फितूर आभाळ
भाग ::-- पाचवा
पावसानं उतार घेतला.तटलेली राबत्याच्या कामाची लगीनघाई सुरू झाली.वाफसा होताच कोळपणी निंदणी, खुरापणी या कामांना सोनेवाडीत वेग आला.दुलबा गेला तेव्हापासून किसनाबास पोरांना मंदिरातून सोडावेच वाटेना. आधीच पोरांवर आघात.त्यात आपण सोडलं तर आणखी पोरं घाबरतील म्हणून किसना बा रात्रंदिवस त्यांना सोबत करू लागला.पण संसार कुणास सुटला.शेतात कामाची लगबग सुरू होताच किसनाबालाही पर्याय उरला नाही.किसनाबा दिवसा शेतात पळू लागला.मात्र दिवसभर शेतातलं काम करून मग तो रात्री मुक्कामाला मंदिरातच येई.
दिवस जाऊ लागले.बाला आरती,पुजा सांभाळत थाळा आणू लागला.सुमीस जेवण घालत स्वत: खात शाळेत जाऊ लागला. पण रंजन फिराक मध्येच होता.हणमंतराव ही सोनेवाडीतच तंबू ठोकून पाळतीवर होता.किसनाबा कामास जायला लागल्याची खबर रंजनला पोहोचवली गेली.तरी दिवसा मंदिरातली वर्दळ व बाला सुमीचं शाळेत जाणं यामुळे दिवसा काही करणं धोक्याचं नी रात्री तर किसनाबा.यामुळं रंजन अजून लक्ष देत नव्हता.तो सोनेवाडीत येई व मळ्यात चक्कर मारून निघून जाई.
बाला हळूहळू दु:ख विसरत शाळा, मंदिर यात रूळायला लागला. मध्यंतरी किसनाबास पार्वताबाईंसह तीन दिवस बाहेरगावी जाणं आलं.त्यांनी गावातल्या नाम्यास मंदिरात पोरांजवळ झोपायला व लक्ष ठेवायला सांगितलं.
हणमंतरावांनी संधी साधली.रंजनला कळवलं. पण पोरांसोबत रात्री असलेला नाम्या नडू लागला.
दुसऱ्या दिवशी ही तीच गत.आता मात्र रंजन बावचळला व त्याचं माथं भणाणलं.कारण अशी संधी येणारच नाही.ही सापाची पिल्लं ठेचण्यासाठी!तिसऱ्या दिवशी त्यानं त्या नाम्यासहीत .......ठेचायचं ठरवलंच.
थांबलेल्या पावसानं आज पुन्हा सुरुवात केली होती. रात्रीचे नऊ वाजले.बालानं सुमीला जेऊ घातलं.किसनाबानं सांगितलेला नामा अजुन आज आलाच नव्हता.भक्त निवासाच्या खोलीत सुमी घाबरू लागली. पुर्वमुखी प्रशस्त मंदीर.मंदिराच्या दक्षिणेस आवारात अंतर राखून उत्तरमुखी भक्त निवासाच्या खोल्या.मंदिराच्या उत्तर भिंतीला लागून भव्य,उंच जुनाट गाव दरवाजा.गाव दरवाज्यातून पश्मिमेला बाहेर पडल्यावर लोकांना बसण्यासाठी लांबच लांब दोन्ही बाजूंनी पार बांधलेले.पाराच्या सरत्या टोकांना गावाच्या दोन-तीन पिढ्या पाहिलेली वडाची जुनी झाडं.त्या वडावर दिवसा कायम वटवाघळं उलटी लटकलेली असत. तर रात्री बगळे झोपलेली असत. गाव दरवाज्याच्या गर्डरच्या खबदाडीत घुबडं ठरलेलीच.मंदिराची उत्तर बाजु जुनाट वाटे तर दक्षिण बाजु दुलबानं नविन नवं बांधकाम व त्यात बाग उठवलेली त्यामुळे प्रसन्न वाटे.
पाऊस सुरुच,अंधार पसरलेला.
"दादा , नामा काका कधी येईल? भिती वाटतेय! चल मंदिरात थांबू" सुमी बालाला लटकत विनवू लागली.बालालाही भिती वाटतच होती.
