नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्या प्रयत्नाला "असंभव" कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात..खूप आभारी आहे मी तुमची, त्यातूनच माझा आत्मविश्वास वाढला आणि ही दुसरी कथा मी लिहितेय.. कशी वाटतेय प्रतिसाद जरूर द्या ..धन्यवाद🙏
प्रतिक्षा..भाग एक
लेखिका..जान्हवी कुळकर्णी - तारे
सानिका तिच्या आई बाबासोबत जवळपास बारा वर्षांनी आजी आजोबांकडे जात होती .. तिचे आजोळ होते रत्नागिरीतील खेड ह्या गावात.. वयाची चोवीस वर्ष तिने आई बाबांसोबत नाशिक शहरातच घालवलेली....पण गेली तीन वर्ष ती मेडिकल practise निमित्त कोल्हापूर येथे आलेली..
आणि तिचे आई बाबा दोघेही नामांकित बांधकाम व्यावसायिक.. सधन.. त्यामुळे लहानपणी खेड येथे यायचे झाले तर आईसोबतच...कारण तिचे बाबा फारसे उत्सुक नसायचे तिथे जायला...त्याचे कारण तिच्या आईने आणि सानिकाने खूपदा विचारले .. पण ते उत्तर द्यायची टाळाटाळ करायचे...त्यांना आठवण झालीच आईबाबाची तर ते त्यांनाच इकडे बोलावून घेत.. . त्यामुळे गावी जायचे तर ती आई सोबतच जायची.. आई तिला आजीकडे सोडून द्यायची आणि महिना भराने घ्यायला जायची...
तिची आई सुद्धा त्याच गावातली होती.. आणि आईच्या आईबाबाचा खूप विचित्र पद्धतीने खून झाला होता..दादा तर गायबच झाला होता.... असे आईने सांगितले होते..सांगताना आई खूप विचलित व्हायची..कारण ह्याचा शोध कधी लागलाच नाही.. सानिकाच्या बाबांनी तिला आपले केले होते..खूप साथ दिली होती.. शेवटी तिच्या दादाचे ते मित्रच तर होते...
काही का असेना, सानिकाला आवडायचे तिथे ..पण जेव्हाही कुठे जायची इच्छा असेल तेव्हा आजी जास्त फिरूच द्यायची नाही.. त्यामुळे पूर्ण गाव तिला कधी फिरताच आले नाही.. आणि किशोर वयात तशीही खूप उत्सुकता असते..त्यात कुणी नाही म्हंटले तर ती गोष्ट करण्याची जिद्द जास्तच असते..
आणि ह्या जिद्दीपणामुळेच तर त्यांच्या जीवावर बेतले होते..त्यातून सहिसलामत बाहेर पडले होते सगळे.. मरणाच्या दारातून तिला सगळ्यांनी खेचून आणले होते.. त्यानंतर सानिकाचे बाबा तिला घेऊन कधीच गावात आले नाही.. तसे ठरवूनच ते गावाबाहेर पडले होते..
त्यांच्या मते ते सुखरूप बाहेर पडले पण खरंच तसे होते का??.. तो भूतकाळ त्यांची पाठ सोडणार होता?? नाही!! उलट आता आणखी दुप्पट शक्तीने तो त्यांच्या समोर येणार होता..
सानिका डोळे मिटून शांत बसली होती गाडीत..आणि तिच्या सोबत तिचा होणारा नवरा शंतनु गाडी चालवत होता.. आजी आजोबा आता थकले होते.त्यामुळे त्यांनी सानिका आणि शंतनुला आशीर्वाद देण्यासाठी गावी बोलावले होते... सानिकाच्या बाबांची अजिबात इच्छा नव्हती...सानिकाच्या हट्टापायी ते नाराजीनेच तयार झाले होते जायला.. . शंतनु सुद्धा नामांकित physician होता..
"शंतनु आपण on the way एखादी चहा टपरी असेल तर चहा घेऊया?? माझी झोप तरी उडेल रे", सानिका बोलली..
"Yes dear, ofcourse घेऊया.. मलाही आता चहाची खूप आवश्यकता आहेच..कारण ड्राईव्ह करून मी पण दमलोय. आणि अजून आपल्याला बरंच पुढे जायचंय..काय बाबा, चालेल ना?"
" येस माय बॉय.. चालेल काय धावेल..आणि तू थकला असशील तर मी करू का ड्राईव्ह?"
"Oh no, not like that, मी करतो ड्राईव्ह..तुम्ही आरामात बसा..ओके?"
