एकतर्फी प्रेम (भाग 2)-लेखक -संदीप पाटील
युवराज चे ब्रेसलेट बघीतल्यावर रोहित रागावला,तो स्वतःशी बडबड करत म्हणाला "युवराज ने त्याचे शब्द खरे केले,तो म्हणाला होता की वृषाली त्याची नाही झाली तर कुणाचीच होणार नाही. त्यानेच माझ्या वृषालीला मारले".रोहित चे बोलणे ऐकून इंस्पेक्टरने ने सर्वांना युवराज बद्दल विचारपुस केली.सर्वांनी त्यांना माहिती दिली.इंस्पेक्टरने त्यांना जायला परवानगी दिली.सर्व सोपीस्कार पार पडल्यावर वृषालीला जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला.सर्वात जास्त दुःख राधा अन रोहितला झाले.वृषाली राधाची रुममेट तर रोहितची प्रेयसी होती.रोहित व राधाला कुणीही एकटे सोडायला तयार नव्हते.काही दिवसांसाठी चेतना मावशीकडून राधाच्या रूमवर रहायला आली.राधाने स्वतःला सावरले व ती रोहितला दुःखातून सावरायला मदत करत होती,कारण तो तिचा दहावीपासूनचा मित्र होता.
मधल्या काही दिवसांत नाटकीय घडामोडी घडल्या.रोहितला बातमी मिळाली की युवराज ला वृषालीच्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली.त्याच्या वडिलांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केलेत पण युवराज चे घटनास्थळी सापडलेले ब्रेसलेट,हातांचे ठसे असे ठोस पुरावे असल्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले.त्या दिवशी सुमित बाहेरगावी गेलेला असल्यामुळे रोहित रूमवर एकटाच होता.रात्रीची वेळ होती,राधा संध्याकाळीच येऊन त्याला भेटून गेली होती.तो झोपायचा प्रयत्न करत होता पण त्याला झोप येत नव्हती.त्याच्या रुममधल्या भिंतीवरच्या घड्याळाने बारा ठोके दिले,याचा अर्थ बारा वाजले होते.रोहितच्या रूमसमोर मोठे पटांगण होते व पटांगणामध्ये वडाचे झाड होते.झाडाखाली बसण्यासाठी बाकडा टाकलेला होता.रोहितची नजर खिडकीतुन वडाखालच्या बाकड्यावर गेली अन रोहित डोळे विस्फारून बघत राहिला.त्या बाकड्यावर वृषाली बसलेली होती व ती रोहितकडे एकटक नजरेने बघत होती.रोहिटनेच भेट दिलेला त्याच्या आवडीचा गुलाबी रंगाचा ड्रेस तिच्या अंगावर होता.वृषालीने रोहितला हाताने बाहेर यायचा इशारा केला तसा रोहित मंतरल्यासारखा उठला,दरवाजाची कडी खोलून बाकड्याजवळ आला,थोडा वेळ उभा राहुन वृषालीजवळ जाऊन बसला.त्याने तिच्या डोळ्यांत डोळे टाकले अन रोहितची शुद्ध हरवली.पहाटे पहाटे मशिदीत होणाऱ्या अजाण चे सूर ऐकून रोहित ला जाग आली.जाग आल्यावर सर्वप्रथम आपण इथे कसे आलो हेच त्याला कळेना.डोक्यावर ताण दिल्यावर त्याला रात्रीचा प्रकार आठवला.तो तसाच धावत आत गेला.आत गेल्यावर एक दोन तास बेड वर विचार करत पडला,नंतर सुमित,राधा,चेतना यांना फोन करून दुपारी रूम वर बोलावुन घेतले.सुमित तातडीने गावाहून परत आला.दुपारी चेतना व राधा रोहितच्या रूमवर आले.सुमित अगोदरच आलेला होता. रोहितने सर्वांना रात्री घडलेली घटना सांगितली.त्यावर चेतना म्हणाली "रोहित,ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो तीला विसरणं शक्य नसते,तु अजूनही तिला विसरलेला नाहीस म्हणून तुला भास होत असतील".सुमित पण चेतनाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला "रोहित काल मी बाहेरगावी गेल्यामुळे तु एकटाच होता,एकटेपणात तुला वृषालीच्या आठवणी आल्या असतील व त्यामुळे तुला तस वाटत असेल".राधा रोहितचा हात हातात घेऊन त्याच्या जवळ बसून राहली.तिचा स्पर्श रोहितला आश्वस्त करत होता.रोहितला समजाऊन सांगुन राधा व चेतना परत निघून गेल्या.सुमित रोहित जवळच झोपला.
