तिसर्या भागाची लिंक 👇👇
#सोनगावचा_मास्तर - भाग चार
त्यादिवशी शनिवार होता.. श्रीधर सकाळी लवकर उठून गावातील मारुतीच्या दर्शनासाठी मंदीरात गेला..गावच्या वेसीच्या जवळ बांधलेले सुंदर दगडी बांधकाम असलेले ते एक छोटेसे मंदीर होते..🛕
गाभार्यातील मारूतीच्या दगडी मुर्तीला भडक शेंदूर फासलेला होता, श्रीधरच्याही आधी दर्शनासाठी येवून गेलेल्या भक्तांनी मुर्तिवर तेल सोडलेले दिसत होते,खाली प्रसाद म्हणुन ठेवलेले नारळाचे छोटे मोठे तुकडे दिसत होते.. बाजूलाच एक तेलाने तुडुंब भरून वाहुन चाललेला पेटता दिवा होता, आणी त्याच्या शेजारी पेटणार्या असंख्य अगरबत्त्या आणी सुगंधी धूपाचा धूर मंदीरात भरलेला होता.. हे सर्व दृश्य पाहून श्रीधरला प्रसन्न वाटले, त्याने मुर्तीला मनोभावे नमस्कार करून अंगार्याच्या छोट्या ढिगातुन थोडासा अंगारा उचलून माथ्यावर लावला आणी थोडावेळ निवांतपणे मन एकाग्र करून त्या शांत वातावरणात डोळे बंद करून बसला..त्याला आता एक वेगळी अनुभूती आणी हुरूप आला होता..मनामध्ये अनेक वेगवेगळ्या कल्पना दाटून आलेल्या होत्या..त्याने आता दर शनिवारी सकाळी मंदीरात जाण्याचा मनोमन निश्चय केला.

थोड्यावेळाने वर्गामध्ये पोहोचल्यानंतर त्याला आज सर्व मुले कंटाळल्यासारखी वाटत होती..श्रीधरने त्यांचा अंदाज घेतला आणी म्हणाला..
"मुलांनो अभ्यास तर आपण दररोजच करतो, चला आज आपण मारुती स्तोत्र म्हणूया, माझ्या मागे मागे सर्वांनी म्हणा.." मूले आनंदाने तयार झाली.
"मुलांनो अभ्यास तर आपण दररोजच करतो, चला आज आपण मारुती स्तोत्र म्हणूया, माझ्या मागे मागे सर्वांनी म्हणा.." मूले आनंदाने तयार झाली.
"भीमरूपी महारूद्रा..वज्रहनुमान मारुती.."
श्रीधर त्याच्या मोठ्या आवाजात स्तोत्राची एक एक ओळ म्हणत होता आणी बाकी मुले त्याच्या मागोमाग म्हणत होती..श्रीधरचे लक्ष संपुर्ण वर्गावर होते.
बाकी सगळे मुले श्रीधरच्या मागे म्हणत असली तरी रघू मात्र अगदी शांतपणे त्याच्या जागेवर बसलेला होता, स्तोत्राचा एकही शब्द तो उच्चारत नव्हता..उलट त्याच्या चेहऱ्यावरून तो अस्वस्थ झाल्यासारखा वाटत होता..जणू त्याला ह्या सर्व गोष्टीचा त्रास होत असावा..सकाळचे थंड वातावरण असतानाही घामाचा एक थेंब त्याच्या केसातून ओघळून गालावर आला होता..😓
अचानक रघू त्याच्या बेंचवरून उठून उभा राहिला आणी त्याचे दप्तर हातात घेवून पुढे श्रीधरजवळ गेला..श्रीधरने स्तोत्र थांबवले होते.

"मास्तर, म..मला बरं वाटतं नाहीये, घरी जायचंय" तो अस्वस्थपणे म्हणाला.
"शनिवार आहे आज रघू, अजून थोडावेळ थांबला तर दूपारी शाळा सुटणारच आहे की"
"नको मला आताच जायचंय, नाहीतरी तुम्ही आज शिकवायच सोडून दुसरच काहीतरी करायला लागलात, त्यामुळं घरी गेलो तरी माझा अभ्यास बुडणार नाहीये..आणी आता नाही गेलो तर आजारी पडन मी"
असे बोलून तो घाईने वर्गाच्या बाहेर पडला आणि दप्तर पाठीवर लटकवून शाळेबाहेर निघून गेला.
