दुसर्या भागाची लिंक 👇👇
#सोनगावचा_मास्तर- भाग तीन.
"'सारंगपुर'चा होता तो, पलीकडल्या जिल्ह्यात आहे त्याचे गाव,असं त्यानेच सांगितले होतं.. पण त्यापलीकडे मी कधी विचारले पण नाही आणी मला जास्त काही माहिती पण नाही मास्तर" शेवंताने सांगितले.👩🦰
"मंग, कधी आठवण येत नाही का तुला त्याची? जायचे का आपण त्याच्या गावाला त्याला भेटायला?"
श्रीधर चेष्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला,
श्रीधर चेष्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला,
"जा की तुम्हीच, मला तर आता त्याच तोंड पण बघायची इच्छा राहिली नाही" एवढे बोलून शेवंता तावातावाने तेथून निघून गेली.
देसाई गुरुजींच्या गावाचे नाव तर श्रीधरला समजले होते, पण रघू त्यांच्यासोबत त्यांच्या गावाला गेल्यानंतर त्याच्यासोबत तेथे नेमके काही विशेष घडले असावे का?
मागच्या वर्षी पर्यंत सामान्य असणाऱ्या रघुला अचानक अशी भयंकर व्याधी कशामुळे झाली असावी?
आणी देसाई गुरूजी सध्या कुठे आहेत? असे प्रश्न त्याला वारंवार पडत होते, आणी ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर देसाई गुरुजींना भेटल्याशिवाय मिळणार नव्हते..
मागच्या वर्षी पर्यंत सामान्य असणाऱ्या रघुला अचानक अशी भयंकर व्याधी कशामुळे झाली असावी?
आणी देसाई गुरूजी सध्या कुठे आहेत? असे प्रश्न त्याला वारंवार पडत होते, आणी ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर देसाई गुरुजींना भेटल्याशिवाय मिळणार नव्हते..
अखेर श्रीधरने एका रविवारच्या सुट्टीत प्रत्यक्ष 'सारंगपुर'ला जावून देसाई गुरुजीला भेटण्याचे ठरवले..पारावर बिडी फुंकणार्या म्हातार्यांपैकींच एक असणारे 'वासुनानां'सोबत श्रीधरची चांगली मैत्री झाली होती.. साठी पार केलेले वयोवृद्ध आणी अनुभवी वासुनाना वयाने श्रीधरपेक्षा अनेक वर्षांनी मोठे असले तरी त्यांच्या मैत्रीत वयाचा अडसर नव्हता..
श्रीधरने वासुनानाकडून सारंगपुरचे नेमके ठिकाण आणी तेथपर्यंत जाण्याचा मार्ग कोणकोणत्या गावांमधून जातो याची माहिती मिळवली, जवळपास चाळीस किलोमीटर च्या आसपास अंतर होते ते..पण मग जायचे कसे? एस टी तर फक्त जिल्ह्याच्या आणी तालूक्याच्या ठिकाणीच होती, ती पण दिवसातुन फक्त एक नाहीतर दोन वेळेलाच.. तिथून पुढे सारंगपुर जर आडमार्गाला असेल आणी लवकर कोणते वाहन नाही मिळाले तर आपल्याला जायला आणी परत यायला किती वेळ लागेल? एक ना अनेक प्रश्न त्याला पडत होते.. त्यापेक्षा कोणाचीतरी सायकल मिळाली तर एका दिवसात जावून परत येता येईल.. सरपंचाच्या गोठ्यात एक नवी आणी एक जूनी अशा दोन सायकली लावलेल्या असल्याची माहिती श्रीधर ला शेवंता कडून मिळाली.
श्रीधरने शनिवारी रात्रीच सरपंचाला विनंती करून
"उद्या रविवार आहे तर जवळच्या एका बाजाराच्या गावाला जाऊन येतो"असे सांगून त्यांची जूनी सायकल ताब्यात घेऊन ठेवली..आणी रविवारी भल्या पहाटे उजाडण्याच्या आतच तो सारंगपुरच्या दिशेने निघाला..
"उद्या रविवार आहे तर जवळच्या एका बाजाराच्या गावाला जाऊन येतो"असे सांगून त्यांची जूनी सायकल ताब्यात घेऊन ठेवली..आणी रविवारी भल्या पहाटे उजाडण्याच्या आतच तो सारंगपुरच्या दिशेने निघाला..
