चौथ्या भागाची लिंक 👇👇
सोनगावचा_मास्तर- भाग पाच.
पहाटेच्या धुक्यात काही अंतर चालून गेल्यानंतर त्याला समोर एक छोटासा दगडी घाट आणी काळ्या दगडांनी बांधलेल्या पायर्या दिसल्या, त्याठिकाणी ओढ्याचे पाणी पण संथपणे वाहत होते.. तेथे श्रीधरला गळ्यापर्यंत खोल असणार्या पाण्यामध्ये एक व्यक्ती उभा असलेला दिसला.. त्याचे फक्त मुंडके आणी आकाशाच्या दिशेने नमस्कार केलेल्या अवस्थेत असलेले दोन्ही हातचं फक्त पाण्याच्या बाहेर दिसत होते.. त्याला पाहून श्रीधरला आनंद झाला आणी तो तेथेच घाटावरील दगडावर ठाण मांडून बसला..तो पाण्यातील व्यक्ती बराचवेळ डोळे बंद करून त्याच अवस्थेत ध्यानात मग्न होता.. काही वेळानंतर आकाशात सुर्य उगवल्यानंतर त्याने एक मिनीटभर पाण्यामध्ये डुबकी मारली आणी नंतर चालत चालत ओढ्याच्या कडेला असणार्या त्या पायर्यांच्या दिशेला आला..🏞️
उंचपुरा आणी काटक शरीरयष्टी, वय साधारणपणे पन्नासच्या जवळपास, अंगावर फक्त पांढरेशुभ्र धोतर होते..बाहेर येताच त्याने एका दगडावर ठेवलेला त्याचा पांढरा पंचा उचलून खांद्यावर टाकला.. श्रीधर अजूनही त्याचे निरीक्षण करत होता.. डोक्यावरील दाट काळेभोर बारीक केस आणी त्यामधून बाहेर आलेली खांद्यापर्यंत रुळणारी लांबलचक शेंडी..पाणीदार डोळे आणी चेहर्यावर दिसणारे तेज पाहून हेच ते वासुनानांनी सांगितलेले 'शंभू गुरव' आहेत हे श्रीधरने ओळखले, त्याने लगेच पुढे होऊन त्यांना नमस्कार केला..
"नमस्कार महाराज.. मी श्रीधर, सरकारी शाळा मास्तर आहे, माझ्या एका विध्यार्थ्याला भुतबाधा झाली असल्याचा मला दाट संशय आहे, त्यासंबंधी मला तुमची मदत हवी होती"
श्रीधर नम्रपणे म्हणाला,
श्रीधर नम्रपणे म्हणाला,
शंभूने काही क्षण श्रीधरकडे निरखून पाहिले.
"भुतबाधा? पण मी तर असली सर्व कामे काही वर्षापुर्वीच सोडून सर्वांपासून अलिप्त झालेलो आहे..मग तुला माझ्याकडे कोणी पाठवले?"
"भुतबाधा? पण मी तर असली सर्व कामे काही वर्षापुर्वीच सोडून सर्वांपासून अलिप्त झालेलो आहे..मग तुला माझ्याकडे कोणी पाठवले?"
" मला वासूनानांनी पाठवले आहे महाराज, तुम्ही फक्त एकदा त्या मुलाला पाहून घ्या.. कदाचित तुम्हाला पाहूनच समजेल त्याला नक्की काय झाले आहे ते.. नंतर हवे तर तुम्ही फक्त जो काही उपाय असेल तेवढा फक्त मला सांगा, मी करेल तो.. माझा विध्यार्थी आहे हो तो.. मी त्याला माझ्या नजरेसमोर दिवसेंदिवस खंगत चाललेला नाही पाहू शकत"
श्रीधरने शंभुला विनंती केली.
श्रीधरने शंभुला विनंती केली.
"ठिक आहे.. संध्याकाळी मारुती मंदीराच्या बाहेर भेट मला, आणी तुझी नेमकी समस्या काय आहे ते सांग"🛕
एवढे बोलुन शंभू तेथून निघून गेला..आणी श्रीधर त्याच्या घरी परतला.
एवढे बोलुन शंभू तेथून निघून गेला..आणी श्रीधर त्याच्या घरी परतला.
सायंकाळी श्रीधर शाळा सुटण्याच्या आधीच शाळेतून बाहेर पडला आणी वेसी जवळच्या मारुती मंदीरामध्ये गेला.
तेथे शंभू एक कळशीमधल्या पाण्याने मुर्तीची साफसफाई करताना त्याला दिसला..अंगावर तसाच पेहराव होता जो श्रीधरने सकाळी पाहिला होता, पांढरे धोतर आणी पंचा.