"सुमे घाबरू नको.नामा काका येईलच.चल तो पावेतो हवंतर मंदीरात थांबू"म्हणत बालानं निवासातून आवारात पडत्या पावसात पळतच सुमीला मंदिरात आणलं.तरी पाय व डोकं भिजलंच. पाय बाहेरील तरठाला व चटईला पुसत ते मंदिरात आले.तळाचं संगमरवर मंदिरातील उजेडात चमकत होतं.दरवाज्यातून प्रकाशाचा लोट बाहेर पडत होता.त्यातून पडणाऱ्या पावसाच्या धारांचा नाच चाललेला होता. बालानं संगमरवरवरच सुमीला मांडीवर झोपवत पडणाऱ्या धारांकडं पाहू लागला. पावसाच्या आवाजात वडाच्या झाडावर परतलेले बगळे स्थिर झाले होते तरी एखाद चुकार बगळा मध्येच उठून त्यानं काढलेला आवाज मिसळवत होता.त्यात पडत्या पावसातही पोटासाठी वटवाघळं आवाज करत चरण्यासाठी निघत असावेत,त्यांचा आवाजही मिसळत होता.गाव दरवाज्याच्या खबदाडीतल्या घुबडांचा घुत्कार ही हळूहळू वाढत होता.बालाला हे आवाज आता परिचीत होत असले तरी आज मात्र त्याला नवेच वाटत होते.कदाचित किसनाबा नसल्यानं व नामा काका ही नाही म्हणुन एकांतानं तसे वाटत असावेत.आता सुमी आपल्या भावाच्या मांडीवर विश्वासानं,निवांत झोपत होती.पण बालाला उशीर होऊ लागला तसा व नामाही येत नाही पाहून भिती वाटू लागली.त्याला किसनाबाची याद तिव्रतेने येऊ लागली.त्यातच गहिवर दाटून मग दुलबा आठवला नी तो रडायलाच लागला.
"बा!कुठं गेलात हो तुम्ही?हा बाला,ही सुमी आठवतच नाही का तुम्हास? या ना!मी कसा सांभाळू हो? आई बाबा गेले तर गेले तुम्ही पण...?"नी मग त्याला बाबा संतापात आईसोबत गेला तो दिवस आठवला.
"बाबा मी ,सुमी येत होतो ना!येऊ दिलं असतं तर आम्ही ही सोबतच असतो ना!आता मी एकटा......"बालानं रोखून धरलेला बांध फुटला.त्याच्या आसवाचे गरम थेंब सुमीच्या गालावर ओघळले.त्यानं व त्याच्या रडण्यानं त्याच्या अंगाची होणारी थरथर यानं सुमी उठली.बालाला रडतांना पाहून ती ही उठताच रडू लागली.
रात्री तिचा आवाज उगाच नको म्हणून बाला तिला गच्च धरत रडतच उगी करू लागला.
"दादा का रडतो रे!अजुनही आला नाही का काका?"सुमी रडत रडत विचारू लागली.
'काका'हा शब्द बालाच्या कानात घुमला नी बाला निर्धारानं अंधार चिरत बोलला.
"काकाला तर यावंच लागेल सुमी!आपले बा सांगून गेलेत ना!"
नामा काकाबाबत विचारणाऱ्या सुमेला हे कळलंच नाही.
रडणाऱ्या सुमेला शांत करत बाला मंदिरातील शांत, निश्चल उभ्या असलेल्या विठ्ठलालाच विचारून बसला.
"विठ्ठला! पाठव ना रे आमच्या बाजी काकास! त्यांची वाट पाहत आमचा बा गेला! आम्हास त्याच्या भरोशावर टाकून गेलाय आमचा बा!मग किती अंत पाहशील!"
