अनुत्तरित
"अरे आज ही लिफ्ट उघडी कशी? कोणीतरी नवीन रहायला आलं असणार. पण एवढ्या रात्री शिफ्टिंग कारतायत?" साहिल सामानासाठी राखीव असलेली बिल्डिंगची लिफ्ट उघडी पाहून विचार करू लागला. त्याने पण साधारण दीड महिन्यांपूर्वी आईबाबांसाहित या बिल्डिंगमध्ये १५व्या माजल्यावरील एका फ्लॅट मध्ये शिफ्टिंग केलं होतं.
आज ऑफिस मधून यायला त्याला थोडासा उशिरच झालेला. ऑफिसच्या कॅबने त्याला ड्रॉप होता म्हणून बरं नाहीतर एवढ्या रात्री जवळपास OLA, UBER मिळणे पण कठीणच. खूप ताटकळत राहावे लागते. विचार करत करत त्याने पॅसेंजर लिफ्टचं बटण दाबलं. इंडिकेटर १३वा मजला दाखवत होतं. "अरे कितीवेळ यार, कोणीतरी दरवाजा उघडाच टाकलाय वाटते" तो स्वतःशीच वैतागत पुटपुटला.
'आता १५ व्या मजल्यापर्यन्त काय पायी जायचं? छे! ही लिफ्ट युज करूया काय?' विचार येताच त्याचे डोळे चमकले. त्याने आजूबाजूला पाहिलं वाँचमन गेटकडेच बसून होता. 'तसपण दुसरी लिफ्ट बंद आहे आपली काय चुक. बघितलं तर बघूदेत निस्तरेन उद्या काय ते.' असा विचार करत तो सामानाच्या लिफ्टमध्ये शिरला.
त्याने १५व्या माजल्याचं बटण दाबलं आणि उभा राहिला. लिफ्टचं दार बंद झालं तसं त्याला आत गारवा जाणवू लागला. अजून मे संपला नव्हता पण तरीही पाऊस येण्याची चाहूल देणारा तो गारवा त्याच्या मरगळ आलेल्या मनाला खूपच आल्हाददायक वाटला. अचानक लिफ्टच्या स्टीलच्या भिंती त्याला हिरव्यागार भासू लागल्या. एका बाजूला उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे वाऱ्यामुळे उडणारे तुषार त्याचं मन मोहून टाकत होते तर एकीकडे उंच कड्याच्या आड दाटलेले ढग त्याच्या डोळ्यांचं पारणं फेडत होते. लिफ्ट १५ व्या मजल्यावर येऊन थांबली, दरवाजा उघडला तसा तो भानावर आला. स्वतःशीच हसला आणि बाहेर पडला.

घरी आई वाट पहातच होती. लिफ्टचा आवाज ऐकून तिने दरवाजा उघडला. "अग तू कशाला जागी? सांगितलेलं ना मी उशीर होणार. आहे माझ्याकडे चावी. मी घेतो जेवण तू झोप जा. आता सध्या नेहमीच उशीर होणार आहे मला हे प्रोजेक्ट सुरू आहे तोपर्यंत तू नेहमीच राहणार का जागी?"
"बरं, उद्यापासून नाही रहात. आता जागी आहेच तर जेवण गरम करून वाढते आणि मग जाते झोपायला तू फ्रेश होऊन घे", म्हणत आई किचन कडे वळली.
तो फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसला, मगासच्या अनुभवामुळे चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. विचार करत करतच तो जेवला, 'सकाळीच तर आपल्याला आपला भीमाशंकरचा ट्रेक आलेला स्वप्नात. किती धमाल केलेली आम्ही. आणि आज लिफ्ट मध्ये जणू परत तिथे गेल्याचा तो भास...भास? की स्वप्न? छे छे! स्वप्न कसं असेल एखाद मिनीट होतो तिथे तेवढ्यात स्वप्न कसं पडेल? भासच असावा तो. दिवसभराच्या थकाव्यामुळे झालं असेल ते. जे काही होतं ते किती छान होतं😇.' तशीच शांत झोप लागली त्याला अंथरुणात पडल्या पडल्या.