असे बोलून तो घाईने वर्गाच्या बाहेर पडला आणि दप्तर पाठीवर लटकवून शाळेबाहेर निघून गेला.
"रवी आणी अज्या तुम्ही दोघं त्याच्यासोबत जा आणी त्याला त्याच्या घरी सोडून परत या, त्याची तब्येत बिघडली वाटत अचानक" श्रीधरने वर्गातील दोन मुलांना त्याच्यासोबत पाठवले आणी नंतर उरलेले स्तोत्र पुर्ण केले.
देसाई गुरुजी आणी रघुची पुर्ण माहिती मिळवल्यानंतर श्रीधरच्या मनामध्ये जी शंका डोकावली होती, ती प्रथमदर्शनी तरी खरी ठरताना दिसत होती.. संकटनाशन मारुती स्तोत्राचा प्रभाव रघूवर प्रभाव पडलेला त्याला दिसत होता..आता त्याचा अंदाज पुर्ण खरा आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याला सोमवारी आणखी एक प्रयोग करायचा होता.
सोमवारी दूपारची जेवणाची सुट्टी संपल्यानंतर शाळा परत भरली, वर्गात श्रीधरचा तास चालू झाला होता..शिकवत असताना श्रीधर मुद्दामहून रघूला अधुनमधून काही अवघड प्रश्ने विचारत होता, आणी रघुला त्याचे उत्तरे देता येत नसल्याने त्याची टर उडवत होता, बराचवेळ रघू शांतपणे मान खाली घालून बसला होता..श्रीधरने रघु सोबतच आणखी काही उत्तरे देता न येणार्या ढ मुलांना उभे राहण्यास सांगितले, आणी त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली..रघुवर श्रीधरचा प्रमुख रोख होता, रघुसोबतच त्याने आता देसाई गुरूजींना पण नावे ठेवायला सुरुवात केली..
"तुमचा तो देसाई गुरुजी, हा सर्वात मठ्ठ मास्तर होता, त्याच्यासोबत राहून हा रघू पण मठ्ठ बनला आणी तुम्ही सगळी मुले अभ्यासात मागे राहिलात..त्याला काहीही येत नव्हते.. अशा लोकांना कोण मास्तर बनवते काय माहित .." इ. इ.
श्रीधरच्या टोमण्यांमुळे वर्गामध्ये इतर मुलांचा हशा वाढत चालला होता..पण रघुच्या डोळ्यात मात्र संतापाची आग भडकताना श्रीधरला जाणवत होती..आणी त्याला तेच करायचे होते..अनेक वेगवेगळी विशेषणे लावून तो देसाई गुरूजींना दूषणे देत होता आणी त्याच्या वाक्या वाक्यावर वर्गातील मुले मोठ्याने हसत होती..आता पर्यंत सर्वांचा अपमान निमुटपणे सहण करणार्या रघुला देसाई गुरूजीचा अपमान मात्र असह्य होत होता.. कुठल्याही क्षणी त्याच्या संतापाचा स्फोट होणार होता आणी झालाच..😠
"मास्तर..!" मोठ्याने ओरडत त्याने त्याचे दप्तर उचलले आणी पुर्ण ताकत लावून जोरात श्रीधरच्या दिशेने भिरकावले..सावध असणारा श्रीधर लगेचच चपळाईने खाली वाकल्यामुळे ते दप्तर त्याच्या तोंडावर आपटण्याऐवजी मागच्या फळ्यावर जावून आदळले..अचानक घडलेल्या ह्या आश्चर्यजनक प्रकारामुळे सगळा वर्ग चिडीचूप झाला..
रवी आणी अज्या हे दोन दांडगट मुले काही विचार करून त्यांच्या जागेवरून उठले आणी वर्गशिक्षकावर हल्ला करणार्या रघुला धडा शिकविण्यासाठी त्याच्याकडे निघाले पण श्रीधरने त्यांना दटावून परत त्यांच्या जागेवर बसायला सांगितले..

