्राणही तो घेऊन गेला. दामोदरने बाजीचे प्रेत उचलले, आणि तो टांग्याकडे जाऊ लागला. घोड्याने टांगा धरून ठेवला होता. दामोदरने लगाम हाती धरला आणि तृष्णा नदीच्या काठी वसलेल्या चित्रकारांच्या वस्तीच्या रस्त्याला लागला. बाजीचे प्रेत त्याने टांग्याच्या खालच्या बाजूला नीट झाकून ठेवले होते.
अनुराग
माया
भाग -१४
लेखन : अनुराग
खडकीतून नर्मदा वाकून आत बघत होती. एका कोपऱ्यात आनंद भिंतीवर हळू-हळू डोकं आपटून घेत होता.
" काय झालं आनंदराव?" तिने सावधपणे विचारलं. तसं त्याने लांबून अर्धवट उघड्या खिडकीकडे पाहिलं. रांगत-रांगत तो खिडकीपाशी आला.
" पाणी पाजता का मला...?"
" हो, तुमचा तांब्या द्या..! " आनंद तसाच जाऊन तांब्या घेऊन खिडकीशी आला. त्यात असलेलं पाणी नर्मदेने खाली ओतलं. ते पूर्ण काळ झालं होतं. वर येण्यास इतरांना परवानगी नव्हती. नर्मदेनी तांब्या वरून खाली टाकला आणि पुन्हा खिडकीत आली.
" माझ्यावर इतका का अत्याचार चालला आहे?" आनंद अक्षरशः रडकुंडीला आला आहे. " अंगाचा दाह होतो आहे, कोणता असाध्य आजार झाला आहे मला, ते तरी सांगा...!"नर्मदेच्याही डोळ्यांत पाणी आलं. "आजार असता, तर आत्तापर्यंत बरा झाला असता...! आनंदराव, थोडा धीर धरा. हे सगळं जे काही चाललंय, त्यात तुमचा दोष नाहीये, तुम्ही फक्त शिक्षा भोगताय...!"
"कशाची? "
" आनंदराव, तुमचा जन्म झाला तेव्हा मी वाड्यावर होते. जे घडलं, ते माझ्यासमोर घडलं...!"
" काय घडलं..?" खच्ची झालेला आनंद कान देऊन ऐकू लागला.
" तुमच्या आईंना कळा सुरु झाल्या आणि विठोबा मला बोलवायला आला. पंतांची फार इच्छा होती, कि आजची रात्र टाळून तुम्ही जन्माला यावं. अमावस्या होती ! कीर्तिकर बुवा पण येऊन बसले होते...!"
" पंत, जे होतं आहे, त्याला तुम्ही आणि मी काहीही करू शकत नाही. हजारो पोरं जन्माला आली असतील आज."
" तुम्हाला कळत कसं नाहीये, आहो हा परम अनिष्ठतेचा काळ आहे."
" पंत, जर आपण आत्ता यात काही गोंधळ केला, तर वहिनींच्या जीवावर बेतू शकतं.

" पंत, जर आपण आत्ता यात काही गोंधळ केला, तर वहिनींच्या जीवावर बेतू शकतं. जे होतं आहे, ते होऊ द्या...!"
" असं कसं, तुम्हीच म्हणालात न, या अनिष्ट काळात कुंडल्या असुरांच्या अधीन असतात म्हणून. आणि असा वेळ किती उरलाय ?"
" पंत, नका थांबू, बाळ आणि आई, दोघही वाचणार नाहीत अश्याने, पुढचं पुढे पाहू...!"
बाळाच्या टाहोंनी वाडा दुमदुमला. सुमन व्यवस्थित सुटली. बाळ व्यवस्थित, निरोगी होते. सगळे आत होते. पंत आणि कीर्तिकर बाहेर दिवाणखान्यात होते. बरोबर मध्यरात्रीच्या थोडा आधी आनंदचा जन्म झाला. दाराची कडी वाजली. एवढ्या रात्री कोण आलंय, या विचाराने दोघे घाबरले. हातात मोठी काठी घेऊन पंतांनी दरवाजा अर्धाच उघडला. बाहेर कुणीच नव्हते. पंतांनी चुबाजूने नजर टाकली. देवडीपर्यंत गेले. कुणीच नव्हतं...! परत येताना त्यांना एका मोठ्या झाडावर घुबड बसलेलं दिसलं.ते शांत होतं. पंत परत आत येण्यास निघाले. त्यांच्या पायाला एक फटका कापडाचा तुकडा लागला. कंदिलाच्या उजेडात त्यांनी तो उचलला आणि एकदम ओरडले..." बुवा...बुवा...!" होते तसे बुवा बाहेर आले. तो कापडाचा तुकडा त्यांनी आपल्या हातात घेतला.
