फितूर आभाळ
भाग::--सहावा
'अप्पासाहेब!जळगाव साईटच्या बाबतीत मि.बाजी चं पूर्ण औदासिन्य आहे.' या दुपारच्या रचनाच्या वाक्यावर नारायणराव गर्गे दुपारपासून चिंतेत होते.आता ही त्यांनी शिपायास बाजीला आत पाठवायला सांगत आॅफिसातल्या खुर्चीत त्याचबाबतीत ते विचारात गढले होते.राज डागाच्या प्रकरणानंतर ते ललितपूर चा आपला सर्व व्यवसाय गुंडाळून आपल्या महाराष्ट्रातच परतू पाहत होते.त्याचाच भाग म्हणून त्यांनी जालना व नंतर आता जळगाव जिल्ह्यात आपल्या व्यवसायास सुरुवात केली होती. पण चार पाच वर्षांपासून आपला उजवा हात होऊ पाहत असलेला बाजी मात्र जळगावबाबतीत नेहमीच कच का खातो ते त्यांना उमजतच नव्हतं.रचनाही नेमकं दुपारी तेच सांगताच ते आणखीनच हैराण झाले.आपण तर पुढचं सारं ठरवून ठेवलंय.तोच दारातनं बाजी आत आला.
"बैस बाजी.हे बघ बाजी जळगाव जिल्ह्यात रचनानं दोन तीन जागा पाहून ठेवल्यात.संबंधीताशी बोलणी ही झाल्यात. रचना व तू उद्याच निघ व त्याच्याशी साऱ्या फाॅर्मॅलिटीज पुर्ण कर." अप्पासाहेब डोळ्यात रोब आणत इन्स्ट्रक्शन देत होते तितक्यात रचनानं आत प्रवेश केला.
"बाजी आधी जमिनी अॅक्वायर करण्यासाठी संबंधीताकडनं पूर्ण रकम घे,आणि एक लक्षात ठेव जमिनी आपल्याच नावावर खरेदी करायच्या.कुणी नकार दिला तर साफ सांगारचं की आमचा गृप कारखाना उभारल्यावरच तुम्हास तुमच्या रकमेइतके शेअर्स देईल.तो पावेतो विश्वास असेल तर आधीच रक्कम गुंतवा.जर कुणी नकार देत असतील तर साफ हाकलून लावायचं"अप्पासाहेब अनुभवानं सुचना देत होते.पण बाजीचं लक्षच नव्हतं.ते पाहून रचनानं अप्पांना इशारा केला.
"बाजी काय प्राॅब्लेम आहे तुझा?लक्ष कूठंय तुझं?"
"काही नाही अप्पासाहेब.
पण....पण..हि साइट दुसऱ्याकडे सोपवली असती तर.."
"का?तुला काय प्राॅब्लेम आहे?नी साइट पूर्ण करेल असा तुझ्याशिवाय कोण आहे दुसरा?डागाला बोलवू का मग तुरुंगातनं?"अप्पा आवाज चढवत म्हणाले.
"अप्पासाहेब तसं नाही पण..."
"पण काय मग ?ते तरी सांग.जळगावबाबतीतच तू खच का खातोस?"अप्पासाहेब खोलात शिरू पाहत होते.
"नाही अप्पासाहेब...."म्हणत बाजी खाली मान करत जमीन पाहू लागला.
"अप्पा!मि.बाजीस माझ्यासोबत काम करायचं नसेल तर तसं स्पष्ट सांगावं.म्हणजे मी एकटी ही साइट पूर्ण करून दाखवेन"आतापर्यंत शांतपणे ऐकत असलेली रचना म्हणाली.
"मॅम तसं नाही काही उगाच आपण.."
"बाजी मग तुझा काही वैयक्तिक प्राॅब्लेम असेल तर ते ही सांग"अप्पासाहेब खोद घेऊ लागले.
आता बाजी घाबरला.
