कथा : #गाव_शहर भाग ४ था
लेखक : #अनुप_देशमाने
झालं ठरल्याप्रमाणे गीता हकुच मांजर पावलांनी घरा बाहेर पडली... दरवाज्यातून डोकावून पाहत तिने बाहेरील परिस्थितीचा आढावा घेतला, बाहेर कोणीही नव्हते सर्वत्र अंधार आणि शांतता होती... गावातील रस्त्यातील खांबवरील लाईट दिवे बंद चालू होतं होते, कुत्रे भुंकण्याचा आवाज अधून मधून येत होता, रात्रीच्या भयाण शांततेला भंग करणाऱ्या रातकिड्याचा आवाज आता स्पष्ट येत होता, गीता घाबरण्यातील नव्हती... तिने केस मोकळे सोडले आणि पदर लाम्ब करून एका हातावर घेऊन चालू लागली...चालत असताना ती हिकडे तिकडे बघू लागली.. हळू हळू ती आता गावातील चौकात पोहचली होती... आता ती रम्याच्या घराकडे जाणार इतक्यात तिला पाठीमागून आवाज आला...!!
"ये पोरे एवढ्या रात्रीला कुठं फिरतेस ग हिकडं, येथे सगळी भुत रहातात तू तुझ्या घरी जा..."
गीता ने माघे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हते, तिने हाक मारली, "कोण आहे..!!"
इतक्यात अंधारातून एक वृद्ध म्हातारी बाहेर आली, ती कमरेत थोडी वाकली होती..हातात काठी होती... एक हात कमरेवर ठेवून ती गीता कडे बघू लागली....
गीता : "आय म्हातारे म्या हडळ हाय, मी कधी केव्हा कुठं फिरायचं हे माझ्या मी ठरवेल तू नग सांगू मला...""
म्हातारी : हसत हसत "हडळ असली तरी काय झालं तू घरी जा येथे भुत रहातात ..."
गीता थोडी अचंबित होऊन : "कसली भुत येथे फक्त म्या भुत आहे अन म्या आज माझं भक्ष्य निवडल हाय तू गप गुमान तुझ्या घरी जा..."
आता म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज येऊ लागले, तिच्या हातातील काठी खाली पडली... वाकलेली कम्बर पुन्हा ताठ झाली, केस मोठे होऊन गळ्यात रेंगाळू लागली... नाक पुढं आले... खाली नजर ठेवून ती मोठ्याने बोलली... "आता घरी जातेस का की तुला आधी येथे गाढु...."
गीता तिच्या त्या विद्रुप रूपा कडे बघू लागली...थोडी घाबरत का होईना तिने हळूच मोबाईल काढला आणि त्या अमानवी रूपाचा फोटो काढू लागली... मोबाईल चा फ्लॅश पडताच सर्वत्र उजेड झाला आणि ती म्हातारी गायब झाली... गीता खूप घाबरली तिला घाम फुटला.. ती दबक्या पावलाने का होईना रम्या कडे जाऊ लागली... रम्याच्या घराजवळ जाताच तिला दिसले की रम्या बाहेर झोपला आहे.... तिने त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवले...
गीता : ये रम्या .... ये रम्या उठ लवकर...!!
रम्या : कोनय रे एवढ्या रातच्याला, जा बरं तुझ्या तुझ्या घरी...?? रम्या झोपेतच बोलला
गीता : अरे येईईई वेड्या उठ ना मी आहे....!!
गीता ने त्याला जोरात धक्का दिला त्यामुळे रम्या जागा झाला... त्याने गीता कडे पाहताच..... भु भु भु भो भो भो भी भी भी करत दातखिळी बसली....डोळे पांढरे करून तो तसाच बसला.... गीताने शेजारी असलेल्या भांड्यातून पाणी घेऊन रम्याच्या तोंडावर मारले... रम्या ताडकन जागा झला...
रम्या : हडळ हडळ हडळ हडळ वाचवा वाचवा मेलो मेलो... जय हनुमान ज्ञान गुणसागर.... बोबडी वळली होती रम्याची
गीता : अरे बाबा मी गीता आहे नीट बघ माझ्याकडे...😢😢
रम्या : बबोव गीता ला झपाटले रे हडळणे.... अम्याव अम्याव करत रम्या तेथून पळत सुटला...त्याच्या माघे गीता पळत होती आणी रम्या पुढे...!!
रम्याच्या आवाजाने अमर पण उठून बाहेर आला त्याच्या बरोबर त्याची आई पण बाहेर आली.... रम्या माघे गीताकडे बोट दाखवत "हडळ हडळ आलीय...!!"
लांबून गीता पळत येत होती पण अंधारात अस्पष्ट दिसणारी गीता तिच्या वेशभूषेत एक विचित्र अमानवी दिसत होती... तिला लांबून बघताच अमर च्या आईला चक्कर आली आणि ती तिथेच कोसळली... अमर आणि रम्या एकमेकांच्या जवळ उभे राहून थरथर कापू लागले.... एवढ्यात गीता त्यांच्या जवळ पोहचली...धाप लागत लागत गीता बोलली...."अमर पाणी दे रे मला भीती वाटत आहे...!!"