ती रात्र अमावसेची रात्र होती.अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधाराने आपल्या काळ्या साम्राज्याचे जाळे विणायला सुरुवात केली होती.बाहेरील वातावरण कमालीचे भेसुर व तणावपूर्ण जाणवत होते.राधा व चेतना गप्पा मारून झोपी गेल्या.मध्यरात्रीच्या प्रहरी अचानक कुठल्यातरी आवाजाने चेतनाला जाग आली.कुठेतरी "चिठ्ठी ना कोई संदेश,न जाणे वो कौनसा देश जहा तुम चले गये" वाजत होते.चेतना उठली,माठातील पाणी पीत असतांना तिची नजर सहज खिडकीबाहेर गेली अन ती जागीच थिजली.बाहेर वृषाली उभी होती.रोहितने सांगितल्याप्रमाणे गुलाबी ड्रेस मध्ये. वृषालीने चेतनाला बाहेर येण्याचा इशारा केला.चेतनाने राधाकडे पाहिले,राधा गाढ झोपेत होती.स्वतःवर काबू नसल्यासारखी चेतना
खोलीच्या बाहेर येत वृषालीच्या मागे निघाली. वृषाली पुढे जात होती व चेतना वृषालीच्या मागे.वृषाली जिन्याने बिल्डींगच्या वरच्या मजल्यावर जात होती व चेतना तिच्या मागे.असे करता करता ते तिसऱ्या मजल्यावरील माडीवर आले.वृषाली माडी च्या काठावर उभी राहुन चेतनाला बोलावीत होती.चेतना काठावर आली अन तीला मागून धक्का बसला.तीन मजले हवेत पार करत चेतना खाली आली अन एक किंकाळी रात्रीच्या काळोखाला चिरत परिसरात घुमली.पटापट दिवे लावल्या गेले.कुणाला काय झाले हे कळेना.एवढ्यात वरच्या मजल्यावरील कुणाचेतरी लक्ष खाली गेले अन तो ओरडला.लोक तात्काळ खाली आले.एका बाईने जाऊन राधाला उठविले,ती डोळे चोळत लोकांच्या घोळक्यात आली.समोरचे दृश्य पाहून तिची शुद्ध हरवली. चेतना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.श्वास सुरू होता.शेजारच्या लोकांनी तात्काळ चेतना व राधाला दवाखान्यात नेले.दवाखान्यात नेल्यावर राधाला शुद्ध आली.तिने रोहितला फोन लावुन सर्व सांगितले.नंतर तिने चेतनाच्या घरच्यांना फोन केला.रोहित सुमितला काही न सांगता दवाखान्यात घेऊन आला.दवाखान्यात आल्यावर सुमितला सत्य परिस्थिती समजली व त्याने हंबरडा फोडला.थोडया वेळाने डॉक्टर चिंतीत होऊन बाहेर आले.त्यांनी सुमित कोण विचारताच सुमित पुढे आला.डॉक्टरांनी सुमितला म्हणाले "पेशंटच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने वाचण्याची शक्यता कमी आहे,ती सारखे तुमचे व मित्रांचे नाव घेत असल्यामुळे तिची शेवटची भेट घ्या".
डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुमितच्या पायातील त्राण गेले.तो खाली पडण्याच्या बेतात असतांनाच रोहित व राधाने त्याला सावरून आधार देत ते चेतनाला ठेवलेल्या रूम मध्ये आले.चेतनाची अवस्था बघून तिघंही जोराने रडायला लागले.चेतनाच्या जवळ गेल्यावर चेतना काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.तिघांनीही आपली मान खाली झुकवुन कान चेतनाच्या ओठांजवळ आणले.चेतनाने मोठ्या कष्टाने उच्चारलेले शेवटचे शब्द त्यांच्या कानात शिरले. वृ..वृ..शा..ली..ने..मा..झी..ही..अ.
वस्था..क..क..केली.
वृषालीने माझी ही अवस्था केली असे बोलुन चेतनाने प्राण
सोडले.सुमित सारखा डोके आपटुन घेत होता.रोहित,राधा त्याला सावरायचा जीव तोडून प्रयत्न करत होते.शोकाकुल वातावरणात चेतनाला निरोप देण्यात आला.पोलिसांनी येऊन राधा,सुमित,रोहित ची चौकशी केली पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. शेवटी चेतनाने आत्महत्या केली असा निष्कर्ष काढून पोलिसांनी केस बंद केली.त्या दिवसांपासून रोहित सतत तणावाखाली राहु लागला.वृषालीच्या आत्म्याने चेतनाला का मारले असेल याचाच तो विचार करायचा. सुमित अजुनही धक्यातून सावरला नव्हता. राधाची तारेवरची कसरत सुरू झाली.ती स्वतःच दुःख सांभाळून रोहितला सांभाळायची.एक दिवस अचानक रोहितला त्याच्या मामांनी सांगितलेला अमानवीय शक्तीचा एक किस्सा आठवला.त्यात त्यांनी एका व्यक्तीचा वारंवार उल्लेख केला.ते नाव आठवायचा तो प्रयत्न करत असताना त्याला ते नाव
आठवले,वीरभद्र.

क्रमशः
भाग 1 लिंक
Bulati hai magar jaane ka nahi
ReplyDeleteभाग ३ कधी येईल?
ReplyDelete