कथा :- नत्तूरी
लेखक :- चेतन साळकर
भाग :- १
Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
लेखक :- चेतन साळकर
भाग :- १
Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
नमस्कार ,
"कोरोना" सारख्या महामारितून आपण लवकरच मुक्त होणार आहोत.भारताने सदा कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याचे तंत्र जणू आत्मसात केले आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क रहा. घरात रहा.
कसे आहात सगळे घाबरताय ना ?
घाबरायलाच पाहिजे कारण मी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक नवीन भयकथा.
घाबरायलाच पाहिजे कारण मी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक नवीन भयकथा.
माझ्या मागच्या "Ascetic" कथेला तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद लाभला , त्याबद्दल मी ऋणी आहे. तुम्ही सर्व वाचक सुज्ञ आहात. प्रत्येक कथेतले बारकावे , उतार-चढाव तुम्ही प्रकर्षाने पाहता. मग अशा उन्मत्त वाचकासाठी लेखकाला देखील उन्नत व्हावं लागतं.
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
ही कथा देखील पूर्णतः काल्पनिक असून त्याचा जिवीत अथवा मृत व्यक्ती किंवा वस्तूशी तीळमात्रही संबंध नसेल, जर योगायोगाने तसा संबंध आढळला तर तो निव्वळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून घ्यावा ही नम्र विनंती.
लेखकाची भेट शेवटच्या महाअंतिम भागात.
तोपर्यंत धन्यवाद 🙏
तोपर्यंत धन्यवाद 🙏
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
( कथे सोबत असलेला व्हिडिओ देखील जरूर पहावा )
खरतर आयुष्य जगता जगता एखाद्या वळणावर असे काही अनुभव यावेत आणि मैलोमैल आयुष्य चालून निमिषात मरणाचं ताट हातात घेऊन साक्षात यमदेव समोर उभे ठाकावे, असं माझ्या बाबतीत घडलं.
"उगीच ते पत्र हातात घेतलं" अस नंतर मला वाटू लागलं. . . . . .
"उगीच ते पत्र हातात घेतलं" अस नंतर मला वाटू लागलं. . . . . .
वेळ - दुपारी 4.30
स्थान - पर्यावरण समीक्षण कार्यालयचे ऑफिस
स्थान - पर्यावरण समीक्षण कार्यालयचे ऑफिस
चहा घेऊन जरा टेबल वर पडतो ना पडतो तोच वॉचमन आत आला आणि म्हणाला ,
वॉचमन - साहेब , हे पत्र मोठ्या साहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितले.
मी - कुठे आहेत साहेब ?
वॉचमन - बाहेरून गेट वरूनच गाडीतून माझ्याकडे देऊन ते गेले.
मी - का ? आम्ही काय डसतो का अंगाला ? लांबून लांबून जायचं ? साहेब कसले साले !
मी चिडूनच मोठ्याने म्हणालो. वॉचमन एक नाही की दोन नाही. त्याने ते पत्र सरळ माझ्या नजरेसमोर ठेवले आणि तो निघून गेला. मी ते पत्र हातात घेतलं आणि वाचू लागलो. वाचता वाचता सपशेल हादरलो कारण त्यात होत माझ्या भविष्याच मोजमाप. माणूस एकदा का जाणता झाला की त्याची दोर इतरांच्या ताब्यात जायला ही वेळ लागत नाही. शरीर आपलं , मन आपलं , निर्णय घेण्याचा अधिकार आपला पण ते सगळं मातीमोल ठरत ,जेव्हा आपली बदली केली जाते परस्पर. क्षणात निर्णय घेण्याच्या अधिकारावर बड्या साहेबांची ऑर्डर स्वरूप भरणी टाकली जाते आणि बिनधास्त पणे न जुमानता केले जातात आपल्या आयुष्याचे निर्णय. झाली तशीच माझी ही बदली केली. शेवटची ओळ वाचताना अंगात रवीज्वाला भडकत होत्या. . .
"MR. Ramsing, we are happily transfer you to Gadchiroli at thatari village. I hope Within two days you will take your new place, thank you"
ह्या... "मिस्टर रामसिंग" म्हणे , ह्यांचं काम असल की बर मान देतात. नाहीतर इतर वेळी नुसतं रामसिंग. सगळ्या साहेब लोकांना झाडाला बांधून चोपला पाहिजे. करून करून बदली कुठे केलीय तर "गडचिरोली". तिथल्या कुठल्या "ठातरी" गावात म्हणे. स्वतःशीच पुटपुटत मी तो कागद अक्षरशः चोळामोळा करून कचरा कुंडीत फेकला. मग काय ऑर्डर म्हणजे ऑर्डर अश्या सुत्रा प्रमाणे निघालो "गडचिरोली - ठातरी गावात."
एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी निघालो. ठातरी गाव हे गडचिरोली बस स्थानकापासून पाऊण तासाच्या अंतरावर आहे. स्थानकापासून २८ किलोमीटर अंतर आहे. एसटी मध्ये बसलेलो असताना मी संपूर्ण माहिती काढत होतो तेव्हा मला कळले की, मी जिथे जात आहे तिथल्या परिसरात आणि डोंगराळ भागात "गोंडी" जमातीच्या आदिवासी जमातींची वस्ती आहे. दुर्गम डोंगराळ भागात असणाऱ्या त्या आदिवासींची संस्कृती जवळून पाहायला मिळणार होती. उन्हं करपायला लागली होती. डोक्यावर आली की गरम घागर फुटल्यासारखी घामाची धार लागे. एकतर गडचिरोली ह्या भागात काही ठिकाणीच जंगल आहेत नाहीतर केवळ उजाड मोकळी माळरानं पसरली आहेत डोंगरांना आडोसा देत.माझी बदली झाली ती डोंगर परिसरातील त्या गावात. उन्हाळ्याचे दिवस होते. मला गावात जाईपर्यंत संध्याकाळ झाली. गाव इतका सामसूम की कोणाचा खून झाला तरी इकडचं तिकडे कळणार नाही. मला पहिल्यांदा कळेना , ह्या अश्या भकास गावात कसे दिवस काढणार ? मी एसटी मधून खाली उतरलो आणि समोरच मळकट, धुरात बोर्ड होता "ठातरी" म्हणून.
हळूहळू काळया सावल्या गावाला वेढायला लागल्या होत्या. पानांची हालचाल नैसर्गिक ही होत नव्हती, दूर दूर डोंगराळ भागात एक चिटपाखरू ही दिसत नव्हते, लागूनच असलेल्या ओढा संथ झाला होता, सड्यावरील गावात सांजेला शीतल होऊन हळूहळू डुलत होते, गावातील पाण्याची विहीर कधीची शांत झाली होती , डोंगरा आड सूर्य कधीच झोपला होता. त्या गावच्या वेशिवरून ती दृश्य पाहिली आणि गावात घुसलो. तिथून जवळजवळ वीस मिनिटांच्या अंतरावर जंगलातून, खाचखळग्यातून , काटाकुट्यातून , नदी ओढ्यातून, पानवेलींतून वाट काढत काढत मी जात असतानाच जोरात किंकळण्याचा आवाज आला. मला पहिल्यांदा कळेना काय प्रकार ? म्हणून दुर्लक्ष करून मी आल्या वाटेने चालत सुटलो. पुन्हा जोरात कींकळण्याचा आवाज आला. तेव्हा मात्र मला कळेना आणि राहवेना. मी आवाजाच्या दिशेने धावत सुटलो .एक खांद्याला एक हातात अश्या बॅग घेऊन मी धावत सुटलो. मधेच पडत होतो , मधेच आपटत होतो, अंग सोलपटून निघत होतं , प्रचंड आच्छादन असलेल्या झाडांना बाजूला सारून मी कसाबसा आवाजाच्या नजिक पोहोचलो आणि समोर प्रकार पाहिला. दुसऱ्याच क्षणी खाली बसलो आणि एका झुडपाच्या मागे लपलो. डोळ्यांना जे दिसलं होतं त्याच्यावर माझा विश्वास बसत होता की नव्हता हेच कळत नव्हतं . समोरच दृष्य अस होतं . . . .
