प्रतिक्षा..भाग दोन
लेखिका..जान्हवी कुळकर्णी - तारे
लेखिका..जान्हवी कुळकर्णी - तारे
"व्वा, काय सुंदर बंगला आहे ग... लोकं उगाच ह्याला भूत बंगला म्हणतात..बाहेरून इतका छान तर आतून किती छान असेल.."
बंगल्याच्या अवतीभोवती मोठ्ठी झाडं होती.. अक्राळविक्राळ वाढलेली... त्यात एक झाड तर पूर्ण वाळलेले.. ते दिसायला वेडेवाकडे आणि विचित्र होते.. सानिकाला जरा वेगळाच भास झाला त्याकडे बघतांना..त्याच्या फांद्या लांब होऊन तिला धरायला पाहताहेत असे वाटले तिला, पण क्षणात भानावर आली ती..आणि असं काही नसतं हे बजावलं तिने मनाला..
दोघी बंगल्याच्या मुख्य दाराजवळ गेल्या.. सानिका हसत हसत जोरात ओरडली "हॅलो, कुणी आहे का आत.. आम्ही आलोय भूत राजा तुला भेटायला..."
"साने, हयसून चल लवकर घरी..माका भ्या वाटतया.. काहीतरी इपरित होनार हा बघ.."
"पुंडे तुला जायचं तर तू जा.. मी ह्या so called भुताला भेटूनच जाणार..."
पुंडी ला कळत नव्हतं काय करावं कारण सानिका तिची मैत्रीण होती. तिला सोडून ती कशी जाणार होती ?
सानिकाने दाराला हात लावताच ते कुरकुरत मोठा आवाज करत उघडले.. आणि खालून एकदम उंदीर पळाले..आणि वटवाघळे उडाली.. दोघी जरा घाबरल्याच.. पण सानिका कसली मान्य करते.. ती आत आली..पाठोपाठ पुंडी पण आली.. पुंडीला ती उंदरे आणि वटवाघळे विचित्र वाटली, त्यांचे डोळे पांढरे दिसले तिला. आणि तोंडाला रक्त होतं त्यांच्या... सानिकाला सांगावे तर ती हसण्यावर नेईल म्हणून ती गप्प बसली..
दार उघडले आणि आता खूप जाळे पसरले होते.. प्रचंड धूळ होती..फरशीवर काही ठिकाणी रक्ताचे डाग सुद्धा होते..चिकट असे... जणू कुणालातरी ओरबाडून खाल्ल्या प्रमाणे .... विचित्र दर्प होता..कुबट असा.. दोघींना एकदम मळमळले. पुंडीला तर उलटीच झाली..सानिकाने तिच्या पाठीवर थोपटले.. पाणी पण आणले नव्हते त्यांनी... बाहेर वीज कडाडून पाऊस सुरू झाला होता.. वेडावाकडा मुसळधार पाऊस.. आणि अचानक मुख्य दार आपोआप बंद झालं..
पुंडी आणि सानिका दाराकडे धावल्या पण ते उघडणे शक्य नव्हतं..कारण आता त्या बंगल्याच्या मनाप्रमाणे सगळं होणार होतं... आता सगळीकडे अंधार झाला होता.. पुंडीने सनिकाचा हात घट्ट धरला..आता सानिकाला पण टेन्शन आलं होतं.. बंगल्याला डावीकडे पायऱ्या होत्या.. आणि त्यांना दिसलं त्यावर कुणीतरी उभं आहे..
सानिकाने घाबरतच विचारलं "क क कोण आहे तिथे?.. "
आणि अचानक ती आकृती गायब झाली.. सानिका ने पुंडी कडे वळून पाहिलं..तर ती तिथे नव्हती... पुंडीचा फक्त हात तोही तुटलेला..तिच्या हातात होता.. सानिका किंचाळली ..खूप घाम फुटला होता तिला..