रम्या : आयुव अम्या ही हडळ तर गीताच्या आवाजात बोलत हाय र....!!
पण अमर ला खात्री पटली की ही हडळ नसून गीता आहे... अमर तिच्या जवळ गेला, कपाळावरील तिचे बाजूला सारत गीता कडे बघून हसला....🤣🤣
अमर : काय ग गीता असल्या भानगडी कशाला करतेस ग..घाबरलाव की आम्ही...!!😊😊
रम्या : "आय आय म्या नाय तूच घाबरला हाय...!!"
गीता : आधी काकूंना उचलून आत घरी घेऊन जाऊया चला...!!
सर्वांनी अमर च्या आईला घेऊन घरात आणले आणि झोपवले..
गीता : अमर अरे मी हे सर्व तुम्हा दोघांना भीती घालण्यासाठी केले होते पण तेवढ्यात... ती म्हातारी नाय नाय ती म्हातारी नाय खूप मोठी तगडी बाई जीची नजर तिच्या पायापाशी होती... ती गुरकत मला घरी जाण्यास सांगत होती, मग मी माझ्या मोबाईल मधून तिचा फोटो काढला पण माझ्या मोबाईल चा फ्लॅश पडताच ती गायब झाली आणि मी घाबरली रे खूप...😢😢
अमर : बघू कुठंय फोटो..??
गीताने तिचा मोबाईल मध्ये काढलेला फोटो बघितला तर सर्वजण चकित झाले... कारण त्या फोटो मध्ये तीच म्हातारी होती जी गावातून गायब झाली होती...
गीता : अरे हिचा फोटो कसकाय माझ्या मोबाईल मध्ये, ही नव्हती रे ती...??
अमर : व्हय ती ही नव्हतीच पण तिच्या रुपात ती आली होती..!!
गीता : ती म्हणजे कोण रे..!!
अमर : तीच #हडळ...!!
रम्या : म्हणजे अमर आता ह्याबारीला पण गावात रक्ताचा सडा पडणार तर...!!
अमर : आपण आता नाय होऊ देयचा ते....
गीता : एक मिनिट.... मला सांगाल का नेमकं काय ते..!!
रम्या : आव ताई साहेब आधी तुमचं तोंड धुवा बरं कारण मला अजून बी भीती वाटत हाय...!!
अमर : आता दिस भर झोप अन रातच्याला जागरण हेच आपलं ध्येय...बोला कोण कोण साथ देणार मला..!!
रम्या आणि गीता ने अमरच्या हातावर हाथ ठेवला..रम्या आणि अमर गीता सोडवयास तिच्या घराकडे गेले...
अमर : घरात जाऊन आधी तो अवतार बदल नायतर ती परत येईल...🤣
सगळे हसू लागले नंतर अमर आणि रम्या आपआपल्या घरी निघून गेले... गीता तिच्या रूम मध्ये येऊन आपला चेहरा धुतला... केस विंचरून व्यवस्थित केले...झोपण्यासाठी पलंग कडे गेली पण कसला तरी आवाज आला म्हणून तिने माघे पाहिले.... कोणीच नव्हते ती घाबरली, घाबरत घाबरत तिने आरशाकडे बघितले आणि डोळेच पांढरे केले कारण तिने आताच चेहरा धुतला होता तरी तिचे कपाळ लाल कुंकूने माखलेले दिसले... ती तडक पळत मामी कडे गेली, मामी मामी करत ती मामीला उठवू लागली.. मामा आणि मामी दोघे ही उठले... काय झालं गीता का रडत आहेस तू म्हणत मामा ने तिला विचारले...
गीता आपल्या कपळाकडे बोट दाखवत रडू लागली...
मामा : काय झाले गीता पडली का तू झोपेत, कपाळाला लागलं आहे का तुझ्या...
गीताने रडतच मान नकारार्थी हलवली...!!
मामीने गीता ला मिठी मारली, तिला आपल्या जवळ झोपण्यास सांगितले तशी गीता ही मामी जवळ जाऊन झोपली....रात्रीचे 3 वाजत आले होते... सगळे गाढ झोपले होते तेवढ्यात गीता झोपेतच...." तुला काय वाटत मला काय कळत नाय, तू गेलास आता , तयार रहा तू तुझी तिरडी तयार करून ठेवली हाय, तुला त्यावर झोपवल्या बगैर मला मुक्ती नाय..." आणि गीता झोपेतच जोरजोरात विद्रुपी हसू लागली...!! तिचे झोपेतील बडबड सगळी मामी आणि मामा ने ऐकली... आणि त्यांची बोबडीच बंद झाली....!!
क्रमशः
#गाव_शहर भाग ४ था
#अनुप_देशमाने
(हा भाग येथेच थांबवत आहे कारण पुढील भागात काही गोष्टींचा उलगडा होणार आहे )