"अप्पासाहेब आपल्या सुचनेनुसार उद्याच निघतो मी रचना मॅम सोबत. मला काय आला वैयक्तिक प्राॅब्लेम!"बाजीनं विषय बदलावा म्हणून ठामपणे म्हणत परवानगी घेत तो कॅबीनबाहेर पडला.
"अप्पा बाजीचा जळगावशी काही तरी संबंध नक्कीच आहे.हा काही तरी लपवतोय नक्की!"तो बाहेर पडताच रचना म्हणाली.
"रचना जे काही असेल ते तू आधी उद्या प्रवासात काढ.बाजीसारखा विश्वासू माणूस नाही पोरी.या पोरानं चार पाच वर्षात आपल्यावर खूप उपकार केलेत गं.शिवाय सारा व्यवसाय निस्वार्थी पणानं सांभाळला ते अलगच"
मात्र हे ऐकतांना रचनाची नस तडकली हे अनुभवी अप्पांनी लगेच ओळखलं.
बाजीनं बाहेर येताच कपाळावरचा घाम पुसला.आज कसंतरी निभवलं पण आता आपला भूतकाळ जास्त दिवस नाही लपवू शकत आपण.उद्या जळगाव ला जावं तर लागणारच मग....? त्याच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. संध्याकाळी तो फ्लॅटवर परतला.त्यानं आज जेवनही घेतलं नाही.कडक काॅफी घेतली पण डोकं काही उतरेना. तो अंथरूणात पडला पण डोळा ही लागेना.त्याला चारपाच वर्षांपूर्वीची ती रात्र आठवू लागली.आपण धना, राधा,मिराशीराडा करत संता दादाच्या सांगण्यावरून जळगाव सोडलं..सारं आठवू लागलं.कसे असतील संता दादा,जना वहिनी,बाबा?नी सुमी बाला तर आता किती मोठे झाले असतील पाच वर्षात?आपल्याला किती तरी वेळा सोनेवाडीस परतावं असं वाटलं.पण पोलीस तर मागावर. नी आपण ही ठरवलंय की धनानं हिसकवलेली जमीन परत घेण्याइतपत कमाई करूनच परतायचं.म्हणून आपण काहीच संबंध न ठेवता राहतोय.तेवढ्यात पोलीसांचं ही प्रकरण शांत होईल.बऱ्याच वेळा घरच्यांशी बोलावं किती आतुन वाटतं.पण काय करणार?संता दादाचा मोबाईल स्वीचऑफ.नी इतर कुणाचे नंबरच नाहीत पाठ.व आपला मोबाईल तर आपणच ट्रकवर विसरलो.
तो पडल्या पडल्या सारं आठवू लागला. ललितपुर,भोपाल, खंडवा बुरहानपूर मागं सरकत सरकत तो जळगावी पोहाचला.......
तेथूनच त्यानं प्रवास सुरू केला.
.

