विधवा (एक सूडकथा) भाग -2
"या आपण थोडा वेळ त्या खडकावर बसू. थोडा आराम मिळेल. म्हणजे तुम्हाला बरं वाटेल."
असं म्हणत तो खडकाकडे निघाला. ती मूकपणे त्याच्या मागे निघाली. खडकाच्या दोन टोकांवर दोघेजण बसले.

"तुम्ही ठीक आहात ना?"-तो
" हो, तुम्ही होता म्हणून आज वाचले मी"
ती कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहत म्हणाली.
" मी असताना तुम्हाला काहीच होणार नाही. तुमच्या रक्षण हे माझे कर्तव्य आहे."
तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तो जागेवरून उठला. तिच्याजवळ गेला. "मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिले, तेव्हाच तुमच्या विषयी एक आपलेपणा वाटला.
खूप जुनी ओळख असल्याची भावना मनात तरळून गेली होती. आई विषयी ममतेची जी ओढ वाटते,
अगदी त्याचप्रमाणे तुमच्याविषयी माझ्या मनात प्रेमाची ओढ वाटली. तुम्ही मला मनापासून आवडला होता. सर्व आयुष्य तुमच्या सोबत जगावे हीच एक इच्छा झाली आहे.
त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,
"माझं तुमच्यावर प्रेम जडल आहे. जसे आज तुमचे रक्षण केले, अगदी त्याचप्रमाणे तुमचे आयुष्यभर रक्षण करेन. तुम्हाला प्रेम देईल".
तो भावनेच्या भरात बरेच काही बोलून गेला. त्याच्या हाताच्या स्पर्शाने तिला भरून आल. चार वर्षाच्या वैधव्याच्या काळात असा प्रेमळ स्पर्श तिला झाला नव्हता. सगळीकडे दुःख, वेदना, अपमान हाच वाट्याला आला होता. तिने अलगद त्याचा हात बाजूला केला. एकवार त्याच्या डोळ्यात खोल बघितले ;आणि बाजूला शून्यात नजर लावून बसली. तिच्या चेहर्यावर संमिश्र भावना उमटून गेल्या. त्या भावना नेमकेपणाने त्याला टिपता येईनात. दुःख, आवेग वेदना, तडफड, अपमान, आनंद, सुख नवल आश्चर्य अशा संमिश्र भावना त्याला दिसू लागल्या. त्याच्या निर्मळ स्पर्शाने, तिच्या दुःखावर थोडीतरी सुखाने मात केली आहे ही जाणीव मात्र त्याला झाली. त्याच्या स्पर्शाने तिला दुःखाचा उमाळा आला असला तरी, त्या दुःखा पलीकडे एक सुखद जाणीव त्याला दिसू लागली.
"रूपा, तुला वाटत असेल की माझं प्रेम बेगडी असेल. दोन-चार दिवसात काय प्रेम होईल? परंतु काही व्यक्तींचे प्रेम आयुष्यभर होत नाही ;तर काहींचे क्षणात होते. माझ्यावर, माझ्या व्यक्तिमत्वात विश्वास ठेव. आयुष्यात तुला कधीच दुःख देणार नाही."
पुन्हा त्याच्या चेहर्यावर अश्रुंची धार ओघळली. त्याचे अश्रू पाहून तिलाही कसतरी झालं. ती आवेगाने म्हणाली,
" तसं काही नाही. तुमच्यावर विश्वास नसता तर तुमच्या एवढ्या जवळ निर्धास्तपणे कधीच बसले नसते. पण माझ्या दुःखाचे कारण तुम्ही नाहीत. माझ्या दुःखाचा इतिहास खूप मोठा आहे. केवळ पंचवीस वर्षांच्या काळात ज्या यातना भोगल्या, त्या कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत. एका तरुण विधवेचे आयुष्य काय असते, हे माझ्यापेक्षा जास्त कोणीच जाणणार नाही. विधवेच्या दुःखाची एक मोठी साक्षीदार आहे मी. याच साक्षीने मरण यातना भोगण्याची शिक्षा मला मिळाली आहे. आणि मिळत आहे. ती बोलत होती. बोलतच राहिली. तिच्या वाट्याला आलेल्या त्या वैधव्याच्या घटना, प्रसंग ती बोलतच राहिली.

