कथा : #गाव_शहर भाग ३ रा
लेखक : #अनुप_देशमाने
#हडळ काय सांगतेस मामी... म्हणत गीता हसू लागली, आग मामे ही हडळ भुते चेटूक वगैरे फक्त पुस्तकात आणि कल्पनेत असतात प्रत्यक्षात काही नसतं, तुम्ही खेड्याकडचे लोक असल्या काहीतरी गोष्टी चा फुगा करत बसता आणि फुटला नाही की मग ओरडत बसता... राग येऊ देऊ नको मामी पण हे सगळं खोट असत...!!
मामी : बरं हे सगळं खोटं आहे कारण अनुभव आल्या शिवाय माणूस सत्य मानत नसतो आणि तुम्ही अनुभव घेऊ सुद्धा नका🙏
गीता : हसत हसत... ये हडळ ये ग माझ्या समोर आपण गप्पा मारुया आणि माझ्या मामीच्या हातचे जेवण जेवूया... किती वर्षे झाले असतील तुझे केस कोणी विंचरलेले नसतील, ये तुझी वेणी फनी करते...😄
मामी ने गीता च्या तोंडावर हात ठेवत म्हणाली, "शांत रहा गीता
मला खूप भीती वाटते, घाम फुटतो मला आणि एवढंच काय मला धाप पण लागते... कावरा बावरा चेहरा करून मामी बोलली
गीता : ok ok बंद हा विषय...
गीताने मोबाईल मधील युट्युब वर हडळ विषयी व्हिडीओ बघितले... गूगल करून हडळ बद्दल माहिती पहात होती, हडळ म्हणजे नेमकं इच्छा नसताना मरण पावलेली स्त्री, आकस्मित मरण पावलेली स्त्री, एखादा बदला घेण्यासाठी आत्मा बनून फिरणारी स्त्री.. असे बरेच काही तिला गुगल वरून माहिती मध्ये मिळत होते... पण तिला काहीच फरक पडत नव्हता ती त्या गोष्टीला मान्य करत नव्हतीच.... ती उठून बाहेर जाण्यास निघाली.. मामा कडे गाडीची चावी मागितली. आणि गाडीवर थाटात बसून फिरायला निघाली...
गावातील लोक आता आपआपल्या कामास निघून गेले होते, चौकात तेवढा एकच रम्या आणि त्याच टमटम उभा असलेले तिला दिसलं...तिने गाडी त्याच्या जवळ घेतली...
गीता : तू रम्या ना...!!
रम्या : व्हय ताईसाहेब म्या रम्या आणि हे माझं डबड तुफान..😊😊
गीता : अरे त्या डबड्याला काय तुफान म्हणतोस तू, त्याच्या पेक्षा बैलगाडी फास्ट चालते 🤣🤣
रम्या पण हसू लागला पण हसत हसत त्याच्या डोळ्यात पाणी आले...😢😢
गीता : हे मॅन कुल कुल.. मी चेष्टा केली रे तुझी..!!
रम्या : नाय ताईसाहेब तुमचं काय बी खोटं नाय बघा, माझं हे डबड च आहे पण ते आता झालं आहे, पूर्वी ह्यानेच माझ्या घराला वर आणले आणि दुसरं नवीन वाहण घेणार होतो पण बापाच्या आजारपनात जेवढं पैसे कमवले तेवढं सगळे संपले...बाप काय वाचला नाय पण मला ह्या अवस्थेत सोडून गेला...😢😢
गीता : घरी कोण कोण असते तुझ्या...!!
रम्या : म्या अन माझी आजी..!
गीता : आई..???
रम्या : ती तर माझ्या बापाच्या आधी गेली सोडून मला...😢
गीता : सो स्याड... रमेश सॉरी माझ्या मुळं तुला मामा रागावले, आणि तुझ्या मित्राला अमर ला...!!
रम्या : मला त्या गोष्टीच काय वावग नाय वाटलं ताईसाहेब पर अमर ला कोणी बोललं तर मला नाय आवडत ते..😏😏
गीता : ok सॉरी पुन्हा एकदा, तुझा मित्र अमर ला पण बोलते सॉरी पण तो कुठे भेटेल ह्या वेळी मला...!!
