घावटी
भाग::-चौथा
रामोजी शिंदेनं रहमत मियाच्या ब्राॅस बॅन्डला चांगले दिवस आणत आॅर्केस्ट्रा सुरू केला. आवाजात व गायकीत कमालीची नजाकत व जादू असल्यानं अल्पावधीतच नाशिक मध्ये त्याचा चांगला जम बसला.ज्या रहमत मियाॅला खायचे फाके पडत त्याला रामोजी शिंदेनं हात देत वर आणलं. नऊ वर्षाचा सदा व सहा वर्षाचा मधा,रेवती यांना चांगले दिवस आले.रामोजी महिन्यात मनमाडला जात आपल्या आंधळ्या आईची सर्व तजवीज करून येई.आता लवकरच तो तिलाही रेवतीची समजूत घालून नाशिकलाच नेणार होता. रेवती गरिबीत जगलेली असल्यानं तिला श्रीमंतीचं आत्यंतिक आकर्षण होतं.रुपानं सौंदर्यान उजवी असल्यानं आपल्या रुपाची तिला मनात एक आढ्यताही होती.दोन मुलं होऊनही रामोजीबद्दल तिला आकर्षक असे नव्हतेच.ज्या आॅर्केस्टानं रामोजी खूष होत होता,त्यालाच ही 'नरड्यास चंदा नं घसाफोडीचा धंदा ' म्हणून हिणवी. रामोजी ज्या बिल्डींगच्या तळमजल्यावर भाड्यानं राही त्याच बिल्डींग समोर मध्यप्रदेशातील शामजी कदमाचं 'राव टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स'चं मोठं आॅफिस होतं.त्यांच्या लक्झरी महाराष्ट्र,गुजरात व म.प्रदेशात सर्वदूर चालत.त्याचा रावसाहेब कदम हा ऐन बत्तीशीचा मुलगा आठवड्यातून दोनेक चकरा टाकत धंदा सांभाळी.त्यांची मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमेवरील गावात शेती व इतरही व्यवसाय होते.रावसाहेब विवाहीत होता व त्यालाही मुलगा होता.यानं रेवतीला हेरलं.रेवतीला त्याची श्रीमंती भुरळ घालू लागली.रामोजीला रेवतीची बदलती राहणी लक्षात यायला वेळ लागला नाही.वेगवेगळे सेंट, साड्या, बोटातल्या अंगठ्या त्याला सतावू लागल्या.ती कारणं दाखवत घरसंसारातून वाचवलेल्या व वडिलांकडून आणलेल्या पैशातून खरेदी केल्याचं दाखवू लागली.पण आपण घरात किती देतो व सासऱ्याची परिस्थिती माहित असल्यानं रामोजीला कोडं उलगडेना.रेवतीला तर विविध ब्रॅन्डच्या सेंटच्या सुवासात रामोजीचा कष्टाच्या घामाचा सुवासही घिण आणु लागला.ती वेगळ्याच विश्वात दंग राहू लागली.त्यानं रामोजीची चलबिचल वाढली.त्यानं पाळत ठेवली.संध्याकाळच्या कार्यक्रमाची तारीख असल्यानं तो बाहेर पडला.आता तो रात्री बारालाच परतेल.हे रेवतीनं हेरलं.आज रावसाहेब होताच.रामोजीनं रहमत मिया व त्याचा नुकताच विशीत प्रवेश करणारा अन्वरला सांगत बुट्टी मारली व पाचला घरातून बाहेर पडलेला रामोजी साडेपाच पर्यंत घराच्या समोर दबा धरून बसला.रावसाहेबाची इनोव्हा बिल्डींगमधल्या रुमजवळ आली.दार लोटलं गेलं.सदा - मधाच्या हातात सुट्टे देत दुकानावर सुसाट पाठवण्यात आलं. रामोजीचे कान खिडकीच्या भिंतीला लागले.त्याच्या कानात भट्टीतला तप्त लोखंडाचा रस पडू लागला.
"गेली का तुझी पिपाणी? "हास्याचा प्रवाह....
"किती गं आणतो गं कमवून"
"खूपच !महिन्यात तुम्ही अत्तरासाठी एकवेळा देता एवढे भरगच्च"
पुन्हा हास्याचा दबलेला स्फोट नी मग नको नको ते घुसमटीचे आवाज.
रामोजीच्या जिवनाच्या कव्वालीचे हरकती,सुर, ताल सर्वाची एकच घुसमट झाली.तो निघाला.पोरं गल्लीतून येतांना दिसताच तो बाजूला झाला.पण पोरासाठी देखील दरवाजा उघडला नाही.रामोजीचा ह्रदयाचा मेंदूचा तट भुसुरुंग लागून उडाला.बत्ती घरच्याच माणसांनी दिली.
