कथा : #गाव_शहर भाग २ रा
लेखक : #अनुप_देशमाने
(सदरहू कथा की प्रेम आणि भयकथा आहे वाचकांनी नोंद घ्यावी)
वेळ रात्रीची... जेवणाचे तयारी झाली होती सर्वाना जेवणासाठी हाक मारण्यास वहिनी बाहेर आली, गीता आणि सरपंच बाहेर व्हरांड्यात बोलत बसले होते..
वहिनी : चला पान वाढले आहे या जेवायला...!!
सगळे फ्रेश होऊन स्वैपाक घरात गेले जेवायला...जेवायला आज वांग्याचं भरीत, बाजरी ची भाकरी, लोणचं आणि कांदा ... गीता ला तर खूप आवडल जेवण, ती जेवणात गुंग झाली होती तेवढ्यात नाम्या सरपंच सरपंच म्हणून जोरजोरात हाक मारू लागला...
सरपंच भरल्या हाताने उठून : काय र नाम्या काय झालं एवढा ओरडत आहेस तू...
नाम्या बोबडी वळल्या सारख : सरपंच ती बया परत आली हाय वाटत, गावाच्या मधोमध येऊन बसली हाय... मला तर लय भीती वाटत हाय अन म्या आज काय शेतात दूध काढायला जाणार नाय म्हणत नाम्या भिऊ लागला....
सरपंच : बरं तू बस म्या जेवण करून आलो...!
हा सर्व प्रकार गीता आणि वहिनी ऐकत होत्या.... सरपंच घरात आले... गीता ने त्यांना हटकले..!
गीता : मामा... काय झालं रे...!!
सरपंच : गीता तू जेवण कर पोरे ...!!
गीता ने एक नजर वहिनी कडे टाकली, वहिनी ने तिला डोळ्याने खुणावुन गप बसायला सांगितले, तसे गीता शांत बसून जेवू लागली, सरपंच पटापट जेवले आणि कपडे घालून बाहेर पडले.. बाहेर पडताना सांगून गेले की दार उघडू ठेवू नकोस.... नाम्या आणि सरपंच गावातील चौकात जायला निघाले....!
गीता : मामी कोण आली आहे ग गावात..!!
वहिनी : आहो कोणी नाही तूम्ही जेवण करा, तुम्हाला भात देऊ का अजून...!!
गीता : नको माझं फुल झालं जेवण, पण सांग ना कोण आहे ती...!!
वहिनी : सांगते पण मी सांगितले आहे असे कोणाला सांगू नका नाहीतर तुमचे मामा मला रागावतील...!!
गीता : नाही सांगत तू सांग मला..!!
वहिनी : अहो ती एक बाई आहे जेव्हा गावावर संकट येईल तेव्हा ती गावात येऊन बसते.. संकट गेल्यावर जाते ..!!
गीता : हसत हसत.. काय जोक आहे असं कुठे तरी असते का मला आवडेल तिला बघायला..!!
वहिनी : नका जाऊ तुम्ही बाहेर, मामा रागावतील तुम्हाला..!!
गीता : नाही रागवत मला मामा मला.. तू मला दुसरा रस्ता सांग मी तिकडून जाते...!!
वहिनीने तिला रस्ता सांगितला पण तो रस्ता अमर च्या शेतातून होता...वहिनीने गीता ला गाडीची चावी दिली. तशी गीता बाहेर पडली...!!
हिकडे गावातील जुने मंडळी जमा झाले होते... सरपंच आल्या आल्या सगळे थोडे बाजूला सरकले..!
सरपंच : ये म्हातारे तू परत आलीस, तू जेव्हा येतेस तेव्हा माझ्या गावावर संकट येते... आणि ह्याबारीला तुला सोडणार नाय म्या.. तुला पोलीसच्या ताब्यात देणार म्या...
म्हातारी हसत हसत : " अररर मेल्या तुझ्या मूळ तर सगळं होत आहे आणि आता तर तुझ्या मुळेच होणार हाय आणि तुझ्या डोळ्या देखत होणार हाय.."
सरपंच : काय बी वंगाळ बोलू नकोस..म्या ह्या गावचा सरपंच आहे आणि म्या माझ्या गावावर कसलेही संकट येऊ देणार नाय..!!