पहाटे आई रूम मध्ये आली उठवायला तेव्हा झोपेतच साहिल खुदकन हसतात तसं लहान मुलांसारखा हसत होता. आईला खूप गम्मत वाटली, झोपूदेत अजून थोडावेळ असा वाटून गेलं. पण हल्ली नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून त्याने सांगून ठेवलेलं काहीही झालं तरी लवकर उठव. खूप कमी वेळेत पूर्ण करायचा होतं त्याला ते. त्याचं प्रोमोशनही त्यावर अवलंबून होतं. आईने त्याला खांद्याला हाथ लावून हलवतच म्हटलं, "अरे साहिल, उठ लवकर. तुझी पिकअप कॅब गेली तर गर्दीतून लटकत जावं लागेल तुला."
शब्द कानावर पडताच साहिल पटकन उठून बसला. त्याला स्वप्नातून बाहेर यायला थोडा वेळ लागला.
"काय रे कसलं एवढं स्वप्न होतं? नुसता खुदु खुदु हसत होतास". साहिलने पण हसतच उत्तर दिलं, "काहि नाही गं आपले चंगु मंगू आलेले स्वप्नात. छान मस्ती करत होतो आम्ही. तितक्यात तू उठवलंस. आई, हे प्रोजेक्ट संपेल १०-१२ दिवसात मग पुण्याला जाऊन ताईला आणि त्या दोघांना घेऊनच येतो. सध्या काय मला वेळ मिळणार नाही त्यांच्याबरोबर खेळायला." साहिलला त्याच्या 3 वर्षांच्या जुळ्या भाच्यांची आठवण येत होती. तेच दोघे आले होते आज त्याच्या स्वप्नात.

साहिलने तयारी केली आणि कॅब यायच्या वेळेला तो आईचा निरोप घेऊन निघाला. लिफ्टचं बटण दाबतानाच त्याचं लक्ष बाजूच्या सामानाच्या लिफ्टवर होतं. त्याला काल झालेला भास आठवला आणि हसू आलं. लिफ्ट आज बंद होती. तशी ती नेहमीच बंद असते, फक्त जड सामानाच्या नेआणीच्या वेळी उघडतात. लहान मुलं २ बोटांनी बंदुकीची गोळी झाडतात तशी स्वतःवरच आपल्या २ बोटांनी गोळी झाडत "ढिशुम..!!" त्याने त्या लिफ्टच्या विचारातून हसतच स्वतःला बाहेर काढलं. आणि तो समोरच्या लिफ्टमध्ये शिरला.
आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. ते तसं असणारच होतं. आणि साहिल अगदी मनापासून करतही होता. त्याला बॉसकडूनच नाही पण क्लायंटकडूनही प्रोजेक्टच्या प्रोग्रेसबद्दल अँप्रीसिएशन मिळत होतं. तरीही बॉस बरोबर काही कारणांमुळे आज त्याचा वाद झालाच. तो खूप वैतागला होता. "साला याच्यापेक्षा माझं कौतुक होतेय म्हणून जळतोय हा." साहिलला राहून राहून वाटत होतं. तसच खराब मूड मध्ये आज त्याने दिवसभराचं काम संपवलं आणि तो रात्री उशिरा घरी निघाला.
'काहीतरी करून या बॉसची जिरवायची असच त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. त्यालाही माहीत होतं हे काही शक्य नाही. त्याची ऑफिसमधली लॉबी खूप मोठी आहे आणि वरिष्टही त्याला सामील आहेत. तरीही काहीतरी केलंच पाहिजे... ' त्याची नुसती चिडचिड सुरू होती. त्या तिरमिरीतच तो कॅबमधून उतरला आणि सरळ लिफ्टपाशी चालत आला.
'अरे, आजपण ही लिफ्ट उघडी? बहुतेक रात्री सर्विसिंगला वैगरे चालू करत असतील' तो मनातल्या मनातच म्हणाला. पॅसेंजर लिफ्ट आज सुरू होती आणि तळ मजल्यावरच होती तरीही त्याने आजूबाजूला पाहिलं कोणी पहात नाही याचा अंदाज घेतला आणि हळूच सामानाच्या लिफ्टमध्ये शिरला. त्याला त्याच्याच कृतीची खूप गंमत वाटत होती. १५ नंबरचं बटण दाबलं नि लिफ्ट सुरू झाली. मागे भिंतीला टेकून डोळे बंद करून तो उभा होता इतक्यात... 'हे काय एवढा किलबिलाट कसला?' त्याने डोळे उघडले. तो एका बागेत होता. लहान मुले आजूबाजूला घसरगुंडीवर आणि झोपाळ्यावर खेळत होती. त्याचे लाडके चंगु मंगु हातात बॉल घेऊन त्याला बोलवत होते. "ए मामा आता बॉल माझ्याकडे फेक, आता मी कॅच करणार". तो ही हसत हसत त्यांच्यामध्ये खेळात सामील झाला. लिफ्ट १५व्या मजल्यावर पोहोचली तसे सर्व पूर्ववत झाले. मुले गायब, बाग गायब; तो आता लिफ्टमध्ये होता. दरवाजे उघडले आणि तो विचारचक्रात गुंततच बाहेर आला.