अंगावर पडलेल्या माराने रेवतीनं रात्रभर राडा केला.सकाळी रामोजी घराबाहेर पडला.तो वेड्यासारखा गोदेवर फिरत राहिला.आक्रोश करत राहिला.संध्याकाळी घरी आला.पोरं रडून रडून शेजारी झोपलेले.त्यानं रेवतीचा तपास केला.तर रेवती व रावसाहेब दुपारीच गायब.दोन तीन दिवस तपास करूनही थांग लागेना.तो हिम्मत करून राव टूर्सच्या आॅफिसात चढला.नेमके शामजी कदम आले होतेच.रामोजीनं कढ दाबत हात जोडत आक्रोश मांडला."दादाजी माझात ताकद असती तर आग लावली असती पण नाही.निदान माझ्या दोन बछड्यासाठी मी सर्व विसरून इथून बाडबिस्तरा गुंडवतो.पण तुमच्या रावास समजवा व रेवतीस ताब्यात द्या"
शामजीनं समोरचं रिसीव्हर घुमवलं.पंधरा मिनीटात इनोव्हा आली.
"जा लेके जा अपनी चिज को अगर आती है तो.मै राव को समजा देता"
रामोजीनं सदा मधाला सोडलं .पोरं पळतच आईला बिलगली.पण रेवती....
"दादाजी ये नही जाना चाहती" रेवती ऐवजी रावसाहेबच बोलला.
शामजीनं खुणेनच रेवतीला विचारलं.
रेवती पोरांना दूर सारत रावामागं उभी राहिली.
ते पाहुन शामजीनं रामोजीकडं पाहिलं.
"अब तु देख क्या करना है!तेरी चिज ही नही बोलती तो मै क्या कर सकता!"
रामोजीनं तप्त रसाची घुटी गिळावी तसं रडणाऱ्या पोरांना घेत निघाला.आपण आखलेला प्लॅन नाही शक्य आता.तो हताश होत नविन विचार करू लागला.ती रात्र त्यानं रडतच काढली.आपल्या सदा- मधास पोटाशी लावत तो आक्रंदू लागला.
"पोरांनो!मी नाही सांभाळू शकलो! नाही देऊ शकत मी तुम्हाला आई!या बापाचं एक पक्क लक्षात ठेवा.जिवनात पुढे जाऊन काही ही करा भीक मांगा,जीव द्या हवं तर ; पण कलेच्या नादी लागू नका. या गायकीनं मी तिच्या अपेक्षा नाही पुऱ्या करू शकलो.आयुष्यात गायकीच्या नादी लागू नको सदा!या बापाचे शब्द कोरून ठेव.एवढ्याशा जिवास काहीच कळेना.पण आपला बाप काही तरी बेंबीच्या देठापासून सांगतोय या संवेदना सदाच्या कोवळ्या मेंदूत, ह्रदयात चटका देऊ लागल्या.
रामोजीनं पहाटे पोरांना घेत निसरणी गाठली.सासरा सासुकडं पोरांना ठेवलं.रेवतीचं विचारताच फुटणारा बांध रोखत "मी मनमाडहून येतोय तो पावेतो ती ही येईल" इतकंच सांगत तोंड फिरवत तो निघाला.सदा मधा त्याच्या पायाला बिलगत "दादा,दादा नका ना जाऊ.....!तुम्हीपण आईसारखं सोडून जाऊ नकाना!"
त्या सरशी सासु-सासऱ्यांना समजेना काय झालंय.रेवती कुठं गेली,ते जावयाला विचारू लागले.
"पोरांनो मी मनमाडहून आजीला घेऊन आलोच उद्या"सांगत तो निघाला.पोरं आकांत मांडू लागली.मधा तर मातीतच लोळू लागला.दूर जाऊन रामोजीनं कसायानं नेणाऱ्या गायीनं आपल्या बछड्यांना वळून पहावं तसं एक वेळा पाहून घेतलं.त्याच्या डोळ्यात आसवामुळं व रेवतीच्या डागणीनं मुलं सामावलीच नाही.
मनमाडला आल्या आल्या आईला स्वत:च्या हातानं खिचडी बनवून आपल्या हातानं खाऊ घातली.आंधळ्या आईला पोराचं काही तरी गणित बिघडलंय हे जाणवलं.पण तरी ती प्रेमानं खाता खाता त्याच्या तोंडातही घास भरवू लागली.दोन तीन दिवसांपासून अन्नाचा कण पोटात नसलेल्या रामोजीनं 'शेवटाचा हा उपाय आता' समजून दोन घास खाल्ले.आईला जरा बाहेर जाऊन येतो सांगत तो रेल्वे पटरीकडं निघाला.
"रामोजी तू फक्त पिपाणी आहेस!नाही लावू शकत तू कदमांच्या साम्राज्याला आग!पण मृत्यूला तर कवेत घेऊ शकतो ना!नाही तिला परतवून मारू शकला तू!"
