घोस्ट हंटर
लेखक :नितीन काकड
#रीपोस्ट
सकाळी सकाळी आलेल्या खळबळजनक न्युज मुळे पूर्ण शहर हादरलं होतं, शहरातील अतिप्रतिष्ठित ,नावजलेलं नाव आदल्या रात्री कायमस्वरूपी थंड पडलं होतं,सुधाकर मोहिते ,ज्यांना लोकं प्रेमाने घोस्ट हंटर म्हणायचे, त्यांचा अचानक मृत्यू झाला होता, एक सळसळतं वादळ कायमस्वरुपी शांत झालं होतं,आतापर्यंत कितीतरी लोकांना त्यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता घोर संकटातून वाचवलं होतं, त्यांना वडिलोपार्जित दैवी देणगी लाभली होती आणि त्याचाच फायदा ते लोकांच्या मदतीसाठी करत असत ,कसलीही अपेक्षा न ठेवता आपलं काम अगदी प्रामाणिकपने ते करत असत, आतापर्यंत त्यांनी कितीतरी केसेस सोडवल्या होत्या ,बाहेरच्या शहरातून सुद्धा त्यांना भूत पकडण्यासाठी बोलावणं यायचं,त्यांचा आतापर्यंत खूप हट्टी, क्रूर आत्म्यांशी सामना झाला होता,पण त्यांनी सर्वांना कैद करून मुक्ती दिली होती,काहीवेळा तर हट्टी आत्म्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील केला,पण त्यातून ते सुखरूप निघायचे ,तसंच ते ढोंगी बाबांचा देखील पर्दाफास करायचे त्यांच्यामुळे कितीतरी ढोंगीबाबा जेलची हवा खात होते,
पण त्याचं असं जाणं बऱ्याच लोकांना पचलं नव्हतं,कारण ते जेव्हा त्यांच्या खोली मध्ये मृत अवस्थेत सापडले ते अगदी विचित्र अवस्थेत होते ,डोळे सताड उघडे जणू काहीतरी खूप भयानक त्यांनी बघितलं होतं,डोळ्यात एक अनामिक भीती दिसत होती, पोस्ट मार्टम मध्ये सुद्धा हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याचे उघड झालं होतं, पण लोकांना विश्वास बसत नव्हता कि एवढा डेरिंगबाज माणूस एवढ्या कमकुवत हृदयाचा कसा काय ,तो तसा असूच शकत नव्हता ,म्हणून सुधाकर रावांनी ज्यांना ज्यांना मदत केली होती त्या सर्वांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून ह्या केस चा खोलवर तपास करायला लावला ,इन्स्पेक्टर समर्थ पोलीस डिपार्टमेंट मधलं नावाजलेलं नाव,पण त्याला गूढ विद्या ,रहस्यमयी गोष्टी ,भुतं, ह्यामध्येच जास्त इंटरेस्ट ,त्यामुळे ही स्पेशल केस त्याच्याकडे सोपवण्यात आली ,समर्थ लागलीच घटना स्थळावर पोहचला ,तिथे पोहचल्या पोहचल्या त्याला त्या घरात एक वेगळीच अस्वस्थता जाणवायला लागली ,आणि काहीतरी वेगळंपण त्याला त्या घरात जाणवत होतं ,खूप दिवसांपासून घर झाडलं नसावं एवढा कराचा घरात जमा झाला होता,देवघर पण काळ्या कपड्याने अर्धवट झाकलेलं होतं, देवांची पूजा तर दूरच दिसतं होती,कितीतरी दिवस किंवा महिने तिकडे कुणी फिरकले देखील नसावे अशी अवस्था होती ,समर्थ ला आश्चर्य वाटलं की सुधाकर राव घरात असे कशे राहू शकतात ,बाहेरचं जग ज्यांना एवढं मानतं ,तो माणूस घरात एवढा गलिच्छ कसा काय राहू शकतो ,नक्कीच ह्या मागे काहीतरी काळंबेरं होतं, समर्थ ने पूर्वी तेथे काम करणाऱ्या बाईला आणि गड्याला बोलावून घेतले ,गंगुबाई सांगू लागली ,कि आमची मालकीण बाई, सुधाताई गेल्यापासून मागील दोन,तीन महिन्यांपासून साहेब सर्वांपासून अलिप्त अलिप्त राहू लागले होते, त्यांचं