बहुतेक विठ्ठलाला ही आगामी संकट कळलं असावं नी हा काळीज चिरणाऱ्या कोवळ्या काळजाचा टाहोनं तो ही बाहेर पडणाऱ्या पावसासारखा विरघळला.तूर्तास नाही बाजी तर काय झालं पण....निदान निधान निघेल असं काही तरी करणं त्यास भाग पडलंच. बाजीतल्या मळ्यातल्या आंब्यांत सळसळ उठली.क्षणात ही सळसळ सोनेवाडीत झेपावली गाव दरवाज्याजवळील वडावर कधी नव्हे ते दोन भली मोठी रानटी माकडाची जोडी आसऱ्यास आली.एरवी दिवस असता तर सारा गाव एकवटला असता पहायला व जुन्या जाणत्यांनी 'पावसानं वाट चुकून गावात आली असतील'असा शेरा ही मारला असता.
नामा धावतच आला.त्याला गावाहून पावसामुळं परतायला उशीर झाला होता.त्याला पोरांना मंदिरात सुखरूप पाहून हायसं वाटलं.त्यानं बालास जेवणाची चौकशी करत जवळ घेत भक्त निवासाकडं नेलं.अंथरुण टाकत पोरांना झोपवलं व तो ही दिवसभराच्या धावपळीनं झोपला.
पण पाऊस काय झोपायचं नाव घेईना.
जळगाव वरून निघालेली गाडी सोनेवाडीबाहेर उभी करत अंधारात रंजननं हणुमंतरावास गाठलं.छत्री सांभाळत सामान घेऊन ते दबक्या पावलांनी मंदिरातल्या आवारात घुसले.
"मी आधी नाम्यावर वार करून खातमा करतो तितक्यात मुलांना घेऊन तुम्ही बाहेर गाडीकडं पळा!"रंजन कुजबुजला.
सासऱ्यानं त्यास हातानं ओढत बाजुला नेलं व दबक्या आवाजात समजवलं.
"फक्त दोन्ही पोरांना उचलून बाहेर न्या.नाम्याला इथंच ठेवू." हणुमंतरावनं दबक्या आवाजात सांगितलं
"हे बांदर उठलं तर सारा घोळ होईल नी पोरांनी ही बोंब मारली तर? त्यापेक्षा तिघांचा इथंच खातमा करूयात"
"नको. मी नाम्यास बेशुद्ध करतो तुम्ही पोरांना उचला"
आवाराच्या बागेतील झाडाच्या आडोशानं ओलं होत ते निवासाकडं सरकू लागले.पडणाऱ्या पावसात सोनेवाडी डाराडूर घोरत होती.
वडाच्या झाडावरील माकडं टुकूर टुकूर पाहत अदमास घेत पार, दरवाजा ओलांडून मंदिराकडं सरकली.पण ती ही रंजन हणमंतरावासारखीच दबकत दबकत.
रंजन निवासाच्या खोलीचं दार उघडंच होतं त्यातून आत घुसला.हणमंतराव ही आडोशा आडोशानं आत घुसले.त्यांनी घोरणाऱ्या नाम्याच्या नाकासमोर रूमाल धरला.नी काही वेळेतच नाम्याचं जोराचं घोरणं कमी कमी होऊ लागलं.रंजन पुढे सरकणार तोच त्याचा पाय जवळच ठेवलेल्या भांड्यास लागला.भांडं सरकलं नी त्यावर ठेवलेली भांडी गडगड आवाज करत भडभड पडली.बाला दचकून उठला.तोच त्याला रंजन ,हणमंतराव दिसला.तो जोरात आरोळी ठोकणारच तोच हणमंतराव पटकन झेपावला व रूमाल बालाच्या नाकावर कोंबत त्याच्या तोंडावर दुसरा हात धरला.बाला मगरमिठीत पाय घासू लागला.रंजन पडणारी भांडीच तोलून धरत होता.
माकडं मंदिराबाहेरच ताटकळत उभी राहिली.जीवाच्या आकांतानं आत जावसं वाटत असुनही आत जाता येईना.रंजन हणमंतराव बाला व सुमीला खांद्यावर टाकत बाहेर निघाली.माकडाचं काम सोपं झालं.माकडं दबा धरत मागं मागं सरकू लागली.
