.
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
💥 सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग -१ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://marathighoststories.blogspot.com/2020/06/blog-post_37.html
ती उठली आणि चुलीजवळ गेली .बाजूच्या हांड्यातल तांब्याभर पाणी काढलं आणि चुलीत घालून चूल विझवली. नंतर माझ्याकडे बघत चिमणी जवळ गेली. दुसऱ्या क्षणाला तिने चिमणी हाताने विझवली आणि तिसऱ्या क्षणाला निर्वस्त्र होऊन माझ्या बाजूला पडली. . . . . .
त्या संपूर्ण रात्री जे काय झालं ते शारीरिक च नाही तर मानसिक ही बाबतीत हेलावून टाकणार होतं. . . . . . .
सकाळ झाली. गावरान निसर्गाच्या कुशीत विहरणारे पक्षी गुंजन करीत फेरफटका मारीत होते. सूर्य हळूहळू सरकू लागला होता. मला जाग आली , जिथे पडलो होतो त्याच कपड्यात जाग आली. आजूबाजूला पाहिलं, डोळे चोळत उठलो तर हात अडकल्यासारखा वाटला. बघितले तर त्या मुलीच्या मानेच्या खाली माझा हात होता. अचानक नजर तिच्या पायावर असणाऱ्या "अर्ध चंद्राच्या खुणे" कडे गेली. मला क्षणभर सगळं आठवलं. काय झालं हे ? नाही व्हायला हवं होतं ? कितीतरी विचारांनी घेरले. चटकन उठलो कसातरी हात गडबडून बाहेर काढला.त्या धक्याने तिला जाग आली. मी सरळ झोपडीच्या बाहेर पडलो माझ्या रस्त्याने. ती पाठून धावत आली आणि माझा हात हातात घेत तिने एक स्मित हास्य फुलवले. क्षणात माझा राग म्हणा किंवा चिडचिड म्हणा चुटकीसरशी बाजूला झाली आणि मी तिला जवळ घेतले. झाले ज्याच्यासाठी आलो होतो ते सोडून मी कुठेतरी भरकटत चाललो आहे , हे मला जाणवत होतं पण माणूस शेवटी निसर्गाच्या पुढे कीटक समान ! आम्ही दोघे मग तिथे गप्पा मारीत बसलो. तिच्या पायावर असणारी अर्ध चंद्राची खूण न्याहाळत मी तिच्याबद्दल जाणून घेत होतो. ती बोलत होती. . . . .
तिचं नाव "हौसा". त्या गावात ती अगदी एकटीच राहत होती . आई वडील कधीच वारले होते. तारुण्याचा ज्वर सांभाळत जगणं कठीण पण ती सांभाळत होती. त्या गावात तिची तीस वर्षांची जिंदगी गेली होती. इतकी सुंदर देखणी तरुणी त्या गावात एकटी राहत होती.एखादी असती तर गाव सोडून कधीच कुठेतरी वस्तीच्या ठिकाणी गेली असती पण ही एकटी का राहिली ? ह्या प्रश्नाचं उत्तर तिने नाही दिलं ! गप्पा मारता मारता आम्ही इतके दंग झालो की दुपारचा प्रहर कधी झाला ते कळले नाही. घड्याळात चार वाजले होते.
मी - काल तू त्या झाडाखाली काय करत होतीस ?
हौसा - काय . . .कुठे . . . !! ( विषय टाळत )
हौसा - मी रानात जाऊन येते (अस म्हणत ती उठली)
मी - मी येतो
हौसा - तिथे जनावर असतात ( नकार दिला )
मग मी तिथेच बसून राहिलो. खूप वेळ झाला तीची काही येण्याची चिन्ह दिसेना. घड्याळात दोन तास होऊन गेले. सायंकाळचे सहा वाजले होते, म्हणून मी उठून रानात गेलो. खूप इकडे तिकडे धुंडाळून पाहिले तर कुठेच काही नामोनिशाण नाही. शेवटी एका दृश्याने माझं लक्ष वेधलं.मी थबकलो आणि पाहिलं. हौसा एका झाडाच्या मुळात बसली होती ,पुन्हा तोच अवतार ,केस मोकळे सोडलेले , उपडी मांडी घालून ती त्या झाडाच्या मुळात हाताने काही जमिनीवर रेखाटत होती. तर्जनी ने ती मातीत काही अक्षरे किंवा चिन्हे किंवा चित्रे रेखाटत बसली होती आणि अंग मागेपुढे झुलवत होती. मी पुन्हा घाबरलो. रात्र जिच्या बरोबर काढली ती सुंदर, देखणी तरुणी आणि हे भयानक काहीतरी विक्षिप्त वागणं ह्यात माझी गल्लत होऊ लागली. इतक्यात तिथून समोरच्या झाडीतून दोन माणसे तिच्याजवळ आली. लांबून तिला न्याहाळू लागली. माणसं कसली भूतखेत वाटत होती. कंबरेला फक्त एक फडका आणि बाकी संपूर्ण अंग उघड , काळीकुट्ट रंगांची, भयानक दात, लाल डोळे, विचित्र अंगकाठी असलेली ती राक्षस तिच्या जवळ यायला लागली. मी पुढे सरसावनार होतो पण तो नेमका काय प्रकार आहे हे मला पहायचं होतं.