पडत्या पावसात रस्त्यावरच्या ढाब्यावर उभ्या ट्रकच्या कॅबीनवरच्या टपावर ड्रायव्हरच्या लक्षात येणार नाही असं बाजी जाऊन बसला.डोक्यात धना, राधा,मिरा व रंजन बाबत आग धुमसत होती.बहुतेक ड्रायव्हर व क्लिनरचं जेवण आटोपलं असावं व त्यांनी ट्रक सुरू केला होता.पोलीस आपल्या मागावर असतील जितकं लवकर शक्य तितकं आपण इथनं सटकू या विचारानं बाजी निघाला पण कुठं जातोय याचा पत्ताच नव्हता.ट्रक नेईल तिकडं.ट्रक अंधारात सुसाट रस्ता कापत होता.मध्यंतरी पाऊस सुरू झाला नी वर टपावर बाजी ओला होत थडथडू लागला. सातपुड्यातला पाऊस,थंडी त्याला झोडपत होती. रात्रभर प्रवास पाण्यातच सुरू होता.मध्यंतरी बुरहानपूर लागलं.बुरहानपूरला ट्रक थांबवलाच नाही.बाजी तर पाऊस थंडीनं गारठू लागला.आता बाजीला आपण ज्या गाडीत बसलोय ती मध्यप्रदेशाकडं चाललीय हे कळलं.रस्त्यावर लागणारे गावं व काही लाईट्सच्या उजेडात दिसणारे फलक यावरून गाडी खंडवाकडे जातेय हे लक्षात येत होतं.ट्रक एका ढाब्यावर थांबला.रात्रीच्या दिड दोनचा सुमार असेल.कॅबीनवर लागणारी थंडी, पाऊस यानं बाजीनं ट्रक सोडण्याचा विचार करत ड्रायव्हर चहा प्यायला ढाब्यावर गेला ही संधी साधत बाजी हळूच खाली उतरत अंधारात आडोशाला थांबला.ढाब्यावर सामसुम होतं.भट्टीत धुमसणारी आग विझायला आलेली.ढाब्यावरचा माणूस उठलाच नाही.ड्रायव्हरनं परत येत ट्रक पुढे नेला.बाजी आडोशातून निघत ढाब्यावर गेला. भट्टीतला विस्तव चाळवत अंग शेकू लागला.तोच त्याला मोबाईल ची आठवण झाली.पावसात मोबाईल भिजू नये यासाठी त्यानं कॅबीनच्या पत्राआड ठेवलेला मोबाईल उतरतांना तिथंच राहिला व ट्रक सोबतच गेला.तो स्वत:वरच संताप करत हात चोळत बसला. भट्टीवर अंग तापवत तो बराच वेळ बसुन राहिला.उत्तररात्री रस्त्यावरची ट्रॅफीकही सुस्तावली. ढाब्यावर एकच माणूस मस्त डाराडूर झोपलेला. बाजी संता दादा व वडील घरी शेत गेल्यानं आज जेवलेही नसतील या विचारानं चिंताक्रांत झाला.तोच रस्त्यावर दूर अंतरावर एका कारला मागून आलेल्या कारनं ओव्हरटेक करून कार आडवी लावत थांबवलं.दडदड उतरत मागच्या गाडीतून चारेक लोक उतरत पुढच्या गाडीतल्या ड्रायव्हरवर सपासप तलवारीनं वार करत क्षणात त्याचं काम तमाम केलं.मागच्या शीटवर झोपलेला माणूस काय होतंय हे कळायच्या आत त्यालाही खेचतच बाहेर काढलं.त्यावरही वार होऊ लागले. तितक्यात मागून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश जवळ येऊ लागला. मारणाऱ्या माणसांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावत त्यापैकीच एकानं त्यांची गाडीही बाजुला गेली.दुसऱ्या दोघांनी त्या माणसाच्या मानेवर हत्यार ठेवत अंधारातून ढाब्याकडं आणू लागले. गाडी लावणाऱ्या माणसांनी मरणासन्न ड्रायव्हरला गाडीत टाकत मागाहून येणारं वाहन पास होताच गाडी पळवली.
"हम इसकी गाडी और ड्रायव्हर को ठिकाणे लगाकर आते है तबतक तुम इस शेठ को हलाल करो.बाद मे वापस जाके डागा....."
"गधा कही का नाम मत ले चल.."दुसऱ्यानं त्याला मध्येच थांबवत नेलं.