"वयाच्या विसाव्या वर्षी थाटामाटात लग्न होऊन मी पाटलाच्या घरात मोठी सून म्हणून आले. अनंतराव तेव्हा सव्वीस सतावीस वर्षाचे असतील. पाटलाच्या घरातील ते मोठे होते. चार भावात सर्वात थोरले होते. स्वभाव शांत, संयमी होता. पाटीलकी रक्तात होती, पण ती त्यांनी नेहमी योग्य कामासाठी वापरली. माझ्यावर खूप जीव होता त्यांचा. मी तर खूप सुखी समाधानी होते. माझी प्रत्येक गोष्ट त्यांनी समजून घेतली. सासू-सासरे, दीर छळ करायचे. पण यांच्या प्रेमापुढे तो छळ नेहमी नगण्य वाटायचा. लग्नाला दोन महिने उलटून गेले होते. दिवाळीच्या सणाला म्हणून मी माहेरी गेले होते. दिवाळीत चांगलीच थंडी पडली होती. शेतीचे सगळे कामे अनंतराव पाहत. शेतात गहू बहरून आला होता. रब्बी हंगामाचा तो गहु मोसमात आलेला होता. सकाळी सकाळी अनंतराव गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात म्हणून गेले, ते कधीच परत आले नाही. शेतातल्या मोठ्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. एवढे कट्टर पोहणारे, पण विहिरीत बुडून कसे मेले? हेच कोणाला कळेना. पोलीस आले, पंचनामा झाला तेव्हा कळले की, विहिरी वरची मोटर सुरू करताना, विजेचा मोठा झटका लागून ते विहिरीत पडले, आणि डोक्याला मार लागून ते विहिरीत बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू ओढावला. दिवाळीसाठी माहेरी आलेली मी. आनंदात सण साजरा करावा या हेतूने, पहिली दिवाळी माहेरी घालावी ही उम्मेद घेऊन माहेरात आले होते मी. परंतु ती बातमी घरी आली आणि मी अक्षरशः कोलमडून पडले. एका क्षणात या बातमीने आयुष्य नरक बनले. वयाच्या पंचविशीत कपाळावरचे कुंकू पुसले गेले. तेथे उरला तो फक्त कुंकवाचा एक कायमचा वर्ण. आणि तिथून सुरू झाला नरक यातनांचा काळ. एक अपमानीत आयुष्य . सासरच्या लोकांनी अमानुष छळ केला .अनंतरावांच्या मृत्यूला जबाबदार मीच होते. असं ठरवून त्यांनी माझा छळ करायला सुरुवात केली.
ती बोलत होती
सोबतच रडत होती. दुःखाचा इतिहास मांडत होती. त्याने तिला बोलू दिले. तिच्या मनातील खदखद त्याने मुक्तपणे बाहेर पडू दिली. ती व्यक्त झाली. तिला कदाचित थोडे हलके हलके वाटत असेल. ती थोडावेळ शांत बसून राहिली. त्याने प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. पुन्हा एकदा प्रेमाने तीचा हात हातात घेतला. तिने वर बघितले आणि स्वतःला त्याच्या मिठीत झोकुन दिले. त्याच्या मिठीत मनसोक्तपणे रडली ती. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. आता तिला प्रेम व्यक्त करायची गरजच पडली नाही. तिच्या मीठीने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.

रामजी पाटील वाड्याच्या जोत्यावर बसलेला होता. शेजारी पाटलीन बाईही होत्या. दोघांच्या गप्पा रंगात आलेल्या होत्या. गप्पा रंगत रंगत मास्तरपर्यंत आल्या. पाटलीनबाई जरा रागातच म्हणाल्या, "त्या मास्तरला कशाला घरात ठेवला उगाच कशाला परका माणूस घरात."
"ते आहे म्हणा ;पण आपला हिरा आला त्याला घेऊन. मग अजून दोन-चार दिवसांनी देऊ काढून."
पाटील म्हणाला.

"ते काही नाही. इथे नका ठेऊ त्याला. घरात ती टवळी आहे. नवरा खाऊन बसली आहे. ती तरुण आहे. जेवताना मास्तर तिच्याकडे बघत होता. उगाच विषाची परीक्षा नको."
पाटलीनबाई जरा ठसक्यातच म्हणाली.
" म्हणजे तसं काय झालं तर दोघांचे मुडदे पाडील मी. त्याला उद्याचे उद्या घराबाहेर काढतो."
पाटील रागाने म्हणाला. त्याला रागाची एक सणक आली.

