💥 सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ५ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://marathighoststories.blogspot.com/2020/06/5.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
समोर पोहोचलो आणि समोर पाहिले तर हौसा ला झाडाला बांधले होते. तिने माझ्याकडे बघितले . . . . .
बांधलेले असताना तिच्या तोंडातून रक्त येत होतं. जसं की कोणी तिला मारत असावं. ती जोरजोरात विव्हळत होती. तिच्या समोर एक पांढरट सावली उत्पन्न झाली. ती सावली काहीतरी सांगू इच्छित होती. ती सावली तिच्या चेहऱ्यावर हात फिरवीत होती. अचानक चारही बाजूंनी कलकलाट उठला. जंगल हादरून गेले. चित्रविचित्र आवाज जंगलात घोळू लागले. असंख्य टापांचे भिदिस्त आवाज जंगल उठवायला लागले. काय होत होते ? काय चाललंय ? कोण आहे ते ? कसले आवाज ? काही कळेना. चारही बाजूला जंगल गर्द असल्याने कुठून कसला आवाज येत आहे हे कळत नव्हते. रात्र वाढली. काळोख वस्तीला आला होता. इतक्यात मला आजूबाजूलाही हालचाली जाणवायला लागल्या.
पाहिले तर चारही बाजुंनी असंख्य मोठे घोडे घेऊन घोडेस्वार धावत सुटले. त्यांच्या हातात तळपत्या तलवारी होत्या. काय प्रकार चाललंय कळत नव्हता ? कोण ही माणसं ? आधी कधी पाहिली नाहीत ? एखाद्या मोठ्या लढाईला निघालेल्या सैन्या सारखे सगळे इकडून तिकडे धावत होते. मोठमोठ्याने आवाज गदारोळ करीत जंगलात गस्त चालली होती. मला कळेना काय झालंय ? हे हौसा प्रकरण काय काय दाखवणार आहे काय माहित ? अस स्वतच्या मनाशी बोलत मी एका झाडाच्या पाठी लपून बसलो. त्यातले काही घोडेस्वार हे तोंडाने काहीतरी बडबडत हातातील तलवारी आकाशाकडे उंचावून धावत होते. हे सैन्य ? हे तलवारी घेऊन फिरणारे कोण ? काय चाललंय ? अचानक क्षणात सगळे नाहीसे झाले. म्हणजे ते खर होतं की सगळा भास होता. मी पाहिलं हौसा कडे. तर ती एका बाळाला घेऊन उभी राहिलेली दिसली. परत क्षणात ते बाळ नव्हतं ,ती नुसतीच उभी होती. ते सगळ खूप विचित्र घडत होतं. मिनिटाला एक दृष्य दिसतं होते तर पुन्हा मिनिटाला दृष्य बदलत होतें .भास भास आणि फक्त भास असच वाटत होतं. भासाचे कितीतरी पैलू माझ्या डोळ्यांदेखत उलगडत होते. इतक्यात सार शांत झालं. हौसा खाली कोसळली होती. मी तुला उचलले आणि झोपडी गाठली. मध्यरात्र सरते ची वेळ होती. चंद्राची कला अगदी बारीक झाली होती, म्हणजे दोन दिवसांनी अमावस्या होती. आम्ही दोघेही चादरीवर पडलो.
भरात आलेली रात्र खूप काही उकरून काढू लागली. हौसा झोपली होती. मी तिच्या पायावरच नक्षी पहिली तर ती आता थोडी थोडी पुसट होत चालली होती. रात्र रंगात असताना एक घडली अशी घटना ज्याने मला खूप काही संदेश दिले. ज्या घटनेने मला पुढचं पाऊल टाकण्याची खूण सांगितली. मी झोपलो नव्हतो नुसताच डोळे बंद करून पडलो होतो. इतक्यात एक पांढरट धूसर सावली झोपडीत प्रवेशकर्ती झाली. मला घाम फुटला. अगदी धूसर होती. एखादा धूर झोपडीत आल्यावर जसा दिसला असता तसचं ते चित्र दिसत होतं. मी दचकलो. हौसा कडे पाहिले तर हौसा चे डोळे उघडे होते. ती त्या धुराकडे बघत होती. ती धूसर आकृती अलगद जाऊन हौसा च्या मांडीवर पहुडली. हौसा ही काही न घाबरता , डलमळता शांत पडून राहिली. हौसा वरून आपला हात थोपटत राहिली जणू काही ते छोटंसं बाळ असावं. मला कळेना आता करू काय ? उठलो आणि काही अनर्थ घडला तर ? मी शांत पडून राहिलो. काहीवेळाने हौसा उठली. ती धूसर सावली पुढे आणि हौसा मागे अश्या रांगेत झोपडीच्या बाहेर बाहेर पडल्या. रानात चालत सुटल्या. तेव्हा मात्र मला उठणे भागच होते कारण रानात जाऊन काही नको ते घडले तर ? मी ही लपून त्यांच्या मागे गेलो. भूत बीत हा प्रकार काय होता हे मी पहिल्यांदाच अनुभवत होतो, त्यामुळे साहजिकच मन पूर्णतः घाबरून उठल होतं. रानात खोल खोल आम्ही जात होतो.