' तो आमचा आहे. आमचाच अधिकार आहे त्याच्यावर. यथावकाश आम्ही त्याला घेऊन जाऊ. तो पर्यंत त्याच्या जीवाचं काही बरं-वाईट होणार नाही, याची काळजी घ्या.त्याला काही झालं, तर तुमचे अख्खे कुळ नष्ट होईल. अशीच कुंडली आहे त्याची...!'
तो कागद घेऊन दोघे आत आले. त्या अंधारात काही कुंडली काढणे शक्य नव्हते. अख्खी रात्र सगळ्यांनी जागून काढ़ली.
नर्मदेचे आश्रू थांबतच नव्हते.
" विलायतेत तुम्ही गेलात, तेव्हा इथे तुमच्या आई-बापाने खूप वाईट दिवस काढले. प्रत्येक देव, प्रत्येक धर्म केला...!"
" मला अजून का नाही सांगितलं त्यांनी...?" आनंद समोर एक-एक पान आता उघडू लागलं होतं.
" भय...! प्रसंग समोर आला, कि माणूस हात-पाय मारतो.पण अघटीताचे भान आधीच माणसाला दिले, तर भीती विचार करू देत नाही आनंदराव. भीती, राग, लोभ हे विचारशक्तीला आधीच मारून टाकतात."
" आता...पुढे...!"
" तुम्हाला आम्ही काही होऊ देणार नाही. पण तो तुमच्या आत आहे. तो तुमच्याकडून , त्याला करायचं आहे, ते करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेल...!"
" पण कोण करतंय हे सगळं..?"
" आनंदराव, या शत्रूला नाव, गाव, पत्ता काहीच नसतं. याला फक्त ध्येय असतं..! हेतू असतो लोकांना त्रास द्यायचा, जीव घ्यायचा. कीर्तिकर आहेत त्याच्या मागावर. ते गेलेत मुंबईला...!"
आनंदला एकदम लेखाची आठवण झाली. त्याला जास्तच असवस्थ वाटू लागले. त्याचा श्वास कोंडु लागला.
" लेखा...?"
" आनंदराव, त्याने पाहिलेच सांगितलं होतं, त्याच्या मार्गावर येईल, त्याला त्रास होईल !"
विलायतेत वर्षभरापूर्वी घडलेलं सगळं आनंदला आठवलं. घरच्यांनी जास्तच हट्ट केल्यामुळे, आनंद एकटाच घर घेऊन रहात होता. लेखाशी त्याची वाढलेली ओळख, हा एकच आधार त्याच्याकडे होता. भेटी वाढत होत्या, त्याची रूपांतर प्रेमात कसे झाले , हे त्याला कळले नाहीच.
त्याचा वाढदिवस त्या दोघांनी खूप आनंदात साजरा केला. जेवून आनंद आपल्या घरी परतत होता. अर्धी रात्र उलटून गेली होती.
" थांब...!" सुनसान रस्त्यावर अचानक मराठीत आलेल्या या हाकेमुळे आनंद थोडा गोंधळला.
" कोण...?" त्याने चारी बाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं.
" बाहेर नाही, आत आहे मी तुझ्या..!"
" उगाच काही बोलू नका. कोण असेल ते समोर या..!" काहीच हालचाल झाली नाही. अचानक त्याच्या नाकातून रक्ताची धार लागली. रक्ताचे थेंब खाली पडू लागले. अंगातले रक्त दुप्पट वेगाने प्रवाहित होऊ लागल्याचा अंदाज त्याला झाला. अश्यात कोणीतरी त्याच्या हातावर धारदार नखाने ओरबाडू लागलं.
" कोण ए...कोण आहेस कोण तू?" आता मात्र आनंद घाबरला.
" बोललो ना, मी तुझ्या आतच आहे. तू माझा वर्तमान आहेस, आणि मी तुझा भूतकाळ...!" काहीतरी आनंदच्या अंगात शिरू पहात होतं. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. एक-एक करून त्याच्या अंगावरचे कपडे फाटू लागले. त्याकब्या शरीरापेक्षा मोठी, त्या परावलंबी गोष्टीची व्याप्ती मोठी होती. तो रस्त्यावरच कोसळला.
डोळे उघडले तेव्हा तो एका दवाखान्यात होता. बाजूला लेखा बसली होती. " काही लोकांनी तुम्हाला इथे आणलं. खिशातल्या डायरीमुळे माझा पत्ता मिळाला या लोकांना म्हणून बरं झालं. घडलेलं सगळं आनंदने लेखाला सांगितलं. संध्याकाळी दोघे बाहेर निघाले. लेखा त्याला एका चर्च मध्ये घेऊन आली.
" तुमच्यावर एका अज्ञात आत्म्याची दुष्ट सावली पडली आहे." पादरीच्या या वाक्याने दोघांच्या पाचावर धारण बसली. " आणि ते काय आहे, हे कोणालाही सांगता येणार नाहीये."
"पण तुम्ही इतक्या खात्रीने कसे सांगू शकता?" लेखाने त्यांना विचारले. पादरीने हातात धरलेला पावित्र क्रॉस समोर केला.