त्याच वेळी तो घरात आला. मास्तरला पाहून पाटलाच्या डोक्यात पुन्हा सणक आली.
" मास्तर तुम्ही आता राहिले ते राहिले पण आता पुरे झाले तुमचे. तुमचे बस्तान दुसरीकडे हलवा. उगाच दोन शब्द वाईट बोलण्यापेक्षा आता धीराणे सांगतो आहे."
पाटलाच्या बोलण्याने त्याला जरा रागच आला. तो काही इथे कायमचाच थांबणार नव्हता.
" पाटील मी काय इथे मनाने आलो नाही. हिरा पाटलांनी आग्रह केल्यामुळे आलो .मी काही इथे कायमचा राहण्यासाठी आलो नव्हतो. आज मी जाणारच होतो."
तोही रागातच म्हणाला. त्याच्या अशा बोलण्याने पाटील चांगला तापला. त्याचा राग इरेला पेटला.
" मग काय कायमचाच इथे राहतो का? धीराण सांगितलेलं कळत नाही का? मास्तर आहे म्हणून जरा धीर धरून सांगतोय. तर उलटच बोलत आहे. तुला गावात राहायचं नाही का? चल निघ आता इथून."
पाटील रागाने बोलत होता. हा जरा घाबरूनच गेला. पाटील एकदम अरेतुरेवरच आला. पाटील जर पुन्हा पेटला तर आपल्याला गावात राहू देणार नाही. त्यानी पाटलाला हात जोडले, आणि तो वाड्याच्या बाहेर पडला. आपल्या सामानसहित.

काळ लोटत होता. दिवस सरत होते. ऋतू उलटत होते. हिवाळा गेला. उन्हाळा गेला. पावसाळा सुरू झाला. सह्याद्रीच्या कुशीतला तो परिसर हिरवाईने चांगलाच नटला होता. गावापासून चारही बाजूला नजर फिरवली की, सगळीकडे हिरवेगर्द झाडे, पिके दिसू लागले. उत्तरेकडच्या कड्यावरून दुधासारखा फेसाळनारा धबधबा पाहिल्यावर, कोणीतरी त्या कड्यावरून दुधाची धार सोडत आहे असा भास व्हायचा. पायाला चिकटणारी लाल माती, अचानक पडणारी पावसाची शांत, संयमी सर किंवा मग मूसळासारख्या धारेचा पडणारा तो अजस्त्र पाऊस.
अशी निसर्गाची कित्येक रूपे प्रत्यक्षात आकार घेऊ लागली. तिकडे वातावरण असे उत्साहाने वाढत होते. आणि त्याला समांतर असे यांचे प्रेम खुलत होते. केवळ निसर्ग आपल्या सौंदर्याचे खुलेआम दर्शन देत होता. आणि हे सुप्तपणे सगळ्यांपासून अदृश्य असे, आपले प्रेम फुलवत होते.