आज घरी आल्यावर त्याचं काहीतरी बिनसलेलंच आईला दिसत होतं. "अगं, तू आजपण जागी?"
"असुदे रे, तू एवढा थकून येतोस. आणि मला दुपारी मिळते की थोडं पडायला" असं म्हणून आईने त्याची समजूत घातली.
त्याचं त्यालाच कळत नव्हतं नेमकं काय सुरू आहे? ऑफिसमधला वाद त्याच्या डोक्यात होताच पण आता हे लिफ्टचं काय नवीन? कालचा आणि आजचा तो अनुभव नेमक काय म्हणायचं त्याला कळत नव्हतं. 'माझं चित्त बहुतेक थाऱ्यावर नाहीय. आणि काय गरज होती मला आज त्या लिफ्टने यायची? नाही नाही आता परत त्या लिफ्टमध्ये उगाच नाही शिरणार. जादूची लिफ्ट आहे का ती? अरे... लहान आहेस का अजूनही जादू आणि पऱ्यांच्या गोष्टींमध्ये रमायला...' विचार करत करतच तो बिछान्यावर पडला. त्याला प्रोजेक्ट आणि प्रोमोशनचा ध्यासच लागला होता. काहीही करून हे प्रोजेक्ट त्याला क्लिक करायचंच होतं. विचारांच्या तंद्रीतच त्याचा डोळा लागला.

नेहमीप्रमाणे सकाळी आईने त्याला उठवलं. "आज नेमका बॉस आलेला स्वप्नात, हा माणूस तर स्वप्नात सुद्धा भांडतो माझ्याबरोबर" साहिल उठत उठत आईला सांगत होता.
त्याला अस्वस्थ वाटत होतं पण ऑफिसला तर जावंच लागणार. तो निघाला, अगदी सकाळपासून त्याने सर्व विचार बाजूला सारून स्वतःला कामामध्ये झोकून दिलं. संध्याकाळी ७ वाजता त्याचा फोन खणखणला. फोनवर आई होती, "हॅलो! काय गं?"
"अरे ऑफिसमध्येच आहेस ना? की बाहेर गेलायस?"
साहिलला आश्चर्य वाटले आईचा प्रश्न ऐकून. सध्या त्याला साधं लंच नंतर पाय मोकळे करायलाही वेळ मिळत नव्हता. "अगं ऑफिस मध्येच आहे आई. कुठे जाणार सध्या तुला तर माहीतच आहे ना."
त्यावर आई सांगू लागली, "तसं नाही रे आताच ताईचा फोन आलेला. दोघांना खाली खेळायला घेऊन गेली होती. मध्येच येऊन दोघंही मुलं तिला सांगू लागली की मामा आला आहे आमच्याबरोबर खेळायला. तिने पाहिलं तर कोणीच नव्हतं. म्हणून विचारलं रे तुला. जाऊदेत, तुझ्या सारखं दिसणारा दुसरा कोणीतरी पहिला असेल त्यांनी. बरं, ये लवकर घरी ठेवते फोन". असं म्हणून आईने फोन खाली ठेवला.
'आई पण ना...' असा विचार करत साहिल परत स्वतःच्या कामात डोकं खुपसून बसला.