तेथे शंभू एक कळशीमधल्या पाण्याने मुर्तीची साफसफाई करताना त्याला दिसला..अंगावर तसाच पेहराव होता जो श्रीधरने सकाळी पाहिला होता, पांढरे धोतर आणी पंचा.
"ये मास्तर, दर्शन घे आणी बस जरावेळ" श्रीधरला पाहताच शंभू म्हणाला.
"आज बर्याच वर्षांनंतर करताय वाटत तुम्ही हे काम" श्रीधरने भिंतीला टेकून बसताना सहजच विचारले,
"होय मास्तर..लहानपणी दहा बारा वर्षांचा होतो तेव्हापासून माझ्या बाबांसोबत ह्या मंदीरात यायचो मी, अनेक वर्षे दररोज न चूकता गावातील मारुती,महादेव,भैरोबा, सटवाई, मरीआई सगळ्या देवदेवतांची पुजा अर्चा केली आहे..पण आता बरेच दिवस झाले होते इकडे आलोच नव्हतो, पण आज आलो आणी माझे ते जूने दिवस आठवले मला"
शंभूने लालभडक शेंदूर तेलामध्ये मिसळला आणी मारुतीच्या धूवून स्वच्छ केलेल्या मुर्तीला फासू लागला..
शंभूने लालभडक शेंदूर तेलामध्ये मिसळला आणी मारुतीच्या धूवून स्वच्छ केलेल्या मुर्तीला फासू लागला..
"हो बरोबर, पण तुम्ही सर्व कामांपासून अलिप्त होण्याआधी दोन तीन पुजार्यांची नियुक्ती केली होती सगळ्या मंदीरांवर, असे मला वासुनानांनी सांगितले होते"
" ते व्हय..ते संसारी माणसं.. त्यांचे सगळे कामधंदे सांभाळून फावला वेळ मिळाला तरच पुजा अर्चा करतात..असो, त्यांची हि सेवा पण कमी नाही..पण हे आजकालचे नवीन साधक फारसे रीतीरिवाज आणी धर्मनियम पण पाळताना दिसत नाहीत मास्तर..प्रत्येकाला ताबडतोब सिद्धी पाहिजे. पण कष्ट करायचे नसतील आणी मनापासून इच्छा नसेल तर कसे काय अधिकार प्राप्त होतील त्यांना? जाऊ दे सोड..
हां तर तु काय म्हणत होतास सकाळी ते भुतबाधेच?"
शंभू आता मुद्द्यावर आला होता.💀
हां तर तु काय म्हणत होतास सकाळी ते भुतबाधेच?"
शंभू आता मुद्द्यावर आला होता.💀
श्रीधरने त्याला रघू आणी देसाई गुरूजींची पुर्ण माहिती सांगितली आणी त्याला आलेले अनेक अनुभव पण सविस्तर सांगितले..
श्रीधरचे बोलणे ऐकता ऐकता शंभूने शेंदुराचा शेवटचा हात फिरवून मुर्तीला रुईच्या हिरव्या पानांचा मोठा हार घातला आणी आजूबाजूने पडलेले नारळाचे सुकलेले तुकडे, तेलाचे मोठे डाग स्वच्छ करायला सुरुवात केली.
श्रीधरचे बोलणे ऐकता ऐकता शंभूने शेंदुराचा शेवटचा हात फिरवून मुर्तीला रुईच्या हिरव्या पानांचा मोठा हार घातला आणी आजूबाजूने पडलेले नारळाचे सुकलेले तुकडे, तेलाचे मोठे डाग स्वच्छ करायला सुरुवात केली.
"हंम्म..म्हणजे रघुवर देसाई गुरुजीची माया होती आणी अकाली शरीराचा त्याग करत असताना लहानगा रघू एकटाच त्या विहीरीजवळ होता तर.. असं असेल तर देसाईच्या आत्म्याचा काही अंश रघुच्या शरीरात प्रवेश करणे सहज शक्य आहे, पण तो अंश त्याच्या शरीरामध्ये किती प्रमाणात भिनलेला आहे हे त्याला पाहिल्या नंतरच समजेल.. उद्या शाळा भरायच्या वेळेस मी येतो तुझ्याकडे, मला त्याला पाहायचेय"
बोलता बोलता शंभूने पुर्ण गाभारा स्वच्छ केला होता.
बोलता बोलता शंभूने पुर्ण गाभारा स्वच्छ केला होता.