पावसाळा असल्याने नदीकाठी जाणे बंद झाले होते. नदीचे पाणी त्या खडकाला गिळून गेले. नदी दोन्ही तीर भरून जोराने वाहत होती. नदीच्या अलीकडच्या काठावर, गावापासून थोडे दूर, आणि थोड्या उंच ठिकाणावर महादेवाचे एक जुने मंदिर होते. श्रावण महिना असल्याने गावातील एक दोन महिला मंदिरात दर्शनासाठी येत.
श्रावण महिन्यातली ती एक प्रसन्न सकाळ होती पावसाची संततधार रात्रीपासून सुरू होती. नेमकाच सोमवार आलेला होता. थोडा पाऊस असल्याने सगळे घरातच बसलेले होते. शाळेच्या जवळच्या आपल्या खोलीत हा आरामात बसलेला होता. महादेवाच्या मंदिरात जाणारा रस्ता याच्या खोलीच्या समोरून जात होता. सकाळचे सहा वाजले असतील. आकाशात ढग असल्याने वातावरणात अजूनही थोडा अंधार दिसत होता. त्याला बाहेर काहीतरी हालचाल जाणवली. तो तसाच उठून बाहेर आला. बाहेर रूपा होती. तिला समोर पाहून त्याला आनंद झाला.
"मी मंदिराकडे जात आहे. तुम्ही या थोड्या वेळाने ती त्याच्याकडे बघत म्हणाली."
तो हो म्हणाला.
आणि ती मंदिराकडे निघाली. बऱ्याच दिवसापासून त्यांची भेट नव्हती. त्याने उत्साहाने आंघोळ केली, कपडे घातले आणि तो मंदिराकडे निघाला. पाऊस असल्याने आणि सकाळची लवकर वेळ असल्याने मंदिराच्या आसपास कोणीही नव्हते. हा मंदिरात जाऊन पोहोचला. मंदिराच्या पाठीमागे एक छोटासा सभामंडप होता. त्याच्या एका कोपऱ्यात ती बसलेली होती .त्याने दर्शन घेतले आणि तो तिच्याकडे गेला. त्याला बघून तिने स्मित केले. त्यानी हलकेच हसून तीला प्रति अभिवादन केले. थोडे अंतर राखून तो तिथे बसला. ती आज खूप सुंदर दिसत होती. नेमकीच आंघोळ केल्याने चेहरा सतेज आणि प्रसन्न भासत होता. अंगावर नेहमीप्रमाणे श्वेत रंगाची साडी होती. दोघे गप्पा मारत बसले. प्रेमाच्या परमोच्च बिंदूपर्यंत ते पोहोचले होते. पुढे काय होईल? जग काय म्हणेल? हा विचार त्यांच्या मेंदूपर्यंत आला नव्हता. केवळ प्रेमाच्या अखंड अवस्थेत ते बुडाले होते. त्या प्रेमाला ना वासनेचा स्पर्श होता ना, बेगडीपणाचा डाग होता. निर्मळ प्रेमाचे ते दोघे साक्षीदार होते. दोघे आपल्याच प्रेमात तल्लीन होते. गप्पा मारण्यात वेळ कसा निघून गेला कळलाच नाही. पाऊस थांबला होता. उन्ह वर आले होते. तरी ते बोलण्यात मग्न होते. अचानक त्यांना कोणाचातरी चाहूल लागली. त्यांनी चमकून वर पाहिले. समोर रघु सोनाराची बायको उभी होती. हातात पूजेचे ताट होते. रघु सोनाराची बायको पाटलीनबाईची खास होती. तीला पाहून रूपा घाबरून गेली. तिने अस आपल्याला बाघयला नको होत. रघु सोनाराची बायको निघून गेली. रूपा जागेवरून उठली. आणि लगबागीने घरी निघून गेली. तिला भीतीने ग्रासले होते. हा प्रकार तिने घरी सांगितला तर दोघांचे आयुष्य अडचणीत येणार होते.

सकाळी सकाळी कोणाच्यातरी दारावरच्या थापेने तो जागा झाला. आधी काहीच कळेना. आपण झोपेतच काहीतरी ऐकत आहोत असे त्याला वाटले. पण दार ठोठावल्याचा आवाज वाढतच जाऊ लागला. तो दचकून अंथरुणातून जागा झाला. त्याला कालचा प्रसंग आठवला आणि भीतीचे एक सणक मेंदूपर्यंत गेली. कोणीतरी जोरजोरात दार ठोठवत होते. त्याला दारात कोण असेल याची काही कल्पना येईना. कदाचित पाटील असेल. जर पाटील असेल तर, आज आपला मुडदा पडेल, या विचाराने तर भीतीने कापरेच भरले त्याला. तो घाबरतच दाराजवळ आला. जरा बाहेरची चाहूल घेऊ लागला. पण काही केल्या बाहेर कोण आहे हे कळेना. पुन्हा दार ठोठावल्याचा आवाज आला. आता त्याची सहनशक्ती संपली होती. जे व्हायचे ते होईल असे म्हणतच त्याने धाडदिशी दार उघडले. दारात हिरा पाटील उभा होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर जाणवले होते की, तो घाबरल्यासारखा अवस्थेत दिसत होता. त्याने गडबडीत त्याला घराबाहेर काढले, आणि म्हणाला आवेगाने म्हणाला,
" मास्तर लवकरात लवकर गाव सोडा. इथून लगेच पळा. माझा बाप तुमचा मुडदा पाडण्यासाठी इकडेच येत आहे. रघु सोनाराच्या बायकोने, काल तुम्हाला आणि वहिनीला सभामंडपात एकत्र बसताना, बोलताना पाहील. अस तीने घरी येऊन सांगितल. ती आत्ताच आली होती.
ते ऐकून माझा बाप, भाऊ हातात कुर्हाड - काठी घेऊनच तुमच्याकडे निघाले आहेत. मी मोटरसायकलवर त्यांच्या आधी तुमच्याकडे आलो. तुम्ही आधी येथून पळ काढा. जीव वाचवा! तुमचा जीव धोक्यात आहे. माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला काहीही करून वाचलं असतं. एवढंच नाही वहिनीशी तुमचं लग्नही लावून दिलं असतं. पण सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत. क्रोधाने त्या सगळ्यांचे मस्तक पेटलेले आहेत. त्यांना या स्थितीत काहीही सांगितलं तरी समजणार नाही. त्या क्रोधाच्या भरात ते तुमचा जीव घ्यायला पण मागेपुढे पाहणार नाहीत. तुमचा स्वभाव चांगला वाटला म्हणून, तुमच्या बद्दल सहानुभूती वाटते. त्यानेच तुम्हाला सांगायला इथपर्यंत आलो आहे. या स्थितीत इथून पळ काढा. गाव सोडून जा. पुन्हा इकडे फिरकूही नका. जीव आहे तर सगळ आहे. त्याला याही स्थितीत हिरा पाटला बद्दल हेवा वाटला. माणूस कसा असावा? याचे उत्तम उत्तर हिरा पाटील होता. स्वतःच्या बापा-भावापासून एका परक्या माणसाला वाचविण्यासाठी तो धावत पळत इथपर्यंत आला होता. स्वतःच्या वहिनीचे लग्न एका परक्या मास्तरशी लावायला तयार होता. त्याला रुपाच्या आठवणीने कसतरी झाल. तिची काळजी त्याला लागली. त्याने त्याही परिस्थितीत प्रश्न केला, "पाटील रूपा कशी आहे? तिला काही केल नाही ना?"
त्या प्रश्नाने हिरा पाटलाला थोडंसं संकोचल्यासारख वाटला. पण रूपाबद्दलच्या त्याच्या प्रेमाने त्याला गहिवरुन आल. तो म्हणाला,
"मास्तर वहिनी ठीक आहेत. त्यांची काळजी करू नका. पहिल्यांदा स्वतःची काळजी करा. आणि बाप इकडे येण्याआधी पोबारा करा."