गीता ला तिच्या चुकी बद्दल खंत वाटत होती, आपण आलोच आहोत येथे काही दिवसासाठी आणि आपण काय करतोय हे तिच्या लक्षात आले होते...
रम्या : ताई साहेब तो आता शेतात गेला असेल...!!
गीता : बस गाडीवर आपण जाऊ त्याच्या शेतात...!!
रम्या आ वासून 😳 : आव ताईसाहेब तुमच्या गाडीवर कसा बसू म्या..!
गीता : अरे मला बहीण माणतोस ना तू मग बस गुपचूप आणि दाखव त्याचे शेत...👍
रम्या मध्ये अंतर ठेवून गाडीवर बसला आणि गीता ला अमर च्या शेतात घेऊन जाऊ लागला... काहीवेळेतच ते दोघे अमर च्या शेतात पोहचले...अमर उसाला पाणी देत होता, अंगात बरमुडा बनियन आणि डोक्याला टॉवेल लावलेला अमर भारदस्त शेतकरी दिसत होता...गीता काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली...!!
रम्या : ये अम्या ये अम्या हिकडं ये कोण आलं आहे बघ....!!
अमर : कोण हाय र , ती शहरवाली येडी आली हाय का☺️☺️
रम्या : आय लका असलं वाईट साईट नग बोलू लका ये की हिकडं...
अमर हातातील काम टाकून त्यांच्या कडे येऊ लागला....
""रानडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा, वेडा पिसा छंद असा लागला... तुझ्यात जीव रंगला..."" हे गाणे गीता च्या मनात तरंगू लागले😍😍
अमर : काय र रम्या हिला कशाला हिकडं घेऊन आलास...🙄
गीता : माझं नाव गीता आहे म्हणत ती त्याच्या पुढे हात करते...
पण अमर नमस्कार करून : बोल काय काम काढलं माझ्याकडे...!!
गीता : अरे मी तुझी माफी मागण्यास आले आहे... मला माफ कर माझ्यामुळे तुला त्रास झाला... आणि माझे मामा तुला रागावले..!!
अमर : बरं बरं मागितली माफी, मी माफ केलं आता मी माझं करू का...!!
गीता : अरे एवढं अकडून का बोलतोस तू मी खरचं माफी मागायला आलेले... जाऊ दे जाते मी
रम्या : अररर अम्या असला कसला र तू... बोल की नीट दोन दिसा साठी तर आलीय लका...!!
अमर : काय नीट बोलू मला काम पडली आहेती... ती करू दे आधी मग बघू...!!
गीता : मला काल रात्री एक भयानक आकृती दिसली होती ते सांगायचं राहील माझं...!!
रम्या आणि अमर आता तिच्या कडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले....
अमर : म्हणजे नेमकं काय बघितलं तू..!!
गीता : मी रात्री पाणी पिण्यास उठले आणि बघितले तर एक लाल साडी वाली बाई... पळत होती आणि तिच्या माघे गावातील कुत्रे भुंकत पळत होते...मी नीट बघावे म्हणून थोडं पुढं जाऊन पाहिलं असता... ती स्त्री पळत पळत माझ्या कडे वळून बघत होती, तिच्या चेहऱ्यावर रक्ताळलेले काहीतरी दिसत होते.... पण अचानक ती गायब झाली, मी घाबरून माझ्या रूम मध्ये जाऊन झोपले....(काहीतरी खोटा विषय काढून गीता अमर ला बोलके करत होती आणि ती यशस्वी झाली होती..)
रम्या : ये ताईसाहेब ती बाई नाय ती एक हडळ होती म्हण, ती परत आली हाय आपल्या गावात...तुला नाय माहिती..तू नवीन हाय ह्या गावात...!!
गीता : काहीही मी नाही विश्वास ठेवत असल्या गोष्टींवर... हडळ वगैरे नसते...!!
अमर मधेच तिला थांबवत..: माझा पण नव्हता विश्वास पण आता बसला हाय, तीच वार ह्या गावात आले आहे...!!
गीता उत्सुक होऊन : व्वा म्हणजे मी नशीबवान आहे तर कारण ती नशीबवान माणसाला दिसते आणि आज तर मी तिचा पदराचा तुकडा कापून ठेवणार आहे....म्हणजे मी म्हणेन तस ती वागेन...!!