रात्री १२च्या सुमारास साहिल नेहमीप्रमाणे कॅबमध्ये बसला. डोक्यात सतत डेडलाईन चे विचार घोळत होते. ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर होत होता त्यामुळे तो थोडा अस्वस्थ जाणवत होता.
बिल्डिंग जवळ कॅब थांबताच लगेच तो खाली उतरला. आज त्याला प्रोजेक्ट आणि इम्प्लिमेंटशन शिवाय दुसरा विचार करायचा नव्हता. तो लिफ्टपर्यंत आला आणि सहजच त्याची नजर बाजूच्या सामानाच्या लिफ्ट कडे गेली. 'नाही नाही आज तिकडे पहायचंही नाहीय मला', तो स्वतःलाच समजावत होता. त्याने त्याच्या नेहमीच्या लिफ्टचं बटण दाबलं, पण त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. सामानाची लिफ्ट त्याला जणू खुणावत होती....'अजिबात नाही... अशी बघू नकोस माझ्याकडे....ए नाही येणार मी तिथे आज. अरे काय करतोय मी? त्या निर्जीव लिफ्टशी बोलतोय? काय होतंय मला हे' त्याने गच्च डोळे मिटून घेतले. त्याची लिफ्ट आली होती, दरवाजे उघडण्याचा आवाज झाला आणि तो तसाच आत शिरला.
त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि डोळे उघडले तसा तो किंचाळलाच.... 'आ....ई.... ए तू घेतलसच मला आत ओढून. का का...?' तो त्या सामानाच्या लिफ्टमध्येच होता. आतमधले वातावरण थंड होऊ लागले अगदी ऑफिसमधल्या AC टेम्परेचर एवढं गार झाले. आणि त्याच्या तोंडावर कसलेतरी पेपर येऊन पडले. त्याने डोळे विस्फारले. समोर बॉस उभा होता आणि क्लायंट कडून आलेल्या मेल चं प्रिंटआऊट त्याने साहिलच्या तोंडावर फेकलं होतं. साहिलचंही डोकं फिरलं आणि क्लायंट रिक्वायरमेन्ट प्रमाणे त्याचं काम कसं योग्य आहे आणि त्यांच्या डिमांड कश्या वाढत आहेत हे तो बॉसला पटवून द्यायचा प्रयत्न करू लागला. "हे सर्व पण ऍड करायचं तर मला अजून वेळ पाहिजे नाहीतर मी हे प्रोजेक्ट सोडतो" साहिलने सरळ सरळ बॉसला इशारा दिला. इतक्यात...

लिफ्टचा दरवाजा उघडला, १५ व मजला आला होता. साहिल भानावर येत बाहेर पडला. नेहमीप्रमाणे आईने लिफ्टचा आवाज ऐकून दरवाजा उघडला. पॅसेज मध्ये साहिल निश्चल शून्यात बघत उभा होता. त्याच्या जाणिवा बधिर झाल्या होत्या. हजारो मुंग्यांनी पोखरावं तश्या त्याच्या मेंदूला झिणझिण्या आल्या होत्या.
भीमाशंकरचं स्वप्न आणि त्याचा लिफ्टमध्ये झालेला भास, भाच्यांचं स्वप्न आणि लिफ्टमध्ये त्यांच्याबरोबर खेळल्याचा तो प्रसंग, आज आलेला आईचा फोन, सकाळी बॉस बरोबर स्वप्नात झालेलं भांडण आणि लिफ्ट मधला आताचा अनुभव सर्व शृंखला एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून गेली. दरदरून घाम फुटला होता त्याला.

"अरे साहिल, काय झालं तुला?" त्याची अवस्था पाहून घाबरलेली आई त्याला हलवत होती. तो काहीच न बोलता घरात शिरला आणि तसाच खुर्चीवर बसून राहिला. आई प्रेमाने त्याच्या केसांत हाथ फिरवत म्हणाली, "खूप दमलायस का रे आज? जा लवकर फ्रेश हो आणि गरम गरम जेऊन घे".
त्याचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो नुसता स्तब्ध बसून होता. त्याचं हृदय धडधडत होतं. "आई ...आई गं... आज झोपायचं नाहीये मला. झोपायचं नाहीये. हो, झोपणार नाही मी आज. हा हा हा हा, येस नाहीच झोपणार. मग कसं दिसेल मला काही? हा हा हा हा"