" पुंडे, कुठेय तू? प्लीज गम्मत नको करुस ग.. मी मान्य करते माझी चूक झाली चल आपण इथून जाऊ.. ये ना ग"..
सानिका रडायला लागली... "साने गो साने, मी हयसर हा वरती ... ये... " आणि मोठ्याने हसण्याचा आवाज आला सानिकाला..
ती अंधारातच कशीबशी चाचपडत जीना चढून वर गेली..तिथे तर अजुनच अंधार होता..
सानिका लटपट कापू लागली.. अचानक तिला दिसलं डावीकडच्या खोलीत कुणीतरी बसलं य.. ती आत गेली.. 'ही पुंडी आहे का? ' तिने खांद्यावर हात ठेवला ..
थरथरत्या आवाजात विचारले... "पुंडे, इथे का बसली.. चल आपण जाऊ.."
"ही ही ही, आता हयसून जाणं शक्य नाय, तू माझ्या ताब्यात आली हा, तुका फाडून खाल्ल्याशिवाय माका चैन पडणार नाय"
"नाही, तू पुंडी नाहीस, कोण आहे तू? पुडी कुठेय..काय केलं तू तिला??" सानिकाने रडत विचारल..
"हो मी पुंडी नाही,मी या बंगल्याचा मालक आहे, आणि जे माझ्या वाटेला जातील त्यांना मरावं लागतं ..आज खूप वर्षांनी ताजं रक्त मी प्यायलो..आता माझी शक्ती खूप वाढणार..त्यात तू मला आव्हान दिले.. तुला तर मी मारून माझी काळी जादू तुझ्यावर करणार आणि तुझ्या रुपात मी आता माझे अस्तित्व सगळ्यांना दाखवणार..हा हा हा...."
आणि पुंडी ने तिच्याकडे मान फिरवली.. डोळे लाल आणि डोळ्यातल्या बाहुल्या पूर्ण पांढऱ्या.. दातातून रक्त टपकत होतं..आणि ती स्वतःचाच हात खात होती.. खातांना वेदना झाल्यासारखी ओरडत होती..
सानिका झपकन खोलीच्या बाहेर आली.. पळायला लागली, रडत होती..पश्र्चाताप होत होता तिला.. का आलो बंगल्यात आपण.. तिच्या मागे पुंडी धावत येत होती.. तिच्या हातात काहीतरी चमकदार वस्तू होती..
सानिका खाली आली..हॉल मध्ये अंधारात ती ठेचकळली.. तिला कॉट दिसला..त्याच्या खाली ती लपली.. आणि तिचा हात कसल्यातरी लिबलिबीत गोष्टीवर पडला... तिने पाहिले ते रक्त होते.. अंधुक प्रकाशात तिला ते काळसर दिसलं..आणि वळून पाहिले तर ती मरून पडलेली पुंडी होती.. तिचा गळा चिरलेला..हात तोडलेला ...मुंडी फिरवलेली ..किंचाळली ती मोठ्याने.. आणि पुंडी खदखद हसत होती...
कॉट खालून बाहेर आली ती, आणि तेव्हढ्यात धाप्पकन तिच्यासमोर पुंडीने उडी मारली.. किती गचाळ दिसत होती.. दात विचकत हसत होती ...डोळे रक्ताळलेले.. सानिकाच्या अगदी पुढ्यात होती ती..सानिकाला तिने जोरात नखं मारली..तिला आपटली... जखमी सानिका कशीबशी उठून किचन कडे धावली.. तिथे तर अजुनच घाण वास येत होता..बाहेर वीज चमकल्याने त्या उजेडात तिला दिसली मरून पडलेली तीन चार शरीरं ज्यावर किडे रेंगत होते..त्यावर धड नव्हते...आणि मध्य भागात कसलेतरी रिंगण होते, सुकलेले लिंब.. काळी बाहुली, त्यावर टोचलेल्या असंख्य सुया आणि तीन चार कवट्या..खूप मळमळ झाली तिला..खूप घाबरली.. ती तिथून परत येणार तेव्हढ्यात त्यातल्या एकाने तिचा पाय धरला..आणि तो खदखद हसू लागला.. सानिकाने त्याला धक्का दिला..आणि ती पुन्हा बाहेर हॉल मध्ये आली..
