कुंभारवाडी...….आठवणीतील
कथा पूर्णतः काल्पनिक आहे. केवळ मनोरंजन करणे एवढाच उद्देश……….
आमची चांडाळचौकडी म्हणजेच…….. नितीन,सचिन,अमोल,राहुल,विवेक आणि विकी असे आम्ही सहा मित्र, पुण्यात नोकरी निमित्ताने सोबत राहायला एकत्र होतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या नोकरी आणि कामात दिवसभर व्यस्त असायचे.शनिवार आणि रविवार हक्काची सुट्टी असायची.शनिवारी मागील आठवड्यात राहिलेली काम पूर्ण करायची ही नेहमीचीच बाब.आणि रविवार हा मस्त पैकी कुठे तरी फिरून येण्याचा दिवस ठरलेला.पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमी म्हणतो आणि ते खरे देखील आहे.पुण्यात असल्यापासून आमच्या ग्रुप ने पुण्याजवळील सगळी प्रेक्षणीय स्थळ पालथी घातली होती.बरेच दिवस सगळे ठरवत होते की एका रविवारी काही तरी मोठे प्लॅन करायचे आणि काही तरी वेगळे.नितीन वयाने जरी आमच्या बरोबरचा असला तरी तो सगळ्या ग्रुप ला मोठ्या भावा सारखा नेहमी सांभाळायचा.सचिन आणि अमोल नेहमी नितीनचं म्हणणे समजून घेऊन ऐकून घेत असत.राहुल आणि विवेक ऐकून तर घेत असत पण आपलं मत आपली आवड मोकळे होऊन सांगत असत.आणि विकी नावा प्रमाणे, जसे नाव छोटे तसे प्रत्येक गोष्टी मध्ये शॉर्टकट शोधणारा.ऐकून घेणे तर त्याला खूप कमी माहीत होते.
असेच एका शुक्रवारी ऑफिस मधून सगळे घरी आले.रात्रीचे जेवण सुरू असताना नेहमी प्रमाणे विषय निघाला,या वेळेस रविवारी कुठे जाणार याबद्दल.प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने जागा सुचवण्याचे योगदान दिले.आणि या वेळेस एक अजून दुग्धशर्करा योग जुळून आला होता. तो म्हणजे या वेळेस सोमवारी सार्वजनिक सुट्टी पण येणार होती, म्हणजे चक्क दोन दिवस मिळणार होते. जर नीट प्लॅन केले तर मस्त पैकी एक मोठी आणि दूर फिरून येण्याची हौस पूर्ण होणार होती. पण आमच्या मधील कुणालाच पुसटशी ही कल्पना नव्हती की या वेळेस जे काही आमच्या सोबत होणार होते,ते काही तरी भयंकर असणार आहे.
जागा ठरली पुण्याजवळ भीमाशंकर येथे जाऊन मुक्काम करून परत दुसऱ्या दिवशी आजूबाजूला असलेल्या जंगलात भटकंती करायची.सगळे एकदम तयार झाले,कारण यावेळेस भरपूर वेळ मिळणार होता फिरण्यासाठी.शनिवारचा दिवस फक्त तयारी करण्यात गेला.नितीनने सगळी सामानाची यादी तयार केली सचिन आणि अमोल हे यादीतील सामान घेण्यासाठी बाजारात गेले.तरुण मंडळी म्हटली म्हणजे मोटरसायकल ही येणारच त्याप्रमाणे राहुल, विवेक आणि विकी सगळ्या बाईक नीट आहेत की नाही पेट्रोल, हवा सगळे नीट बघून घेत होते. दिवसभर प्रत्येकजण आपण केलेल्या कामच एकमेकाला सांगत होते. रात्रीचे जेवण सुरू असताना सुद्धा त्याच गप्पा कोणत्या रस्त्यावरून जाणार, कुठे थांबायचे,पैसे किती सोबत लागणार, औषधी,छोटा टेंट आणि बरच काही सोबत नेण्याच्या वस्तू बद्दल गप्पा सुरु होत्या.रात्री लवकर झोपनार होतो, कारण सकाळी सकाळी निघायचे होते म्हणजे उशीर नको व्हायला.पण झोप कुणालाच येत नव्हती,प्रत्येकजण उद्या आपण काय काय करणार आहोत याची जणू यादीच करत होता मनामध्ये.असेच विचार करता करता प्रत्येकाला केव्हा झोप लागली हे त्यांना देखील कळले नाही.
