पहिल्यांदा अनुभवलेला खराखुरा अनुभव
एक वर्षापुर्वी मी वास्तूशास्त्राबरोबरच हिलींगचा क्लास पुर्ण करून प्रॅक्टीस चालू केली होती , कारण सततच्या प्रॅक्टीसमुळेच व्यक्तिचं अनकाॅन्शस माईंड विकसित होतं असा आमच्या गुरुंचा सल्ला होता.
असंच एके दिवशी आमच्याच एका जवळच्या पाहुण्यांचा काॅल आला ज्यांच्या मावस बहिणीसाठी मी माझ्या मेहुण्याचा बायोडाटा त्यांना सहजच पाठवला होता आणि पत्रिका मस्त जुळल्यामुळे त्यांनी मला आज सायंकाळी 8:00 वाजता माझ्या सासर्यांचं घर पाहायला येणार आहोत म्हणून अचानक सांगितलं पण शुभ गोष्टी घडण्यासाठी उशीर कशाला म्हणून मी माझ्या सासरवाडीला फोन करून तयारी करायला सांगितली पण त्यांनी मध्यस्थ म्हणून मला व माझ्या पुण्यातील एका साडू लाही यायचा अट्टाहास केला. मुलीकडचे पुण्यातून येणार होते आणि माझी सासरवाडी ही भोरची असल्यामुळे सहाजिकच त्यांना यायला दीड तास तरी लागणार होता म्हणून मी माझ्या साडूना फोन करून जाण्याचं नियोजन केलं पण कितीही उशीर झाला तरी मुक्काम न करता माघारी यायचं हे ठरवलं.त्यानुसार माझे साडू हडपसर वरून सासवडला येऊन आम्ही तसंच टुव्हिलरवर कापूरहोळमार्गे भोरला जाणार होतो.यानुसार मी तयारी करून बसलो.नंतर साडू आल्यानंतर आम्ही साधारण सायं.7:00 वा सासवडहून निघालो पण निघताना मी प्रोटेक्शन म्हणून माझा वास्तू-व्हीजीटच्या वेळी नेहमी बरोबर घेतो तो ब्लॅक टर्मलिन क्रीस्टाॅल बरोबर घेतला..
भोरला आम्ही साधारण 8:30 पर्यंत पोचलो पण पाहूणे अजून काही आलेले नसल्यामुळे आमच्या सासर्यांनी स्वयंपाकाचे नियोजन केले तोपर्यंत आम्ही नातेसंबंध व लग्नासाठीच्या अंतर्गत बारिकसारीक गोष्टींवर चर्चा केली तसेच मधेआधे पाहुणे कुठंशी आलेत याची फोनवर माहिती घेत होतो.
पाहुणे साधारण 9:30 वाजता आले कारण त्याचं पाषाणमधे एक नामांकित काॅलेजसमोर काॅफी शाॅप असल्यामुळे काॅलेज सुटल्यानंतरच ते निघाले होते आणि ते आल्यानंतर पहिलं जेवण उरकून गप्पा मारायचं ठरलं....त्यानुसार आम्ही सर्वजण जेवण उरकून साधारण रात्रौ 10:30 वा गप्पा मारायला बसलो. पाहुणे पुण्यातले असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने रात्रीचे 10-11ची वेळ ही सामान्य होती पण आम्हाला टुव्हिलरवर जायचं असल्याने आम्ही दोघे साडू-साडू चिंताग्रस्त होतो पण आम्ही मध्यस्थ असल्यामुळे बैठक मधेच सोडून जाणेही बरोबर नव्हते आणि मुक्काम करायचीही आमची तयारी नव्हती त्यामुळे कितीही उशीर झाला तरी माघारी जायचचं असं पुन्हा ठरवून आम्ही बिनधास्त झालो.साधारण रात्रौ 11-45 ला बैठक संपवून पाहुणे मोठ्या गाडीने पुण्याकडे रवाना झाले मग आम्हीही जाण्यासाठी निघालो पण आमच्या सासरवाडीकडच्या लोकांना आम्हा दोघांचे नियोजन माहिती नसल्यामुळे ते मुक्काम करण्यासाठी हट्ट करू लागले. शेवटी 12 चा ठोका चुकवून निघण्याचं सर्वानुमते ठरलं म्हणून लेडिजचं जेवण होईपर्यंत स्थळाबद्दल गप्पागोष्टी करत बसलो.साधारण 12:32 वाजता आम्ही निघालो तरीही आमचे सासरे आम्हाला ईतक्या उशीरा जाऊ नका...सकाळी जा म्हणून विनवू लागले पण आम्ही त्यांचं न ऐकता टुव्हिलरवर निघालो.