"ही परमेश्वराची पवित्र स्मृती उजव्या हातात धरा...!" आनंदने हात पुढे केला. पण त्याचा हात जागचा हलला नाही. खांद्यापासून तळव्यापर्यंतच्या शरीराची पूर्ण संवेदना नाहीशी झाली. त्याला घाम फुटला. "घ्या...घ्या ना...!" पादरी पून्हा नम्र आवाजात बोलू लागले. तरीही आनंदचा हात वर येत नव्हता.
"नाही धरता येणार ! ईश्वर प्रचंड पवित्र शक्ती आहे. मनात किंवा शरीरात पाप, त्याच्या बद्दल संशय, किंतु, किंवा शरीरात त्याचा विरोध किंवा त्याला घाबरणारी शक्ती असली, की असं होतं."
" मग..त्या शक्तीला आपण काढू...!"
" नाही, ती शक्ती फक्त तिच्या मूळ स्थानी पोहोचली तरंच निघू शकेल. पण तिथे पोहोचल्यावर , किंवा तिचे काम झाल्यावर ती या शरीराचा नायनाट ही करू शकेल हे लक्षात असू द्या. एकदा त्याचं इस्पित साध्य झालं, की त्याला हे शरीर काही कामाचं नाहीच. पण जो पर्यंत तो तिथे पोहोचत नाही, तो पर्यंत तो तुझे नुकसान होऊ देणार नाही. मुली, याला जप."
आपल्या कर्माची शिक्षा लेखाला मिळते आहे, हे पाहून आनंद अधिक विचलित झाला.
" मावशी...! ते माझ्या अंगात आहे, माझं जे व्हायचं ते होऊ देत, पण लेखाला कशाला याचा त्रास. मी बाहेर निघून याचा सामना करायला तयार आहे." त्याने नर्मदेला सांगितलं.
" पण आम्ही नाहीये तयार...!" मागून पाणी घेऊन पंत आले. "कोण ती मुलगी...? आम्ही कधी पाहिली नाही...काही संबंध नाही...!"
"पंत, काय बोलताय तुम्ही...!" आनंदने आतूनच पंतांना विचारले.
" खरंय, नर्मदे, सांग याला, जो पर्यंत तू इथे आहेस, तो पर्यंत सुरक्षित आहेस. कीर्तिकर आले, की यातून तुझी कायमची सुटका करू तुझी. त्या मुलीचं जे होईल, त्याच्याशी आम्हाला काही घेणं -देणं नाहीये...!"
" पंत, माझ्यामुळे तिचा जीव धोक्यात आहे, कळतंय का तुम्हाला?" आनंद आता बापाच्या स्वार्थावर चिडू लागला.
" असेल, त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाहीये. तू आमचा एकुलता-एक आहेस. सात पिढ्या पुरेल, इतकी ही जायदाद त्या मुलीमुळे आम्ही वेवारशी नाही सोडू शकत. तुझ्यात जिव असला, तर या सगळ्याचा उपभोग तुला घेता येईल. मुली काय छप्पन मिळतील...!"
पंतांचे हे रूप आनंदनी कधी पाहिलेच नव्हते. " पंत...! त्या मुलीचा पण बाप आहे , त्यालाही काळीज आहे हे लक्षात असू द्या...!"
" आणि तुझ्या आणि माझ्या मागे ही अफाट संपत्ती आणि जवाबदारी आहे, हे तू लक्षात ठेव..!" त्यांनी धाडकन खिडकी लावली.
" पंत, पोराचा जिव आहे त्या मुलीत." नर्मदेने त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला.
" मूर्ख आहे तो...वास्तवाचे भान नाहीये. त्याचं काही बरं-वाईट झालं, तर पूर्वज्यांनी कमावलेल्या या वाड्याचं, अफाट संपत्तीचं काय करायचं. आणि हे सगळं त्या मुलीच्या आणि याच्या फालतू प्रेम-कहाणी च्या नादाला लागून मी वाऱ्यावर नाही सोडू शकत...!" जात असलेले पंत मागे फिरले. " तुलाही एक सांगून ठेवतो,स्वतःची अक्कल चालवशील, तर गावाबाहेर हाकलून लावेल तुलाही...!" पंत जिना उतरून निघून गेले.
लेखा निपचित पलंगावर पडून होती. तिच्या अर्धवट उघड्या डोळ्याने आनंदची वाट बघत होती. शरीर काहीच प्रतिक्रिया देत नव्हतं , क्रियाही करत नव्हतं. काशी तीनदा येऊन खाऊ घालून जात होती. पण दिवसेंदिवस तिचे शरीर कृश होत चालले होते. तिच्या चेहऱ्याचे तेज कुठच्या कुठे निघून गेले होते. भर दिवसा ,उघड्या डोळ्याने बघता यावे, इतके तेज सूर्याचे कोमेजून जावे, तसेच काहीतरी होते.
क्रमशः