रविवारी सकाळी बरोबर पाच वाजता नितीन ला जाग आली तशी त्याने बेल लावून ठेवली होती जाग येण्यासाठी.त्याने सचिन आणि अमोल ला आवाज दिला तसे ते ही उठले,प्रत्येकजण पटापट तयारी ला लागले,नंतर राहुल,विवेक आणि विकी ला उठवले.विकी साहेब तर आपल्याच स्वप्न दुनियेत हरवले होते उठल्या नंतर सुद्धा.पावसाळ्याचे दिवस होते रात्रीच खूप पाऊस पडून गेला होता.हवेत मस्त पैकी गारवा…..अहो गारवा कसला थंडीच म्हणावी लागेल….. पसरला होता. सगळे लवकर तयार झाले आणि मग ग्रुप ने प्रवासाचा श्रीगणेशा केला.जो त्यांना हवा तसा कधीच होणार नव्हता पण याची त्यांना कल्पना नव्हती.एका बाईक वर सचिन आणि अमोल,दुसऱ्या बाईक वर राहुल आणि विवेक,आणि एका बाईक वर नितीन आणि विकी.विकीला मुद्दाम नितीन सोबत बसवले होते जेणे करून तो जास्त आगाऊपणा करणार नाही. तासा तो नितीन ला थोडा घाबरत पण असायचा. सगळी मंडळी निघाली देवाचे नाव घेऊन.सगळ्यात पुढे नितीनची बाईक त्यामागे सचिनची बाईक आणि सगळ्यात शेवटी राहुलची बाईक असे ठरले होते आधीच.कोणीही जास्त जोरात चालवणार नाही हे आधीच बाजावले होते सगळ्यांना, कारण पावसाळ्याचे दिवस होते बाईक घसरून पडण्याची भीती जास्त होती. सगळ्यांनी रेनकोट आधीच अंगावर चढवून घेतलेला होता जेणे करून मध्ये कुठे पाऊस लागला जरी तरी कुठे थांबावे लागणार नाही तेवढाच वेळ वाचेल सगळ्यांचा.प्रत्येकाची बाईक जणू हवे सोबत गप्पा मारत पुढे धावत होती.अजूनही उजाडले नव्हते अंधार तसाच होता.सकाळची वेळ तशी देवाचे नामस्मरण करण्याची असते.पण आजची सकाळ कोण जाणे ग्रुप मधील प्रत्येकाला वेगळी वाटत होती.आणि प्रत्येकाने तसे बोलून पण दाखवले होते.रस्त्यावर भयाण शांतता पसरली होती,नाही तर या वेळे पर्यंत चाहवाले दुधवाले रस्त्यावर असतात असं आमचे मत होते.पाऊस पडून गेला होता वातावरणात मस्त पैकी गारवा पसरला होता,सगळ्याची मस्त चहा घेण्याची इच्छा होत होती.एका टपरीवर चहा मिळेल असे वाटले आणि आम्ही सगळे तेथे थांबलो.आत्ता पर्यंत आम्ही बरेच अंतर चालून झाले होते आणि पुढे अजून खूप वेळ लागणार होता.आम्ही एका टपरीवर एक वयस्क आजी बघितल्या,त्यांना सहा कप मस्त पैकी आल्याचा चहा बनवण्यासाठी सांगितला.रिमझिम पावसात नाही म्हटले तरी आम्ही सगळे भिजलो होतो आणि त्यामुळे सगळ्यांना कुडकुडी भरली होती हे एव्हना त्या आजीच्या लक्षात आले होते.त्यांनीच प्रश्न केला,बाळांनो कुठे निघाला आहात…..तसे लगेच विकीने आम्ही भीमाशंकर ला जात आहोत आणि आज तिथेच मुक्काम करणार आहोत लगेच सांगून टाकले.आजीने भीमाशंकर….मुक्काम असे ऐकले आणि जणू तिला काही तरी प्रश्न पडला असा चेहरा तिने केला.मला(सचिन) त्या आजीचा चेहरा बघून जरा शंका आली.म्हणून न रहावले गेल्यामुळे मी आजीला स्पस्ट विचारले,आजी काय झाले तुमचा चेहरा असा काळजीत असल्या सारखा का दिसतोय.विकीला वाटले हा सचिन नको ते प्रश्न करतो आहे त्या आजीला. पण माझा प्रश्न ऐकून नितीन,राहुल,अमोल हे सगळे मग आजीला विचारू लागले …...