त्याच्या या अवतारकडे पाहून आई घाबरली. तिने आतल्या रूम मध्ये झोपलेल्या साहिलच्या वडिलांना हाक मारली. दोघांनी मिळून त्याला कसेतरी समजावले. आईने स्वतःच्या हाताने त्याला 2 घास भरवले आणि त्याच्या रूम मध्ये नेले तशी त्याची बडबड परत सुरू झाली. "आई आई तू थांब ना माझ्याबरोबर. आपण गप्पा मारू, मला झोपायचं नाहीय आज. आज झोपणार नाहीय मी. आई तू थांबशील ना गं इथे? मला झोपू देऊ नको हा नाहीतर परत मला स्वप्न पडेल". साहिल ने स्वप्नांचा पुरता धसका घेतला होता.
आई त्या रात्री त्याच्याबरोबरच थांबली. रात्रभर साहिल तिच्याशी या ना त्या विषयावर गप्पा मारत होता. तरीही त्याचा पहाटे ३ च्या सुमारास डोळा लागलाच. आईलाही वाटले आराम मिळेल त्याला. ऑफिसच्या कामाचं एवढं टेन्शन त्याने घेतलेला पहिल्यांदाच आईवडिलांनी पाहिलं होतं. वर्क लोड आणि प्रेशरमुळे, तसेच कामाच्या ठिकाणी असणाऱ्या पॉलिटिक्समुळे हल्ली तरुणांमध्ये मानसिक आजाराचं प्रमाण वाढलं आहे असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं. त्यांना काहीही करुन आपल्या मुलाला मानसिक रुग्ण होण्यापासून रोखायचं होतं.
सकाळी उठताच ते आपल्या मित्राच्या मुलाला सागरला फोन करणार होते जो एक मानसोपचार तज्ञ होता.

"नाही नाही मी काही नाही केलं, मी काही नाही केलं. मी निर्दोष आहे." पहाटे नेहमीच्या वेळी आईने न उठवताच सागर ओरडत उठला होता.
आईबाबा दोघेही धावतच त्याच्या रूममध्ये गेले. तो आईच्या कुशीत शिरून अगदी लहान बाळासारखा रडू लागला. आता तो पुरता भानावर आला होता की आपण स्वप्नात होतो. "आई का झोपू दिलंस मला? आई मी पुरता अडकलोय यात आता. माझी सुटका नाही गं इथून". आईला काहीच कळत नव्हते.

बाबा त्याला म्हणाले , "चल तयारी कर, आपल्याला बाहेर जायचं आहे. आज एक दिवस ऑफिस मध्ये जाऊ नकोस." खरं तर साहिललाही तेच हवं होतं. कालचा लिफ्टमधला प्रसंग आणि आज सकाळी त्याच्या हृदयाचा थरकाप उडवणारं ते स्वप्न त्याला आठवत होतं. येणारा काळ काय घेऊन येणार आहे याची त्याला कल्पना आधीच आली होती. 'पण छे हे असंच होणार आहे का? की निव्वळ भ्रम आहे हा माझा? थकल्यामुळे भास होत असतील मला. एवढ्या रात्रीपर्यंत काम करायची सवय कुठेय मला? पण मग ताईचा फोन आलेला त्याचं काय? आई म्हणते तसं दुसरं कोणी असेल. नाही आता मी विचार पण नाही करणार. वेड लागेल मला... नाही आता मी कसलाच विचार नाही करणार.' तो बाबांबरोबर बाहेर जायला तयार झाला. त्याने कुठे कशाला कसलीच चौकशी नाही केली. यावेळी फक्त त्याला ऑफिसला न जाण्याचं निमित्त हवं होतं.
साहिल आणि आईबाबा घरातून बाहेर पडणार एवढ्यात साहिलचा मोबाईल खणखणला. बॉसचा नंबर बघून साहिलच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला फोन घ्यायचा नव्हता तो मोबाईलकडे बघत तसाच उभा आहे हे पाहून बाबांनीच फोन कट केला आणि म्हणाले "साहिल ऑफिसला कळवलं नाहीस अजून आज येणार नाहीस ते?"
साहिल: अहो बाबा खूप महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे. आज नाही गेलो तर उद्या मला खूप प्रॉब्लेम होणार आहे. म्हणून नाही कळवत आहे. डायरेक्ट उद्याच जाऊन बॉसच्या शिव्या खातो.