तो तळमळीने पुन्हा पुन्हा सांगत होता. त्याला धोक्याची कल्पना आली. हिरा पाटील हिताच सांगत आहे. इथून पोबारा केलाच पाहिजे. तो जंगलाच्या दिशेने पळत निघाला. त्याला स्वतःची काळजी वाटत होती; पण त्याहीपेक्षा दुपटीने रूपाच्या काळजीने त्याला अस्वस्थ होऊ लागले. हिरा पाटलाला रूपाबद्दल विचारले तेव्हा, त्यांचा चेहरा पडला होता. त्याचा अर्थ काहीतरी वेगळा होता. काहीतरी विपरीत घडलं होतं. त्याच्या डोळ्यात त्या विचाराने अश्रू तरळले.
पाठीमागे कोणाच्यातरी ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ कोणीतरी त्याच्याकडे वेगाने पळत येताना दिसले. त्याने सर्कन पाठीमागे वळून बघितले. रूपा त्याच्याकडे पळत येताना दिसली. ती धावत होती. तीला पाहताच अतिशय आनंदवेगाने तो तिच्याकडे धावत गेला. दोघेही जवळ आले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. तीला सुखरूप पाहून त्याला अत्यानंद झाला. त्याची नजर थोडी दूर गेली. तिकडे मोटरसायकलवर हिरा पाटील दिसला. तो हाताने इशारा करत होता. आता दोघेही इथून दूर जा. त्यांनी हात हलवून हिरा पाटलाला निरोप दिला. हिरा पाटील यांनीच रूपाला इकडे आणून सोडले. हे त्याने लगेच ओळखले. त्याने मनातून हिरा पाटलाचे उपकार मानले. आणि ते जंगलातून पुढे जावू लागले. आता तो निर्धास्त होता. त्याच्यासोबत आता रूपा होती. आता त्याला कोणाचे भय नव्हते. कोणाची भीती उरली नव्हती. तो वेगाने जंगलातून बाहेर पडण्यासाठी धावू लागले.