आजी काय झाले कसला विचार करता आहात तुम्ही.सगळ्यांनी एकदम विचारल्यामुळे जणू त्या खडबडून जाग्या झाल्या होत्या.आजी म्हणाल्या, अरे मुलांनो तुम्हाला भीमाशंकर ला जायला आणि तिथे मुक्काम करायला दुसरा कोणता दिवस नाही मिळाला का.आम्ही सगळे तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होतो तिने ते पहिले तसे ती पुढे म्हणाली…..अरे आज अमवसेची रात्र आहे,आणि तुम्ही सगळे दर्शन घेऊन तिथे मुक्काम करणार आहात रात्रीचा त्या जंगलात.अमोल लगेच म्हणाला…..आजी बस एवढेच ना आम्ही काही घाबरत नाही असं काही ऐकून.आजी पुढे म्हणाली अरे बाळांनो त्या रस्त्यावर बरेच अपघात झालेले आहेत. बरेच लोक संध्याकाळी सात नंतर त्या मार्गाने येणे सुद्धा टाळतात.दूर दूर पर्यंत कुठेच गाव लागत नाही.फक्त जंगलच जंगल आहे.तुम्ही सगळे दिवसभर दर्शन करा थोडे फिरून या पण संध्याकाळी सात वाजण्याच्या आधी तो जंगलाचा भाग सोडून दिलेला बारा राहील असे आजी खूप चिंतेने सांगत होती.आणि हा तिथे एक गाव आहे ..…… आजी काही सांगणार तोच राहुल विवेक आणि विकिला वाटले झालं लागली पानोत्ती आपल्या ट्रिप ला सुरू होण्या आधी,ते तिघे जरा चिडक्या आवाजात त्या आजीला म्हणाले …..ठीक आहे ठीक आहे, घेऊ आम्ही स्वतःची काळजी तुम्ही चिंता नका करू आमची.तशी ती आजी पण म्हणाली ठीक आहे बाबांनो मला तुमची काळजी वाटली म्हणून मी बोलले.या म्हातारीने या संपूर्ण आयुष्यात बरेच काही ऐकले आहे आणि बघितले पण आहे म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयन्त केला.पुढे तुमची इच्छा.नितीन सचिन आणि अमोल प्रेमाने त्या आजीला म्हणाले …...आजी आम्ही घेऊ आमची काळजी तुम्ही निवांत राहा…...आणि हो तुम्ही बनवलेला हा चहा या सकाळी अमृता समान लागतो आहे बर का ……..नितीनने आजीचे आभार मानत नमस्कार करत म्हटले.सगळे आपल्या आपल्या बाईक वर बसून कधी एकदा भीमाशंकर ला पोहचतो असे निघाले. चार पाच तासात आम्ही सगळे भीमाशंकर ला पोहोचलो सुद्धा.सगळ्यांनी जोतिर्लिंगाचे दर्शन घेतले.नितीनने अभिषेक करून घेतला आणि काही रक्षा आपल्या सोबत घेतली…..तो जरा जास्तच देवभोळा होता...असे विकीचे नेहमी म्हणणे असायचे.हीच रक्षा पुढे त्यांच्या किती कामात येणार आहे हे त्यांना सुद्धा माहीत नव्हते.या सगळ्या गोष्टी करता करता कधी संध्याकाळ झाली हे त्यांना सुद्धा कळले नाही.आधीच ठरल्याप्रमाणे आता मस्तपैकी जंगलात थोडे फिरून कुठे तरी रात्र काढण्याची जागा शोधायची आणि जंगलातील रात्रीचा अनुभव पण घेण्याचं ठरले होतेच.सगळ्यांनी आपल्या गाडीला किक मारली,थोडे पुढे आठ दहा किलोमीटर जाऊन जंगल अजूनच घनदाट होत होते.पावसाळ्याचे दिवस होते म्हणून पाऊस मधून मधून सुरूच होता.कुठलीच जागा फायनल होत नव्हती थांबण्यासाठी आणि या चक्कर मध्ये आपण किती पुढे येऊन गेलो आहोत मंदिरा पासून हे कोणाच्याही लक्षात आले नव्हते.