चहा घेता घेता आई बोललीच, " सानु गावात गेल्यावर आजी आजोबांचा आशीर्वाद घ्यायचा आणि एक दिवस थांबून लगेच निघायचे, मला कोणतीही रिस्क नको आहे, तुला कळलय मला काय म्हणायचय!"
"हो ग आई, सारखी सारखी तू तेच का सांगतेय.."
"एक मिनिट, काही प्रोब्लेम आहे का, मला कळेल का तुम्ही नेमके कोणत्या रिस्क बद्दल बोलताय". शंतनुने विचारलं..
"Nothing my boy, मायलेकीमधला जनरल डायलॉग आहे, बाकी काही नाही" बाबांनी विषय टाळला.
चहा घेऊन ती चौघे पुढे जायला निघाले.. तिचे गाव आता साठ किलोमीटर अंतरावर असेल.. चार तासांपासून तो ड्राईव्ह करत होता.. छान थंड हवा सुटली होती.. गाडीत गाणे लागले होते... ...
.... आनेवाला पल जानेवाला है, हो सके तो इसमे जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है ....
गाणे ऐकता ऐकता सानिका भूतकाळात हरवली..

***************************************
सनिकाची गावातली एक मैत्रीण होती पुंडी नावाची..तिच्याच वयाची .. तिच्यासोबत खेळणे आणि खूप गप्पा करणे आवडायचे सानिकाला.. पुंडीचा एक भाऊ .. परशा.. उन्हाळ्यात तर तो नेहेमी चिंचा आणि कैऱ्या आणून द्यायचा ह्या दोघींना.. खूप मजा करायचे हे तिघे.. आजीने तर परशाला तंबीच दिली होती.. ह्या दोघींना कधीच एकटे सोडायचे नाही.. कारण परशा ह्या दोघींपेक्षा चार पाच वर्षांनी मोठा होता.. त्यामुळे अगदी मोठ्या भावाप्रमाणे त्यांचा सांभाळ करायचा....
गावाच्या थोडं पुढे एक किलोमीटर वर एक बंगला होता.. त्याच्याविषयी गावात चर्चा असायची.. तिकडे कुणीच जायचे नाही.. कारण त्या बंगल्यात भूत आहे असे सगळे म्हणायचे.. गावातली चार पाच माणसं रहस्यमयरित्या गायब झाली होती ती त्या बंगल्यात गेल्यानेच असे म्हंटले जायचे.. मोठी मंडळी तर आपल्यापेक्षा लहान मुलांना कधीच त्या भागाकडे फिरकू काय त्या वाटेकडे बघुही द्यायचे नाही.. त्या बंगल्याकडे जातांना मध्ये खूप झाडी वाढली होती..
सानिकाला खूप उत्सुकता होती त्या बंगल्याची.. शहरात वाढलेली असल्याने भूत वगैरे असतात ह्यावर विश्वास ठेवावा की नाही हा संभ्रम पडायचा तिला..
"आज्जी, तो भूतबंगला खरंच आहे का ग.. खरंच तिथे कुणी जात नाही??.. आणि काही घडले होते का तिथे.. ते पाटील काका नेहमी त्या गोष्टी सांगतात..म्हणतात तिथे जे गेले ते परत आलेच नाहीत.. "
"जळो मेलं लक्षण ते.. त्या किस्न्याला काही काम नाही ..उठ सुठ त्या बंगल्याच्या गोष्टी करतो.. लहान मुलं घाबरतील ह्याची जाण नाही मेल्याला.. आज तर चांगली फैलावरच घेते त्याला. हे बघ सानु, कुणी काहीही सांगितले तरीही आपण जायचे नाही तिकडे.. समजलं.. आणि मला जर असं कळलं तर तुझे तंगडेच मोडीन मी.. एक तर तुझे आई बाबा इथे नाहीत त्यात आज अमावस्या आहे, काही झालं तर मी काय तोंड दाखवू त्यांना?? खबरदार पुन्हा असे काही विचारले तर.."
सानिका चांगलीच घाबरली आजीला.. ती पुंडीकडे खेळायला गेली.. पण एका वेगळ्या निर्धाराने..

"काय गो साने, आज तू उदास हा..काय झालं.. आज्जीनु रागावल्यान वाटतं.."
"पुंडे, मला त्या बंगल्यात जायचंय.. तू चलते का सोबत??.."
"आत्ता ह्या काय नवीन बाई, तो बंगला भूताडीचा हा.. कूनीबी नाय जायचं तिथे.. माका तर बाई भितीच वाटती.. "
"अग पुंडे, भूत बीत काही नसतं ग.. तू येणारेस की मी एकटी जाऊ.. बोल लवकर.."
