"हॉटस्पॉट" (लघुकथा)
लेखक - अक्षय शेडगे
"यार, काय हे दलींदर नेटवर्क, किती वेळा फ्लाईट मोड चालू करून बंद करतोय तरी नेटवर्क नाही...."
निशांत खूप वैतागला होता... हे रोजच होत.. कधीच त्याला नेटवर्क भेटत नव्हता...
खाली पार्किंगमध्ये थांबलं, तरच नेटवर्क... शेवटी वैतागून झोपला...
पुढच्या दिवशी दुपारी पार्किंगमध्ये थांबला होता... तेव्हा शेजारचा कुणाल आला... कुणालच्या आणि निशांतच्या रूमची बाल्कनी शेजारीच होती... एकमेकाला चिटकून दोन्ही बाल्कनी होत्या...

"काय रे निशांत, सारखं काय पार्किंगमध्ये बसलेला असतोस भाई?"
"अरे भाई, काय नाय... आमच्या घरात माझ्या सिम कार्डला नेटवर्क नाही... अजून मला १८ वर्ष पूर्ण नाही म्हणून मी माझ्या नावावर नवीन सीम कार्ड घेऊ शकत नाही... फादरला बोललो तर मलाच ओरडत बसेल, कशाला नको ते उद्योग, हे आणि ते.... " त्रस्त निशांत बोलला...
"अरे एवढ काय मग? मला माझ्या बाल्कनीमध्ये फुलं नेटवर्क असतो... मी तुला हॉटस्पॉट देत जाईल रात्रीच... " कुणाला निशांतला बोलला...
"अरे भाई, कशाला तुला त्रास? तुला पण डेली लिमिट असेल ना.. उगच माझ्यामुळे तुझ नको संपायला.." निशांतच वाक्य चालूच होते इतक्यात कुणाल बोलला...
"अरे, एवढ काय नाय रे.. मी तुला रोज रात्री १० वाजता हॉटस्पॉट देत जाईल... मला रोज ३ जिबी डाटा असतो... मी नाही वापरत एवढा... तू वापर... मी न चुकता हॉटस्पॉट देत जाईल भाई.. चल जातो आता" अस बोलून तो निघून गेला...
एकंदरीत निशांत खुश होता...
कुणालने बाल्कनीमध्ये येऊन निशांतला पासवर्ड सांगीतला... आणि मग काय निशांतच खूप मोठं टेन्शन गायब झालं होत... कुणाल बाल्कनीमध्येच झोपायचा रोज.. त्यामुळे निशांतने त्याचा बाल्कनीच दार उघडं ठेवलं की त्याला फुलं स्पीड भेटायचा... कुणाल तसच हॉटस्पॉट चालू ठेवून झोपायचा...
आता हे रोजच झालं होत...

१ महिन्याने... निशांत सकाळी उठला.. तर त्याला जरा गोंधळ ऐकू आला...
त्याने बाहेर जाऊन आईला विचारलं तर उत्तर ऐकुन त्याच काळजात धस झालं...
कारण आई म्हणाली की,
"अरे आपल्या शेजारचा कुणाल, काल फाशी घेऊन मेला रे.." अस बोलून त्याची आई शेजारच्या घरात निघून गेली...
निशांतने सगळी अंतयात्रा बाल्कनीमधूनच पहिली... तो खूप घाबरला होता...

असच ४-५ दिवसांनी निशांत झोपला होता.. २ च्या आसपास त्याचा फोन वाजू लागला... नोटिफिकेशन ची रिंग सारखी ऐकू येत होती...
त्याने उठून पाहिलं तर त्याला सोशल मीडियावर मित्रांचे मेसेज आले होते.. पण त्याच नेट बंद होत... मग???
त्याने उठून पाहिलं तर त्याला सोशल मीडियावर मित्रांचे मेसेज आले होते.. पण त्याच नेट बंद होत... मग???
त्याने पाहिलं तर त्याच वायफाय कुणालच्या हॉटस्पॉट ला कनेक्ट झालं होत...
हे बघून निशांतची झोप उडाली... त्याने फोन स्विच ऑफ केला...
हे बघून निशांतची झोप उडाली... त्याने फोन स्विच ऑफ केला...
आणि पुढच्या दिवसापासून त्याला रोज १० वाजता कुणालाच हॉटस्पॉट कनेक्ट होऊ लागलं... त्याचा वायफाय कधीच चालू नसायचं.. तरी आपोआप हॉटस्पॉट कनेक्ट व्हायचं...
त्याने चौकशी केली तर त्याला समजलं की, कुणालचा फोन त्याच्या घरच्यांनी कधीच फोडून टाकला होता कारण त्याच्या फोनमुळे त्याने मुलीशी ओळख करून नंतर आत्महत्या केली अस त्यांना वाटायचं...
त्याने चौकशी केली तर त्याला समजलं की, कुणालचा फोन त्याच्या घरच्यांनी कधीच फोडून टाकला होता कारण त्याच्या फोनमुळे त्याने मुलीशी ओळख करून नंतर आत्महत्या केली अस त्यांना वाटायचं...
मग त्याला हॉटस्पॉट कस भेटायचं..?
आणि शेवटी त्याला एक वाक्य आठवलं...
"मी तुला रोज रात्री १० वाजता हॉटस्पॉट देत जाईल.... मी न चुकता हॉटस्पॉट देत जाईल"..
कुणालने गेल्यानंतरही त्याच सांगणं खर केलं होत... शेवटी घाबरून निशांतने त्याच्या घरी हे सांगितल... मग त्याच्या घरच्यांनी हे सगळं डोळ्यांनी बघितल आणि त्याचा जुना फोन कोणाला न विकता फेकून दिला.. आणि त्याला नवीन फोन घेऊन दिला नवीन सीम कार्ड सोबत... नंतर त्याला असा त्रास झाला नाही...
समाप्त...