बाकी दोघांनी ढाब्याच्या आडोशाला त्या माणसाला नेतांना त्यानं बाजीकडं कसायानं बोकडाचं शीर कापतांना बोकडानं पहावं तसंच पाहिल्याचं भट्टीच्या उजेडात दिसलं.अंधारात जातांना तोंडावर काळा रूमाल बांधलेल्या दोघांनी "चल यहा रूकना मत!जान प्यारी है तो!" बाजीकडं पाहत धमकावलं.ढाब्यावर झोपलेला माणूस तर ड्रायव्हरला उडवलं तेव्हाच सुंबाल्या झाला होता.बाजीनंही त्यांनी धमकावताच बुरहानपुरच्या दिशेनं रस्ता पकडला.एकतर नवखा मुलूख,अंधारी सुनसान रात्र व आपल्याच पाठीशी पोलीस शिवाय त्यांच्याकडं हत्यारं, का उगाच झमेल्यात पडा ! असा साळसूद विचार करत बाजी निघाला.तिकडे त्या माणसावर वार होऊ लागले.त्या सरशी जाणाऱ्या बाजीला तो माणूस हंबरडा फोडून मदतीसाठी याचना करू लागला. त्याच्यावर वार होतच होते.पुढे जाणाऱ्या बाजीला क्षणात अंधार-उजेडातली त्याची हलाल होणारी बोकडागत नजर डोळ्यासमोर आली.त्यानं क्षणात विचार केला.आपल्या बापानं आपणास तर असं कधीच शिकवलं नाही.आपण जर पळून गेलो तर त्या माणसाची मौत अटळ आहे.फिरावं का परत?किती दोन जण आहेत?दोन तर गेलेत?ते परत येण्याआधीच आपण आपलं काम करू.
बाजीतला पहेलवान डोळ्यात आग उतरवत परत फिरला.त्याला परत येतांना दिसताच एक चवताळून चालून आला.बाजीनं वार वरच झेलत त्याला एका दणक्यातच लोळवत हातातलं हत्यार हिसकवलं.ते पाहून दुसराही धावून आला.बाजीनं हातातल्या तलवारीनं शेतातल्या कडबा तोडतांना वार करावा असा दोघांच्या पायावर वार केला.बाजीच्या परतण्याची सुतराम कल्पना नसलेल्या दोघा गुंडांना बाजीचा हा हल्ला अनपेक्षित होता.त्यातून सावरत नंतर आलेल्या गुंडानं पायाच्या पोटरीतून रक्ताची चिरकांडी उडत असतांनाही बाजीवर सपकन वार केला.बाजीची पाठ सर्रकन चिरली गेली.बाजी कळवळला नी चवताळला.त्यानं दोघांवर वार करावयास सुरुवात केली पण दोघांनी परिस्थीती ओळखून स्वत:ची गाडी देखील सोडून अंधारातून पलायन केलं.
बाजीनं त्यांचा नाद सोडत त्या माणसाकडं धाव घेतली.त्याची शुद्ध हरपायला येत होती.त्यानं दवाखान्यात नेण्यासाठी हातवारे करत आपल्याकडचा मोबाईल दिला.बाजीनं आजुबाजुला पाहिलं याला तर दवाखान्यात नेणं अर्जंट . नाही तर हा दम तोडून देईल व आपणावरच प्रकरण अंगलट येईल शिवाय गेलेले गुंड एक होत आले तर आपला खातमाच करतील.गुंडाची गाडी उभीच होती.बाजीनं पळत जात पाहिलं तर चाॅबी गाडीलाच.त्यानं क्षणाचाही विलंब न लावता गाडी स्टार्ट करत आणली.त्या जखमी माणसास टाकलं व गाडी सुसाट खंडव्याकडं पळवली .तो पावेतो पहाट व्हायला लागली.त्यानं रस्त्यात दवाखाना विचारत विचारत मोठं हाॅस्पीटल शोधलंच.त्या माणसास अॅडमीट केलं.डाॅक्टरांनी पोलीसांना कळवलं.तो पावेतो बाजीनं त्या माणसाच्या मोबाईल वरनं त्याच्यातले एक दोन नंबर घुमवले.कुणीतरी रचना गर्गे म्हणून मुलीनं फोन उचलताच.