राहुल विवेक आणि विकी मस्त बाईक राईड एन्जॉय करत होते.आणि अचानक राहुल आणि विवेकच्या बाईकचा हेडलाईट
बंद पडला.कोणाला काहीच कळले नाही काय झाले ते,सगळ्यांनी नीट विचार करून आणि एक मताने ठरवले की,सगळ्यात पुढे नितीनची बाईक राहील मध्ये राहुलची बाईक राहील आणि सगळ्यात शेवटी सचिनची बाईक राहील.म्हणजे राहुलला नीट बाईक चालवता येईल.सगळ्या बाईक हळू हळू चालत होत्या.पावसाने पण जोर धरायला सुरवात केली होती.आपण आज मंदिरात रात्र काढून उद्या जंगलाची सफर केली असती तरी चालले असते असे नितीनला मनातून वाटून गेले.आपला निर्णय चुकला तर नाही ना असे सगळ्यांना वाटायला लागले होते एव्हाना.पण आता खूप उशीर झाला होता,पुढे जे होणार होते ते काही तरी वेगळे आणि अनपेक्षित होते…...आता रात्रीचा प्रहर सुरू झाला होता…..गर्द दाट काळोख फक्त बाईकचे हेडलाईटचा तेवढा प्रकाश.एव्हाना अमोलने आणि राहुलने राम राम राम राम आणि विकीने हनुमान चालीसा म्हणायला सुरवात केली सुद्धा होती.
मग सुरू झाला त्यांचा खरा प्रवास,एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला जोरदार कोसळणारा पाऊस, आणि भरीस भर म्हणून की काय सोसाट्याचा वारा त्यात भर घालत होता.नितीनने एका बाजूला एक मोठा फलक लावलेला बघितला…...सावकाश वाहने चालवा घाट आणि घनदाट जंगलाचा भाग सुरू होत आहे.वन्यजीव संचार…..…..ते वाचून प्रत्येकाला एक तरी जंगली प्राणी अचानक समोर येईल अशी भीती वाटायला सुरवात झाली होती आणि आता आपले काही खरे नाही असे पण वाटत होते.नितीन आजू बाजूला निरीक्षण करत गाडी चालवत होता.आता रस्त्यावर फक्त हे सहाजण आणि सोबत जोरात पाऊस,घनदाट जंगल,काळी अमवसेची रात्र,आणि सोसाट्याचा वारा एवढेच होते. त्या आजीने सांगितल्या प्रमाणे एका गावा नंतर दुसरे गाव येत सुद्धा नव्हते.आता मात्र आपण रस्ता चुकलो हे सगळ्यांच्या लक्षात आले होते.आता पुढे जाऊन जे गाव दिसेल तिथंच मुक्काम करून रात्र काढायची असे सगळ्यांचे एक मत झाले लगेच. रस्ता पण नीट नव्हता पाऊस भरपूर पडत होता सगळी कडे चिखलच चिखलच दिसत होता.आकाशात ढग भरून येतच होते आणि काही वेळातच जोरदार पावसाला परत सुरुवात झाली.पाऊस इतका जोरात होता की बाईक चालवणे कठीण झाले होते.एक बाईकचा लाईट तर आधीच बंद पडला होता.आता दुसरी बाईक माझी (सचिनची) सारखी बंद पडत होती. पावसाचे पाणी इंजिनात गेले असावे बहुतेक,असा निष्कर्ष काढला सगळ्यांनी. पुढचे पाच फुटापर्यंत पण नीट दिसत नव्हते.सगळ्यांनी एका आडोश्याला थांबण्याचा निर्णय घेतला,आणि सगळे एकमेकाला हात दाखवत गाडी बाजूला लावत होते.गाडी बाजूला लावली तिथे एक पाटी दिसत होती त्यावर लिहिले होते "कुंभारवाडी" गावचे नाव असेल असे वाटत होते.पावसाने खूपच जोर धरला होता.सोसाट्याचा वारा सुटला होता …..वारा जणू सांगत होता..जो कोणी माझ्या समोर येईल त्याला मी बेचिराग करेल.दोन तीन झाड तर आमच्या समोर उन्मळून पडली मुळासकट.आम्ही जिथे आडोसा घेतला होता तिथले छप्पर सुद्धा त्या वाऱ्यासमोर तग नाही धरू शकले.मग आमचे सगळ्यांचेच हात पाय गार होण्यास सुरुवात झाली…….