💥 सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ३ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://marathighoststories.blogspot.com/2020/06/blog-post_98.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
समोर पाहिले तर त्या अग्नीच्या समोर एक मुलगी बसली होती. तिला एका रिंगणात बसवले होते. तिचा चेहरा बघताच क्षणी मी आणि हौसा जागच्या जागीच उडालो. रिंगण बसवलेली मुलगी होती "हौसा".
मी बुचकळ्यात पडलो मग माझ्या बाजूला उभी होती ती कोण होती ?माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती हौसा होती मग मी जीच्याबरोबर त्या जागी पोहोचलो ती कोण आहे ? मी तिच्याकडे पाहिलं ! ती हौसा च होती पण समोर पाहिलं तरी ती सुध्दा हौसा च होती. कराव काय ?
इतक्यात माझ्या बाजूला असणाऱ्या हौसा ला चक्कर आली. ती तिथेच खाली कोसळली. आवाज न करता मी तिला उचलायला गेलो आणि माझाही पाय अडकला गेला . काळोखात फारस दिसत नसल्याने मी ही खाली कोसळलो. तिला खांद्याला धरून हलवून मी तिला जाग करत होतो पण काही उपयोग नाही झाला. ती काही केल्या शुध्दीवर येत नव्हती. मी उठलो आणि तिला उचलून घेण्याचा यत्न करू लागलो इतक्यात हालचाल उठली. आमच्या दोघांच्या तिथे असण्याची चाहूल जाणवायला लागली. मी त्या माणसांकडे पाहिलं तर त्यातल्या एका माणसाने आमच्याकडे पाहिलं आणि त्याने इतर साथीदारांना सुध्दा दाखवलं. सगळे मिळून आमच्याकडे धावले. तेव्हा मात्र माझी चाळण झाली. मी त्या आगी समोर असणाऱ्या मुलीकडे पाहिलं तर मला भ्रमाचे अनुभवायला मिळाले. ती मुलगी अचानक अदृश्य होऊन तिथे लहान बाळ दिसे , मधेच पुन्हा तरुण मुलगी , मधेच हौसा चं प्रतिबिंब , मध्येच पुन्हा लहान बाळ. हे असे खेळ मी निमिषात पाहिले. थांबून सोक्षमोक्ष लावणारं होतो पण ती माणसं आमच्या दिशेने धावत येत असल्याने मला हौसा ला घेऊन धावणं गरजेचं होतं. मी उठलो हौसा ला हातात घेऊन धावत सुटलो. धावता धावता मी एका मोठ्या रानटी झाडांच्या मागे लपलो. मोठा बुंधा असलेल्या त्या झाडांच्या मुळात बसल्याने काळोखात आम्ही दिसत नव्हतो. ती माणसे धावून धावून इकडून तिकडे शोधून परत माघारी फिरली. मी सुटकेचा निःश्वास टाकला. . .हौसा ला घेऊन मी झोपडीत आलो. थोड्यावेळाने हौसा शुध्दीवर आली. रात्र वाढली होती म्हणून एकांत शांत वातावरण प्रकट करून आम्ही झोपलो.
पहाट झाली. कुजबुजत पक्ष्यांची हेलकावणी चालू झाली. मला कसही करून ते गाव सोडायचं होत कारण, तिथे राहून आमचं काहीतरी वाईट नक्की होणार ह्याची मला खात्री झाली होती. माझा मोबाईल तर केव्हाच बंद झाला होता. चार्जिंग नसल्याने त्याचे काम बंद झाले. एकाच मार्ग मला दिसत होता. दिवसभरात उजेड आहे तोपर्यंत गावच्या बाजारात जाऊन मोबाईल कुठल्याही परिस्थितीत चार्ज करुन आणायचा. तरच इतर कोणाशी किंवा मदतीची गरज लागली तर संपर्क करता येण्यासारखा मार्ग होता. मी हौसा ला घेऊन तर जाऊ शकत नव्हतो कारण तिचा एकंदरीत पोशाख आणि अंगकाठी ह्यावरून तिला बाजारात घेऊन जाणे अवघड झाले असते आणि त्यात तिची तब्ब्येत ही ठीक नव्हती. मी निघालो हौसा ला तिथेच ठेऊन मी बाजार गाठत होतो. दुपारचे 3 वाजले असावे. मी बाजारात पोहोचलो साधारण 2 तास तिथेच मोबाईल चार्जिंग करून मी घरी यायला निघालो. संध्याकाळचे 5 वाजले होते. मी बस मध्ये बसल्यावर आमच्या साहेबांना फोन लावला. फोनवर साहेब जे बोलले त्याने मी नखशिखांत हादरून उठलो. ते जवळजवळ गेले कितीतरी दिवस फोन लावून लावून थकले. ते पुढे म्हणाले
साहेब - तुमची बदली आम्ही लगेच दोन दिवसात रद्द केली होती, कारण ठातरी हे गाव आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या मुद्द्यातून काढून टाकण्यात आले. त्या विभागाचे समीक्षण करण्याची तितकीशी गरज नव्हती अस कार्यकारणी च्या महत्त्वाच्या मीटिंग मध्ये तडकाफडकी निर्णय घेतले गेले. त्यामुळे तुम्हाला संपर्क करण्याचा खूप प्रय्न केला पण तुमच्याशी होऊ शकला नाही. एक अधिकारी देखील आम्ही पाठवला त्या गावात पण निर्मनुष्य असल्याने ती पुढे गेला नाही तिथूनच परत फिरला. तुम्ही परत या !!