म्हातारी : "तू स्वतःवर संकट ओढवून घेतले आहे.. तुझ्या घरात अवदासेने प्रवेश केला हाय, आज पासून तुझे दिवस मोजायचे सुरू झाले..."
सरपंच आणि म्हातारी चे सर्व संभाषण गीता हळूच एका ठिकाणी उभी राहून सिगरेट ओढत ओढत ऐकत होती... तिला त्या म्हातारी बद्दल कुतुहुल वाटू लागले... आणि भीती ही, तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हाथ ठेवला असे तिला जाणवले आणि ती घाबरून ओरडली...तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळे जण त्या दिशेने बघू लागले, तिथे गीता आणि अमर होते.. सरपंच पळत तिथे गेले,
सरपंच : काय ग गीता हिकडे काय करत आहेस...??
गीता घाबरत : काही नाही जेवण झाल्यावर फिरायला आले होते गाडीवर...!!
सरपंच : मग ओरडली कशामुळे..??
गीता : हा अमर माघून आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला म्हणून घाबरून ओरडली..!!
सरपंच : अम्या बेट्या तुला सकाळीच सांगीतले हाय ना, हिच्या नादाला नग लागू म्हणून...सरपंच डोळे लाल करून बोलू लागला
अमर : ओ पाटील हा माझ्या शेतात जायचा रस्ता हाय, जाताना ही पोरगी हिथे सिगरेट ओढत असताना दिसली म्हणून हिला सांगायला आलो होतो... मला काय करायचं हाय हिच्या नादी लागून अन ती म्हातारी काय म्हणते जरा तिच्या कड लक्ष द्या म्या चाललो शेतात... म्हणत अमर शेताकडे निघाला..!
सरपंच आणि गीता परत त्या म्हातारी कडे आले..!!
म्हातारी : ह्या पोरीला गावाच्या बाहेर हाकला नायतर सगळं वाटूळ होणार तुमचं म्हणत म्हातारी हसू लागली..!!
सरपंच : आग ये म्हातारे काय ते नीट सांग...!!
म्हातारी : हसत हसत गप बसली आणि शेजारील चिंचेच्या झाडाकडे बघू लागली....
सरपंच गावातील सर्वाना आपल्या आपल्या घरी जाण्यास सांगू लागले आणि स्वतः गीता ला घेऊन घरी गेले...!! घरी आल्यावर त्यांनी गीता ला झोपण्यास सांगितले आणि वहिनी ला तिच्या सोबत झोपण्यास सांगितले...सरपंच ला घाम फुटला होता, तो अंगणात हिकडे तिकडे चकरा मारू लागला होता... मध्येच थांबून तो घाम पुसत होता आणि डोक्याला हाथ लावत होता...नाम्या हे सर्व बघत होता पण काही बोलत नव्हता...!!
सरपंच ने अचानक पायात चप्पल घातली आणि नाम्या ला घेऊन परत त्या म्हातारी कडे गेला...
सरपंच : म्हातारे ये म्हातारे उठ मी आलोय...!! म्हातारी हाक मारत सरपंच हिकडे तिकडे बघत होता..!
म्हातारी : आलास व्हय तू... गावाच्या समोर लय मोठा वाघ झाला होतास तू अन आता मांजर बनून आलास व्हय..! आणि म्हातारी हसू लागली..!
सरपंच : आता कोण आलंय सांग म्हातारे...पाहिजे ते तुला देईन फक्त सांग...!!
म्हातारी : चिंचेच्या झाडाकडे बघून "सगुणा आलीय सगुणा" आणि तुझ मरण अटळ आहे आता... भोग तुझ्या मरणाचे फळ आता...