असं म्हणून साहिल त्याच्या आई वडिलांबरोबर निघाला. सागर त्यांना घरीच भेटणार होता. म्हणूनच बाबा त्याला घेऊन लवकर निघाले होते. घरी सागर आणि त्याचे आईवडिल यांच्याबरोबर औपचारिक गप्पा झाल्यावर सागर त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला.
सागर: काय मग कसं सुरू आहे ऑफिस आणि नवीन फ्लॅट काय म्हणतोय?
साहिल: आहे सुरू नॉर्मल, विशेष असं काहीच नाही. आणि नवीन फ्लॅटचं म्हणशील तर.... (साहिल स्वतःच्याच विचारात गेल्याचं सागरने पहिलं)
सागर: साहिल, कुठे हरवलास?
साहिल: सागर मला बोलायचंय काहीतरी तुझ्याशी, कदाचित तू समजू शकशील किंवा नाही पण...
सागर: तू बोल तरी मग बघू मला कळतेय का नाही ते.

साहिलने त्याला गेल्या 2-3 दिवसात आलेल्या अनुभवाची सर्व शृंखला कथन केली. सागरला आता खात्री पटली की या प्रोजेक्टचा खूपच ताण साहिलने घेतला आहे. त्याने साहिलला आजचा दिवस ब्रेक घ्यायला सांगीतला तसा त्याने तो घेतलाच होता. काही स्ट्रेस रिलीव्हर मेडिसीन्स प्रिसक्राईब केल्या. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या क्लिनिक मध्ये बोलावले.
सागर कडून आल्यावर साहिलला थोडं बरं वाटत होतं. तो गोळ्या घेऊन दुपारी शांत झोपला.

संध्याकाळी ऑफिस मधून आलेल्या एका कॉलमुळे त्याला जाग आली. ऑफिसमधून प्रसादचा कॉल होता. "साहिल अरे काय यार हे असले राडे घालून तू गायब? निदान आमचा तरी विचार कारायचास ना. आम्ही पण आहोत तुझ्या टीममध्ये. बॉसबरोबर वाद घालून गेलास तो परत आलासच नाहीस ऑफिसमध्ये. इथे सर्व काम खोळंबल आहे. तू टीम लीडर आहेस, आम्ही काय करायचं तुझ्याशिवाय? लटकलोय मधल्यामध्ये आम्ही. तू धमकी दिलीस बॉसला प्रोजेक्ट सोडणार म्हणून? आधी ये आणि मॅटर साँल्व करूनच जा परत."
साहिलच्या हातातून फोन खाली पडला. तो तसाच बेडवर स्तब्ध बसून राहिला. 'मी तर आज गेलोच नाही ऑफिसला? मग बॉसशी भांडण कोणी केलं? याचीच भीती होती, मला हे सर्व टाळायचं होतं म्हणून आज मी गेलो नाही. म्हणजे मला हे टाळता नाही येणार?' साहिलचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याला आता सकाळी पडलेलं स्वप्न आठवलं. त्याच्या कपाळावरच्या शिरा ताठरल्या. 'म्हणजे उद्या माझ्या हातून बॉसचा खून.....' "आई बाबा लवकर या. मला वाचवा. हे हे मी नाही करत आहे सगळं". त्याचा आवाज ऐकून आईबाबा धावतच त्याच्या रुम मध्ये आले. तो चक्कर येऊन जमिनीवर पडणार एवढ्यात आईबाबांनी धावत येऊन त्याला सावरलं. त्याला बेडवर झोपवलं आणि तातडीने सागरला फोन लावला. सागर परिस्थितीच गांभीर्य लक्षात येताच लगेच साहिलच्या घरी आला.
"उद्याच आपण त्याला माझ्या ऑबसर्वेशनखाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू. आजसाठी त्याला हे झोपेचं इंजेक्शन दिलं आहे. काळजी करू नका होईल सर्व ठीक." सागर साहिलच्या आईबाबांना समजावत होता.