एक तरुण कोवळी, देखणी, काळीकुट्ट पण जबरदस्त सुडौल बांधा असलेली, साधारण तीस वर्षाची मुलगी एका झाडाखाली बसली होती. अंगात घातलेले कपडे ती आदिवासी असल्याची खूण सांगत होते. कंबरेपासून खाली गोल साडी , पोट उघडे आणि छातीच्या भागावर जुनाट, फाटकी चोळी. तिच्यासमोर काळी कांबळ होती त्यावर चार हाडं चौकोनात ठेवली होती. त्यावर कसलीशी पानं ठेवली होती. त्यासमोर ती मोकळ्या केसांसहित उपड्या मांडीवर बसली होती. तिच्या दोन्ही हातात प्रत्येकी एक एक झाडाच्या फांद्या होत्या. त्या फांद्या त्या हाडांवर मारीत ती काहीतरी बोलत मागेपुढे हलत होती. कळायला मार्ग नव्हता तो काय भयानक प्रकार चालू होता. मी पूर्ण घामाने डबडबलेलो होतो. जरा जरी हालचाल केली असती तरी सहज तिला आवाज गेला असता कारण संध्याकाळ होऊन काळोख होत होता. मी स्तब्ध राहिलो. आदिवासी लोकांची मुळात भीतीच जास्त वाटते. त्यांची भयानक परंपरा, त्यांचे देव ह्या सगळ्यात आणि आपल्यात विसंगतता असते म्हणून. मी उठलो आणि विचार केला की, संपूर्ण काळोख पडायच्या आत आपल्या स्थानी जाऊया. मी लगोलग निघालो . पाठीमागच दृष्य बघायची हिम्मत नव्हती पण तरी धाडस करून पाठी वळलो तर जवळ जवळ अटॅक यायची पाळी कारण , ती मुलगी माझ्या दिशेने धावत येत होती. जबरदस्त कळ माझ्या छातीत बसली. मी आहे तसच धावत सुटलो. मनात कितीतरी विचारांची गर्दी जमली. हा काय प्रकार ? ही कोण ? सगळ्या प्रश्नांनी माझ्या छातीत उलथापालथं सुरू केली. जीवाच्या आकांताने धावत होतो. ती माझ्या मागे झुडपांना मागे टाकत , वाट काढत काढत ,हातातील बॅग करकचून आवळून धरून मी धावत होतो. अस करता करता एक जुनाट झोपडी मला दिसली. बऱ्यापैकी कोणीही तिथे नव्हतं ,मी कसलाही विचार ना करता त्यात शिरलो आणि लपून बसलो. झोपडीच्या बाहेर धावताना चे पावलांचे आवाज येत होते. जवळ जवळ आले आणि एकाकी झोपडी जवळ येऊन ते आवाज थांबले.ह्याचा अर्थ ती मुलगी झोपडीच्या बाहेरच येऊन थांबली. माझी पूर्ण चाळण उडाली. घामाने काय सुचत नव्हते. हात थरथरायला लागले. ती मुलगी सरळ झोपडीत शिरली. . . .
आत आल्या आल्या इकडे तिकडे शोधू लागली. मी एका मळकट कापडाच्या आत लपून बसलो होतो. काही सुचेना काय करावे. नंतर तिने हळूहळू कांबळ खुंटीला टांगले. सहजतेने ती त्या झोपडीत वावरू लागली. हातपाय धुतले , चुलीवर तिने जेवण करायला सुरवात केली, मला कळेना, ती इतकी सहज वावरत होती की जणू तिचीच झोपडी होती की काय ? नंतर तिने झोपडीत एक चिमणी प्रज्वलित केली. झोपडीत प्रकाश पसरला. तिच्या एकंदरीत वागणुकीतून सिध्द झाले की , ती तिचीच झोपडी होती. तेव्हा माझी दाणादाण उडाली. आता करावे काय ? बाहेर कसे पडणार ? पडलो तर काय करेल आपल ती ? तरी मी घाबरून एक टोपली उचलली आणि ती डोक्यावर ठेऊन स्वतः ला लपवत बाहेर जाणार इतक्यात तिने आवाज दिला.
( काही शब्द मूळ भाषेत आहेत पण सर्वांना कळावेत म्हणून मराठी भाषा देखील वापरली आहे )
ती - अद ओडी नावा. .
मी - ( मला कळेना ती काय म्हणतेय , त्यांची भाषा मला कळत नव्हती )
ती - मावा ओडी सियाना !
मला काही कळेना तेव्हा तिचं पुढे म्हणाली
ती - न्हाय कळत भासा आमची ! खुळ की तू !
तिने मराठीत म्हटल्यावर मला कळायला लागलं. तिने पुढे म्हटलं
ती - आमची टोपल ठेव ! मगासी का पळाला ? कोण तू ?
मी तिची टोपली ठेवली आणि जाणार इतक्यात तिने थांबवलं. तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला हवीच होती कुठल्याही परिस्थितीत. मी सांगायला जाणार इतक्यात तिने चुलीवरची कोयती उचलली आणि माझ्या अंगावर धावत आली. कोयती माझ्या मानेवर ठेवून मला धक्का देऊन तिने पाडले. दोघेही आम्ही पाठी असलेल्या कपड्यावर पडलो.
मी - मी अधिकारी आहे , माझी बदली या गावात झालीय. मला हे गाव नवीन आहे.
ती - लग्न झालंय का ?
मी - ( मी चमकलो ) नाय !
ती - वरीस किती ?
मी - बत्तीस !
ती उठली आणि चुलीजवळ गेली .बाजूच्या हांड्यातल तांब्याभर पाणी काढलं आणि चुलीत घालून चूल विझवली. नंतर माझ्याकडे बघत चिमणी जवळ गेली. दुसऱ्या क्षणाला तिने चिमणी हाताने विझवली आणि तिसऱ्या क्षणाला निर्वस्त्र होऊन माझ्या बाजूला पडली. . . . . .
त्या संपूर्ण रात्री जे काय झालं ते शारीरिक च नाही तर मानसिक ही बाबतीत हेलावून टाकणार होतं. . . . . . .
भाग - २ पुढील टप्प्यात
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://marathighoststories.blogspot.com/
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