लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ३
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
💥 सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - २ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://marathighoststories.blogspot.com/2020/06/blog-post_56.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
अनेक प्रश्नांनी मला पछाडून सोडले होते. आम्ही दोघे पुन्हा झोपलो. असे पुढचे दोन दिवस गेले आणि एक रात्र अशी आली जेव्हा मला सर्वांगात घाम फुटला . . . .
अचानक मला मध्यरात्री आवाज आले. त्या आवाजाने मी जागा झालो. पावलांचे आवाज , ओरडायचे आवाज , मला कळेना काय चाललंय ते ! मी उठलो बाहेर पाहिलं तर भयानक तोंडाचा आवाज करीत ८ ते ९ आदिवासी ओरडत जंगलात गेले. त्यांच्या हातात कसली भयानक हत्यारे होती.
मी बाजूला पाहिलं तर हौसा नव्हती. काळजात धस झालं. पुन्हा कुठे गेली ? काय करायचं ? अरे बापरे आता ही माणसं तिच्याच शोधत गेली नसतील ना ? काही कळेना. शेवटी मी तडकिने उठलो आणि जंगलात धावत सुटलो. जंगल रात्री भयंकर दिसत होते. कसले भयानक पक्षी चित्कारत होते. मी त्या माणसांच्या मागून धावत होतो पण त्यांना कसलाही संशय येणार नाही अश्याप्रकारे. पायांचे होणारे आवाज कटाक्षाने टाळत होतो. तसाही आवाज त्यांच्यापर्यंत गेला नसता कारण , ती सगळी माणसं तोंडाने बोंबलत धावत होती. चंद्र अगदी हट्टाला पेटला होता. मंद प्रकाश त्याने फवारून दिला होता त्या गर्द वनात.त्यातून वाट काढत आम्ही धावत होतो . मला हौसा ला शोधायचे होते. गावात आल्यापासून रोज हेच होत होतं. रोज रात्री हौसा जंगलात जात असे. काय आहे नेमक गणित ते सोडवण गरजेचं होतं. धावता धावता आम्ही एका मोठ्या खडकांच्या जागेत आलो. भलेमोठे खडक ,जवळजवळ एका इमारतीच्या उंचीचे दगड होते. बाजूने उंच डेरेदार वृक्षाच्या पारंब्या त्या दगडांवर झोंबकळत होत्या. जणू काही एखादा निद्रिस्त राक्षस असावा.
सगळी काळेकुट्ट रंगाची माणसं त्याभोवती जमा झालेली होती. सगळी लोक त्या एका मोठ्या खडकाकडे तोंड करून काहीतरी पुटपुटत होती. चंद्राचा धूसर प्रकाश त्यातून फार काही स्पष्ट दिसत नव्हते. मला वाटलं मी उगाचच ह्या लोकांच्या मागून आलो. हौसा तर नाही भेटली ! आता कुठे गेली असेल ? अस मनोमन ठरवून मी मागे वळून निघालो. इतक्यात ती लोक जोरजोरात ओरडू लागली. कलकलाट करू लागली. मी सहजच मागे पाहिले तर माझी पायाखालची जमीन सरकली. त्या लोकांच्या नजरेसमोर होती हौसा. हौसा चा तो अवतार पाहून मात्र माझ्या पायांची मुरकुंडी झाली. पाय लटपटू लागले. जो काय अवतार तिने केला होता तो कोणता राक्षसापेक्षा कमी नव्हता. महत्त्वाचे म्हणजे तेव्हा ती त्या माणसांना घाबरत नव्हती आणि ती माणसं सुध्दा तिला मारायला धावत गेली नाही. हा काय प्रकार ? मग त्यादिवशी काय वेगळं होतं ?
हौसा ने केस मोकळे सोडले होते. डोळ्यातील आग ज्वलंत होऊन जळजळीत करून सोडत होती. दोन्ही हातात झाडांच्या फांद्या घेऊन ती त्या दगडासमोर थयथयाट करीत होती. सगळे तीच्यासमेत हाहाकार करू लागले. मला कळेना काय प्रकार चालला आहे तो. मी जरा घाबरलो होतो म्हणून तिथून जाण्याचा निर्णय घेतला. मी पाठी वळलो आणि आपला मार्ग धरला. जाताना अनेक विचार मनात घोळत होते. हौसा हे प्रकरण काय आहे ? काय तिच्या वागण्याचं गूढ ? तिचा हा अवतार का असतो ? मला प्रश्नांची उत्तरं मिळवायची होती. मी झोपडीत परतलो. मध्यरात्र भरात आली होती. गडद जांभळी किर्र रात्र हुंकार देत भयाण काळोखात स्वतःला झोकून देत होती. मी जाऊन त्या झोपडीत कपड्यात पडलो , बघता बघता वेळ गेला आणि थोड्या वेळाने हौसा झोपडीत आली. तेव्हा तिला पाहिली तेव्हा ती पूर्णपणे वेगळी होती. मघाशी पाहिलेली हौसा आणि तेव्हा समोर असणारी हौसा ,ह्यांच्या कितीतरी तफावत होती. एकीकडे भयानक , अघोरी अस काहीतरी रूप आणि दुसरीकडे देखणी , सुंदर हौसा, अश्या दोन गोष्टी मला भेडसावू लागल्या. ती आली आणि निवांत माझ्या बाजूला पहुडली आणि क्षणात झोपी गेली. मी ही तिला उठवल नाही, जरी ती काही रहस्य लपवत असली तरी माझा जीव जडला होता.
