भाग क्र -- 2
पहिल्या भागाची लिंक 👇👇👇
कारखान्यात सगळे कामगार जमले होते....कारखान्याचा वर्धापन दिन होता...कामगारांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते......कामगार आनंदाने टाळ्या वाजवत होते.....काकासाहेब पुसे कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यात टिपत होते.....कामगार सुद्धा त्यांचा जयजयकार करत होते....एक मोठं पॅकेज त्यांनी आपल्या कंपनी मधील मजुरांना जाहीर केलं होतं......काकासाहेब तसे थोर समाजसेवक होते....त्यांच्यामुळे अनेक तरुण वाईट मार्ग सोडून संसाराला लागले होते......शहरातील श्रीमंत व्यक्ती असून सुद्धा काकासाहेबांना कशाचीही घमेंड नव्हती.....सभा रंगली होती कामगार आनंदात होते.....काकासाहेब त्या गर्दी मधील कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळत होते.....त्या गर्दीत त्यांना एक काळा मास्क घातलेला चेहरा त्यांना दिसला.......अगदी समोर उभा होता.....अचानक तो पूर्ण काळ्या कपड्यात लपेटलेला माणूस हवेत तरंगत असलेला त्यांना दिसला.....काकासाहेब घाबरले ती वाऱ्याचे वेगाने आला आणि सरळ काकासाहेबांच्या छातीत शिरला.....काकासाहेब किंचाळत खाली कोसळले......सगळी सभा अचानक शांत झाली....काकासाहेब छाती पकडून डोळे उघडे ठेवून छताकडे बघत होते...स्टेज वरील एकाची नजर छताकडे गेली तिथे काहीच दिसत नव्हते..स्टेज वर असलेल्या लोकांना काही कळायला मार्ग नव्हता.......त्यांनी काकासाहेबांना उचलले.......आणि ऍम्ब्युलन्स मध्ये घातले....काकासाहेब पुसेचा मुलगा रमेश त्यांच्या सोबत होता.....काकासाहेब वेदनेने तडफडत होते....ते घामाने भिजले होते....त्यांना समोर चित्रविचित्र आकृत्या दिसत होत्या......लाल डोळे जणू आपल्या समोर यमदूत असल्यासारखे त्यांना भासत होते.....काकासाहेबांना स्ट्रेचर वरून अतिदक्षता विभागात आणलं गेलं.....डॉक्टर बघून हैराण होते काकासाहेबांचे डोळे उघडेच होती छाती धडधड उडत होती.....काकासाहेब छताकडे बघत होते.....भयाण काळी सावली लालभडक डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होती....तिचे ते लांब दात विचकत होती....काकासाहेबांच्या डोक्यात प्रचंड मोठी कळ आली ते तळमळू लागले.....डॉक्टरांनी त्यांना घट्ट पकडल होतं.....पण 70 वर्षाचे काकासाहेब त्या 5 तरुण डॉक्टरांना आवरत नव्हते....अचानक ते शांत झाले.....डॉक्टरांनी बघितलं काकासाहेबांच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं.....त्यांनी एका डॉक्टरकडे बघितलं एका विचित्र आवाजातून एक शब्द बाहेर पडला "क्रेकन" हा शब्द काकासाहेबांच्या तोंडून बाहेर पडला आणि समोरच्या दोघा डॉक्टरांना जोराचा धक्का दिला....ते धावत धावत हॉस्पिटलच्या गॅलरी मध्ये आले.....आणि त्यांनी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली......डोक्यातून रक्त वाहू लागले आणि काकासाहेब गतप्राण झाले.....त्यांच्या तोंडातून ती काळी सैतानी आकृती धुरासारखी बाहेर पडली.....काकासाहेब मरण पावले.....एक पुण्यवान सामाजिक पर्वाचा अंत झाला होता