माझे साडू गाडी चालवित होते तर मी मागे बसलो होतो कारण मी साधारण 30-40 च्या स्पीडने गाडी चालवतो तर साडू 80-90 च्या ...त्यामुळे ते सोईस्कर असल्यामुळे तेच गाडी चालवित होते...पण आमची गाडीवरही मेव्हण्याच्या लग्नाविषयी सकारात्मक चर्चा चालली होती आणि रस्ताही चांगला असल्यामुळे निवांत 30-40 च्या स्पीडने चाललो होतो.तेवढ्यात माझी नजर वरती गेली..एक मोठा पक्षी जो गिधड किंवा गरूड याच्यासारखाच होता ..तो आमच्या गाडी भोवती सलग तीन वेढे घालून निघून गेला...लगेच मी ही गोष्ट साडूंना सांगितली पण त्यांनी हा योगायोग समजून त्याकडे दुर्लक्ष केलं...मीही नंतर त्याकडे दुर्लक्ष करून विषय सोडून दिला..आता आमची गाडी भाटकर धरणाजवळ आली होती आणि समोरून एक फोर व्हिलर येत होती..आणि आम्हीही निवांत गप्पा मारत चाललो होतो. समोरची फोरव्हिलर व आमच्यात साधारण 30 मीटरचं अंतर असेल तेवढ्यात रस्त्याच्या उजव्या बाजूने एक कुत्रा किंवा कुत्र्त्रासारखा प्राणी अतिवेगाने रस्ता क्राॅस करून डाव्या बाजूच्या झाडीत शिरला पण त्याला मोठमोठाले पंख होते आणि फडफड करतच तो प्राणी झाडीत शिरला होता..अचानक समोरची फोरव्हिलर आमच्यासमोर येऊन थांबल्यामुळे आम्हीही थांबलो. त्याने काच खाली घेतली .त्यावेळी त्याच्या गाडीत त्याच्या घरातील काही लेडिजही होत्या... त्याने। आता जे पाहिलं त्याच्याबद्दल खातरजमा केली तसेच आम्हीही जे समोर पाहिलं त्याबद्दल त्याच्याशी शहानिशा केली तेव्हा जे पाहिलं ते खरं होतं असं कळल्यानंतर आम्ही माघारी न फिरता पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता.
आता आम्ही भाटघर धरणापासून 2 किमी पुढे आलो होतो आणि घडल्या प्रसंगाबद्दल निवांत गप्पा मारत 30-40 च्या स्पीडनेच होतो...तेवढ्यात मला मनात काहीतरी भितीदायक वाटू लागल्याने मी साडूंना पुढे 3 किमी पर्यंत जास्तीत जास्त स्पीडने गाडी चालविण्याची विनंती केली आणि त्यांनीही गंमत म्हणून साधारण 80-90 च्या दरम्यान गाडी घेतली तसेच "तुम्ही बिनधास्त राहा" असं मलाच बजावलं.
साधारण 100 मीटरवर गेल्यानंतर मला अतिशय भितीदायक वाटू लागलं आणि छातीतही धस्स होत असल्यानं का कुणास ठाऊक मी साडूंना स्पीड अजून वाढविण्याची विनंती केली आणि त्यांनी गाडी डायरेक्ट 100 स्पीड च्या आसपास नेली. आता आम्ही नेकलेस पाॅईंटच्या अलिकडे 2 किमी होतो आणि रस्त्याच्या एकदम मधोमध गाडी होती त्यावेळी साधारण एक-सवा एक वाजले होते....दुतर्फा पुर्ण अंधार.
तेवढ्यात आमच्या डाव्याबाजूच्या झाडीतून एक शाळकरी मुलगा पळत आमच्या अंगावर आला पण आमचं स्पीड फारच जास्त असल्यामुळे आणि तो अचानकच सेकंदात अंगावर आल्यामुळे आमच्या साडूने रागाच्या किंवा भितीच्या भरात त्याला एक शिवी हासडली व गाडी न थांबवता आम्ही पुढे निघून गेलो. पण मी मागे वळून पाहिलं असता त्याठिकाणी मला काहीही दिसलं नाही.
तो मुलगा साधारण चौथी-पाचवीतला..आणि शहरी वाटत होता..दिसायला एकदम गोरापान... डोक्यावर कॅप, पायात साॅक्स व बूट, हाफ चड्डी, पाठीला स्कूलबॅग, गळ्यात वाॅटर बॅग होती आणि तो आम्हाला लिफ्ट मागतात तसं हातवारे करत अंगावर आला होता पण तो "लीफ्ट..लीफ्ट" न म्हणता " जबलो- जबलो..जबलो...जबलो...मोठ्याने ओरडतच पळत आमच्या अंगावर आला होता...पण त्याचं स्पीड एवढं होतं की डाव्या बाजूने आम्हाला क्राॅस येऊनही तो आमच्या गाडीपर्यंत येऊन पोचला होता.पण मला हात लावणार तेवढ्यातच झटका बसावा तसा त्याने स्वतःला मागे खेचलं होतं..(वेळ रात्रौ 1 ते 1:20 च्या दरम्यान)
आता मात्र माझ्या साडूंची हालत फारच डेंजर झाली होती कारण..त्यांचे केस भितीने उभे राहिलेले दिसत होते आणि ऐन थंडीतही त्यांच्या अंगावर घामाच्या धारा वाहत होत्या..पण आता ते स्पीड काही कमी करत नव्हते पण मी त्यांना बिनधास्त करून त्यांना शांत केलं.पण ते काही माझ्याबरोबर पुढे यायला तयार होईनात..शेवटी आम्ही दोघांनी आमच्या नसरापूरजवळच्या एका गावातील आमच्या तिसर्या साडूकडे राहायचं ठरवून तेथेच मुक्काम केला..
आणि त्यानंतरही काही दिवस आम्ही ...तेथील आजूबाजूच्या गावात त्या मुलाविषयी माहिती घेतली असता असं लक्षात आलं की तो मुलगा गावातील बहुतेक लोकांना आम्हाला जसा दिसला होता त्याच अवस्थेत दिसला होता... नंतर काही दिवस आम्ही जबलो ..जबलोचा अर्थ शोधत होतो पण अजूनही त्याचा अर्थ कोणत्याच भाषेत आम्हाला सापडला नाही..कोणाला त्याचा अर्थ माहिती झाल्यास नक्की कळवावे.

धन्यवाद!