अमर परत तिला थांबवत : रम्या हिला घेऊन जा हिच्या डोक्यात भुसा भरला हाय....घेऊन जा लवकर तिला येथून....
रम्या तिला घेऊन जाण्यास निघाला असता....
गीता : ये अमर आईक ना...!!
अमर : काय आता...🙄🙄
गीता : तू चिडल्यावर खूप गोड दिसतो रे..!!
अमर : जा लवकर नायतर हडळ येईल तुझ्या कडे...!!
रम्या आणि गीता तेथून निघून गेले..... गीता घरी आली फ्रेश झाली आणि झोपाळ्यावर येऊन बसली... तिच्या डोक्यात एक कल्पना आली , ती आज रात्री लाल साडी घालून गावात फिरणार आहे असे तिने ठरवले होते... तिने मामी ला हाक मारली...
मामी ये मामी... हिकडे ये ग!!
मामी : आले आले... बोला गीता काय काम, आलात पण तुम्ही बाहेर जाऊन...!!
गीता : हो आले...तू आधी माझ्याजवळ बस आणि सांग तुझ्या कडे लाल कलर ची साडी आहे का ग...??
मामी : हो भरपूर आहेत पण तुम्हाला का हवीय साडी..!!
गीता : आग मला घालू वाटत आहे, काहीतरी शिकते ना गावी आल्यानंतर म्हणून...!!
मामी : बरं ठीक आहे कोणती आवडेल ती घ्या आणि मला नेसवून दाखवा आधी....☺️☺️
गीता : हो पण आता नाही नेसणार मी..नंतर नेसल्यावर दाखवते...!!
गीता मनातून खुप हसत होती... ती आपल्या व्हाट्सएप कॉलेज फ्रेंड ग्रुप मध्ये हा प्रकार सांगत होती सगळे तिच्या ह्या प्रकाराबद्दल हसत होते... सर्वांनी तिला बेस्टलक पण दिले....
कधी एकदा रात्र होते आणि हा प्रयोग मी करते असे गीता ला झाले होते... गालातल्या गालात ती हसत होती...!!
एव्हाना दिवे लागणीची वेळ झाली होती... मामी स्वैपाक बनवत होती.. मामा गावातील लोकांसोबत गप्पा मारत बसले होते, गीता आपलं मोबाईल वर टाईमपास करत बसली होती... थोड्यावेळाने मामी ने जेवायला या म्हणत हाक दिली... तशी गीता आणि मामा जेवायला आले...
मामा : मग गीता कसे वाटले गाव आपले...!!
गीता : एकदम झक्कास..!!
मामा : अररर तिच्या तू तरी गावठी बोलू लागली लगेच..!!😄😄
गीता : व्हय व्हय म्या ह्या गावचीच हाय म्हणल्यावर गावठी यावं लागेल मला..!!
मामा आणि मामी जोरजोरात हसू लागले... गीता पण हसू लागली, सर्वांनी जेवण केले... गीता मामी ची लाल साडी घेऊन रूम मध्ये गेली... दार लावून घेतले, युट्युब वरून साडी घाकण्याचे प्रयोग तिने केले... खूप प्रयत्नानंतर तिला साडी नेसता आली... ती आरशा समोर उभी राहून स्वतःकडे पाहू लागली...आणि जोरात हसली आणि म्हणली एवढ्या क्युट हडळीला कोणीच घाबरणार नाही म्हणत तिने आपले केस मोकळे सोडले... लिपस्टिक ने तोंड लाल केले... काजळ ने कपाळावर नक्षी काढली... ओठ काजळणे काळे केले.. आणि अरशाकडे बघू लागली... प्रथमच ती स्वतःला अरशाकडे बघून घाबरली... आणि हसली.. म्हणली, " आता खरी मजा येणार मी आधी रम्याला घाबरवणार आणि नंतर अमर ला.." म्हणत थोडी अजून रात्र होण्याची वाट बघू लागली... रात्रीचे 11 वाजले होते...!! ती आता 12 ते 12 30 वाजण्याची वाट बघू लागली...!!
क्रमशः
#गाव_शहर भाग ३ रा