कारण आम्ही सगळ्यांनी कधीच पावसाचा असा रुद्र अवतार बघतीला नव्हता.काय करावे सुचत नव्हते,सगळे देवाचा म्हणजेच शंकराचा धावा करू लागले…...ज्याला जो मंत्र येत होता तो ते म्हणताना दिसत होता.देवा हे संकट टळू दे लवकर एवढीच प्रत्येकाची इच्छा होती त्या वेळेस.तेवड्यात नितीनला मागून कसला तरी आवाज आला….एवढ्या जोरदार पावसात कोण आपल्याला आवाज देणार असे समजून त्याला भास झाला असे वाटले.थोड्या वेळाने सचिनला पण आपल्या मागून कोणी तरी आवाज देत आहे असे जाणवले.या वेळेस सचिन ने नितीनला हे सांगितले.नितीन म्हणाला मला पण असा आवाज आला रे…..तिसऱ्या वेळेस तो आवाज सगळ्यांना ऐकू आला...तसे सगळेच मागे वळून पाहू लागले.पाऊस इतका जोरात होता की स्पस्ट काही दिसत नव्हते.ढग इतके गडद होते की फक्त ढगफुटी होण्याची बाकी राहिली होती. एक घरा नंतर बऱ्याच अंतरावर दुसरे घर होते.दूर एका घरात दिव्याचा उजेड दिसत होता आणि एक स्त्री हात हलवत आवाज देत असल्याचे सगळ्यांना दिसले.सगळ्यांनी एकमेका कडे पाहिले आणि तिकडे जाण्यासाठी एक मत झाले.कारण दुसरा पर्याय पण नव्हता, आम्ही जिथे उभे होतो तिथे सुद्धा घुडघ्या पर्यंत पाणी भरत आले होते.जागा बदलावी लागणार होती आम्हाला.आम्ही सगळे बाईक तिथंच ठेऊन सरळ त्या घरा कडे जाण्यासाठी निघालो.सगळे पटापट त्या घरात पर्यंत येऊन पोहचलो.समोर बघतो तर एक मावशी चाळीस पन्नास वय असेल त्यांचे उभ्या होत्या.त्यांनी नितीनला प्रश्न केला….काय रे केव्हा पासून तुम्हाला आवाज देते आहे ऐकू नाही येत का?पाऊस एवढा जोरात सुरू आहे तुम्हाला आसरा द्यावा म्हणून आवाज देत होते मी….तुम्ही मागे बघायला पण तयार नव्हता.लगेच मी त्या मावशीला म्हणालो ….मावशी या पावसात आवाज नीट ऐकू येत नव्हता. तशी ती म्हणाली या पोरांनो आत या ….त्या मावशी आग्रहाने आम्हाला म्हणाल्या.आम्ही सगळे आत गेलो,आत जाऊन बघितले तर ते घर जरा पडके वाटत होते काही बाजूला,जणू कित्येक दिवसा पासून कोणीच या घरात आलेले नाही.घराला जाळ तसेच लटकलेले होते,भिंती पण काळ्याकुट्ट झालेल्या होत्या….नितीनने मुद्दाम त्यांना प्रश्न केला मावशी तुम्ही एकट्याच राहतात या घरात,तुमच्या सोबत अजून कोणीच कसे राहत नाही….तसे त्या मावशी रडायला लागल्या…..काय करणार पोरा नशिबाने जे समोर मांडून ठेवले असते ते भोगावेच लागते.आम्हाला ति काय बोलत होती काहीही कळत नव्हते.त्या मावशी हुंदके देत पुढे बोलू लागल्या …..पोरांनो मागील दोन वर्ष्यापूर्वी या गावात महाभयंकर पूर आला होता.जीवाला जीव देणारी आपली माणस या पुरामध्ये वाहून गेली…..आणि मला एकटीला या संसारात एकटी टाकून निघून गेले सगळे…...असे बोलत ती आपले डोळे पुसत होती.हे पडके घर आणि मी फक्त मागे राहिलो…….मी कशाला जिवंत राहिले कळत नाही…….तिचे रडणे सुरूच होते.सगळे एकदम शांत झाले त्यांनी तिला धीर दिला तशी ती पण शांत झाली….आणि म्हणाली माझं काय घेऊन बसलात,तुम्ही कुठे चालला आहत ते सांगा.अमोल ने आम्ही कुठून आलोत कुठे जाणार आहोत सगळे सांगितले.तिने आम्हाला जेवणाचा आग्रह केला….