"मामा या पिल्लांना गाडीतून दुसरीकडं नेऊ मग पाहू कशी वासलात लावायची ते!"रंजन चालता चालता दबल्या आवाजात हणमंतरावांस बोलला. अंधारातून वाट कापत ते गाडीजवळ आले.बाला व सुमीस गाडीमध्ये टाकलं नी गाडी सुरू करणार तोच माकडांनी त्यांच्या गाडीवर उड्या टाकल्या.ते दात विचकारत गाडीचे पुढचे काच फोडू लागले पण काच फुटेना.हणमंतरावास काय दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक ते गाडीतून उतरत हाताला अंधारात लागेल तो दगड उचलू लागले नी माकडांना हुसकावू लागले.तोच दुसरं माकड उघडल्या दरवाज्यातून गाडीत घुसलं व रंजनला ओरबाळू लागलं .रंजन ही आपल्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर निघाला नी मग दोन्ही माकडांनी एकेकाला धरत बोसकायला सुरूवात केली.रंजन व हणमंत लालेलाल होऊ लागले.तरी रंजन व हणमंता पुन्हा गाडीकडे सरकू लागले.जेणेकरून पळता येईल.पण माकडांनी कान, नाक, चेहरा नखांनी ओरबाडून काढत दोघांना मारोतीसारखं लालेलाल केलं.अंगावरच्या कपडाच्या चिंध्या झाल्या.त्यांच्या ओरडण्याच्या आवाजानं सोनेवाडी हळूहळू जागी होऊ लागली व लोक आवाजाच्या दिशेनं चाचपडत सरकू लागले.लोकांची चाहूल लागताच माकडं थोडी मागं सरली.जखमी अवस्थेतल्या रंजननं गाडीत बसत गाडी सुरू केली.हणमंतराव ही लाथातांगड करत गाडीत बसले.हणमंतरावाने गाडीत बेशुद्ध पडलेल्या बाल्या व सुमीस लाथेनं खाली चिखलात ढकललं. हे पाहून कलकलत माकडं पुन्हा गाडीकडं झेपावली पण तोच रंजननं गाडी पळवली.गाडी झुकांड्या खात जळगावच्या रस्त्याला लागली.लोक आले त्यांना चिखलात पडलेले बाला व सुमी दिसली. विजेरींच्या उजेडात चिखल व पाणी लाल दिसत होते.लोक येताच माकडं मळ्याकडं धूम ठोकत पळाली. लोकांनी बाला व सुमीस उचलत "ही पोरं इथं कशी आली?ही तर बेशुद्ध आहेत मग कुणी आणलं असावं?का आणली?कुणी बेशुद्ध केलं असावं असे नाना प्रश्न पडू लागले.त्यांनी दोघांना घेत गावातच डाॅक्टरकडं नेलं.
सकाळ सकाळीच रंजन व हणमंतरावांना हायवेवर लिंबाच्या झाडाला ठोकून उभ्या असलेल्या गाडीतून लोकांनी दवाखान्यात दाखल केले. पंधरा दिवस सुटी मिळालीच नाही.येणाऱ्या प्रत्येकाला ते माकडांनी पावसाळ्या रातीत हल्ला केल्याचं सांगू लागले.पण गावात परतणाऱ्या किसनाबास शुध्दीवर आलेल्या बालानं मंदिरातल्या निवासात आपण रंजन व हणमंतरावास पाहिल्याचं व पुढचं काहीच आठवत नसल्याचं सांगितलं.तरी किसनाबास घटनेची सुसंगती लागेना.पण नंतर रंजन व हणमंतरावांना माकडांनी बोसकल्याचं कळालं नी मग त्यांना घटनेची सुसंगती लागली. त्यांनी त्या दिवसापासून पोरांना एकटं सोडलंच नाही.तरी किसनाबा सोबत रात्री बाजीच्या मळ्यातली दोन्ही माकडं वडावरच थांबू लागली.नी विठ्ठलासही आता बाजीला सोनेवाडीत कसं आणावं हे साकडं पडलं. दिवस महिने जाऊ लागले.
.
.
.
बाजी.…!
बाजी..?

संता व जना गेले त्या दिवशीच ट्रकनं बऱ्हाणपूर कडं निघालेला बाजी कुठं होता?
क्रमश: