नमस्कार वाचकहो, कसे आहात सगळे... हळू हळू सर्व काही व्यवस्थित होत आहे.. पण काही प्रमाणात आपण आता स्वतःची काळजी घ्यायला हवी..कारण आता सर्व बंद ठेवून चालणार नाही...👍 असो काळजी घ्या, गरज असेल तरच घराबाहेर पडा...
कथा : #गाव_शहर भाग १ ला
लेखक : ©अनुप देशमाने
पहाटेची वेळ, कोंबडा आरवला.. तसा नभात फिकट तांबूस रंग येऊन सूर्य नारायण वर येण्यास गडबड करू लागला होता...चिमण्यांचा चिवचिवाट... गोठ्यातील म्हशीच्या गळ्यातील घुंगरुचा आवाज देत आम्ही पण जागे झालो आहोत याची साक्ष ते जनावर देत होते...शेणलोट करण्यासाठी अमर उठला त्याला पाहताच गाईचे, म्हशीचे लेकरू उड्या मारू लागले... अमर पटापट झाडू मारू लागला... शेण काढून त्याने उकिरड्यावर टाकले... लागोलाग त्याने बादली घेऊन म्हशीचे, गाईचे दूध काढण्याची तयारी करू लागला... घरात त्याची आई चुलीवर पाणी तापवण्यास ठेवू लागलेली होती... अमर चे वडील उठून तोंड धुत बाहेर उभे होते...अमर ची बहीण राधा आईला घरातील कामास मदत करत होती... उन्हाळ सुट्टी असल्यामुळे ती आता घरातील आणि स्वैपाक घरातील कामे शिकत होती...अमर दुधाचे कॅन्ड घेऊन अंगणात आला...घामाजलेला अमर ला पाहून राधा त्याला पाणी घेऊन आली...अमर च्या आईने सर्वांसाठी चहा केला आणि ती बाहेर घेऊन आली... सर्व जण आता चहा चा आस्वाद घेत होते...
अमर चे वडील : अमर आज उसाला पाणी दे बरं का.… गेल्या आठवड्यात दिलं व्हत बघ पाणी.. आणि मेथी कडे जरा बघून पण घे...
अमर : व्हय आबा आज तेच काम करणार हाय... बाजारात पण आज मेथी च्या जुड्या घेऊन जाणार आहे ईकायला.. तेवढंच पैका पण होईल आणि त्या पैशातून शेती पम्प च सामान पण आणतो ..!
आई : अररर अमू, पर पोरा गाडीत तेल हाय का ते बघितल का..!
अमर : आग जाताना टाकतो तेल..!
राधा : ये दादया येताना मला कायतरी आन र..!!
अमर दुधाचे कॅड घेऊन गावातील डेअरी ला निघाला...गाव तसे लहान च होत पण त्यात 90 टक्के सगळे शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय करणारे होते...गावात दारूचे दुकान आणि टपरी मात्र एकपण नव्हती.. त्यामुळे गाव निर्व्यसनी होते पण काही लोक मात्र गावा बाहेर जाऊन व्यसन करून येत होते...
"ये अमर्या आज लय उशीर झाला र तुला..." डेअरी वाला
अमर : "नाय तात्या जरा घरातील काम बघत व्हतो..म्हणून उशीर झाला...हे घ्या दूध आज हिशोब करून ठिवा आठवड्याचा रातच्याला येतो पैस न्यायला...!!" म्हणत अमर शेताकडे निघाला...तसे अमर ला 3 एकर शेती पण पाण्याची होती... त्यात 2 एकर ऊस आणि बाकी एकरात पालेभाज्या लावल्या होत्या... गाव पासून 2 3 किलोमीटर असे त्याचे शेत होते...अमर रानात आला त्याने पम्प चालू करून उसाला पाणी देण्यास सुरुवात केली... तसं तो मेथी च्या मोठ्या झालेल्या रोपणा तोडून त्याची जुडी तयार करू लागला... सकाळचे 9 वाजत आले होते हिकडे अमर ने जवळ जवळ 90 मेथीच्या जुड्या बनवल्या आणि तो एका कॅरेट मध्ये भरू लागला... उसाला पाणी चालू होते.. आता थोड्या वेळात लाईट जाईल त्यामुळे तो मेथीचे कॅरेट गाडीवर टाकून घरी निघाला... घरी आल्या आल्या त्याने दोन घास खाल्ले आणि येतो म्हणून तो तालुक्याला निघाला....!!
"तुझमे रब दिखता है, यारू मे क्या करू.. तुझमे सब दिखता है मेरू मे क्या करू..." काहीतरी आपलं गाण्याची विल्हेवाट लावत तो गाडी चालवत होता... काही वेळेत तो तालुक्याच्या मार्केट यार्ड मध्ये पोहचला.. त्याने व्यापाऱ्याला मेथी दाखवली.. अमर ला एक जुडी ची 8 रुपये प्रमाणे 720 रुपये रोख मिळाले ते ही उशीर न करता... अमर आनंदित झाला... आजचा दिवस भारी आहे म्हणून त्याने गावातील महादेव साठी मोठा हार विकत घेण्याचे ठरवले, आई साठी बांगड्या, वडिलांसाठी टॉवेल आणि राधा साठी जिलेबी घेण्याचे ठरवले...👍 तसा तो पैसे खिशात ठेवून खरेदी करू लागला...सर्व खरेदी केल्यावर तो चहा घेण्यासाठी एका ठिकाणी थांबला...!