सकाळच्या थंडगार हवेमध्ये त्याला प्रवासाचा ताण जाणवत नव्हता..तो रस्ता पण तसाच होता म्हणा, काय काय दिसत होते त्याला त्या वाटेवर? वेगवेगळी झाडे-झूडपे होती, कुठे लांबपर्यंत पडीक जमीन तर कुठे हिरवीगार बहरलेली शेती आणी पिके होती..कुठे पाळीव तर कुठे मोकाट जनावरे दिसत होती, पाणी भरलेले तळे आणी कालवे होती.. वाटेवरील अनेक छोटी छोटी गावे, वस्त्या यामधून रस्ते काढत तो वेगाने पुढे पुढे चालला होता..🏞️
जेथे रस्ता समजणार नाही तेथे तो थांबून कोणाला तरी पुढचा मार्ग विचारत होता, जास्तच कंटाळा आल्यावर घटकाभर रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली विश्रांती घेवून नंतर परत पुढे पुढे जात होता..असे करत करत दूपारी बाराच्या आसपास तो सारंगपुला पोहोचला, तेथे देसाई मास्तरांच्या घराविषयी चौकशी करत करत तो अखेर त्याच्या इच्छित ठिकाणी पोहोचलाच..
जेथे रस्ता समजणार नाही तेथे तो थांबून कोणाला तरी पुढचा मार्ग विचारत होता, जास्तच कंटाळा आल्यावर घटकाभर रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली विश्रांती घेवून नंतर परत पुढे पुढे जात होता..असे करत करत दूपारी बाराच्या आसपास तो सारंगपुला पोहोचला, तेथे देसाई मास्तरांच्या घराविषयी चौकशी करत करत तो अखेर त्याच्या इच्छित ठिकाणी पोहोचलाच..
हिरव्यागार शेतजमीनीला लागूनच एक छानपैकी घर होते ते..घरामध्ये बाहेरच्या मोठ्या खोलीतच एक तरुण विधवा स्त्री बसलेली होती, श्रीधरने त्याची ओळख सांगताच तिने त्याला घरातील लाकडी खुर्चीवर बसायला सांगितले आणी आतल्या खोलीतील कामवालीला सरबत बनवण्यासाठी सांगून आली..तिच्या घराबाहेर दोन शेतमजूर आलेले होते, त्यांना तिने वेगवेगळ्या सुचना देवून लगेचच शेतीमध्ये कामावर पाठवून दिले.. त्या महिलेचा साधा पेहेराव आणी रिकामे कपाळ पाहून अनेक शंकाकुशंका चे काहुर श्रीधरच्या मनामध्ये दाटुन आले होते, सरबत घेवून झाल्यानंतर श्रीधरने सोनगाववरून सारंगपुरला येण्याचे त्याचे खरे कारण म्हणजे देसाई गुरूजींची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले..
"मी त्यांची पत्नी आहे, मागच्या वर्षीच त्यांचा विहीरीमध्ये पडून अपघाती मृत्यू झाला होता" त्या महिलेने सांगितले.
"बापरे, फारच दुःखदायक आहे हे ताई " श्रीधरने शोक व्यक्त केला.
"आणखी काही विचारायचे आहे का तुम्हाला?" सहजपणे ती बोलत होती.
"जे काही झाले ते वाईटच झाले ताई ..पण मला फक्त एवढे सांगा की, त्यांच्यासोबत सारंगपुरला आलेल्या रघुसोबत नेमके काय घडले होते आणी त्याची अशी अवस्था कशामुळे झाली असावी असे तूम्हाला वाटतेय"
त्यावर गुरुजींच्या पत्नीने जे सांगितले ते श्रीधरला आणखी विचारात पाडणारे होते..
"आता तुमच्यापासून काय लपवायचं मास्तर, आमच्या ह्यांना पोराबाळांची खूप हौस होती हो, ते नेहमीच म्हणायचे माझ्या मुलांना मी हे करील, ते करील..पण दूर्देव म्हणजे मी त्यांची ही साधी ईच्छा पुरी करू शकले नाही, अनेक औषध उपचार घेतले, उपास तापास, नवस सायास पण करून पाहिले, पण मला काही मुलबाळ झालेच नाही..कदाचित त्यामुळेच हळूहळू आमच्या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाला..छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडणतंटे होऊ लागले..आणी एकेदिवशी रागावून ते त्यांचे घर,शेती आणी गाव सोडून दूर सोनगावला जाऊन राहिले..त्यांचे मन तिकडेच रमले, फक्त अधेमधे सनासुदीलाच सारंगपूरला येऊन राहायचे ते..मागच्या दिवाळीत पण ते आले होते, त्यांच्यासोबत त्यांचा एक प्रिय विध्यार्थी रघू पण आलेला होता, ज्याला ते स्वताच्या मुलासारखेच समजत होते..काही दिवस आराम करून आणी नातेवाईकांकडे येणे जाणे झाल्यानंतर ते रघुसोबत शेतीचे कामकाज पाहण्यासाठी आमच्या मळ्यात जात होते.. त्यादिवशी पण आम्ही तिघेजण मळ्यात कामासाठी गेलेलो असताना, दूपारी तहान लागली म्हणून ते आणी रघू मळ्यातल्या विहिरीजवळ पाणी प्यायला गेले, त्यांना कल्पना पण नव्हती की त्यांचा काळ जवळ आलेला होता..
