#कथा :- नत्तुरी
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ७
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ७
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
💥 सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ६ ची लिंक खाली दिलेली आहे.
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
त्यातला एकही शब्द मला कळला नाही कारण ती भाषा गोंडी जमातींची होती. त्याचा अर्थ विष्णु च मला समजावू शकत होता. त्यात शब्द होते. . . . .
"साता बाव दश गोलीला , पुंगार जी भूम"
"अद शिदुर डांबी एटी, रगु सियाना नत्तुरी"
"अद शिदुर डांबी एटी, रगु सियाना नत्तुरी"
हे शब्द वाचून काही कळेना म्हणून शेवटी तो कागद तसाच ठेवून दिला आणि पहाटे पहाटे आम्ही झोपलो.
सकाळ झाली. उशिरा झोपल्यामुळे सूर्य डोईवर आला तरी आम्ही उठलो नाही. थोड्यावेळाने म्हणजे साधारण सकाळी ९.३० च्या सुमारास जाग आली. हौसा आणि मी एकत्रच उठलो. माझी डोक्यातल्या विचारांनी पुन्हा जागा घेतली. एकही दिवस माझा निर्मळ, आनंदी मनाने जात नव्हता. प्रत्येक दिवस काय दाखवणार याचीच धास्ती लागलेली असायची पण तो दिवस तसा नव्हता. त्या दिवशी विष्णु भेटायला येणार होता. तो संध्याकाळी येणार होता. तोपर्यंत मी दिवसभर त्या कागदावरच्या ओळी आठवून काय संबंध लागतोय हे पाहत होतो. खरतर ते शब्द मी हौसा ला सांगून काही मिनिटात अर्थ समजावून घेतला असता पण मला तिच्यापासून काही गोष्टी लपवन भाग होतं. त्या गोष्टी मला विष्णु कडून जास्त खोल समजू शकतील म्हणून मी तो कागद बाहेर सुध्दा काढला नाही. असच संपूर्ण दिवस जाऊ दिला आणि संध्याकाळ झाली. सुर्य मावळतीला गेला आणि काळोख्या सावल्या रानात दाखल झाल्या. हलत्या सावल्या कश्या मनाला घाबरवू लागल्या. . . . आणि चाहूल लागली ती विष्णु येण्याची. . . ..
समोर पायवाट कुठे वाकडी उडी मारते तिथून विष्णु येताना दिसला. इतका हळू चालत होता की दोन पायांच्या मधले अंतर खूप काळ स्थिर राहत होते. उमदा व्यक्ती मनाने, वयाने ८० वर्षाचा , चेहऱ्यावर सुरकुत्या , काळे डाग ह्यांचं साम्राज्य होतं, डोळ्यात मात्र अंगार, वयाच आणि डोळ्यांच वेगळं तोंड फिर्वण्याच नात होत. वय आणि डोळे दोन्ही वेगवेगळे रस्ते होते. हातात दणकट काठी , अनवाणी चालत येणारे पाय, पायाच्या अंगठयात तांबेची जाड गोल कडी, हातात पत्र्याचा लोखंडी कडा, मानेभोवती एक लाल फडका , गळ्यात ताईत , डोक्यावर फाटकी शेली. असा हा पोशाख पेहराव करून समोर येणार विष्णु माझ्या डोळ्यात भरला. मी पुढे सरसावलो आणि त्याच स्वागत केलं. वेगळी आशा माझ्या मनात फुलारित होती. इतक्या दिवसांनी खूप मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं.
मी त्याला घेऊन झोपडीच्या दारात आलो. विष्णु ने आत डोकावून पाहिले आणि क्षणात मागे हटला. एकंदरीत हौसा चा जो अवतार होता तो बघवत नव्हता. हौसा चुलीच्या बाजूला बसली होती ,दोन्ही पाय तिने चुलीत घातले होते. केस मोकळे सोडलेली ती इतकी भयानक दिसत होती ,की बघताच क्षणी काळजात हादरा बसला. तिने हळूहळू मान फिरवली आणि आम्हा दोघांकडे बघितले. काय करावे ? अस दोघांच्याही मनात आलं. विष्णु पुढे सरसावला. तो तयारीतच आला असावा कारण हौसा ला भूत लागलं आहे अस मी त्याला सांगितले होते. त्याने आपल्या मळकट खिशातून एक काळा धागा बाहेर काढला. तो सरळ हातात धरून तीन वेळा वरून खाली ओढला आणि मला त्याने हौसा जाऊन धरायला सांगितले. मी पुढे सरसावलो आणि हौसा ला गच्च धरून ठेवलं. तो पुढे झालं त्याने हातातील धागा तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला बांधला. हौसा जराही हलली नाही. तिने त्या उपायला काहीही प्रतिसाद दिला नाही उलट ती उठली दोन्ही हात पसरून ती विष्णु कडे धावत गेली. त्याच्या मानेला जात करकचून दाबून धरून ती दोघेही खाली पडले. गच्च मन आवळून ती विष्णु ला मारत होती. ती पुढे झालो. हौसा ला धरायला गेलो पण तिच्या हाताच्या कोपर्याने मला धक्का दिला. मी चुलीत हात भाजता भाजता वाचलो. रणसंग्राम पेटला होता. हौसा नव्हती तर कोण होती ? कश्याला ते करीत होती ? काय संबंध ? असे प्रश्न त्याचबरोबर तिचा थैमान सार अंगावर येऊ लागलं. इतक्यात विष्णु ने एक जोरदार फटका हौसा ला दिला. त्या फटक्याने हौसा कोलमडली आणि बाजूला असलेल्या चादरीवर पडली. डोक्याला मार बसल्याने ती थोडी शुध्दीवर नव्हती. त्याच अवस्थेत ती पडून राहिली. मी विष्णु ला सावरले आणि आम्ही झोपडीच्या बाहेर गेलो.
