💥 सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 6.30" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ४ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://marathighoststories.blogspot.com/2020/06/4.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
तिथून दूर उंचावर गेल्यावर मी पाठी वळलो तर , दिसली झोपडीच्या दरात उभी असलेली डोळ्यात पाण्याची भव्य लाट ओसरती ठेवणारी "हौसा"
मी पुढे मार्गस्थ झालो.. . . . .
मी बस स्थानाजवळ उभा राहिलो असताना अचानक एक दिव्य चमक माझ्या अंतरंगात उठली. सांज पूर्ण झाली होती. सुर्य पूर्ण डोंगराळ प्रदेशात लुप्त झाला होता. कालाय सावल्या हलत गावाला , डोंगर वस्तीला झुलवत होत्या. अश्यातच मला अचानक आठवली तो नक्षी जी मी येताना त्या झाडापाशी पहिली होती.अग सुरू झाले सगळे आठवणींचे युद्ध. एकेक गोष्टी अश्या वर यायला लागल्या आणि ढवळून काढू लागल्या सगळ्या संपर्काला. एकमेकांशी गुप्त जुळणी असावे असे ते सगळे मुद्दे माझ्या मनाच्या आणि मेंदूच्या पटलावर धाडधाड करून नाचू लागले. आठवत गेलो घडलेल्या गोष्टींची नियमावली. प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागलो होती. मला काय झाले कोणास ठाऊक , मी आहे त्या अवस्थेत पुन्हा माघारी फिरलो आणि हातातील बॅग तशीच करकचून मुठीत आवळून धावत सुटलो. मला पूर्ण अंधार होऊ द्यायचा नव्हता. मला ती नक्षी बघायची होती. मी ज्या वेगाने धावत सुटलो त्या अंदाजाने मी पुढील पाच मिनिटांत त्या झाडाजवळ पोहोचलो आणि बॅग बाजूला टाकून मी खाली उपड्या मांडीवर बसलो. अंधार बऱ्यापैकी झालाच होता. माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी प्रयत्न केला तरी सुध्दा ती नक्षी मला व्यवस्थित दिसू शकली नाही. . . .
सांज काळवंडून आली.. ..
मला पर्याय नव्हता , पुन्हा मला झोपडीत जावेच लागले. हौसा बसलेली होती चुली जवळ. ती संपूर्ण तुटली होती. डोळ्यात आर्तता पाण्याच्या रूपाने वहावत एकटक झोपडीच्या दाराकडे बघत बसली होती. मी पोहोचलो तर त्या क्षणी इतक्या असीम आनंदाच्या ओघाने ओझरत येऊन मला बिलगली. तिच्या हाताच्या घट्ट मिठीत कळत होते की, तिच्या आतमध्ये प्रेमाची कितीतरी मोठी सुखाची व्याख्या होती. मी आत गेलो. मी तिला त्या झाडाजवळ असणाऱ्या नक्षी बद्दल सांगितले नाही कारण, तीच इतकी विचित्र वागत होती तेव्हाच्या एकंदरीत काळात तर तिच्याकडून आणखी काही घटना घडायची वात मी पाहू शकत नव्हतो. ती रात्र पुन्हा आमच्या प्रेमाने नाहून निघाली. एकमेकांना बिलगून रात्र कधी संपली कळलेच नाही. पहाट झाली. . . . .
सुर्य आनंदून आपल्या कर्तव्याला आला. माथ्यावर येतंच उबदार किरणे अंगाला सुखाऊ लागली. मी तडक निघालो . मला ती नक्षी बघायची होती. हौसा ने जिथे जाऊन हातांनी कसलीशी नक्षी काढली होती, ती नक्षी मला खुणावत होती. काहीतरी गूढ आहे ,हे ओरडून ओरडून सांगत होती. मी झाडांना बाजूला सारत तिथे पोहोचलो. खाली बसलो. ती नक्षी डोळ्यांत भरली. सहा मोठे दगड किंवा वर्तुळ गोलाकार अवस्थेत काढले होते. प्रत्येक गोलावर आडवी रेघ मारली होती. त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक मोठा गोल होता. त्या गोलावर फुल्ली मारली होती. मी थोड आणखीन निरखून पाहिले तर मला दिसले ते एक वास्तव. त्या मधल्या गोलाच्या वरच्या फुल्लीच्या आत होता एक अर्धा चंद्र. माझे विचार मला दूर घेऊन आठवणीच्या गर्भात दामटू लागले. तिथे मला सापडले एक सत्य. ते म्हणजे त्या मुख्य गोलात असणारा तो अर्धा चंद्र जश्याचा तसा हौसा च्या पायावर होता. मग हौसा च्या पायावर असलेला आणि ह्या नक्षीच्या आता असणाऱ्या अर्ध्या चंद्राचा काय संबंध असावा ?
मी तिडकिने झोपडी गाठली. मला विचारांनी घेरले होते. हौसा झोपडीत अशीच पडली होती. मी तिला उठवले आणि विचारले. .
मी - हौसा तुझ्या पायावरच्या त्या अर्ध्या चंद्राचं काय रहस्य आहे ?
हौसा - अद अल्ली कस्कना !
( मला कळेना तिला काय बोलायचं आहे. मग खूप हातवारे करून करून मला अर्थ कळला )
मी - अच्छा . . . उंदीर चावला होता.