दूसर्या दिवशी सकाळी श्रीधर आणी शंभू दोघेजण शाळेच्या एका रिकाम्या असणार्या वर्गातील खिडकीत उभे राहिले..जेथून शाळेमध्ये येणारे सगळे मुले व्यवस्थित दिसत होते..पण येणार्या मुलांना ते दोघे दिसत नव्हते.. थोड्याच वेळात शाळेचे मुले मुली येण्यास सुरुवात झाली ,दुरूनच श्रीधरने तोंड आणी एक हात वाकडे झालेला रघू एका पायाने लंगडत शाळेच्या गणवेशात येताना पाहून इशार्याने शंभूला दाखवले..शंभू त्याचे बारकाईने निरीक्षण करत होता..
"तुझा संशय बहुतेक बरोबर असावा असे मला वाटतेय मास्तर, त्याचा सुकलेला चेहरा आणी लाल डोळे, आणी ही अपंगत्वाची व्याधी शारीरिक असेल असे मला वाटत नाही..जसा जसा त्याच्या शरीरातील देसाईच्या आत्म्याचा अंश वाढत जाईल तसतशी त्याची शारीरिक व मानसिक व्याधी पण वाढतच जाईल.. बरे झाले वेळीच तुझ्या लक्षात आले ते"
शंभुने आपल्या संशयाला दूजोरा दिला आणी रघुच्या प्रकरणामध्ये रुची दाखवली हे पाहुन श्रीधरला आनंद झाला..
शंभुने आपल्या संशयाला दूजोरा दिला आणी रघुच्या प्रकरणामध्ये रुची दाखवली हे पाहुन श्रीधरला आनंद झाला..
"मग आता आपल्याला काय करावे लागेल महाराज"
"सगळ्यात पहिल्यांदा हे सिद्ध करावे लागेल की, त्याला खरोखर भुतबाधा झालेली आहे ते, अशा बाधाग्रस्तांवर इलाज करताना कधीकधी त्यांचा मृत्यूही ओढावू शकतो, तु त्याचा शाळा मास्तर आहेस, पालक नाही.. त्यामुळे सर्वात आधी त्याच्यावर उपचार करायचा का नाही, याबद्दल त्याच्या संबंधित नातेवाईकांची परवानगी घ्यायला लागेल.."
शंभूने स्पष्ट केले.
शंभूने स्पष्ट केले.
"त्याच्या घरी फक्त त्याची आई असते महाराज, आणी मला नाही वाटत ती माझ्या शब्दाबाहेर आहे म्हणून..रघुची प्रकृती आणखी बिकट होण्याच्या आधीच आपल्याला लवकरात लवकर त्याच्यावर इलाज करायला हवा"😐
श्रीधरचे बोलणे ऐकून शंभूला हसू आले..
"अस्स..मग बघ तु बोलून रघुच्या आईसोबत.. देतीय का पहा ती परवानगी..अजून काही दिवस माझा मुक्काम सोनगावातच आहे, आणी हां, मला भेटण्यासाठी तुला पहाटे ओढ्यावर यायची गरज नाही.. मी दररोज सायंकाळी मारुती मंदीरात भेटू शकतो"
एवढे बोलून शंभू तेथून निघून गेला..

शंभूला निरोप देवून श्रीधरने वर्गात जावून मुलांचे काही विषयांचे तास घेतले आणी नंतर सगळ्यांना अभ्यासाला लावून तो शाळेबाहेर पडला आणी थेट रघूच्या घरी गेला..
रघुची आई घरात एकटीच होती..अचानक आलेल्या श्रीधरला पाहून ती थोडीसी गोंधळली, तिने डोक्यावर पदर घेऊन त्याला घरात घेतले..
रघुची आई घरात एकटीच होती..अचानक आलेल्या श्रीधरला पाहून ती थोडीसी गोंधळली, तिने डोक्यावर पदर घेऊन त्याला घरात घेतले..
तेथे श्रीधरने रघुबद्दलचे त्याचे आणी शंभूचे मत, तसेच त्याने आजवर गोळा केलेली माहिती सांगितली आणी रघुवर झालेल्या भुतबाधेचा उपचार करणे कसे आवश्यक आहे ते पण समजावले पण रघुची आई श्रीधरवरच संतापली.
"हे बघा मास्तर, तालूक्याच्या सरकारी दवाखान्यात दाखवलाय त्याला, डाक्टरांनी तपासणी पण केलीय.. आनुवंशिक का काय म्हणत्यात तसला रोग सांगितलाय त्याला, तुम्ही उगीच त्याच्यावर भलतेसलते परयोग करू नका, भुतबाधेची चर्चा गावभर झाली तर गावात राहण मुश्कील होईल आमचं..मग असलं अपंग पोरगं घेऊन कुठं जायचं मी?"😟
रघुच्या आईच्या बोलण्यात पण सत्य होतं.