बाईसाहेबांवर लै प्रेम होतं, त्यांना काही मुलबाळ नसल्यामुळे ते दोघेच एकमेकांची काळजी घ्यायचे ,साहेबांचं बाईसाहेबांशीवाय पान देखील हालत नव्हतं , पण एका छोट्याश्या आजाराचं निमित्त होऊ बाईसाहेब गेल्या ,साहेब मनातून खूप खचले होते,एक जोरदार मानसिक धक्का त्यांना बसला होता ,ते नेहमी दुःखी राहायचे,स्वतः ला नेहमी त्यांच्या रूम मध्ये कोंडून घेत असत, आमच्याशी एक शबुद देखील बोलत नसत ,दोन दोन दिवस त्या रूम च्या बाहेर निघत नसत,नेहमी शून्यात नजर लावून बसत असत ,आणि कधी तरी मोठं मोठ्याने एकटेच हसत असत ,विचारलं तर अंगावर वसकायचे,म्हनायचे कि मी सुधा सोबत बोलत आहे,आम्हांला पण त्यांच्या अश्या वागण्याची भीती वाटायला लागली होती,ते नेहमी म्हणायचे माझी सुधा मला बोलवतीये ते बघा तिकडे उभी राहून मला हात दाखवतेय,मला तिच्याकडे जायला हवे ,नाहीतर मी तिलाच परत बोलावून घेतो इकडे , त्यांच्या रूम कडे बघत ते असंच काहीतरी बोलायचे, आम्हांला पण त्यांची भीती वाटायला लागली होती ,आणि एक दिवस
त्यांनी आम्हांला देखील कामावरून काढून टाकलं,"
गंगाराम घरातला गडी ,जो सुधाकर रावांचे बाकी सर्व कामं करायचा तो सांगू लागला,"साहेब ह्या दोन,तीन महिन्यात साहेब फार विचित्र वागू लागले होते,हि गंगी तर संध्याकाळी सर्व आटपून घरी जायची पण बाईसाहेब गेल्यापासून साहेबांना सोबत म्हणून मी बंगल्यावरच झोपायचो,मला साहेबांच्या अश्या वागण्याची खूप भीती वाटायची ,रात्री कितीतरी वेळा मला त्यांच्या रूम मधून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज यायचा , कधी कधी एका बाईचा पण आवाज यायचा मला खूप भीती वाटायची पण गणपतीचं नाव घेऊन मी झोपून जायचो, साहेब मला त्या खोलीत कधीच येऊ द्यायचे नाहीत ,काही काम असेल तर ते स्वतः बाहेर येऊन मला सांगायचे ,पण प्रत्येक अमावसेला ते माझ्याकडून जिवंत कोंबडा ,गुलाल ,आणि आणखी काही गोष्टी मागवायचे ,आणि मग रात्री बारा नंतर कुठलीही पूजा करायचे ,होम पेटवून मोठमोठ्याने वेगळेच मंत्र म्हणायचे ,आणि शेवटी म्हणायचे हा घे तुझा बळी आणि माझी बायको मला परत दे, साहेब ठार पागल झाले होते,कधी कधी रात्री पेग मारतांना मला म्हणायचे तुझ्या बाईसाहेबांना मी लवकरच परत आणणार आहे,मला त्यांची लै भीती वाटायची ,प्रत्येक अमावशेला घरात आमच्या दोघां व्यतिरिक्त आणखी कुणीतरी आहे असं सतत जाणवत राहायचं ,कधी बांगड्यांचा आवाज येई ,तर कधी कुणी शेजारून पळत गेलं असं वाटे,रात्री लाइट तर कधीच राहत नसे ,एका अमावशेला साहेबांनी डोक्यावर चंद्र असलेला बकरा मागवला, साहेब जिवंत प्राण्यासोबत काय करतात हे बघण्याची मला उत्सुकता होती म्हणून मी त्या रात्री त्यांच्या रूम च्या बाहेर लपून बसलो ,आणि दरवाज्याच्या फटीतून आत बघू लागलो ,आतलं सर्व बघून माझे पाय लटपटू लागले ,साहेबांसमोर त्या कुंडांत एक धूसर आकृती होती ,साहेब तिला नमस्कार करत होते,त्या कुंडाभोवती कवटी,गुलाल ,बिब्बे, कुंकू अश्या गोष्टी मांडल्या होत्या ,आणि तिथेच एक बाईचं प्रेत दिसत होतं, ते कुजलेल्या अवस्थेत होतं त्यामुळे नीट दिसत नव्हतं पण ते बहुतेक सुधाबाईसाहेबांचं होतं ,कारण साहेबांनी बाईसाहेबांना अग्नी न देता दफन केलं होतं, त्या प्रेतासमोर बोकड बांधलेलं होता,साहेबांनी त्या बोकडाला कुंकू लावून ,त्याच्या गळ्यात माळ घातली ,कवटीमध्ये आग टाकून दोन वेळा त्याला ओवाळले आणि कुंडाकडे वाकवून एक झटक्यात त्याची मान धडावेगळी केली ,त्याच्या रक्ताच्या चिळकांड्या साहेबांच्या सर्व अंगावर उडाल्या ,त्याच्या रक्ताने त्यांचा चेहरा सुद्धा लालभडक झाला,साहेबांनी लगेच स्वतः चं तोंड त्या धडाला लावलं आणि ते त्याच रक्त प्यायला लागले, मग साहेबांनी स्वतः चा हात कापून त्या प्रेताच्या तोंडात स्वतः च रक्त टाकलं साहेबांचं ते अघोरी रूप बघून माझी ज्याम टरकली,साहेब नक्कीच काहीतरी विचित्र आणि अमानवीय करत होते एवढं माझ्या लक्षात आलं,पण त्या दिवसापासून जे भास रात्री व्हायचे ते दिवसादेखील व्हायला लागले,एक प्रकारची मरगळ ,उदासीनता सर्व घरात पसरली होती,आता आम्हांला साहेबांची भीती वाटायला लागली होती,साहेबांनी देवघरात जाणं तर बंदच करून टाकलं होतं,आणि त्यानंतर त्यांनी देवघरावर काळा कपडा टाकून दिला,आम्ही काम सोडून जाणार तोच साहेब स्वतः म्हणाले की उद्यापासून दोघांनी कामावर यायची गरज नाही म्हणून, एकदाचे सुटलो हे भाव आमच्या चेहऱ्यावर त्यांनी वाचले असावे कदाचित,अधून मधून मी साहेबांकडे चक्कर मारायचो ,साहेब फार खंगत चालले होते ,आणि त्यांचं वेड खूप जास्त वाढलं होतं, आता त्यांना सुद्धा आसपास कुणीतरी आहे असे भास व्हायला लागले होते,ते माझ्याकडे रडत रडत म्हणाले कि तो आलाय ,तो परत आलाय आणि त्याला आता माझा बळी पाहिजे आहे ,तो मला घेऊन जाणार आहे ,मला वाचावं ,असं म्हणून ते आत मध्ये पळून गेले ,आणि आता ही अशी बातमी आली...😢
समर्थ ला अश्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता पण त्याने कधी अश्या गोष्टी हाताळल्या नव्हत्या ,पण त्याचे गुरु सद्गुरू नित्यानंद स्वामी ह्या गोष्टी हाताळण्यात त्यांचा हातखंड होता ,आणि विशेष म्हणजे ते सुधाकररावांना चांगल्या प्रकारे ओळखायचे ,कित्येक अशक्य,अमानवीय केसेस त्या दोघांनी मिळून सोडवल्या होत्या,पण भौतिक संसारात मन रमत नसल्यामुळे नित्यानंदानी अज्ञातवास स्वीकारला होता, समर्थ ने टेलीपॅथी च्या माध्यमातून नित्यानंदसोबत संपर्क करायचा प्रयत्न केला पण घरातील वाईट शक्त्या त्याला अडवत होत्या ,त्यामुळे घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी समर्थकडे एकाच उपाय होता ,त्याने लागलीच त्या घरातील मंदिरातील काळा कपडा हटवला ,बाहेरील बागेतून मस्त टवटवीत फुल आणून गणेशाची आराधना केली ,खड्या आवाजात गणपती अथर्वशीर्ष म्हटलं आणि परत एकदा त्याच्या गुरुशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला ह्या वेळी तो यशस्वी झाला ,नित्यानंदानी त्यांच्या योग सामर्थाच्या जोरावर ,त्या घरात प्रवेश मिळवला ,त्या घरात आल्या आल्या नित्यानंदानां समजलं होतं की सुधाकर रावांनी स्वपत्नीच्या प्रेमापायी चुकून एका खतरनाक काळ्या शक्तीला जागं