जंगलाच्या उत्तरेडच्या बाजूने गलका ऐकू आला. त्या पाठोपाठ शिव्या दिल्याचा आवाज येऊ लागला. त्या दोघांनी तिकडे बघितले. रामजी पाटील आणि त्याची दोन पोर आणि इतर गडी व गावातील दहा बारा माणस हातात काठ्या कुर्हाडी घेऊन त्यांच्याकडे येताना दिसली. भितीची एक सणक मेंदूपर्यंत गेली. भीतीने अंगावर सरकन काटा आला. ते त्यांच्याच दिशेने पळत येत होते. तोंडातून शिव्या देत ते त्यांच्यावर चाल करून येत होते. त्यांना पाहून ते दोघे त्यांच्या विरुद्ध दिशेला पळू लागले. दोघांनी एकमेकांच्या हाताला धरले होते. दोघे सोबत धावत होते. जन्मभर असे दोघे एकमेकांना सोबत घेऊन धावले असते, पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हते. सह्याद्रीचे ते जंगल घनदाट झाडे, वृक्ष, वेली यांनी दाटलेले होते. सदाहरित झाडांनी सगळा परिसर हिरवा झालेला होता. श्रावण महिन्यातील दिवस असल्याने खाली चिखल झालेला होता. त्या चिखलातून वाट काढून ते धावत होते. आणि त्यांच्या पाठीमागे तो चौदा - पंधरा जणांचा जमाव धावत होता. चिखलामुळे पायांना वेग येत नव्हता. तरीही अगदी जीवाच्या आकांताने ते धावत होते. कारण पाठीमागे येणारे सगळे वैरी होते. खुनी होते. त्यांच्या हातात सापडलो की इथेच, याच जंगलात आपली समाधी होईल ही पक्की जाणीव त्यांना होती. त्यांच्या हातात सापडणे म्हणजे जगण्याची आशाच संपुष्टात येण्यासारखे होते. एकनाथच्या मनात विचार थैमान घालत होते. सोबत रुपा होती म्हणून, पळताना पायात दहा घोड्यांचे बळ येत होते. पायांना हवेची गती येत होती. तीची सोबत म्हणजे एक सकारात्मक उर्जा होती. एक आदिम प्रेरणा होती. पण अगदी त्याच्याच उलट, पाठीमागून येणारा जमाव काळ होता. त्याच्या समीप येण्याने दोघांचा अंत होता. जीवनाचा शेवट होता. त्यांच्या समीप येण्याने, नकारात्मक ऊर्जा अंगात शिरत होती. त्या उर्जेने पायांचा वेग कमी होत होता. अचानक पाठीमागचा आवाज समीप आल्यासारखा वाटला. त्याने पाठीमागे वळून पाहिले. वळल्यामुळे त्याचा धावण्याचा वेग कमी झाला. त्याचा हात धरून धावणारी रूपा अडखळली आणि धपकन जमिनीवर पडली. त्याच वेळी पाठीमागून भिरभिर करत एक दगड आला.
दगड त्याच्या डोक्याचा वेध घेणारच की, खाली पडलेली रूपा एकाकी उठली. आणि फट् असा आवाज होत तिच्या डोक्यावर तो दगड आदळला. क्षण दोन क्षण स्तब्धता पसरली. पाठीमागून पळणारा जमाव जागेवरच थांबला. याचे डोळे विस्फारले आणि तोंडातून रूपाsss असा चीत्कार बाहेर पडला. दगडाने रुपाच्या डोक्याचा वेध घेतला होता. याच्यावरचा वार तिच्यावर झाला होता. पाठीमागून डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. धाडदीशी रूपा खाली जमिनीवर पडली. रक्ताचा ओघळ भळाभळा वाहू लागला. ती पाण्याबाहेर काढलेल्या माशावाणी तडफडू लागली. डोळे तिरके झाले, वर आकाशाकडे नजर झाली. हात, पाय वेदनेने झाडू लागली. सगळ्या देहाला आचके बसू लागले. तीची शेवटची धडपड सुरू झाली. रक्ताचा ओघळ खालच्या लाल चिखलात बेमालूमपणे मिसळून गेला. तीचा देह हळू हळू शांत होऊ लागला.
ती त्याही अवस्थेत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. ती ओठातून काहीतरी पुटपुटत होती. त्याने कान तिच्या तोंडाजवळ नेले.

"एकनाथ पळा! येथे क्षणभर थांबू नका. तुम्हाला ते जिवंत ठेवणार नाहीत. तुम्ही धावा! तुम्ही धावा!!"
ती वेदनेने तडफडत होती. तरी त्याचीच काळजी करू लागली. त्याला गहिवरून आलं. तो तिला मिठीत घेऊन हमसु हमसु रडू लागला.
एव्हाना मागचा घोळका वेगाने त्यांच्या दिशेने येत होता. मागून दगडफेक चालूच होती. शेजारी दगड पडण्याचे आवाज येत होते.
" एकनाथ जा तुम्ही. तुम्हाला माझी शपथ! आपल्या प्रेमाची शपथ!! पुढच्या जन्मी ईश्वर आपल्याला एकत्र आणेल. हे आयुष्य संपलं आता. आपण पुढच्या आयुष्यात एकत्र येऊ. तुम्ही स्वतःला वाचवा! तुमच आयुष्य वाचवा! त्यानेच मला शांती मिळेल. तुम्ही पळा! इथून लवकरात लवकर धावा!!"