दोन्ही माणसे पुढे झाली आणि त्याच्या एकाच्या हातात असलेला कोयता त्याने पुढे काढला , मी हादरलो .मला कळेनाच मी काय करू ? हे काय चाललंय ? इतक्यात हौसा मागे वळली आणि तिने पाहिली ती माणसं तशी ती जोरजोरात धावत सुटली. ती पुढे तिच्या मागे ती माणसं, झाडातून उभी आडवी गेलेली वाट काढत ते तिघेही सुसाट धावत होते. मी देखील सावध होऊन त्यांच्या मागे धावत सुटलो. हौसा ला काही करायच्या आता मला तीची मदत करायची होती. मी धावत सुटलो, शेवटी हौसा जाऊन एका दगडाला आपटली. मी धावता धावता दोन मोठे दगड उचलले. हौसा मागे वळली ,दोन माणसं तिच्या समोर आली कोयता तिच्या मानेवर घालणार इतक्यात मी मागून दोन दगड एकसाथ दोघांच्याही डोक्यात घातले. दोघेही विव्हळत खाली कोसळली. मी रागाने लाल झालो. हौसा चा हाथ जोरात धरून तिला झोपडीत घेऊन गेलो आणि समोर बसवून तिच्या एका कानाखाली वाजवली. हातभार अंतर लांब जाऊन तीन पडली.
मी - मी तुला कालही पाहिलं होतं, तू हे सर्व काय करतेस. कसली जादू करतेस , तंत्र मंत्र करतेस ?
हौसा - तस नाय कायो !
मी - मघाशी सुध्दा विषय टाळलास ?
हौसा - मला नाय कळत , मला बारक पोरं दिसतंय डोळयांना. त्यासमोर मी बसती आणि काय बाय करत राहती. मला काय तसलं येत नाय, जंतर मंतर पण मी कशी काय करती काय माहीत.
मी - मला कळेना ती जे काय करीत होती ,ते तिलाच कळत नव्हत , मग हे काय प्रकरण आहे ? ( मी मनातल्या मनात विचार करीत होतो )
रात्र झाली. आम्ही जेवलो. झोपायची वेळ झाली. आम्ही त्या कपड्यात झोपायला गेलो. रात्रीत वारा विहरायला लागला. जंगलातील रात्र काढायची म्हणजे कितीतरी भीती. शांत, एकांत, खायला उठतो. रात्र भराला होती. चंद्र एकटक शांत होऊन गुप्त रहस्य उलगडू पाहत होता. भयानक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांचा , किड्यांचा उच्छाद मांडला होता. मी गाढ झोपेत होतो. कुस इकडून तिकडे बदलताना अचानक माझा हात बाजूला पडला तर तिथे हौसा नव्हती. मी दचकून उठलो. कुठे गेली ? आता रात्री कुठे शोधायचे ? माझे डोके काम करणे बंद करू लागले. मी कसातरी घाबरत झोपडीच्या बाहेर आलो आणि नजर जाईल इतक्या लांबपर्यंत शोधू लागलो. शेवटी मला पर्याय राहिला नाही तिला शोधायला रानात जाण्याशिवाय. मी चप्पल घालून निघालो . वाट काढत काढत पुढे सरसावत होतो. एकतर भयानक जंगल, काळी रात्र, खिन्न काळोख , कुठलेसे चित्र विचित्र आवाज मला नकोस करत होते. मी पुढे जाणार इतक्यात एका हालचालीने माझे लक्ष वेधले. त्या काळोखातून मुश्किलीने मी बघू शकत होतो पण, तरी मी निक्षून पाहिले. एक बाई आपल्या छातीला एका लहान बाळाला कवटाळून चालली होती आणि तिचा मागोमाग हौसा चालत होती. आता काय करावे ? मी पुढे चालत सुटलो त्या दोघी पुढे मी मागे असे चालले असताना ती बाई एकाकेकी मागे वळली आणि तिने माझ्याकडे पाहिलं. माझं पाणी पाणी झालं. तिचे लाल डोळे, चेहरा संपूर्ण काळवंडलेला होता, हातातील बाळ सुध्दा अगदी शांत होते , जिवंत होते की नाही काही अंदाज नाही ? मी थबकलो. तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. अचानक ती जोरात किंकाळली . इतकी जोरात किंकाळी की जंगल हादरून गेलं. क्षणात शांत असलेलं जंगल जाग झालं. पक्षी चित्करू लागले, भयानक आवाज वाढू लागले. मी इकडेतिकडे पाहू लागलो आणि पुन्हा हौसा कडे पाहिले तर ती बाई अचानक गायब झाली होती. एकाएकी दिसेनाशी झाली. मी धावत पुढे सरसावलो आणि हौसा ला धरून झोपडीत घेऊन आलो पण हौसा शुध्दीत नव्हती. तिला काही च कळत नव्हते. मी दोन चार फटके पाण्याचे मारल्यावर ती अचानक त्या अवस्थेतून बाहेर आली. अनेक प्रश्न माझ्या मनात घुमघुमत होते.
हौसा अशी विचित्र का वागते ?
तिला कसली तंत्र-मंत्र विद्या येते का ?
अश्या अनेक प्रश्नांनी मला पछाडून सोडले होते. आम्ही दोघे पुन्हा झोपलो. असे पुढचे दोन दिवस गेले आणि एक रात्र अशी आली जेव्हा मला सर्वांगात घाम फुटला . . . .