रान आले. ती पांढरट सावली जिकडे घेऊन जाईल तिथे हौसा चालत सुटली होती. तिची पापणी देखील जास्त मिटत नव्हती. एका वेगळयाच तंद्रीत ती चालली होती. अचानक एका जागी ती पांढरट सावली थांबली आणि ती अदृश्य झाली. हौसा एकटीच त्या जागी पुढील पाच मिनिटे उभी राहिली. मी मुद्दामच पुढे गेलो नाही. मला त्या प्रकरणात खोल जाऊन मुळ गाठायच होतं. थोड्यावेळाने हौसा अचानक त्या जागी खाली बसली आणि जोरजोरात किंचाळू लागली, हातांनी त्या जागेवर ओरबडू लागली, ती हातांनी ती जागा खणायला लागली, मोकळ्या केसांनी भारलेली , तिच्या चेहऱ्यावर प्रचंड रागीट भाव , रडविले भाव होते. भयानक अवतारात ती जोरजोरात खणत होती. मी पुढे गेलो आणि तिच्या खांद्यांना स्पर्श केला. लगेचच हौसा ने जे माझ्याकडे बघितले आणि मला जो तिचा चेहरे दिसला तो मी कधीच न विसरता येणार आहे.
डोळे लालेलाल होते, तोंडातून रक्त येत होतं , अंग भाजल्यासारखे तापून निघाल होते, गरम भट्टी सारखं भाजत होतं, केसांच्या भयंकर रूपातून ती इतकी प्रचंड विध्वंस करणारी भासत होती की माझे हात थरथर कापू लागले, डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली, चंद्राच्या मिणमिणत्या अंधुक प्रकाश दिसलेले ते तिचे रूप मला बेशुद्ध पाडू शकणारे होते. मी ठाम राहून स्वतःला सावरलं आणि तिला उचलून मी रानाच्या वाटेने परतीला निघालो इतक्यात वारा इतका जोरात घोंगावू लागला. काहीतरी भयानक होत आहे ह्याची जाणीव मला झाली. ती जागा खूप काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होती हे नक्की. तिथे झाडांवर असणाऱ्या पक्ष्यांनी चित्कार सुरू केला, कर्कश आवाजाने रान उठले, वाऱ्याने फेर धरला , घु.. घू ...करीत तो आम्हा दोघांना फेरा घेऊ लागला, इतक्यात हौसा जोरजोरात हसायला लागली , तिच्या त्या विचित्र हसण्याने तिथला जागीचा अतृप्त आणि निद्रिस्त सैतान जागा झाला असावा, इतकी वैचित्रता तिच्या हसण्यात आणि वागण्यात होती. आम्ही कसतरी करून ती जागा सोडली आणि रानातून बाहेर आलो.
बाहेर आलो तरी प्रश्नाची मांदियाळी भरलेली होतीच. मला मुळात पोहोचायचे होते. मी एकेक पाऊल त्या उद्देशानेच टाकत होतो. काय तो सोक्षमोक्ष लावायचाच होता. काल संध्याकाळी म्हांगाच्या विष्णु शी झालेली गाठ काहीतरी नक्कीच घडवणार होती , ही मला खात्री होती. रात्र पहाटेला झुकली. दुसऱ्या दिवशी तो "विष्णु" मला भेटायला येणार होता म्हणून मी सुखावलो होतो. एकट्याने त्या सगळ्याला तोंड देणं म्हणजे मरण पत्करण होतं. मला थोड हायस वाटलं होतं. झोपडीत जाऊन आम्ही पहुडलो.
अचानक मला त्या इसमाने दिलेला कागद आठवलं. काय असेल त्यात ? मलाच का दिला ? मी त्या विष्णु ने दिलेला कागद उलगडला. त्यात खूप जुनाट पद्धतीने अक्षरे काढली होती. काळपट झालेल्या त्या कागदावर कदाचित पुढचं भविष्य होतं का ? कोणास ठाऊक ? माणूस आहे तो क्षण सांगू शकतो , भूतकाळातील क्षण सांगू सांगतो पण काय गंमत पुढच्या मिनिटाला काय घडणार ह्याचा अंदाज लावू शकत नाही. हा खेळ सारा कोणाचं आहे ? माणसांच्या कर्माचा की परमेश्वराचा ? कोण जाणे , मी त्या कागदावरील अक्षरे न्याहाळू लागलो आणि वाचण्याचा प्रयत्न करू लागली.. त्यातला एकही शब्द मला कळला नाही कारण ती भाषा गोंडी जमातींची होती. त्याचा अर्थ विष्णु च मला समजावू शकत होता. त्यात शब्द होते. . . . .
"साता बाव दश गोलीला , पुंगार जी भूम"
"अद शिदुर डांबी एटी, रगु सियाना नत्तुरी"
(भाग - ७ उद्या संध्याकाळी ६ वाजता पोस्ट होईल )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