तिने त्याचा हात हातात घेतला. डोळे भरून एकदा त्याच्याकडे पाहिले. तीच्या चेहर्यावर एक समाधानचे स्मित झळकले. आणि तिने डोळे मिटले. अगदी कायमचेच. त्याला दुःखाचा एक उमाळा आला.
रूपाssss असं म्हणून, तो हमसून हमसून रडू लागला. त्याच चित्त सैरभैर झाल. मती गुंग झाली. क्षण दोन क्षण काय कराव त्याला कळेना.
घोळक्याचा आवाज दहा पावलांवार आला. तसा तो दुःखातून भानावर आला. त्याने डोळे पुसले आणि वेगाने तो जंगलाच्या दिशेने पळू लागला. क्रोधाने, दुःखाने, सुडाच्या भावनेने, त्याचे पाय रथाच्या चाकाप्रमाणे वेगाने अंतर कापू लागले. पाठीमागचा जमाव कुठेच दिसेना. तेव्हा तो थांबला. एका झाडाच्या बुंध्याला टेकून तो बसला. आणि त्याने अश्रुचा पूर मोकळा केला. रूपाच्या आठवणीने तो शोकाकुल झाला. कितीतरी वेळ तो रडत होता. भावनांना डोळ्यातून मोकळी वाट करून देत होता.

सूर्य बुडायला आला होता. तो कानोसा घेत. रूपा पडली होती त्या जागेवर आला. रूपाचा देह तिथेच पडला होता. तिचा तो निष्प्राण पडलेला देह पाहून त्याला गलबलून आलं. त्याने तो देह उचलला. स्वतःच्या मांडीवर घेऊन थोडा वेळ स्वस्थ बसुन राहिला. तीच्या कपाळावर अलगद थोपटत राहिला.
तो उठला. शेजारी एक खड्डा होता. त्या खड्ड्याला त्याने एका मजबूत काठीने खोल केले. चारी बाजूंनी त्याला खणले. रूपाचा देह उचलला आणि त्या खड्ड्यात ठेवला. आजूबाजूची कोरडी माती आणून त्या देहावर टाकली. त्याला ही प्रत्येक कृती करताना गलबलून येत होतं. रूपा गेली हीच गोष्ट त्याला असह्य होत होती. तिच्या मरणाला आपणच कारणीभूत आहोत. अस राहून राहून त्याला वाटत होत. पण आपण निर्मळ प्रेम केले. त्याची शिक्षा आपल्याला अशी का मिळावी? तो विचार करून करून थकून गेला. त्याने रूपाचा देह जमिनीत नीट पुरून टाकला. बाजूचे एक रोपटे आणून तेथे लावले. आणि तिथेच बसून तो रडू लागला. पण आता तो क्रोधाने पेटला होता. त्याचा संयम संपला होता. 'प्राणप्रिय रुपाच्या हत्येचा सूड' ही एकच भावना मनात खदखद करू लागली.
संध्याकाळ झाली होती. रात्रीचे आठ वाजले असतील. तो कानोसा घेत त्याच्या खोलीकडे आला. खोलीजवळ कोणीही नव्हते याची त्याने खात्री केली. तो खोलीच्या पाठीमागच्या झाडाजवळ जाऊन थांबला. रात्र चांगली गडद होण्याची वाट बघू लागला. रात्र वरती सरू लागली, तसा तो चपळ झाला. त्याने गडबड सुरू केली. तो कानोसा घेत खोलीत आला. कोपर्यात ठेवलेली पाच लिटरची रॉकेलची कॅन त्याने उचलली. सोबत काडीपेटी खिशात कोंबली. एव्हाना मध्यरात्र उलटून गेली होती. रात्रीचा एक- दीड वाजला असेल. गाव सामसूम झाला होता. रातकिड्यांचा किर्र आवाज रात्रीला पुन्हा गदड करत होता. कुत्रे भुंकून भुंकून कुठेतरी मुटकुळे मारून शांत झोपले होते. हा हळूहळू राशन दुकानाजवळ आला. सोबतचा लोखंडी गजाने त्याने राशन दुकानाचे कुलूप तोडले. कुलूप फुटल्याचा कट् आवाज वातावरणात घुमला. क्षण दोन क्षण त्याने श्वास रोखून धरला. वातावरण पुन्हा पूर्ववत झाले. एकदम शांत झाले. त्याने दुकानाची कडी काढली. दुकानात उभ्या केलेल्या रॉकेलच्या कॅनीपैकी, त्याने एक दहा लिटरची कॅन उचलली. आणि तो रामजी पाटलाच्या वाड्याकडे निघाला.
आता तो क्रोधाने पेटलेला होता. डोळ्यात दुःख, वेदना, क्रोध, बदला अशा सगळ्या भावना जमा झाल्या होत्या. तो झपाझप पावले टाकत वाड्याजवळ आला. लांबून वाडा नजरेस पडला. वाड्याच्या मागच्या बाजूला तो आला. त्याने सर्व बाजूंनी वाड्याची पाहणी केली. थोडा वेळ विचार करून, त्याने एक मोक्याची जागा हेरली. वाडा सगळा लाकडात चीरेबंद होता. सगळ्या बाजूंनी लाकडाचे बांधकाम होते. त्याने एका ठिकाणाहून रॉकेल टाकायला सुरुवात केली. वाड्याच्या वरच्या, खालच्या बाजूला रॉकेल टाकले. बाहेरचे सगळे लाकडी बांधकाम रॉकेलने भिजवले. तो तसाच पुढे होत. हातात पाच लिटरची कॅन घेऊन. वाड्याच्या एका भिंतीवरून चढत वर आला. खाली रामजी पाटील झोपतो त्या, खोलीच्या सगळ्या भिंतीवर त्याने रॉकेल ओतले. जेवढा लाकडी भाग दिसेल, तिथे त्याने रॉकेलचा शिडकावा केला. सगळे काम चोख झाले होते. तो वाड्याच्या बाहेर आला. जवळचा लोखंडी गज त्याने बाहेरून मुख्य दरवाजाला अडकवला. खिशातली काडीपेटी बाहेर काढली. एकदा रूपाचा चेहरा डोळ्यापुढे आणून काडी पेटवली.
वाडा ढणढण पेटत होता. सगळीकडे हाहाकार माजला होता. वाड्यातून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. दारावर धडका बसू लागल्या. पण बाहेर त्या अडकवलेल्या गजाने चोख काम केले. पाटील,त्याचे पोर आणि इतर गडी यांना वाड्याच्या बाहेरच पडता येईना. सगळा गाव जागा झाला. पण अग्नि एवढा पेटला होता की, वाड्याच्या जवळ जाण्याची कोणाची हिम्मत होईना.