"रघुला कोणीही काही बोलू नका, कोणीही जागेवरून उठायचे नाही, सगळ्यांनी आपापली मराठीचे पुस्तक काढून धड्याचे वाचन करायला घ्या..मी येतोच थोड्यावेळात"
असे बोलून तो वर्गाबाहेर पडला, रघू अजूनही त्याच्या जागेवर संतापाने धुसपुसत उभा होता..
असे बोलून तो वर्गाबाहेर पडला, रघू अजूनही त्याच्या जागेवर संतापाने धुसपुसत उभा होता..
शिक्षकांच्या खोलीत जावून श्रीधरने तोंडावर थोडे पाणी मारून रुमालाने तोंडावरचा घाम पुसला..
"हे भगवंता..म्हणजे मला वाटणारी शंका खरी ठरली का काय? रघुला देसाई गुरूजींच्या आत्म्याची भुतबाधा झालेली आहे? पण..पण हे फक्त मला समजले..हे मी बाकी लोकांना कसे पटवून देऊ, कोण विश्र्वास ठेवेन माझ्यावर"
तो स्वताशीच पुटपुटत होता..😦

त्यादिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर श्रीधर लवकरच वडाखालच्या पारावर पोहोचला..तेथे त्याचे वृद्ध मित्र 'वासूनाना' अडकित्याने सुपारी कातरत एकटेच बसलेले होते, त्यांचे समवयस्क जोडीदार अजून पारावर आलेले नव्हते.. श्रीधर त्यांच्या जवळ जावून बसला.
"लवकरच आलास मास्तर..बिडी तर काय तू वढत नाहीस, ही सूपारी तरी खा"
वासुनानांनी दिलेल्या सुपारीचे दोन खांड तोंडात टाकून श्रीधर चघळू लागाला..'वासूनाना' हे गावातील एक अनूभवी आणी जाणकार होते, आजूबाजूच्या पंचक्रोशीचीही त्यांना खडानखडा माहिती होती..त्यामुळे श्रीधरलाही त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती.

"नाना, हे भुतबाधा होणे, आत्म्याने झपाटणे असे भुताटकीचे प्रकार खरे असतात का खोटे असतात हो" श्रीधरने विचारले.
"कारं मास्तर, आज असं का इचारतोयस?" वासुनानानी कातरलेली सुपारी तोंडात टाकत विचारले.
"सांगा तर..मी असं ऐकलंय की, तुम्हाला ह्या विषयाची जास्त माहिती आहे म्हणून" श्रीधरला वासुनानाचे मत जाणून घ्यायचे होते.
नानांनी त्यांच्या बिडी बंडल मघून एक बिडी बाहेर काढली.
"आता ही बिडी..मला रोज वढायची सवय आहे म्हणून मला तिचे महत्त्व आहे पण तु आजवर कधी वढुन पाहिलीच नाही आणी तुला त्याची सवयबी नाही म्हणून तुझ्यासाठी तिचे महत्त्व लाकडाच्या काडीसारखच आहे,
त्याचप्रमाण भुतबाधेच आहे, ज्याला त्याचा अनुभव येईल त्यालाच ते खरं वाटत आणी त्याला त्याच महत्त्व पण समजत पण ज्यांच्या वाटेला त्याचा अनूभव येत नाही त्यांना ते समदं खोटंच वाटत"☠️
नानांनी त्यांच्या परीने उत्तर दिले होते.

श्रीधरने आणखी काही वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांच्याकडून काही माहिती घेतली, तसेच आपल्या गावामध्ये किंवा गावच्या आजूबाजूला कोणी भुतबाधा उतरवण्यासाठी सक्षम सिद्धपुरूष आहे का याचीही विचारणा केली..
"तुला एक सांगतो मास्तर,,सवताला सिद्ध म्हणवणार दहाजनां मधल नऊजन हे एकतर खोटं बोलत असत्यात, नायतर अर्धवट विध्या शिकलेलं असतात..भल्या माणसानं त्यांच्या नादाला लागण म्हणजे समदी बरबादीच"
वासूनानांनी बोलता बोलता आता सूपारी संपवून बिडीचा बार भरला होता.🚬
"पण एक माणूस हाये, आपल्याच गावातला ज्याची खात्री मी तुला देऊ शकतो"
"कोण आहे तो नाना?"