बाजीनं एका दमात सारं सांगितलं.पलिकडून कुठे?कधी?कोणी?कसं?आपण कोण?अशी रडतच सरबत्ती सुरू केली.त्या मोबाईल वर काॅल्सवर काॅल्स येऊ लागले.त्या माणसाची ओळख पटली.नारायणराव गर्गे ललितपुर मधील मोठा उद्योजक.फर्टिलायझर, शेतकी अवजारे व बी-बियाणे,किटकनाशके यांचा मोठा उद्योग.बाकी चक्र वेगाने फिरली.आता बाजीला आपल्या पाठीवरील चिरल्याची जाणीव झाली.त्याला भोवळ आली.डाॅक्टरांनी त्यावरही उपचार सुरू केले.दुपार पावेतो तो शुद्धीवर आला.पोलीसांनी त्यांच्याकडून सारी माहिती घेतली.त्यानं मात्र आपली जळगावची ओळख लपवत बाकी सारं सत्य बया केलं.त्यानं रात्री आणलेली गुंडाची गाडी सागर मधून परवाच चोरीला गेलेली होती.त्यानंतर रात्री नारायणराव गर्गेची सारी माणसं आली.आल्या आल्या कुणी तरी राज डागा म्हणून सोबत आलेल्या माणसानं बाजीवरच पलटवार करत यानंच गुंड पाठवून बचावाचं नाटक केलं असावं म्हणत पोलीसावर दबाव आणू लागला.पण नंतर गर्गेंची गाडी व ड्रायव्हरचचं प्रेतही नदीत पोलीसांना आढळलं.पण नारायणराव शुद्धीत येईपर्यंत संशयाची सुई राज डागा,रचना गर्गे बाजीवरच फिरवू लागले.त्यांनी नारायणरावास तात्काळ ललित पूरला हलवलं.बाजी पोलीसांच्या पहाऱ्यात दवाखान्यात उपचार घेऊ लागला.बाजीला आता उपकार केल्याचा पश्चाताप होऊ लागला.पण चार दिवसांनी ललितपूरहूनच संदेश आल्यावर बाजीला सोडण्यात येऊन ललित पूरला नेलं.नारायणरावांनी पडल्या पडल्या त्याची माफी मागून हात ही जोडले.हा राहिला नसता तर कदाचित मी जिवंत राहिलोच नसतो.
आठ पंधरा दिवस तपास चालूनही हल्लेकरी सापडलेच नाही.पण नारायणरावांनी एका गुंडांच्या तोंडून ओझरता झालेला उच्चार 'डागा..'त्यांच्या मेंदूत झिणझिण्या आणू लागला.पण त्यांनी तरी मनात ठेवत ते फक्त राज डागावर पाळत ठेवू लागले.त्यांना आपण शुद्धीत नसतांना बाजीला अडकवल्यात राज डागाच होता हे ही कळलं.पण तरी त्यांनी राज डागाशी पुर्ववत संबंध ठेवले.मात्र बाजीला ते आता आपल्या सोबतच फिरवू लागले.जो माणूस आपल्यासारख्या अनोळखी माणसासाठी अपरात्री जीवावर उदार होत मदय करतो, जीव वाचवतो,त्याला जीव लावलाच पाहिजे.हा नसता तर आपल्याला त्या गुंडांनी हलालच केलं असतं.
त्यांनी त्याला आपल्या सोबतच फिरवत एक दोन महिन्यातच सारा उद्योगधंदा समजावला.हल्ल्यानंतर त्यांनी डागावर विश्वास ठेवणं सोडलं.त्याऐवजी धंद्यातला हरहुनर ते बाजीलाच कळवू लागले.त्यासाठी त्यांनी नविन फ्लॅट,बेंटली मुलसॅन गाडी दिली.
रचनाला ही बाब खटकू लागली.ती या बाबत राज डागाला सुचित करू लागली.त्यामुळं राज डागा बाजीवर काट खाऊ लागला.शिवाय हा रात्री टपकला नसता तर नारायण गर्गे संपल्यातच होता. आपला सारा बेत या बाजीनंच चौपट केला.आता बाजी व रचना दोघांना......,..पर्याय नाही.

क्रमश:
पुढचा भाग कधी येणार
ReplyDelete