फ्लाईट ( एक स्वप्न)
नोकरी असली तरी जेमतेम पगार. स्वता: वर खर्च करण परवडण्या सारखे नव्हते. म्हणुन खुप कष्टाने शेवटी तो दिवस आज आलाच होता. ओव्हरटाईम करून कंपनीने दिलेल्या सगळ्या कामांचा तपशील व पुर्णत्वास नेलेल्या कामामुळे माझ प्रमोशन तर झाल होत पण, प्रमोशन साठी थोडी हा सगळा खटाटोप केला होता. खटाटोप होता तो प्रमोशन सोबत मिळणार्या फ्लाईट च्या एक टिकटासाठी. घरांवरुन जाणारे विमान बघणे आणि तो दिसे पर्यंत त्याच्या मागे मागे धावणे, ठरलेलंच असायच. लहानपणी कागदाचा विमान बनवुन तो उडवत त्याच्या मागे पळत राहायचो, पण त्याला काहीच अर्थ नव्हता.
एअरपोर्ट वर पोहचलोच होतो की अचानक एका ट्रक ने एका ओला कार ला धडक दिली. घाई असली की अस काही न काही होतच असते..... ट्रॅफिक जमा झाली. माझी फ्लाईट सुटेल या भितीने तिकडे न पाहता पुढे एअरपोर्ट वर चालतच आलो .फ्लाईट यायला अजून वेळ होता. किती सुंदर होता एअरपोर्ट. ह़ो पहिल्यांदाच पाहत होतो. नुसता दिव्यांचा झगमगाट. पण , काहीतरी विचित्र नेगेटिव्ह वाटत होते. मी ज्या लाईन मध्ये ऊभा होतो त्या लाईनीतील वेरीफिकेशन साठी असलेली माणस काही वेगळी दिसत होती. वेरीफिकेशन होऊन एका ठिकाणी बसलोच होतो की एक लहान मुलगी धावतच येऊन बसली बाजुला. सहसा मी तिला पाहिलं ही नसत पण तरी मी तिला एकटक पाहत होतो कारण ईतर मुलांन पेक्षा ती वेगळी दिसत होती. सफेद पडलेला चेहरा, फाटलेला फ्रँक, हातात एक बाहुली ती पण मळकट. ही आत आली कसी समजत नव्हत. म्हणुन तीला मी विचारले ," तुझे आई बाबा कुठे आहेत", तर तीने फक्त हात वर करून एक बोट समोर केल. तशी माझ्या पायाखालची जमिनच सरकली. समोर एक बाई आणि माणुस होते ते ही तिच्यासारखे दिसत होते. आणि ते सरळ रेषेत माझ्या जवळ बसलेल्या मुली जवळ आले आणि तीला घेऊन गेले. जाताना त्यांच्या पाठमोर्या आकृती कडे मी पाहत बसलो तर डोकच थंडगार पडल. पाय उलटे होते तिघांचे. मागे वळुन ती तिघं माझ्या कडे कुत्सुक पणे हसत जात होते.
फ्लाईट मध्ये चडत असताना जेवढी उत्सुकता व्हायला पाहिजे होती तेवढी होत नव्हती. हाच क्षण अनुभवायला आपण एवढी मेहनत घेतली आणि तोच क्षण आता नकोशा का झाला आहे. हातात निर्जीव कागदाच विमान घेऊन फिरायचो या खर्याखुर्या विमानात बसण्यासाठी, पण हा खराखुरा विमान निर्जीव असल्याचा भास का होत आहे.
फ्लाईट मधुन आत येत असताना सुद्धा उभे असलेल्या एअर होस्टेस सुद्धा वेगळ्या दिसत आहेत. एवढ्या कुरूप का आहेत या? डोक आता जरा जास्तच जड झाले. शेवटी खिडकी जवळच्या सीट वर बसुन थोडा आनंद होतो का ते माझ मीच पाहत होतो. पण काहीच सुख किंवा भावना निर्माण होत नव्हतं.
फ्लाईट आता हवेत झेप घेणारच होती. एक एअर होस्टेस पाणी आणि काही खायच सामान घेऊन आली. पण सगळ खराब झालेलं. आळ्या पडल्या होत्या. घाबरून मी ओरडलो आणि ते सगळ फेकुन दिले पण कोणाचच माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठलिही हालचाल न करता. सगळे कसे मान खाली घालुन बसले होते.
विमान आता खुप उंच उडत होत पण जे लहानपणी कुतुहल आणि ओढ वाटायची ती का वाटत नाही समजत नव्हतं. खिडकीतून बाहेर बघताना फक्त अंधार पडलेला दिसत होता. मध्येमध्ये काही लाईटस दिसायचे. खिडकीत पहता पहता अचानक खिडकीबाहेर एक आकृती बनु लागली आणि हळूहळू त्या आकृतीने एका भितीदायक मानवीय रूप घेतल आणि काही कळायच्या आतच ते माझ्या अंगावर ओरडत धावत आले. तस मी ओरडुन उठलो आणि पडलोच पण कोणीच काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
भास झाला असेल म्हणुन शांत डोळे बंद करुन पडुन राहिलो. तर अचानक विमानात तिच लहान मुलगी आली जी एअरपोर्ट वेरीफिकेशनच्या वेळी आली होती. ती मला तिच्या हाताच्या आधाराने बोलवत होती. काहीतरी दाखवायच होत बहुतेक तीला. मीही तिच्या दिशेने चाललो होतो. पुढे जाऊन ती दिसेनाशी झाली पण जिथे ती थांबली होती तिथे एक आरसा होता..... त्या आरश्यात मी पाहिले असता माझं डोकच गरगर फिरायला लागले....
फक्त विमानात बसणारी माणस नाही तर मी ही त्यांच्या सारखा दिसायला लागलो होतो...पांढराफटक.....आणि निर्जीव.....त्यातच माझं लक्ष माझ्या पायाखाली गेले तर ती उलटी होती. मला न वाटणारी ओढ ,भावना आणि उत्सुकता याच उत्तर मिळाल होतं.
एअरपोर्ट ला येताना झालेला अपघात माझाच होता.... म्हणजे ही माणसे विमान अपघातात किंवा माझ्यासारख्या अपुर्ण ईच्छे मुळे ईथे या भुतांच्या जगात आडकले गेलेत.
शेवटी माझं डोक विचारांच्या पलीकडे जाऊन शांत झालं आणि मी माझ्या सीट वर निर्जीव होऊन ईतरांसारखा खाली मान घालून बसलो.
स्वप्न लहान असो वा मोठ , मेहनत करूनही ती अपुर्णच राहीली तर!!!! काय अर्थ आहे त्या मेहनतीला.......जसं एखादा महत्त्वाचा क्षण हातात येऊन निसटुन जावा आणि तो जगता ही न यावा यासारख वाईट दुसर ते काय........
समाप्त
✒️_ ऋचा हाडवळे
✒️_ ऋचा हाडवळे