रस्त्यावरील वाहनांची व्हरदळ, ट्राफिक पोलिसांनी मारलेल्या शिटीचा आवाज... मधूनच पो पो करत एखादा मोठा ट्रक येऊन त्याने सर्व रस्ता बंद करून टाकावा... हातगाडे वाले, रस्त्याच्या बाजूने आपली जागा धरलेले फळ विक्रेते.. हा सगळा गोंधळ फक्त आणि फक्त शहरात च बघायला मिळतो.. पण निसर्गाची शांतता आणि शुद्ध हवा फक्त आणि फक्त गावीच मिळतं... सर्व दृश्य तो आपल्या डोळ्यात सामावून हसऱ्या चेहऱ्याने गाडीवर बसला आणि किक मारून गावाकडे निघाला... दुपारचे 12 वाजत आले होते...त्यामुळे उन्ह जरा जास्त जाणवू लागले होते... एका वळणावरुन त्याने गावचा रस्ता धरला...थोडं पुढे गेल्यावर त्याला गावातील सहा आसनी टमटम बंद पडलेला दिसला.. आणि त्यातील प्रवासी बाहेर उतरलेले अमर ला दिसले... त्याने जवळ जाऊन गाडी थांबवली...!
अमर : अररर रम्या काय झालं र..!
रम्या : स्टार्टर बसेना झालाय...!
अमर : ढकलून चालू करू की..!!
रम्या : व्हय लका चल धक्का दे तू..!
अमर : आय माणसांनो चला धक्का द्या...! म्हणत त्याने प्रवाश्यांना बोलवलं.
त्यातील एक प्रवासी : मी धक्का वगैरे देणार नाही, माझे हात आणि ड्रेस खराब होईल.. म्हणत तिने पॅकेट मधून सिगरेट काढली आणि लाईट करून ओढू लागली!
अमर : मग एक काम कर तू चालत जा गावाकड..जो धक्का देईल त्यालाच गावाकडे नेण्यात येईल.. म्हणत अमर धक्का देण्यास पुढे सरसावला.. त्याच्या बरोबर बाकीचे पण सरसावले, त्यात बायका पुरुष होते, पण तीने मात्र हाथ लावला नाही...😊 धक्का दिला तरी टमटम काही चालू होईना..!
ती : शी कसला खटारा आहे हा, माझा सर्व मेकअप खराब होत आहे उन्हात..
अमर : ये बाये खटारा का बोलत आहेस तू, ह्याने तर आम्ही प्रवास करतो आमच्या गावची शान हाय हे...म्हणत अमर ने टमटम कडे हात दाखवला..!
रम्या : अमर्या जाऊ दे र.. सरपंच ची पाहुनी हाय ती, कशाला वाद करतो तू..!!
अमर ने रागाने तिच्याकडे नजर फिरवली आणि जोरात परत एकदा टमटम ला धक्का दिला आणि टमटम चालू झाला.. सगळे टमटम मध्ये बसले...तिने अमर कडे बघून कडू हसू आणले...अमर ने आपल्या गळ्यातील टॉवेल ने घाम पुसत जाणाऱ्या टमटम कडे बघू लागला.. आणि परत गाडीवर बसून गावाकडे निघाला...घरी आल्यावर त्याने राधा ला तिला आणलेली जिलेबी दिली, आईला बांगड्या दिल्या आणि वडीलाला टॉवेल दिला.. आणि राहिलेले पैसे आई कडे देऊन परत शेताकडे निघाला...!
रम्या : आय अमर्या कुठं चालला र..!
अमर : चाललू शेताला... का र बाबा..!
रम्या : अररर ती पोरगी तुझं नाव ईचारात होती बा..!
अमर : मग सांगायचं की तिला माझं नाव..!
रम्या : सांगितले तुझं नाव तिला, पण ती म्हणली तूझ नाव ती तिच्या मामाला सांगणार हाय..??
अमर : मामा, कोण र हिचा मामा...??
रम्या : अररर सरपंच पाटील हे तिचे मामा आहेती अन ती उन्हाळ सुट्टी साठी हिकडं आली हाय मामाकडे..!
अमर : बरं आपल्याला काय करायचं हाय तिच्या वाचून जाऊ दे म्या शेतात जातूय..!!
रम्या : म्या पण युका र शेतात, आज तस वडाप ला धंदा नाय म्हणावं तसा..!
अमर : चल जाऊ की ... म्हणत अमर आणि रम्या शेतात निघाले..."जिंदगी एक सफरचंद है सुहाना, यहा कल क्या हुवा था किसिने सोचा ना जाना..." असले अमर चे गाणे ऐकून रम्या जोरजोरात हसू लागला... तेवढ्यात अमर ने गाडी साईड ला लावून शेतात शिरला.... ऊस ला पाणी चांगलंच मिळाल होत..त्यामुळे अमर आज खुश होता म्हणून त्याने रात्री शेतात पार्टी करायचं ठरवलं... तसा रम्या पण खुश झाला, दोघे परत शेतातील कामे करण्यास गुंग झाले...!!