ह्या घटनेचा क्राईम ब्रँचमध्ये सेवेत असलेल्या ऑफिसर विक्रांत यांना मोठा धक्का बसला होता.....विक्रांत तसा अनाथ होता पण आता क्राईम ब्रँच मध्ये मोठ्या पदावर होता....ह्याचे सगळे श्रेय तो काकासाहेब पुसेना देत असे कारण विक्रांत मधील प्रतिभा त्यांनी त्याच्या लहानपणीच ओळखली होती.....त्यानुसार काकासाहेबांनी विक्रांतला हवी ती मदत केली होती.....विक्रांत हे उपकार विसरणारा नव्हता.....काकासाहेबांनी सुद्धा त्याच्याकडे केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून "प्रामाणिकपणे देश सेवा करणार" हे वचन विक्रांत कडून घेतलं होतं.....त्या दिवशी विक्रांत खूप रडला होता......काकासाहेब त्याचे सर्वस्व होते.....त्यांच्या अश्या अचानक जाण्याने त्याचा आधार गेला होता.....बऱ्याच दिवसांनी त्याने स्वतःला सावरलं होतं......पण काकासाहेबांच्या आठवणी तो विसरू शकत नव्हता.....एकदा त्याने त्या एरिया मधील पोलीस स्टेशनला भेट दिली.....काहीतरी विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत होते....काकासाहेबांची पोस्टमार्टम रिपोर्ट त्यांच्या हातात होती.....ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले काकासाहेबांचे फोटो त्याला विचलित करत होते....बरेच एन्काऊंटर विक्रांतने केले होते पण हे फोटो त्याच्या डोळ्यात पाणी आणणारे होते......त्याने स्वतःला सावरलं.....तिथल्या पोलिसांना ह्या घटनेबद्दल विचारलं तर हा अपघात आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला होता.....आणि रिपोर्ट चेक करत असताना विक्रांतला तो बरोबर वाटत होता....अचानक विक्रांतची नजर काकासाहेबांच्या मानेवर गेली......त्याने तो फोटो भिंगातून बघितला.....काकासाहेबांच्या गळ्यावर तीन वर्तुळ असलेला निशाण दिसत होता.....विक्रांत पुरता हादरला कारण पोलीस परीक्षेचा अभ्यास करत असताना 1950 सालीच्या काही फाईली तो तपासत होता त्या फाईल मध्ये मृत व्यक्तीच्या मानेवर तसा ठसा उमटला होता आणि सगळेच्या सगळे प्रतिष्ठित लोक तसेच समाजसेवक होते.....विक्रांतला काहीतरी विचित्र वाटत होते त्याने तो फोटो स्कॅन करून गुगल वर सर्च केला त्या त्या तीन वर्तुळाच्या निशाणाबाबत बरेच रिझल्ट त्याला शो झाले जगातील प्रत्येक देशातून समाजसेवा तसेच चांगलं काम करणाऱ्या लोकांचा कुणी अंत करीत होत.....जणू माणुसकी संपवण्यासाठी कारस्थान करत होत......त्याने एक दोन आर्टिकल वाचले.....दोघे तिघे त्याला "सैतानी शक्तीचे" काम म्हणत होते......बरेच मोठे लेख होते.....एका अमेरिकन आणि जर्मन माणसाचे लेख विक्रांत वाचत होता लेखाखाली त्यांची चित्रे दिली होती....ती माणसे जरा विचित्र वाटत होती......विक्रांत स्क्रोल करत होता....अचानक त्या फोटो संबंधित आणखी एक मराठी भाषेतील लेख त्याला दिसला बरीच माहिती त्याला दिसत होती......कुठल्या तरी कोपऱ्यात छापलेला लेख होता तो.....कुणीतरी रामेश्वर बाबा नावाच्या माणसाने अजब दावा केला होता की त्यावेळचे मोठे लोकनेते गणेश माने ह्याचं निधन झालं नसून ती हत्या होती सैतानी शक्तींच्या कडून......ह्या एका विधानाने 70 च्या काळात रामेश्वर बाबा हे नाव चर्चेत आलं होतं......अनेक शिकलेल्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.....