केलं होतं ,त्यांच्या एका चुकीच्या अधिष्ठानाणे खूप वर्ष शापामुळे निद्रावस्थेत असलेल्या एका महाभयानक ,खूप शक्तीशाली काळ्या शक्तीचे सर्व पाश तुटले होते आणि ती मुक्त झाली होती ,आता ती काळी शक्ती,ह्या जगावर राज्य करण्याचे खूप युगांपासून अपूर्ण असलेले तिचे मनसुबे सत्यात उतरवणार होती ,त्या शक्तीपुढे नित्यानंद अपुरेच पडणार होते ,पण तरीही ते सर्व त्या ईश्वरावर सोपवून त्यांच्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करणार होते,त्यादृष्टीने त्यांनी समर्थ आणि गंगाराम ला आवश्यक त्या गोष्टीची तयारी करायला सांगितलं ,नित्यानंदानी तिथे असलेल्या विघ्नहर्त्याला मनोमन हात जोडून हे विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली, सुधाकर रावांनी त्यांच्या बायकोचं प्रेत जिथे ठेवलं होतं ,नित्यानंदानी परत काढून आणायला सांगितलं ,कारण त्यांना ती शक्ती परत त्याच शरीरात बंदिस्त केल्यानंतरच नष्ट करता येणार होती,किंवा त्या काळ्या शक्तीला तिच्या जगात परत पाठवता येणार होतं, स्वामी नित्यानंदानी त्या एकदंताचं मनोभावे आर्जव केलं आणि ते त्यांच्या अधिष्ठानाओवतीला लागले,एका पवित्र ठिकाणच्या अबिराचे त्यांनी त्यांच्या भोवती आणि सुधाबाईंच्या प्रेताभोवती एक रिंगण केले ,मग हळद आणि कुंकुवाने एक तारा त्या ठिकाणी अश्या प्रकारे काढला कि त्या ताऱ्याच्या प्रत्येक बाजू एका विशिष्ठ कोनात येतील ,हे सर्व करत असतांना त्या काळ्या शक्तीने त्यांच्यावर 3 वेळा जीव घेणा हल्ला चढवला ,ती शक्ती सहजासहजी नित्यानंदांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नव्हती, त्या रूम मध्ये अचानक सर्व वस्तू जोर जोरात हलू लागल्या ,हवेत उडू लागल्या ,मोठमोठ्याने किंचाळण्याचे आवाज येऊ लागले , रूम मधले सर्व पुस्तके धापाधप खाली पडू लागले ,असंच एक पुस्तक नित्यानंदांच्या डोक्यावरून खाली पडले आणि त्यातून कसलातरी कापडाचा तुकडा बाहेर पडला ,नित्यानंदानी ते पुस्तक हातात घेऊन बघितलं तर ते एक अतिशय प्राचीन जादूटोण्याविषयी पुस्तक होतं ,पुस्तक पूर्ण धातूचं होतं, मुख्य कव्हर वर दोन कवट्या होत्या आणि त्या एकमेकांसोबत अश्या प्रकारे बांधल्या होत्या की त्याने पुस्तक लॉक होत होतं,पुस्तकाच्या पूर्ण बाजुंनी धातूच्या सापाने वेढा मारला होता ,आणि त्याची शेपटी त्या कवटीच्या डोळ्यांतून बाहेर येत होती ,आणि खाली मोठ्या अक्षरात प्राचीन लिपी मध्ये पुस्तक खोलण्यासाठी स्व:रक्ताचे दोन थेंब पुस्तकाला अर्पण करा ,पुस्तक आपोआप उघडेल असं काहीतरी लिहिलेलं होतं,नित्यानंदानी स्वतः चे रक्त त्यावर अर्पण केल्यावर, तो साप जिवंत झाल्याप्रमाणे सरसर करत पुस्तकाच्या वरच्या कोपऱ्यात जमा झाला,त्या कवट्या एकमेकांपासून विलग झाल्या आणि फडफड करत ते पुस्तक उघडल्या गेलं,पुस्तक उघडल्या बरोबर खूपसारे वटवाघूळ त्यातून बाहेर पडले ,नित्यानंदांच्या डोक्यावर घिरट्या घालून ते खिडकीतून बाहेर पडले ,पुस्तकाची अवस्था अतिशय वाईट होती पानं जीर्ण झालेले होते ,त्यामुळे पलटतांना ते पान फाटतयं कि काय