काळजीपोटी साहिलच्या आईला अन्न जात नव्हते, शेवटी तशीच येऊन ती साहिलच्या उशाशी बसली. रात्री साधारण १ वाजता साहिलला जाग आली. त्याला काहीही करून हे सर्व थांबवायचं होतं. पण त्याच्या हातात होतं का ते? थांबवू शकेल का साहिल पुढे होऊ घातलेलं अघटित?
एक अनामिक शक्ती साहिलला बाहेर ओढत होती. तो स्वतःला रोखु शकत नव्हता. आई गाढ झोपलेली, बाबाही त्यांच्या रूममध्ये झोपले असावेत. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. साहिल संमोहित झाल्यासारखा दरवाजाकडे खेचला जात होता, तरीही त्याचं जागृत अंतर्मन त्याला थांबवायचा प्रयत्न करत होतं. 'का मला बोलावतेयस? कोण आहेस तू? काय हवंय तूला? मीच का... मीच का पण?' त्याचं मन आक्रोश करत होतं. त्याने फ्लॅटचं दार उघडलं आणि त्या लिफ्टकडे निघाला. ती ही जणू आ वासून त्याला गिळण्यासाठी तयारच होती. साहिलला कल्पना होती आज त्याला आत काय दिसणार आहे. त्याच्या हातून आज त्या लिफ्टमध्ये काय घडणार आहे. पण त्याच्या हातातून सर्व निसटत जाताना त्याला उघड्या डोळ्यांनी पाहावे लागणार होते. साहिल अगदी सगळं माहीत असल्याप्रमाणे आत गेला आणि आता त्याचं हृदय, डोळे, एकूणएक जाणिवा त्या अनामिक शक्तीच्या आधीन व्हायला तयार झाल्या.

लिफ्टचं दार जसं बंद झालं सकाळी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे तो बॉसच्या समोर ऑफिस केबिनमध्ये होता. दोघांमध्ये प्रचंड मोठं भांडण झालं आणि रागाच्या भरात साहिलने टेबलवरचा पितळी फ्लॉवरपॉट उचलून त्याच्या डोक्यात घातला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बॉसकडे बघत असतानाच लिफ्टचं दार उघडलं आणि तो बाहेर आला. त्याचं शरीर थंड पडलं होतं, मेंदू जणू काळाच्या पुढे जाऊन होणारं अघटित कसं टाळता येईल याच्या विचाराने सुन्न झाला होता. 'काहीही झालं तरी मी हे होऊ देणार नाही. आज तुझा आणि माझा सामनाच होऊन जाऊ देत पाहू तू जिंकतेस की मी.' साहिल लिफ्टकडे बघून हसला. त्याने मनोमन त्या शक्तीला हरवण्याचा मार्ग शोधला होता. लढाई जिंकल्याच्याच अविर्भावात तो घरी आला. आज आई थकून शांत झोपलेली. तो हॉलच्या बाल्कनीमध्ये गेला आणि कठड्यावर उभा राहिला. 'स्वतःशीच हसत म्हणाला जर मीच नाही राहिलो तर? तर कोणाच्या हातून घडवणार हे सगळं? कशी नेणार ही शृंखला पुढे?' आणि स्वतःला त्याने खाली झोकून दिलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीमध्ये साहिलच्या आत्महत्येमुळे खळबळ माजली. पोलीस येऊन मृतदेह ताब्यात घेऊन गेले. कुटुंबाकडे आणि शेजारीपाजारी चौकशी सुरू झाली आणि दुपारपर्यंत ऑफिसमधून बॉसच्या खुनाची वार्ताही झपाट्याने सगळीकडे पसरली.
साहिलने त्या अदृश्यं शक्तीविरुद्ध पुकारलेला लढा संपला होता. कोण होती ती शक्ती जी स्थळ, काळ, वेळ, एखाद्या माणसाचं अस्तित्व या पलीकडे साहिलला नेत होती? दुसरा कोणता मार्ग होता का तिला रोखण्याचा साहिलकडे? बॉसला मारणारा तो साहिल तर नव्हता, मग कोण होता तो? पोलिसांना आणि ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांना कळले असेल का? सर्व प्रश्नांना अनुत्तरित ठेऊनच साहिल गेला.
आज साधारण १ महिना झाला होता साहिलला जाऊन, रात्रीचा १ वाजला होता. १६व्या मजल्यावरील प्रणयला आज उशीर झाला होता यायला. त्याने बाईक पार्क केली आणि सोसायटीच्या गेटमध्ये शिरला. आज पण पॅसेंजर लिफ्ट बंद होती आणि सामानाची लिफ्ट प्रणयच्या स्वागताला दरवाजे उघडून उभी होती......
✍️ दर्शना तावडे