विष्णु ला सावरण जास्त गरजेचं होत, त्याच्याकडून फायदा आहे म्हणून नाही तर तो वयाने हौसा पेक्षा जास्त होता. मी त्याला घेऊन बाहेर गेलो तोपर्यंत बाहेर अंधारून आलं होतं. काळोखाच्या गर्भात लपलेले खूप रहस्य होती. त्या गावात आल्यापासून मला जीवाला घोर होताच पण त्यात भयंकर घटनांची रेलचेल सुध्दा होती. चंद्र गडी बारीक कडा होऊन गेला होता. बारीक शी नाजूक कला त्याची त्यादिवशी जागणार होती, म्हणजे उद्या अमावस्या. दुसरा दिवस काहीतरी नक्की घेऊन येणार असणार ह्याची खात्री माझ्यापेक्षा ही जास्त विष्णु ला होत होती. विष्णु ने मला एका जागेवर घेऊन जाण्याचा आग्रह केला. मी त्याच्या हाताला धरून तिथपर्यंत घेऊन गेलो. जाता जाता मधल्या वाटेत कसलीतरी चाहूल लागली म्हणून आम्ही मागे वळलो तर पांढरट सावली उभी होती. मी दचकलो, विष्णु ही दचकला. त्या पांढरट आकृती चा चेहरा दिसत ही नव्हता. विष्णु मोठ्या धाडसाचा होता त्याने एक पाऊल पुढे टाकले आणि चेहरा बघण्याचा प्रयत्न केला. काही नाही. चेहरा दिसलाच नाही. इतकी जोरात किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी त्या पांढरट सावलीच्या मागून येत होती. पाहिलं तर मागून किंकळत हौसा धावत येताना दिसली. भयानक कळ दोघांच्याही ह्रदयात घुसली. बघता बघता हौसा जवळ आली आणि ती पांढरट सावली हौसा च्या शरीरात डोळ्यांदेखत प्रवेश्कर्ती झाली. . . . .
प्रवेश केल्यकेल्या हौसा च रूप पालटून गेलं, तिचे मोकळे केस मुक्त होऊन वाऱ्यावर विहरत होते. डोळ्यातील आग आम्हा दोघांपर्यंत पोहोचत होती.. . .इतक्यात विष्णु ने मला डोळ्यांनी "चल निघूया" अशी खूण केली. आम्ही दोघेही निघणार इतक्यात हौसा जोरात किंकळली "थांब रे . . विष्णु". दोघेही आम्ही जागीच हादरलो. माझ्या व्यतिरिक्त हौसा ला विष्णू बद्दल काहीच माहीत नव्हत, त्याच नाव देखील तिला माहीत नव्हतं ! मग तो काय प्रकार ? तिला कस माहीत त्याच नाव ? विष्णु देखील पेचात सापडले. जिला कधी पाहिलं नाही , कधी कुठला कसलाच संबंध नाही ? तिला माझं नाव कसं माहीत ? नक्कीच काहीतरी गूढता आहे हे नक्की ! हे त्याला देखील जाणवले आणि मला देखील. त्याने मला खुणेने सांगितले तो कागद बाहेर काढायला. मी तो कागद काढला आणि विष्णु च्या हातावर ठेवला. विष्णूने कागद हातात घेतला आणि त्या दोन ओळी काढून त्याने माझ्याकडे बघितले.
विष्णु आणि मी दोघांनी ही एक निर्णय घेतला आणि आम्ही दोघांनी हौसा तिथे उपस्थित नसताना एक जाड बांबू आणून तो जमिनीमध्ये खुपसला. खोलवर घातला. त्याला एक जाड दोरी बांधली. हौसा ला धरून आणले आणि त्या जाडजूड दोरीला तिला बांबूला गुराढोरांसारखे बांधून ठेवले. आम्हा ते करण्यामध्ये आनंद नव्हता पण ती आमच्या कार्याच्या आड आली असती. ते सर्व तिच्या चांगल्या साठीच करत होतो. नाईलाजाने आम्हाला तिला बांधून ठेवावं लागलं. तिला बांधून ठेवलं कारण विष्णु त्यादिवशी तिथेच राहणार होता कारण दुसरा दिवस खूप महत्त्वाचा होता. अमावस्या होती. . . .
भाग - ८ पुढील टप्प्यात
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