"अगो पण परशा दादाक तरी येऊ दे..तेका सांगून जाऊ.."
"हे बघ मी ह्या खुर्चीवर चिठ्ठी लिहून ठेवते..मग तर झालं ... चल आता..नाहीतर मी निघते..आणि तू घाबरु नको ग..मी आहे ना.. चल तो जो कुणी भूत असेल त्याला आज चांगला हाणू"
आणि त्या निघाल्या.. जातांना हवा खूप सुटली होती.. पूंडी खूप घाबरली होती पण मैत्रिणीला सोबत हवी म्हणून ती निघाली.. परशा लवकर घरी येऊन त्याने ती चिठ्ठी पहावी अशी बाप्पाला मनोमन प्रार्थना ती करत होती..
वाटेत झाडी चांगल्याच वाढल्या होत्या... एकात एक फांद्या दाटल्या होत्या त्यामुळे सूर्यप्रकाश अगदीच तुरळक होता रस्त्यावर...आणि दिवसा रातकिडे ओरडत होते... त्यात मे महिना असूनही मधे मधे ढग आले होते आकाशात.. आता तर अचानकच भरून आलं..थंड हवा सुटली होती. ...कधीही पाऊस कोसळेल असं वाटत होतं.. अंगावर शिरशिरी यायला लागली होती..
"पुंडे, लवकर पाय उचल बरं, म्हणजे पाऊस यायच्या आता आपण त्या बंगल्या जवळ जाऊ.. ओले झालो ना तर आजी संताप करेल बाई.."
"साने, गो साने, आपण घराकडे परत जाऊ ... माका काही हे लक्षण ठिक दिसत नाय हा... तुका काय वाटता आपन जे करतुया ते चांगला हा काय. "
" हे बघ पुंडे, तुला जायचे तर तू जाऊ शकतेस, पण मी तिथे जाणार म्हणजे जाणार ... मलाही बघायचं काय आहे तिथे आणि तो जो भूत आहे त्याला चांगला धडा शिकवायचा आहे." सानिका हसत म्हणाली.
तेव्हढ्यात वाटेवरच्या पिंपळाच्या झाडाची सळसळ झाली.. अचानक कुणीतरी तिथून निघून गेल्यासारखे वाटले पुंडीला... पण सनिकाचे तिकडे लक्षच नव्हते..
आता जरा जास्तच हवा सुटली होती, पुंडीच्या कानाजवळ आवाज आला.. ये ssss पुंडी...
ये ssss... हा हा हा...
पुंडी एकदम दचकली... सानिका खूप पुढे निघून गेली होती.. पूंडीला आता रडायला यायला लागलं... ती जोरात धावू लागली..आणि ठेच लागून पडली.. तिच्या बोटातून रक्त यायला लागलं .. तेव्हड्यात एक बुटका माणूस ज्याच्या डोक्यावर केसच नाहीत आणि एक डोळा मोठा तर एक डोळा अगदीच लहान..डोळ्यातल्या बाहुल्या लालभडक आणि दातांच्या जागेवर अणकुचीदार सुळे.. तिच्या बोटाचे रक्त पाहून तो जिभल्या चाटायला लागला... तिने जोरात किंकाळी फोडली...आणि अचानक तिच्या खांद्यावर हात पडला.. ती घाबरली..वळून पाहिले तर ती सानिका होती..
"काय झालं ग पुंडे, अशी अचानक का थांबली.. आणि ओरडायला काय झालं तुला..वेडी..घाबरली की काय.. चल लवकर...तो दिसतोय बघ बंगला.."
पुंडीचे रक्त त्या दगडापाशी सांडले होते.. आणि तो बुटका जिभेने ते चाटत होता..
बंगला त्यांच्या अगदी समोर होता.. मोठ्ठा आवार... बंगल्याच्या आवारात एक झोपाळा..कड्या तुटलेल्या..सगळीकडे पाला पाचोळा विखुरलेला.. बंगल्याचे नाव होते.."प्रतिक्षा"..
काय मोठ्ठा बंगला होता तो.. त्याचे गेट सुद्धा मजबूत लोखंडी आणि प्रशस्त होते, सानिका पूंडीचा हात धरून गेट जवळ आली.. गेट ला हात लावणार तेव्हढ्यात ते आपोआप करsssss आवाज करत उघडलं.. सानिकाला आश्र्चर्य वाटलं...पण तिने तिकडे लक्ष दिले नाही.. पुंडी अजूनही थरथर कापत होती .. कारण काहीतरी विपरीत होणार ही जाणीव तिला होत होती..

क्रमशः...