पाणी बाहेर काढत असताना विहीरीच्या कडेला असणार्या गवतामध्ये त्यांचा पाय एका विषारी सापावर पडला आणी त्याच्या पायाला सर्पदंश झाला.. विषारी सापाला पाहून घाबरलेले ते पाय घसरून कठडा नसलेल्या त्या खोल विहीरीमध्ये कोसळले..पोहायला जमत नसल्याने जास्त खोल पाण्याची भिती त्यांना आधीपासूनच होती.. अचानक झालेल्या प्रकारामुळे रघुने मोठ्याने आरडाओरडा करत मला आणी जवळपासच्या इतर काही शेतकर्यांना गोळा केले,पण बाकी लोकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत त्यांचे प्राण गेले होते..ते भले कसेही असले तरी माझे पती होते ते, त्यांच्या निधनामुळे माझ्यावर तर आभाळच कोसळले होते.. सगळेजण गोळा झाल्यानंतर काही वेळाने गावकर्यांनी गावाबाहेरच्या स्मशानात नेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले..
बाकी जमलेल्या नातेवाईकांनी माझी कशीबशी समजूत काढली पण लहानग्या रघुची समजूत काढायला तेथे कोणीच नव्हते, कोणाचे त्याच्याकडे लक्षही नव्हते.. तो एकटाच संपूर्ण रात्रभर त्या विहीरीच्या काठावरच रडत बसलेला होता.. दूसर्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी त्याला विहीरीजवळ पाहिले आणी मग गावाच्या बाहेर नेऊन सोडून दिले..नंतर तो कसातरी परत माघारी त्याच्या गावाला गेला..यापलीकडे जास्त काही मलाही सांगता येणार नाही, मला वाटते ह्या सर्व घटनाक्रमाचा वाईट परिणाम रघुच्या मनावर झाला असेल.. म्हणुनच त्याची अवस्था तुम्ही सांगितली तशी झाली असेल."😒
देसाई गुरूजींच्या पत्नीने तिचा भुतकाळ श्रीधरपुढे मांडला..
देसाई गुरूजींच्या पत्नीने तिचा भुतकाळ श्रीधरपुढे मांडला..
"माफ करा ताई, तुम्हाला मी तुमच्या अप्रिय भुतकाळाची आठवण करून दिली, नशीबापुढे खरोखरच कोणाचे काही चालत नाही..पण तुम्ही हिंमतवान होतात म्हणून या बिकट परिस्थितीतुन सावरलात..चला, येतो मी, रात्र होण्याच्या आत मला सोनगावला पोहोचले पाहिजे"
"ठिक आहे..परत कधी येणे झाले इकडे तर या घरी"
असे बोलून तिने श्रीधरला निरोप दिला.
असे बोलून तिने श्रीधरला निरोप दिला.
गुरुजींच्या विधवा पत्नीचा निरोप घेऊन श्रीधर सायकलवर बसून परत माघारी निघाला..डोक्यावरच उन्हं अजून पुर्ण उतरलेले नव्हते, त्या उन्हाच्या तडाख्यात त्याला येताना न जाणवलेले रस्त्यावरचे खाचखळगे, चढउतार आता जास्त प्रमाणात जाणवायला लागले होते..त्याच्या सायकलचा वेगही मंदावला होता..🚴
रात्री उशीरा तो सोनगावात परत आला, त्या जून्या सायकलवर केलेल्या लांबलचक प्रवासामुळे त्याचे संपुर्ण अंग ठणकत होते..भूक पण कडाडून लागली होती. शेवंता संध्याकाळीच त्याचा जेवणाचा डबा बंद दरवाजाजवळ ठेवून गेलेली होती हे पाहून त्याला हायसे वाटले..त्याने मनोमन शेवंताचे आभार मानले आणी त्या डब्यातील जेवण पटपट संपवून तो अंथरूणावर अंग टाकल्या टाकल्याच झोपी गेला..
पुढील काही दिवस सामान्य होते, श्रीधरचा दिनक्रम व्यवस्थित चालू होता, पण वर्गामध्ये बसलेल्या रघूला पाहिले की श्रीधरला देसाई गुरूजीची आठवण होत होती.. गुरूजींच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे खरोखर गुरुजींच्या अपघाती मृत्युचा रघूला मानसिक धक्का बसला असावा का? पण मग त्याच्या शरीरामध्ये बदल कशामुळे झाला असावा? मानसिक धक्यामुळे ? का त्यामागे दूसरेच काही कारण असावे? आपण विचार करतोय ते तर नसेल ना?
नाही, असे नाही होऊ शकत?
श्रीधरने त्याच्या मनामध्ये डोकावणारा तो विचार काढून टाकला.
नाही, असे नाही होऊ शकत?
श्रीधरने त्याच्या मनामध्ये डोकावणारा तो विचार काढून टाकला.
#क्रमश..
चौथ्या भागाची लिंक 👇👇