हौसा - हा . . . !!
मी - पण उंदीर चावण्याचा आणि ही नक्षी असल्याचा काय संबंध ??
हौसा - ते मला बी ठाव ना ! मी लहान पासून पाहत हाय ती खूण ! येक माणूस बोलताना पता हाय !
तिला जरी माहीत नसला तरी मला खात्री होती की त्या मागे नक्कीच काहीतरी गाभार्थ आहे. मला त्याचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे होतेच. इतक्या सहज नसत एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असणारी खूण तशीच कुठेतरी भयानक प्रकरणा मध्ये असणं. काय करावे ? कसे पोहचावे या सगळ्याच्या अंती. दिवसभर विचार करून करून मी थकलो शेवटी रात्री गाढ झोप लागली. मध्यरात्र झाली. मला जाग आली तर नेहमीप्रमाणे हौसा नव्हती. मी बाहेर पडलो. भयानक रात्री घोर जंगलात बाहेर पडणं जस की मला सवयीचं झालं होतं. मी बाहेर पडलो तर संपूर्ण जंगल पालत घातलं. जवळ जवळ अर्धा तास शोध घेतला तेव्हा त्याचं झाडाखाली हौसा मला बसलेली दिसली जिथे ती नक्षी काढली होती. पुन्हा हौसा तेच काम करीत होती. हातांनी मोठमोठ्याने काहीतरी ओरखडून काढीत होती. मी स्तब्ध होऊन काय काढते ते पाहू लागलो. कदाचित मला काही नवीन पाहायला मिळाले तर माझ्या शोधात मला त्याचा फायदा होईल.. . .
थोड्यावेळाने हौसा उठली आणि केस मोकळे करून ती जंगलाच्या वाटेने पुन्हा झोपडीकडे निघाली. मी स्तब्ध राहिलो आणि ती थोडी दूर जाण्याची वाट पाहू लागलो. ती थोडी दूर गेल्यावर जंगलात दिसेनाशी झाली. मी पुढे सरसावलो आणि त्या झाडाखाली काय तयार झाले आहे ते पाहिले तर तिथे मला दिसली ती दोन अक्षरं. मी निरखून पाहिले तर होती "वि" आणि "ष्णु". अर्थात "विष्णु". प्रश्न हा होता की हौसा ना शिकलेली मुलगी. तिला ही अक्षर कशी माहीत. नक्कीच हे तीच काम नाही , कोणीतरी तिच्याकडून हे घडवू पाहत आहे किंवा त्या सगळ्या प्रकरणात खोलवर जाण्यास मला सहाय्य करीत असावं. पण कोण ? का ? कश्यासाठी ? हे सगळे प्रश्न एकावर एक वरचढ करू लागले. मी तिथून काढता पाय घेतला. सरळ झोपडी गाठली. आत बघितल तर हौसा चुलीजवळ बसली होती. पोहोचलो , आत गेलो पण काही झालं अस दाखवलं नाही. मी मला काय करायचं ते ठरवलं होतं आणि झोपी गेलो. . .
सकाळ झाली. मी तडक निघालो. जिथे मी मोबाईल चार्ज करायला गेलो होतो तिथे जावं आणि काही हाताला लागतंय का ते पाहायचं होतं. मी निघालो लगेचच पोहोचलो. जिथे मी मोबाईल चार्ज केला तिथे जाऊन सहज बसलो. त्या गावबद्दल ? तिथल्या माणसांबद्दल ? जुन्या काही घटनांबद्दल ? इतिहास बद्दल ? काही हाताला लागत नव्हते. माझ्या मनात अचानक एक नाव आलं , त्याविषयी मला जाणून घ्यायचं होतं.
मी - "विष्णु" नावाचा काय संबंध आहे हो ?
माणूस - तस काय नाय ओ. असल काय बी कोण बी नाय !!
इतक्यात बाजूला बसलेला एक अगदी काठीवाला म्हातारा कुरबुरीत आवाजात म्हणाला
म्हातारा - म्हांगाचा "विष्णु" . . . . !!
मी चमकुन उठलो. इतका जुन म्हातारा पण कोणी नाही उत्तर दिले ते त्याने दिले होते. मी त्याच्याशी पुढचे दोन तास सल्लामसलत करीत राहिलो. मला बरच काही गोळा करायचे होते. पुरेशी माहिती गोळा करून मी सरळ निघालो म्हांगाचा विष्णु ला भेटायला. त्या गावापासून साधारण पाऊण तास अंतरावर "म्हांग" नावाचे गाव होते. त्या गावात होता "विष्णु". . . . . !!
त्याला भेटुन मी पुन्हा गावात आलो. त्या विष्णु ने मला एक कागद दिला होता. जुनाट खूप काही वर्षांपूर्वी चा कागद होता तो. झोपडीत आलो. हौसा नव्हती. मला येईपर्यंत सांज झाली होती. पूर्ण काळोख पसरला. इतक्यात जंगलातून खोल हौसा ची किंकाळी आली. मी आहे त्या अवस्थेत तिथे धावत सुटलो.. . . . समोर पोहोचलो आणि समोर पाहिले तर हौसा ला झाडाला बांधले होते. तिने माझ्याकडे बघितले . . . . .
भाग - ६ पुढील टप्प्यात
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