प्रकरण तिथेच संपलं होतं......पण आता नवीन प्रकरण सुरू झालं होतं.....विक्रांत वैयक्तिक रित्या ह्या घटनेचा तपास करणार होता.....कारण 1950 साली साथीच्या रोगाप्रमाणे चांगली समाज सुधारक माणसं मरत होती त्यानंतर अनेक वर्षांनी परत हे प्रकरण जन्म घेत होत.....विक्रांतने त्या मठाचा पत्ता घेतला होता......त्यानुसार शेकडो किलोमीटर प्रवास करून विक्रांत त्या मठात पोहोचला.....त्याने तिथे साधना करणाऱ्या एका शिष्याला रामेश्वर बाबा बद्दल विचारले...ते सध्या जिवंत आहेत की नाहीत ह्याबद्दल शंकाच होती...शिष्य विक्रांत कडे संशयी नजरेने बघू लागला......त्याने विक्रांत ला मठापासून दूर नेले.....एका झाडाखाली नेऊन तो इकडे तिकडे बघत होता कसली तरी अनामिक भीती त्याच्या मनात होती
"हे बघा महाशय.....रामेश्वर बाबांना आम्ही मठातून काढून टाकलं आहे......ते काही अघोरी प्रयोग करत होते जे मठाला मान्य नव्हते....त्यामुळे ते नाहीत इथे"
विक्रांत हे ऐकून चिंतेत पडला त्याने आपल्या जवळचे त्या चिन्हाचे फोटो दाखवले....."ह्याबद्दल माहिती पाहिजे होती"
तसा तो शिष्य आवक होऊन विक्रांतकडे बघू लागला
"इथून 100 किलोमीटर दूर गिरिनारी जंगल आहे तुम्ही तिथे गेल्यावर उत्तरेकडे चालत जा तिथे तुम्हाला त्यांचं घर दिसेल....पण जरा सांभाळून....कारण ते आता संत नाहीत.....गूढ विद्या समजून घेण्यासाठी ते इतके बुडाले होते की....ते आता मानसिक रोगी झाले आहेत असं कळलं मला....तरी तुम्ही जाऊन या एकदा"
विक्रांतच्या मनात एक प्रश्न होता तो त्याने बोलून दाखवला
"इतका जुना हा माणूस जिवंत असेल का?"
शिष्य हसला
"रामेश्वर बाबा अनेक विद्या जाणतात....ते अजून जसेच्या तसे असतील.....ह्याची मला खात्री आहे.....ते भेटल्यावर त्यांच्या शक्तीचा अंदाज येईलच तुम्हाला"
हे ऐकून विक्रांत चालू लागला....त्याने त्या एकमेकांत अडकलेल्या तीन वर्तुळाच्या फोटोकडे बघितले विक्रांतला हा प्रकार काय आहे हे समजून घ्यायच होतं.....काकासाहेबांचे बोल त्याच्या डोक्यात घुमत होते....तो गिरिनारी जंगलाजवळ आला....खूपच घनदाट जंगल होते.....आसपास मानवी वस्ती नव्हतीच पण आधुनिकीकरना पासून कितीतरी लांब जंगल होत....इथले काही भाग असे होते की जिथे मानवी पाऊल पडले देखील नव्हते.....जंगलातून वाट काढत आपल्या मोबाईलच्या कंपस च्या आधारे विक्रांत उत्तरेकडे चालू लागला.....वन्य प्राणी सर्प त्याची वाट आडवत होते.....पण विक्रांत न घाबरणारा होता.....तो सरळ चालत होता.....त्या जंगलाच्या भयाण शांततेत त्याला घंटेची किणकिण ऐकू येऊ लागली.....विक्रांतची गती वाढली घनदाट जंगल अचानक संपलं आणि समोर मोकळं मैदान दिसू लागलं.....त्या मैदानात एक मोठी झोपडी होती बांबूने बनवलेली.....त्या झोपडीतून बारीकसा धूर येत होता.....विक्रांत त्या मोठ्या झोपडीजवळ आला तो ती झोपडीच्या भोवती फिरू लागला....पण त्या झोपडीचे दार त्याला सापडत नव्हते.....बरीच मोठी झोपडी बनवली होती.....अचानक एका कोपऱ्यातून कररररर असा आवाज झाला एक बाजू उघडली होती....तिथून विक्रांत आत शिरला....आत खूपच अंधार होता....चंदनाचा वास येत होता....बाहेरून जरी छोटी दिसत असली तरी आतून खूप मोठी झोपडी होती.....