अग्नि भडकतच गेला. आतल्या हाका, रडण्याचा आवाज जोर जोरात येऊ लागला. अग्नि पुन्हा भडकत होता. हळूहळू आतील आवाज शांत झाला. आगीच्या ज्वालाही शांत झाल्या. आगीच्या ज्वालेत वाडा खाक झाला. हिरा पाटील शेतावर होता. तो येईपर्यंत वाड्याचे केवळ भग्नावशेष उरले होते. आतील पाटील, त्याचे पोर सगळेजण त्यात भस्म झाले होते. ते वाड्याचे दृश्य पाहून हिरा पाटलाच्या डोळ्यातून पाणी आले.
'शेवटी कर्माचे फळ बापाला मिळालेच' असा विचार करून तो मटकन खाली बसला. त्याला कळाले होते वाडा,मास्तरमध्ये पेटलेल्या सूडाच्या अग्नीने पेटला आहे. आणि त्या अग्नीला जबाबदार सर्वस्वी त्याचा बाप होता. त्या वाड्याकडे बघत बघतच हिरा पाटील पुन्हा पुन्हा रडत होता. बाप, भाऊ मेल्याचे दुःख होते. वहिनी मेल्याचे दुःख होते. सगळेच दुःख होते. काही वेळाने तो शांत झाला. सगळ काही शांत झाल. पाटलाचा एकमेव अंश त्याच्या रूपाने आता उरला होता.

सूड घेतला होता याचे समाधान मानावे? की, रूपा गेली याचे दुःख मानावे? आपल्यासाठी तिने जीव दिला मग. आपले जगणे योग्य आहे का असा विचार करतच तो गावाशेजारचा त्या उंच कड्याकडे निघाला. रूपाकडे जाण्यासाठी. अगदी कायमचा जाण्यासाठी. आणि त्या उंच कड्यावरून त्याने स्वतःचा देह झोकून दिला.
(**समाप्त)
# अभिप्राय नक्की कळवा.
# वैभव देशमुख.
माझ्याकडे शब्द नाहीत एकदम मस्त अप्रतिम
ReplyDelete