रघुच्या आईच्या बोलण्यात पण सत्य होतं.
"ठिक आहे ताई, मला शंभू महाराज म्हणालेच होते तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून, पण तुमचा विश्वास बसावा म्हणून मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की त्याला कुठला अनूवंशीक रोग झालेला नसून देसाई गुरूजींची भुतबाधा झालेली आहे..फक्त तुम्ही एकच काम करा..आपल्या मध्ये झालेल्या ह्या चर्चेबद्दल कृपया रघू आणी बाकी कोणालाच काही बोलू नका"
.
पुढे दोन दिवस श्रीधर बारकाईने सर्व प्रकरणावर विचार करत होता,आणी बराच विचार करून त्याने एक योजना आखली.
.
पुढे दोन दिवस श्रीधर बारकाईने सर्व प्रकरणावर विचार करत होता,आणी बराच विचार करून त्याने एक योजना आखली.
दुसर्या दिवशी वर्गामध्ये आल्यानंतर तो सर्व मुलांना उद्देशून म्हणाला,,
"मुलांनो, आता काही दिवसांनंतर आपल्या वार्षिक परीक्षा लागणार आहेत..मला दिसतंय काही मुला मुलींचा अभ्यास खरोखर चांगला आहे, पण काहीजण परीक्षेमध्ये पास होतील असे मला वाटत नाही..तरी अशा अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना मी रविवारी सुट्टीच्या दिवशी खास शिकवणी देणार आहे..तरी ह्या रविवार पासून एकेकाला माझ्या घरी शिकवणी साठी यावे लागणार आहे, उद्याच्या रविवारी रघू येईल, पुढच्या रविवारी शाम आणी नंतर रवी असे येतील, जमेल ना.."
श्रीधरच्या ह्या योजनेला सगळ्या मुलांनी मोठ्याने होकार दिला, रघूने सुद्धा मान हलवून सहमती दर्शवली.

दूसर्या दिवशी रविवारी सकाळी दहाच्या आसपास रघु त्याच्या आईसोबत श्रीधरच्या घरी आला.
"मास्तर, नीट शिकवा बरं आमच्या पोराला, काही येत नसल तर समजून सांगा, येते मी दूपारी दोन वाजता त्याला न्यायला परत"
असे बोलून रघुची आई तेथून निघून गेली खरी, पण ती तिच्या घरी न जाता सरपंचाच्या वाड्यावर जाऊन थांबली.

श्रीधरने सौम्य भाषेत रघुचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली, अभ्यास करताना रघुकडून काही चुकले किंवा त्याला काही जमले नाही तरी श्रीधर त्याच्यावर रागावत नव्हता,
एक तासभर अभ्यास झाल्यानंतर रघुच्या कानावर पायातील पैंजनांचा मंजूळ आवाज आला आणी त्याचे लक्ष थोडे विचलित झाले..श्रीधरचा जेवणाचा डबा घेऊन तेथे शेवंता आली होती,💁
आज तिने रोजच्यापेक्षा थोडा जास्तच शृंगार केल्यासारखा वाटत होता..केसाच्या वेणीला झटका देत तिने एकदा रघूकडे पाहिले आणी जेवणाचा डबा खाली ठेवला..

"अगं शेवंता, तुला सांगायचे विसरलोच मी, मला पाटील गुरुजींच्या घरी जेवणासाठी बोलावले होते, काहीतरी खास बेत आहे तेथे, हा जेवणाचा डबा राहु दे असाच मी रात्री खाईल"
शेवंताने मान हलवून होकार दिला आणी ती तिथेच खाली बसून रघुचा अभ्यास पाहु लागली.. थोड्यावेळाने श्रीधरने रघुला काही गणिते सोडवायला दिली आणी म्हणाला,
शेवंताने मान हलवून होकार दिला आणी ती तिथेच खाली बसून रघुचा अभ्यास पाहु लागली.. थोड्यावेळाने श्रीधरने रघुला काही गणिते सोडवायला दिली आणी म्हणाला,
"रघु, मी जातोय पाटील गुरूजींच्या घरी, तु येथेच सांगितलेला अभ्यास करत बस आणी दोन वाजता तुझी आई आली कि तिच्यासोबत जा..शेवंता, तुलाही काही काम नसेल तर थोडावेळ बस जरा रघुसोबत"
असे बोलून तो तेथून निघून गेला.. आता त्या घरात फक्त रघू आणी शेवंता हे दोघेच राहिले होते..
असे बोलून तो तेथून निघून गेला.. आता त्या घरात फक्त रघू आणी शेवंता हे दोघेच राहिले होते..
#क्रमश..
सहाव्या भागाची लिंक 👇👇