विक्रांतची नजर आजूबाजूला फिरू लागली....चित्रविचित्र गोष्टी त्या भिंतीला अडकवल्या होत्या.....मानवी कवट्या.....बांबूने बनवलेल्या बाटल्या.....मेलेले पक्षी भिंतीवर लटकत होते...खाली मोठी मोठी पुस्तके,ग्रंथ ठेवले होते.....दुसऱ्या बाजूला एक दोन मोठ्या तलवारी लटकल्या होत्या......खोलीच्या कडेने कसलीतरी राख पसरवली होती.....विक्रांतची नजर वर गेली....वरती बारीक बारीक घंटा लावल्या होत्या.....विक्रांतची नजर वर गेली आणि त्या घंटी खनखनू लागल्या......एक माणूस पाठमोरा उभा होता....समोरच्या भगवान शंकरांच्या मूर्तीला धूप आरती दाखवत होता....त्या घंटाची किणकिण ऐकून त्याच्या तोंडून आवाज आला
"हा...हा हे कधीना कधी होणार होत....क्रेकनचे बागल बच्चे कधीना कधी पृथ्वीवर चांगल्या शक्ती नष्ट करून वाईट शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणारच होते"
विक्रांतला त्याची पाठ दिसत होती त्याने पाठीवर मोठा चौकोनी आकरासारखे काहीतरी गोंदवल होत.....त्यात मंत्र लिहले होते...तो माणूस मागे वळला आणि विक्रांत पुरता हादरला....त्या माणसाचे डोळे गायब होते.....फक्त तिथे खाचा दिसत होत्या.....त्याने आपल्या चेहऱ्यावरही गोंदवल होत......सगळीकडे मंत्र दिसत होते.....त्याचे केस अजूनही काळेच होते....डोळ्याच्या खाचा झाल्या असूनही तो माणूस अगदी डोळस माणसासारखा चालत येत होता.....त्याने आरतीचे ताट खाली ठेवले....रामेश्वरबाबांच्या हातात दिवा होता.....रामेश्वरबाबा विक्रांत जवळ आला त्याने विक्रांतचा वास घेतला
"सुडाला पेटलेला...निडर युवक....मदतीसाठी आलाय"
अस बोलून रामेश्वर बाबा विक्रांतचा हात चाचपू लागले......त्याच्या हातात एक कागद होता....तो त्यांनी हातात घेतला आणि दिव्यावर धरला कागद जळू लागला.....त्याचा धूर रामेश्वर बाबांच्या नाकात जात होता.....विक्रांत जरा लांब सरकत होता तो डोळे नसलेला खाचा असलेला चेहरा अगदी त्याच्या जवळ होता....रामेश्वर बाबाने त्याचा हात पकडला....त्या हाताची लांब नखे विक्रांतचा हातात घुसली
"काकासाहेब पुसे.....काकासाहेब पुसे......बळी ठरलेत अघोरी विद्येचे"
काकासाहेब पुसे हे नाव ऐकून विक्रांतला धक्का बसला कारण असल्या जादूटोण्यावर त्याचा विश्वास नव्हता.....पण आता विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता
"हो मी त्यांच्या मुला सारखा आहे.....काही दिवसांपूर्वी त्यांनी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली"
विक्रांतचे वाक्य मधेच थांबवत रामेश्वरबाबा बोलले
"आमहत्या नव्हती ती....हत्या होती....तुझ्या वडिलांच्या डोक्यावर क्रेकन ह्या मायावी राक्षसाने आपल्या गुलाम पिशाच्च कडून हल्ला केला....तो हल्ला ते सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी आपला जीव दिला.....ही पहिली घटना नाहीय.....क्रेकनने आपले शिष्य जगभर पसरून ठेवले आहेत.....ते लोग आपल्या आसपासच्या चांगल्या लोकांना संपवतात आणि समाजाला वाईट गोष्टीकडे वळवतात.....ह्या वाईटातुन ते सैतानाला खुश करतात आणि आपली शक्ती वाढवतात....भारतात 50 च्या दशकात हे प्रकार झाले होते आणि आता परत हे सुरू झालं आहे"