त्यांच्या अश्या शब्दांनी मला धक्केच दिले होते. सगळा राग , अनावर झाला. हातात येईल ते फेकून, तोडून, मोडून टाकावं अस वाटू लागलं. भयानक राग जेव्हा विस्फोटक पद्धतीने बाहेर पडू पाहतो तेव्हा तो सगळच उध्वस्त करतो. त्या रागाने मला ही त्रास होऊ लागला. माझं अंग गरम झालं , रक्तदाब वाढला. डोकं गरगरू लागलं, मग मनाने ठाम निर्णय घेण्याचं व्रत घेतलं. बस बॅग घ्यायची आणि निघायचं. आधीच मनात नव्हतं इथे येण्याचं आणि आता कळलं आहे तर का मुर्खासारख थांबायचं. लगेच संध्याकाळ ची एस टी पकडून पुन्हा आपल्या घरी जायचं. बस . . . !!
मी बसमधून खाली उतरलो आणि झोपडी गाठू लागलो. तेव्हा मला कसलाही विचार करायचं नव्हता आणि अजिबात भावनिक व्हायचं नव्हतं. सांजवायला लागली होती. मळभ पसरू लागली होती. अंधार आता आपल अस्तित्व दाखवू लागला होता. काळोख त्या भयाण जंगलात वस्तीला येऊ पाहत होता इतक्यात मी झोपडीच्या दारात पोहोचलो. समोरच दृष्य पाहून कचरलो. हातापायाला मुंग्या आल्या. डोकं आणखीन गरगर करू लागलं. राग कुठल्या कुठे लुप्त झाला आणि एका वेदनेच्या कळी ने मनाचा असा ढास मारला की अर्त कळ काकोळत हृदयाला भिडली. समोर हौसा बसली होती. एखाद्या बाळाला घेऊन आई बसते तशी ती मांडी हलवत होती. हात फिरवत होती पण तिच्या मांडीवर कोणीच नव्हते. काल्पनिक रित्या ती बाळाला थोपटत होती. मला कळेना काय करावं ? मी पुढे सरसावलो आणि तिला गदगदून जाग केलं तशी ती पटकन जागी झाली आणि क्षणात पूर्ववत झाली. काय घडत होतं ते तिला कळलंच नव्हतं. तिला बगल देऊन की बॅग भरू लागलो. ती रडायचा घाईला आली. मी मात्र ठाम होऊन निर्णय बजावत होतो. ती मात्र मोडकळून जाऊन माझ्याकडे एकटक बघत डोळ्यात पाणी आणून रुजवत होती. तिने खूप यत्न केला मला थांबवण्याचा पण मी पेटलो होतो. खरतर माझ्यातला पुरुष हलकटपण करून माझ्यातल्या माणसाला भोसकून काढत होता. रोज रात्री तो स्त्री देह भोगणारा तो पुरुष आज स्वतःचा विचार करून माणुसकीला मरण देत होता. असच करायचं होत तर त्या मुलीचा उपभोग का घेतला ? लाज - शरम काही ? आणि आता स्वतःचं मन भरल की जायचं सोडून ?
इतक्यात दोन्ही मनाच्या युध्दात शेवटी खोटं मन भारी पडायला लागलं. खऱ्या मनाने हताश होऊन शरणागती पत्करली आणि मग निर्लजजपणाची हद्द गाठत मी तिच्याकडे ढुंकूनही न बघता हातातील बॅग घेऊन झोपडी सोडली. झपाझप पावले टाकत मी झोपडी पासून दूर दूर चाललो होतो. पाठी तिला काय वाटलं असेल ? ती काय करत असेल ? पाठीमागून धावत येईल ? रडत बसेल ? का सोडून देईल विषय आणि विसरून जाईल सगळं ? ह्या ना त्या मार्गाने मी स्वतःला स्वतःपासूनच लपवत होतो. मी पायपीट करीत गावच्या जंगल वाटेवर आलो. तिथे खूप गर्द जाळीदार झाडी पडली होती. सांज झाल्यामुळे सर्व अंधुक अंधुक होऊन काळपट होऊ लागलं होतं. मी त्या एका डेरेदार झाडाजवळ आलो जिथे दुसऱ्याच दिवशी हौसा झाडाखाली बसून मातीत काहीतरी ओरखडून काढत होती. मी त्या बुंध्या जवळ पोहोचलो आणि कटाक्ष टाकून पुढे निघणार तर माझे पाय झपकन थांबले. जागीच खिळून राहिले. हातातील बॅग अलगद बाजूला ठेवली आणि खाली वाकलो तर डोळ्यांना एका चित्राने किंवा नक्षीने वेधून घेतलं. निरीक्षण केलं आणि मटकन खाली मांडी घातली. जवळ डोळे नेऊन मी ती नक्षी न्याहाळू लागलो तर एकेक प्रश्नांनी घेराऊन मला चक्रावून सोडले. अचानक मला शुध्द आली , मी काय करतोय ? मला निघायचं ? मला ह्यात अडकायच नाही ? अस विचार करून मी सरळ बॅग हातात घेतली आणि झपाझप पावले टाकत गावातून बाहेर पडलो. तिथून दूर उंचावर गेल्यावर मी पाठी वळलो तर , दिसली झोपडीच्या दरात उभी असलेली डोळ्यात पाण्याची भव्य लाट ओसरती ठेवणारी "हौसा"
मी पुढे मार्गस्थ झालो.. . . . .
भाग - ५ पुढील टप्प्यात
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