पण तिच्या घराकडे पाहून आम्हाला अंदाज आला होता की हिच्याकडे जेवणासाठी काहीच नसेल. तसेही आम्ही भीमाशंकर वरून निघताना पोटभर जेवण करूनच निघालो होतो .तिचे रडणे आता हळू हळू कमी होत जातं होते आणि तिच्या रडक्या चेहऱ्यावर एक विचित्र आणि कुटीर हसू सहज ओळखता येत होते.आम्ही सगळे एकमेकांना बघू लागलो.पाऊस सुद्धा पहिल्यापेक्षा खूप जोराने कोसळू लागला होता.वाऱ्याने सुद्धा त्याला साथ देण्याची जणू शपथ घेतली होती की काय असे वाटत होते.अश्या प्रकारचे वातावरण आम्ही पाहिले कधीच बघितले नव्हते. तिने हळूच आमच्याकडे बघून हसत म्हटले…...खूप चांगला दिवस निवडला आहे तुम्ही सगळ्यांनी.आम्हाला काहीच कळत नव्हते ती असे का म्हणत होती ते. आणि पुढच्याच क्षणि पापणी लवते ना लवते तोच त्या बाईचे एका चेटकिणीत रूपांतर झाले. आमच्या तर पाया खालची जमीनच सरकली होती. समोर काय घडते आहे हे कोणालाच काही कळत नव्हते.कोणाला काही काळण्या अगोदरच तिने तिच्या उजव्या बाजूला हात वर केला,तसे तिकडे काही तरी असल्याचा अनुभव आम्हाला झाला.सगळे एकटक तिकडे बघतच राहिले.समोर बघतो तर आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, समोर तिचा नवरा,तिचा मुलगा,तिचा म्हातारा सासरा आणि तिची एक म्हातारी सासू असा सगळा परिवाराच समोर आला होता.आम्ही जेव्हा या घरात आलो होतो त्यावेळेस फक्त आणि फक्त ही स्त्री एकटी होती हे नक्की.आता मात्र आमचा श्वास घश्यातच अडकला होता कोणालाही काय करावे हे कळत नव्हते.आम्हाला घाबरलेला बघून ती अजून जोरजोरात हसू लागली…….आणि म्हणाली आज माझी आणि माझ्या कुटुंबाची इच्छा पूर्ण होणार आहे…..कारण एक नाही तर सहा सहा बळी मला मिळाले आहे. आता मात्र काही तरी केले पाहिजे नाही तर आपले काही खरे नाही हे आमच्या पूर्ण लक्षात आले होते.नितीन हा देवाला खूप मानणारा मंदिरात अभिषेक करून त्याने काही रक्षा सोबत आणली होतीच.पण नुसते त्याने काही होणार नव्हते,हे त्याला चांगले माहीत होते. तरी त्याने एक प्रयत्न म्हणून त्या चेटकीनीच्या अंगावर ती रक्षा फेकली,तसा तिच्या अंगाने पेट घेतला.या संधीचा फायदा घेऊन आम्ही सगळे तिथून पळून जाण्यात यशस्वी झालो……..त्या घरातून बाहेर आल्यानंतर ज्याला जसे जमेल तसे सर्व ताकतनिशी पळू लागले.बाहेर पावसाने तर कहरच केला होता,थोडा सुद्धा कमी झालेला नव्हता तो...कसेबसे आम्ही सगळे बाईक पाशी येऊन पोहचलो.मागे वळून पाहण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती….पण एक मात्र नक्की कोणी तरी आपला पाठलाग करत आहे हे सगळ्यांना कळून चुकले होते.सगळ्यांनी आपआपल्या बाईक पटापट काढल्या.बाईक चिखलात रुतत होत्या, सर्वांनी सर्व ताकतनिशी त्या बाहेर काढल्या आणि तिथून धूम ठोकली…..बराच अंतरा पर्यंत काही आकृत्या आमच्या मागावर आहेत हे आम्हाला कळत होते.विकीने नितीन जवळील उरलेली रक्षा मागे वळून न पाहता हवेत फेकली…..तसा मोठा जाळ झाला आणि मोठयाने ओरडण्याचा आवाज पण झाला.आम्ही कुठलाही तर्क न लावता गाडी जेवढ्या जोरात चालवता येईल तेवढ्या जोरात चालवत होतो.