रामेश्वरबाबांची प्रत्येक गोष्ट खरी होती.....विक्रांतला विश्वास बसला होता
"रामेश्वर बाबा मी विक्रांत......मला माझ्या वडिलांच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे....त्या कुठल्या क्रेकनच्या शिष्याला धडा शिकवायचा आहे....पण तुमच्या मदतीशिवाय शक्य नाही"
विक्रांतचे वाक्य ऐकून रामेश्वरबाबा जोर जोरात हसू लागले
"अरे वेड्या....जादुई अघोरी विद्या आहे ती.....तुझ्या डोक्याबाहेरची.....मागे अनामिका नावाच्या दैवी मुलीने क्रेकनच्या शिष्याचे मुंडके उडवले होते......मी तेव्हा शिष्य होतो....तिने माझ्या गुरू कडून दिव्य अंजन मिळवलं होतं.....क्रेकनचा शिष्य एका अदृश्य वाड्यात राहतो......ज्याच्यावर क्रेकन हावी होतो त्याचा बोट तोडून तिथे एक सोन्याची लेखणी बसवतो......त्या लेखणीला एका विशिष्ट रक्षसाच्या काळ्या हाडातून ताकत मिळते....आधुनिक काळातील पेन्सिल सारखा प्रकार......त्या पेन्सिल मधून ज्याचे स्केच बनते त्यावर क्रेकनचे काळे पिशाच्च हल्ला करतात त्याच्या डोक्यात शिरून त्याला वेड लावतात किंवा त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त....समाजातील चांगले घटक ह्याच्या टार्गेटवर असतात......तू म्हणत आहेस की धडा शिकवणार.....पण एका अदृश्य वाड्यातून हा काळा कारभार चालतो तुझ्या डोळ्यांना तो दिसणार पण नाही"
हे ऐकून विक्रांत ने रामेश्वर बाबांचे पाय पकडले
"तुम्ही म्हणताय की त्या मुलीने तुमच्या गुरू कडून ते अंजन मिळवले होते.....तुम्ही मलाही द्या ते अंजन इतकी मदत करा प्लिज"
रामेश्वर बाबा हसले...
"अस कुणालाही नाही देता येत ते अंजन....त्यासाठी त्याग करावा लागतो तोही मोठा.....माझ्या ह्या झोपडीमधली प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट किमतीला मिळते आणि ती तू दिलीस तर मी तुला ते अंजन देईन"
क्षणाचाही विलंब न लावता विक्रांत उद्गारला
"मी तयार आहे.....काकासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे"
हे ऐकून रामेश्वर बाबा हसले आणि चालत एका काळ्या रंगाचा कवटी जवळ गेले.....त्यांनी त्या कवटीच्या दाताजवळ आपले कान नेले....त्याच बरोबर ती कवटी आपले दात वाजवू लागली....कट कट असा आवाज सगळ्या झोपडीत घुमला....जणू ती कवटी रामेश्वर बाबांशी बोलत होती.....रामेश्वर बाबा भिंतीजवळ गेले त्यांनी तिथून एक काचेची बाटली उचलली आणि एक छोटी डबी.....ते विक्रांत जवळ आले
"ह्या दोन गोष्टी तुला लागतील....ह्या डबीत ते अंजन आहे ज्याने तू तो अदृश्य वाडा बघू शकशील आणि आत प्रवेश करू शकशील....आणि ह्या बाटलीत दिव्य जल आहे....ज्याच्या प्रभावाने पिशाच्च नष्ट होतील....तू काही वेळ त्यांना रोखू शकशील.....आता मुख्य गोष्ट.....ह्या दोन गोष्टी मिळवण्यासाठी तुला त्याग करावा लागेल.....तो ही तुझ्या शरीरातील कोणत्याही दोन महत्वपूर्ण अंगाचा.....ते अंग तू आम्हाला दिलेस तर ह्या दोन गोष्टी तुझ्या"
रामेश्वर बाबांचे हे बोल ऐकून विक्रांत विचारात पडला.....त्याला त्या दोन दिव्य गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या शरीराचे कोणतेही दोन अंग द्यायचे होते............(क्रमशः)
✍️लेखन -- शशांक सुर्वे