तिला दिसलं पुंडी आता भिंतीवर पालीसारखी रेंगत होती.. दाराच्या अगदी वरच्या बाजूला.. तिथून कसे बाहेर पडावे...ती पुंडी नसून तिच्या रूपातला तो सैतान तिला कधीही आणि कसाही मारू शकणार होता.. काय करावे सुचत नव्हते फक्त रडायला येत होते.. बाजूच्या खोलीतले ते मृतात्मे सुद्धा रेंगत रेंगत तिच्याकडेच येत होते, चारही बाजूंनी ती घेरली गेली होती..
सगळ्यांचे भेसूर रडणे आणि हसणे तिला असह्य व्हायला लागले.. आपला प्राण जातो की काय असे वाटत होते तिला... हृदय धडधड उडत होतं भीतीने .. सगळे तोंड विचकत तिला मारायला येऊ लागले..तेव्हढ्यात मुख्य दार उघडले गेले.. आणि बाहेरून धुपाचा सुगंध येऊ लागला..सानिकाने पाहिलं परशा आला होता..सोबत आजी होती आणि पीर बाबा होते.. मोठमोठ्याने त्यांच्या भाषेत काहीतरी बोलत ते आत आले...धुपाच्या वासाने सगळे मृतात्मे भरभर किंचाळत आतल्या खोलीत निघून गेले..आणि पुंडी भिंतीवरून दाणकन खाली आपटली..
पीरबाबाने त्या सैतानाच्या डोळ्यात उदी फेकली.. आणि पवित्र चादरीत त्या सैतानाला गुंडाळले.. तो किंचाळत होता, भेसूर दिसत होता.. बाबाने त्याला एका खोलीत बंद केले..बाहेर कुलूप लावले ... त्यावर पवित्र जाड धागा बांधला..
आणि सांगितले हा धागा कुणीही सोडायचा नाही ... तसे झाले तर पुन्हा जे घडेल ते अघटीत असेल..त्यातून कुणीही वाचणार नाही..
सानिका बेशुद्ध झाली होती...तिला परशा ने उचलले.. बाहेर ठेवले... पुंडीचे कलेवर देखील बाहेर आणले ... गावकरी जमले होते.. पीरबाबाने बंगल्याच्या मुख्य दाराला कुलूप लावून त्यावर उदी असलेल्या पुड्यांचे दोरे बांधले.. बाहेरून उदीची रेषा ओढली... सगळं संरक्षीत केलं.. सगळे भराभर तिथून निघाले.. फक्त एक चूक झाली होती आणि ती कुणाच्याच लक्षात आली नाही..ती म्हणजे सानिकाची एक वस्तू बंगल्यात राहून गेली होती.. तिच्या उजव्या पायातले पैंजण..
पुंडी वर अंतिम संस्कार झाला..परशा खूप रडत होता.. बहिणीवर खूप माया होती त्याची.. शेतातून तो संध्याकाळी घरी आल्यावर त्याला खुर्ची खाली चिठ्ठी पडलेली दिसली.. त्यातलं वाचून तो घाबरला..सानिकाच्या आजीकडे धावत गेला..आजीने पीर बाबाकडे शरण घेतली..आणि वेळेत हे झाले नसते तर सानिका सुद्धा प्राणास मुकली असती..
त्यानंतर सानिकाला गावात आईबाबांनी कधी येऊच दिले नाही..
****************************** ******************************

"सानिका उठ बेटा, आजीआजोबांचं घर आलं.."आईने आवाज दिला..