•••••••●••••••••●•••••••••
आव सरपंच, आव वहिनी साहेब पाव्हन आलं पाव्हन आलं म्हणत नाम्या वाड्यात घुसला....!! लागलीच सरपंच आणि वहिनी पळत खाली आले.. समोर दरवाज्यात पाहुनी म्हणून आलेली सरपंच ची भाची उभी होती...
सरपंच : तुम्ही नुसतं तिला बघत उभे राहू नगा, जावा आत आणि मीठ मिरे आणून तिची दृष्ट काढा...! म्हणताच वहिनी आत पळत गेल्या आणि मीठ मिरे आणून त्या दृष्ट काढू लागल्या...
सरपंच : या गीता बाई या खूप वर्षांनी तुम्ही आला बघा मामाच्या गावी..!
गीता : मामा मला बाई वगैरे म्हणू नको रे.. गीता म्हणत जा रे..
सरपंच : बरं राहील गीता म्हणतो.. बरं सांग प्रवास कसा झाला तुझा...काही त्रास वगैरे झाला नाही ना..!
गीता : प्रवास छान झाला पण मधेच ते तुझ्या गावातील डबड बंद पडले मग तिथे खुप त्रास झाला...!!
सरपंच : पण सुखरूप आली ना घरी तू..!!
गीता : हो आली ना पण अपमान करून घेऊन आली...!! हे ऐकताच सरपंच चपापला आणि मोठा आवाज चढवत..."कोणी केला तुझा अपमान नाव सांग फक्त...मुस्कटच फोडतो बघ त्याच...!!"
गीता : अमर ने केला आहे अपमान...
कोण अमर .. सरपंच ने विचारले
गीता : त्या रम्या चा मित्र अमर त्याने...
सरपंच : नाम्या आताच्या आता गावात जा आणि त्या रम्या आणि अमर ला उचलून घेऊन ये वाड्यात....
वहिनी : जाऊ द्या त्यांसी माहिती नसेल गीता बद्दल...त्यामुळं झाली असेल चूक त्यांच्या कडून...!!
सरपंच : तुम्ही गप बसा, तुमचं कायतरी निराळंच असत, जावा आत चहा पाण्याचं बघा हिच्या....
गीता आणि वहिनी आत निघून गेल्या.... सरपंच मात्र व्हरांड्यातील झोपाळ्यावर मिशाला ताण देत अमर आणि रम्या ची वाट बघत बसला होता...!!
तेवढ्यात नाम्या, अमर आणि रम्या ला घेऊन वाड्यावर हजर झाला... सरपंच ने लागलीच पायातील चप्पल काढून रम्यावर भिरकावली...
सरपंच : अररर ये सुकाळीच्या ते तुझं डबड टमटम विकून टाक भंगारात... नायतर पेटवून दे त्याला भर चौकात.... अन ये तू अमर्या माझ्या भाचीचा अपमान करायला भीती वाटली नाही का म्हणत सरपंच ने अमर ची गचंडी पकडली...
नाम्या : सरपंच जाऊ द्या एकवार म्या सांगतो ह्यांना समजावून...!
घरातील कालवा ऐकून वहिनी आणि गीता बाहेर आले... अमर आणि रम्या ला बघून गीता हसू लागली... हातात चहा चा कप घेऊन ती वरून त्यांचा तमाशा बघू लागली....
अमर : सरपंच म्या काय तिचा अपमान केला नाय, वाटल तर तिला बोलवा अन विचारा...
रम्या : व्हय सरपंच अमर नी त्यांचा अपमान केला नाय केला म्या होतो तिथे...
सरपंच : ते काय बी असू द्या पण ह्या पुढं जर तिच्या नादी लागलात तर गावात दिसू देणार नाय तुम्हाला...चला निघा...!!
आता गीता खूप हसू लागली... तिला खूप आनंद झाला, आल्या आल्या गावातील भांडण चा ट्रेलर बघून ती खुश झाली...आणि परत आत जाऊन आपली बॅग कपडे बाहेर काढून रूम मध्ये ठेवू लागली...
वहिनी : गीता रातच्याला काय करू खाण्यास... तुम्हाला काय आवडत ते सांगा ...!!
गीता : काहीपण कर ग मामी, आवडेल मला खायला, चल मी घरी आणि मित्रांना फोन करून सांगते पोहचली म्हणून...!!
गीता - एक शहरात लाडात वाढलेली मुलगी त्यामुळे व्यसन थोडे होते तिला कारण तिचे फ्रेंड सर्कल तसच होत...थोडे दिवस गावाकडे पाठवू त्या निमित्ताने सुधारेल म्हणून तिच्या आईने मामा कडे तिला पाठवले होते....!!
क्रमशः
5 va bhag kdhi upload krnar ahat..... lvkrat lvkr kara link tutate punha
ReplyDelete