थोडावेळ मी ही तिच्यासोबत पहुडलो आणि एकदम हौसा काहीतरी पुटपुट करू लागली. झोपेत काहीतरी बडबडू लागली. डोळे पूर्ण खोल बंद होते पण ओठांवर शब्दांची घाई चालली होती. मी एकटक त्या शब्दांकडे निरीक्षण दिले तर काही शब्द मला प्रकर्षाने जाणवले. ती मध्ये मध्ये बोलत होती "नको. .नको., "माफी" , " कुठेस तू" असे शब्द तिच्या ओठातून बाहेर पडू लागले. मी तिला उठवलं आणि माझ्या जवळ घेतलं. ती घाबरली होती. रात्री केस सोडलेले तसेच मोकळे होते. ते बांधून मी तिला पाणी दिलं. तिला विचारलं तर तिला काही आठवत नव्हतं पण मला एक गूढता कळली होती. ती शुद्ध मराठी बोलणारी नव्हती तरी तिच्या ओठातून शुध्द मराठी शब्द कसे आले होते.
सकाळ झाली. मला तिला कालच्या प्रकारा बद्दल विचारायचं होतं. मी तिला जवळ बोलावलं आणि समजावून विचारलं. . .
मी - तुझ नक्की काय आहे हौसा ? काल रात्री तू कुठे होतीस ?
हौसा - काय याद नाय मला
मी - तू पुन्हा तो भयानक अवतार करून त्या कुठल्या जंगलातल्या दगडावर सगळ्या माणसांमध्ये होतीस.
हौसा - मला नाय याद पर वाटत परत तसचं चालू हाय !
मी - कसं ?
हौसा - मला काय कळतं नाय, पण एक लहान मुल मला दिसत आणि मला हाका मारत असतं. मला मी काय करते ते कळतच नाही.
मी - तू काल रात्री स्वप्नात सुध्दा काहीतरी बडबड करीत होतीस ?
हौसा - मला आठवत नाही !
प्रत्येक दिवस आमचा असच चालला होता. कधी काही घडत नव्हते ज्यावरून त्या गूढ गोष्टींचा मागोवा घेता आला असता. प्रत्येक दिवसी निरनिराळे अनुभव तेवढे यायचे. कधी झोपडीत बाळाच्या अंगाचा सुवास येत, कधी जंगलातून कोणतरी ओरडत असत, झोपडी बाहेर कोणीतरी धावत जातानाचा आवाज , हौसा स्वप्नात बडबडू लागत असे, काहीच समजत नव्हते. खरतर हौसा ला सुध्दा काही उमगत नव्हते पण ती जे घडेल त्यात जराही ना कचरता शामील होत असे आणि तो भयानक अवतार धारण करीत असे. अस करता करता एक दिवस असा आला ,ज्याने एक थरकाप सोडून द्यावा तसा आम्हाला अनुभव दिला.
रात्र झाली होती . मध्यरात्र होती. चिटपाखरू सुध्दा चित्कारत नव्हते. शांतसुंत झालीय रात्र काहीतरी भीषण गुढतेची झालर पांघरूण सुस्त पडली होती. चंद्र आळसावून गर्भित रात्र रंगवत होता. अश्यातच जंगलातून खोल आगीचे लोट उठलेले दिसू लागले. त्याची गगनाला भिडणारी ज्वाला आकांत करीत होती. उडणारे असंख्य प्रज्वलित ठींणग्यांचे झोत रात्रीचे रान उठवत होते. आम्ही दोघे ही उठलो आणि जंगलाच्या दिशेने निघालो. थंड वातावरणात अंगाला झोंबणारा वारा कटाक्षाने टाळत आम्हाला ती आग बघायची होती. काय चाललं असेल ? कोण असेल ? कोणी लावली असेल ? असंख्य प्रश्न तसेच मनात ठेवून आम्ही जवळ जवळ येत होतो. काही अंतराच्या पायपीट करण्याने आम्ही समोर पोहोचलो आणि पाहिले तर असंख्य काळीकुट्ट माणसं एका अग्निभोवती जमा झाली होती. अग्निचा लोट इतका उंच होता की , त्याची गरम धग आम्हाला जंगलातल्या काही अंतरावर सुध्दा जाणवत होती. ती सगळी माणसे त्या आगिभोवती तोंडाने आवाज काढत बोंबलत फिरत होती. इतक्यात हौसा दबक्या आवाजात किंचाळली. मी ही तिच्या नजरेच्या दिशेने पाहिले आणि की सुध्दा दचकून गेलो. जवळजवळ हृदय बंद पडण्याच्या परिस्थितीत आल. समोर पाहिले तर त्या अग्नीच्या समोर एक मुलगी बसली होती. तिला एका रिंगणात बसवले होते. तिचा चेहरा बघताच क्षणी मी आणि हौसा जागच्या जागीच उडालो. रिंगण बसवलेली मुलगी होती "हौसा".
मी बुचकळ्यात पडलो मग माझ्या बाजूला उभी होती ती कोण होती ?
भाग - ४ पुढील टप्प्यात
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराhttps://marathighoststories.blogspot.com