असंच वाटायचं ,एकदा का एखादं पान फाटलं असतं तर त्या काळ्या शक्तीला परत पाठवण्याचे सर्व पर्याय संपले असते ,नित्यानंद पुस्तक वाचत असतांना त्यांना कुणीतरी ते पुस्तक त्यांच्या हातातून हिसकावून घेत आहे असं जाणवत होतं,अचानक जोराने वारा वाहायला लागला ,त्या खोलीत एक भोवरा तयार झाला आणि तो त्याच्या सोबत त्या खोलीतील सर्व साहित्य गरागरा फिरवायला लागला ,नित्यानंदानी लगेच आपल्या योगाच्या बळावर स्वतः भोवती तेजोवलंय निर्माण केलं त्यामुळे त्यांना काही होऊ शकलं नाही , नित्यानंदानी सर्व वाचल्यानंतर त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली ,त्यांनी लागलीच स्वतः जवळ असलेली कैलास पर्वताची पवित्र माती मंत्रीत केली ,त्या रूम मध्ये असलेल्या गणपतीची मूर्ती समोर ठेवून तिच्या भोवती त्या पवित्र माती चं रिंगण केलं आणि त्या आदिस्वरूप गणरायाची आराधना केली ,एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य त्या रूम मध्ये जाणवू लागलं, त्या गणेशाच्या मूर्ती भोवती एक तेजोवलंय निर्माण झालं होतं ,त्यातून सहस्त्र सूर्याचं तेज बाहेर पडत होतं, सर्व खोली त्या दैदीप्त्यमान किरणांनी उजळून निघाली होती ,रात्री घड्याळात बरोबर 12 च्या ठोक्याला चंद्र डोक्यावर आल्यावर ,एक चंद्रकिरन बाणाच्या वेगाने खाली येऊन गणपती बाप्पाच्या डोक्यावर असलेल्या चंद्रावर स्थिरावले,त्याच क्षणी एक गगनभेदी कींकाळी त्या खोलीत घुमली, त्या काळ्या शक्तीने सुधाबाईंच्या शरीरात प्रवेश केला आणि खूप आक्रमक झाली,चित्रविचित्र आवाज काढत नित्यानंदानां हानी पोहचवण्याचा प्रयत्न करू लागली , त्या खोलीत असलेल्या सर्व वस्तू हवेत उडायला लागल्या ,नित्यानंदानां त्या काळ्या शक्तीला आवरनं त्यांना कठीण व्हायला लागलं होतं ,त्यांनी परत एकदा गणेशाची मनोभावी आराधना केली ,त्या ओंकारस्वरूपात हालचाल सुरु झाली ,आणि काही कळायच्या आत त्याच्या हातातील अंकुश सुधाबाईंच्या प्रेतात घुसला ,एक मोठ्ठा स्फोट होऊन त्यांच्या प्रेताने पेट घेतला ,त्याचं क्षणी तिथली धरणी दुभंगली आणि ते प्रेत त्या काळ्या शक्तीसोबत कायस्वरूपी पाताळात गाडल्या गेलं ,घरातील उदासीनता सकारात्मक शक्तीने दूर झाली ,नित्यानंदानी त्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली ,तिथे असलेल्या सुधाबाईंच्या आणि सुधाकर रावांच्या उरलेल्या गोष्टीचं नदी मध्ये विसर्जन केलं आणि बाप्पाला त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली , नित्यानंदानी समर्थला सर्व गोष्टींची पूर्ण माहिती दिली ,पण सुधाकर राव ज्यांचं समाजात एवढं नावं होतं, ते खराब होऊ नये म्हणून नित्यानंदानी समर्थ ला ह्या केस बद्दल बाहेर लोकांमध्ये खरं कारण सांगण्यास मज्जाव केला ,समर्थने सुद्धा त्या गोष्टीचं भान जाणत केस ला रहस्यमयी मृत्यू चा दर्जा देऊन केस बंद केली ,कधी कधी समर्थ ला त्या बंगल्याच्या जवळून जात असतांना ,सुधाकर राव आणि सुधाबाई त्या बंगल्याच्या झोपाळ्यावर एकमेकांच्या गळ्यातगळा घालून निवांत झुला झुलत असतांना दिसतात.....
समाप्त