सानिकाने डोळे उघडले.. आजी च्या हातात औक्षणाचे तबक होतं.. थरथरत्या हाताने आजीने सगळ्यांना भाकर तुकड्यांनी आणि निरांजनने ओवाळले.. किती खुश दिसत होती ती दोघं..
"सानू, अग किती गोड दिसते ग..आणि जावई बापू तर फारच राजबिंडे.. चला हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा..सानू च्या आवडीचा स्वैपाक केलाय.. आमरस, पुरणपोळी, काजुचा रस्सा, भजी..आणि सोलकढी "....
"व्वा आजी, खूप दिवसांनी सोलकढी पिणार आणि तीही तूझ्या हातची..लव यू आजी"
छान हसत खेळत दिवस गेला... रात्र झाली.. झोपण्याची तयारी झाली..
शंतनु वरच्या खोलीत झोपला.. सगळीकडे शांतता होती, तेव्हढ्यात कुत्रे भेसूर रडायला लागले .शंतनुची झोप उडाली.. त्याला विचित्र वाटायला लागले, घड्याळात पाहिले रात्रीचा एक वाजला होता, तो पाणी प्यायला पण त्याला झोप येत नव्हती..
खिडकीतून खूप थंड हवा येत होती.. तो खिडकी लावायला गेला तर त्याला सानिका खाली अंगणात उभी दिसली,
"एव्हढ्या रात्री ही तिथे काय करतेय", त्याच्या मनात विचार आला..
तो खाली गेला... आता अंगणात कुणीच नव्हतं... "गेली कुठे ही, आणि दार तर आतून बंद होतं... भास झाला का.."
तो घरात जाणार तेव्हढ्यात त्याला आवाज आला, "शंतनु, ये ना माझ्या मागे, लवकर ये..."
हसण्याचा आवाज येत होता, सानिका कुठे बोलावतेय..त्याला कळत नव्हतं..ती पुढे पळत होती...तो तिला आवाज देत होता.. त्याला समजत नव्हतं ती कुठे जातेय...
जातांना वाटेत त्याने पाहिलं अवतीभोवती जंगल सारखी झाडी वाढलीय.. अचानक कुणीतरी त्याच्या अंगावर झेप घेतली... तो दचकला...ते वटवाघूळ होते..खूप मोठे..त्याने सानिकाला आवाज दिला...तिच्या पैंजणाचा आवाज येत होता पळतांना, पण दिसत नव्हती..अशी काय गम्मत करतेय ही... "सानिका प्लीज गम्मत पुरे झाली, घरी चल"
"अरे, ये ना शंतनु, किती छान चांदणं पडलंय...ये.."
तो आणखी पुढे गेला, त्याला तो बंगला दिसला, "प्रतिक्षा"...
पण सानिका नव्हती दिसत..अचानक मागून तिने खांद्यावर हात ठेवला, बोलली," शंतनु, चल ना बंगल्यात..खूप छान आहे हा बंगला, आत जाऊन बोलूया"
"अग पण कुलूप आहे ह्या दाराला, आणि कुणाचा आहे हा बंगला..तू चल बरं इथून, मला खूप विचित्र feelings येताहेत इथे..."
"अरे माझ्या काकांचा आहे हा, तू एक काम कर कुलूप त्या दगडाने तोड आणि त्या पुड्या सगळ्या फेकून दे"

"अग पण"
"तोड म्हंटले ना ते कुलूप"
तिचा आवाज आता घोगरा झाला होता.. त्याने तिच्या डोळ्यांकडे पहिले...तो एकदम संमोहित झाला ... त्याने कुलूप तोडले... आत गेला... त्या खोलीचेही कुलूप तोडले ...आणि दार उघडले..तो सैतान बसला होता आत...पवित्र चादर होती त्याच्या अंगाभोवती, शंतनु ने ती सुद्धा बाजूला केली ...आणि अचानक शंतनु भानावर आला, त्याच्या अंगावर शहारे आले...काहीतरी विपरीत घडणार त्याला अंदाज आला....
क्रमशः....