"पण एक माणूस हाये, आपल्याच गावातला ज्याची खात्री मी तुला देऊ शकतो"
"कोण आहे तो नाना?"
"'शंभू गुरव'.. दहा वर्षापुर्वी वेशीवरल्या मारुतीपासुन ते गावाबाहेरच्या मरीआई पर्यंत समद्या मंदीराची व्यवस्था तोच पाहायचा..पण आता समद्या व्यापातून मोकळा झालाय तो, तरीपण सोनगाव आणी आजूबाजूच्या पंचक्रोशीत धार्मिक उत्सव आणी जत्रामंदी त्याचा मान असतो..मी सवता दोन तीन वेळेला अनूभवं पाहिलाय म्हणून सांगतोय..मानसाला साप डसलेला असू नाहीतर इंचू, एका अंगार्याच्या फटक्यात नीट करतो तो..भुत,हडळी, खविसान झपाटलेल्या बाईला अन पुरूषाला तर त्याच्याशिवाय पर्यायच नाही बघ.."
वासुनानांनी बिडी ओढता ओढता 'शंभू गुरवा'ची माहिती श्रीधरला दिली..
वासुनानांनी बिडी ओढता ओढता 'शंभू गुरवा'ची माहिती श्रीधरला दिली..
"पण मला कुठे भेटतील हे शंभू महाराज?" श्रीधरने उत्सुकतेने विचारले,
"ब्रमचारी गडी हाये त्यो..आता त्याचा कुठला एक ठिकाणा असतो व्हय? कधी ह्या गावाला तर कधी त्या गावाला..हां, पण त्यो जर सोनगावात असलं तर दररोज सकाळी सुर्य उजाडायच्या आत माळावरल्या ओढ्यावर अंघोळीला नक्की येतो, तिथं भेटू शकतो तो तुला..पण मी म्हणतो मास्तर, एवढी चौकशी करतोय तु..नेमकी कुणाला झालीय भुतबाधा?"💀
"कोणाला नाही नाना, मलाच आजकाल रात्री चित्रविचित्र स्वप्ने पडतात, दिवसापण वेगवेगळे भास होतात म्हणून त्यांना भेटायचे होते" श्रीधरने खोटे सांगितले.
"हातिच्या..! एवढंच व्हय..मग त्याला शंभू गूरव कशाला पायजे, मंदीरात जावून मारूतीचा अंगारा लाव की कपाळाला..नाहीतर चल मंदीरात मीच लावतो..माझ्याबी हाताला तसा गुण हाय बरं.."
दात विचकत हसत वासुनाना म्हणाले.
दात विचकत हसत वासुनाना म्हणाले.
"नको नाना, मीच जातो, तुम्ही बसा इथेच..तुमचे बाकी सहकारी पण येतीलच आता" असे बोलून श्रीधर तेथून सटकला आणी त्याच्या घरी आला..
दुसर्या दिवशी पहाटे लवकरच उठून तो ओढ्याच्या दिशेने गेला...गावाच्या बाहेर तो भला मोठा मोकळा माळ होता आणी तेथेच वर्षाचे बाराही महिने अखंड वाहणारा तो मोठा ओढा होता.. उन्हाळ्याच्या दिवसांत ओढ्याच बरचसं पाणी सुकून जायच आणी वाळू उघडी पडायची, फक्त काही उथळ पाण्याचे ओघळ वाहताना दिसायचे पण आता सध्या पावसाळा संपून काही महिनेच झालेले असल्याने त्या ओढ्याला खोल आणी वेगाने वाहणारे पाणी होते..
ओढ्याच्या कडेकडेने बारकाईने निरीक्षण करत श्रीधर पुढे पुढे जात होता..🏞️
ओढ्याच्या कडेकडेने बारकाईने निरीक्षण करत श्रीधर पुढे पुढे जात होता..🏞️
#क्रमश..
पाचव्या भागाची लिंक 👇👇