सगुणाच नाव ऐकताच सरपंच माघे सरकला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली, डोळ्यासमोर अंधारी आली.. कसाबसा सावरत सरपंच ने जवळील एक मोठा दगड उचलला आणि तडक म्हातारीच्या डोक्यात घातला.. एका फटक्यात सरपंच ने म्हातारीचा जीव घेतला होता पण शंका नको म्हणून त्याने परत तो दगड उचलून तिच्या छातीत घातला.. म्हातारीच्या शरीराने कधीच जीव सोडला होता, नाम्या ला इशारा करताच नाम्याने तिचा मृतदेह उचलून गावाबाहेर नेहुन पुरून आला ... नाम्या आणि सरपंच घरी न जाता शेतात गेले, सरपंच चे शेत हे अमर च्या शेता जवळ होते, एवढ्या रात्री सरपंच च्या शेतातील घरात लाईट कशी चालू त्यामुळे अमर बुचकळ्यात पडला, चोर पावलांनी तो घरा जवळ गेला आणि हळूच बघू लागला... तर आत मध्ये सरपंच आपले सगळे कपडे काढून एका पाटीत जाळत होता, त्याच्या सोबत नाम्या पण होता... शेतातील घरातले दुसरे कपडे घालून सरपंच परत घराकडे निघाला..अमर तिथेच खाली बसून राहिला... सरपंच आणि नाम्या रपारपा चालत लाम्ब निघून गेले... अमर सरपंच च्या शेतातील घरात येऊन बघू लागला... पण त्याला जळणाऱ्या कपड्याशिवाय बाकी काही दिसले नाही.. त्याने तो विषय तिथेच थांबवून आपल्या शेतात जाऊन झोपला...हिकडे गीता त्या म्हातारीच्या विचारात जागी होती, त्या म्हातारीचा एक एक शब्दवर ती विचार करू लागली होती...अवदसा, वाटूळ होणार... गीताला हा विषय खूप आवडला होता, त्यामुळे ती ह्या विचारात झोपी गेली...!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◇
सकाळी गावात एकच चर्चा म्हातारी कुठं गायब झाली, सगळा गाव गोळा झाला.... अमर ला थोडं विचित्र वाटले, पण तो काही बोलला नाही... तो त्या गर्दीत नाम्या ला शोधत होता, नाम्या एका ठिकानी उभा राहून तंबाखू मळत होता, त्याच्या चेहऱ्यावरील हाव भाव थोडे बदलले होते... तीच संधी साधत अमर जोरात ओरडला..
अमर : मला माहिती आहे म्हातारी कुठ हाय ते..??
सगळं गाव अमर कडे कुतूहलाने बघू लागले...
नाम्या : सांग मंग आपण तिला हुडकून आणू..!!
अमर : नामदेवराव काल तर तुम्हाला रात्री बघितले मी तिच्याशी बोलताना... तुम्हीच लपवली हाय तिला म्हणत अमर हसू लागला...!!
नाम्या : आय भिताडा तुझ्या तोंडाला आवर नायतर तुझं नाव सरपंच ला सांगेन म्या..!! नाम्या रागाने अमर कडे बघू लागला, पण तो तसाच सरपंच कडे पळत सुटला...!! नाम्या पळत सरपंच च्या वाड्यावर आला..
सरपंच : काय र नाम्या काय झालं आता..??
नाम्या : सरपंच ती म्हातारी गायब झाली हाय आणि त्या अमर ने माझ्यावर संशय घेतला हाय... सगळ गाव माझ्याकडे आरोपीच्या नजरेने बघत हाय... म्हणत नाम्या मुळू मुळू रडू लागला..
सरपंच त्याला शांत करत , तू काय केलं नाय तर तू कशाला घाबरतोस मर्दा... म्हणत त्याला धीर देत होता... हे सर्व गीता वरून बघत होती...
काहीतरी नक्कीच आहे ह्या गावात अघटित, अपरिचित, अदृश्य, असह्य, विद्रुप असे पण आपल्याला ह्या सर्वांची माहिती कोणाकडून मिळेल हिचा ती विचार करू लागली....
वहिनी : गीता तुम्ही जास्त विचार करू नका, ह्या गावावर श्राप च आहे तसा दर वर्षी कोणाचाना कोणाचा तरी असा मृत्यू होतो आणि त्याचा क्षडा लागत नाही....
गीता : मामी मला काही माहिती हवी आहे ती देशील का, तुझ्या गावासाठी उपयोगी पडेल....
वहिनी : हो सांगेन पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे...
गीता : काय आहे असे जे विश्वास ठेवला नाही जाणार...
वहिनी : #हडळ ...............!!
क्रमशः

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