बऱ्याच वेळाने एक गाव लागले आणि त्या गावात सुरवातीलाच एक मंदिर होते. आम्ही तिथे गाडी थांबवून रात्र काढण्याचा निर्णय घेतला.आत एक पुजारी बाबा जागी होते.आमच्या गाडीचा आवाज ऐकून एव्हाना त्यांना जाग आली होती. आम्ही सगळे घाबरलेल्या अवस्थेत मंदिरात प्रवेश केला आणि आमच्या जीवात जीव आला.पुजारी बाबांनी आम्हाला बसवले पाणी प्यायला दिले.आमची चौकशी केली कुठून आलो कुठे जाणार आहे,एवढे घाबरलेले का आहोत?आम्ही एकेकाने सुरवाती पासून ते आता थोड्यावेळा पूर्वी पर्यंत जे जे काही झाले ते सगळे सांगितले.पुजारी बाबानी फक्त एवढेच म्हटले पोरांनो तुमचे नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात आजच्या दिवशी.आम्हाला कळलेच नाही ते असे का म्हणत होते ते.त्यांनी सांगायला सुरुवात केली……."कुंभारवाडी" या नावाचे गाव आता अस्तित्वात नाहीच मुळी.आम्ही एकदम अचमबीत होऊन एकमेकाकडे पाहत राहिलो…..हे त्या बाबांनी ओळखले सुद्धा…..अरे पोरांनो मागील दोन वर्षांपूर्वी त्या गावात महाभयंकर पूर आला होता, त्या वेळेस त्या गावातील सगळी घरे कुटुंबासहित वाहून गेली होती.त्यानंतर त्या गावात जिवंत असे कोणीच राहिले नाही. मागील दोन वर्षात लोकांना सुद्धा तुमच्या सारखे अनुभव आलेत त्या पडक्या गावाबद्दल….म्हणून तर लोकांनी त्याचे नाव "कुंभारवाडी" वरून "भुताचीवाडी" असे केले आहे आता. संध्याकाळी सात नंतर तर त्या रस्त्याने कोणी जाण्याची पण हिम्मत करत नाही आणि तुम्ही चक्क अमवसेच्या रात्री त्या गावात जाऊन आलात.आम्हाला आमच्याच कानांनवर विश्वास बसत नव्हता.जे ऐकत होतो ते खरे की जे आपल्या सोबत झाले ते खरे काहीच कळत नव्हते.त्या पुजारी बाबांनी आपल्या मंदिरातील रक्षा आमच्या अंगावर फुंकर्ली आणि काही मंत्र म्हटले,आणि म्हणाले आता निवांत झोपा या मंदिरात तुम्हाला कसलीच भीती नाही.पण खरे सांगायचे तर झोप कोणाला येणार होती एवढे सगळे आयुष्यात पहिल्यांदाच झाल्या नंतर.पुजारी बाबाच्या आग्रहाने आम्ही सगळे झोपायला तयार झालो पण झोप कुणाला येत नव्हती.सगळे प्रसंग एका मागून एक डोळ्या समोरून जात होते अगदी स्पस्ट.आणि या पुढे असा भयंकर प्रवास कधीच परत करायचे धाडस करायचे नाही असा विचार नक्की सगळ्यांच्या मनात आला असेल त्या रात्री………"कुंभारवाडी" नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहील कायम………

लेखक:
सचिन पुंडलिक माळी
सचिन पुंडलिक माळी