पटरीवर समोरून गाडी येऊ लागली.तो बाजूला चालू लागला.गाडी धावत येऊ लागली.त्यानं अदमास घेतला अंतराचा.नी पटरीत उडी घेत टक्कर दिली........हाडा मासांचा चिखल शिंपडत गाडी पुढे निघाली.त्याआधी खिचडीतील गरळानंही चोख परिणाम दाखवत म्हातारीला थकलेल्या लाथेच्या टाचा घासत मुलांसोबत पाठवलंच.
आजी-आजोबांनी दोन्ही नातवांना लगोलग मनमाडला नेलं. सदा मधाला ऊर बडवून बडवून ही रक्तमासांच्या चिखलात बाप दिसलाच नाही.त्याच चिखलास व आजीला सदानं चूड दिली.व नंतर काळोख्या कष्टाचा प्रवास करण्यासाठी तो निसरणीला परतला.आजी-आजोबांनी सारं नाशिक धुंडाळून ही रेवती भेटलीच नाही.रहमत मियाॅनं राव टूर्सचा पत्ता धुंडाळला पण अनेक धंदे असलेल्या शामजीनं ते फर्मच बंद करत आपल्या मूळ गावी परतला.
जावईचं दु:ख, रेवतीचं जाणं यानं खचलेला आजोबा नातवासाठी उभा राहिला.ट्रॅक्टरवर, थ्रेसरवर कामाला जाऊ लागला.कुट्टीमशीनवर कुट्टी करू लागला.तर कधी मुरूम मातीचं काम करत नातवांना शिकवू लागला.सुट्टीला सदा ही थ्रेसरवर कणसं ढकलण्यासाठी,धान्याच्या पाट्या उचलण्यासाठी जाऊ लागला. जिव तोडून शिकणं राबणं सुरू झालं.रात्रीच्या अंधारात आईचं झिडकारुन कुण्या दुसऱ्या माणसामागं जाणं आठवलं की डोळ्यात अंगार दाटू लागला.हा अंगार झेलत तो वाढू लागला.पण तरीही अंधाऱ्या रात्री कुण्या लग्नातला डिजे वाजू लागला की त्याच्या धमन्यातलं रक्त उसळू लागे.कधी कधी वडिलांनी रिकाम्या वेळेत गायलेल्या कव्वाली,शिकवलेलं आठवू लागे.सिहाच्या छाव्यास शिकार कशी करावी हे शिकवावं लागत नाही.तसचं डिजेत गाणाऱ्या गायकाचं गाणं त्याला कळू लागलं.त्याचे कान मिळेल ते संगित ऐकू लागले.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी सदा नाशिकला आला.वसतीगृहात राहू लागला.पण गावात केव्हाही सहज काम मिळे शिवाय खर्च कमी.आता त्याला आर्थिक नड भासू लागली.आजोबाचं वाढतं वय, मधाचं शिक्षण यानं सदाला घरून काहीच मदत मिळेना.सदाला काही तरी काम पाहणं आलंच.वसतीगृहामागे लग्नासाठी लागणारे मंडपवाले,केटर्स,बॅन्डवाले होते.बरीच वसतीगृहातली मुलं केटर्सवाल्याकडं वाढायला जात.मजुरी व भरपेट जेवण मिळे.सदाही जाऊ लागला.
रामोजीनंतर रहमतमियाॅच त्याचा आॅर्केस्टाचं व बॅन्डचं साहित्य घेऊन आलेला होता.पण गायक न मिळाल्याने व रहमत मिया थकल्याने अन्वर कसाबसा बॅन्ड चालवत होता.सदा वाढायला तर कधी मंडप उभारायला जाऊ लागला.यात अन्वरशी ओळख झाली.अन्वरच्या घरी पडलेलं साहित्य पाहुन सदाला अंधुकसं बालपण व बापाचा आॅर्केस्टा आठवला.रहयतमियाॅनं ओळख पटताच सदाला आधार दिला. सदा बॅन्ड मध्ये वाजवायला जाऊ लागला.वाजता वाजता गायकी ऐकू लागला.पण बापाचे शब्द आठवले की नड पुरतं ठिक पण या गायकी नकोच म्हणत गायनाकडं दुर्लक्ष करे.मात्र ऐकणं कायम सुरूच.अशाच एका ठिकाणी गायक आलाच नाही.म्हणून दुसऱ्याच मुलाला उभं केलं .पण नाचणारे बिथरले.त्यांनी हुल्लड करायला सुरुवात केली.अन्वरही नव्हता.रहमत मियावर लोक खेकसू लागले.रहमत मिया रडकुंडीला येत गयावया करू लागला.सदानं डिजेच्या गाडीत चढत जे येईल ते गायला प्रथमच सुरुवात केली. त्याचं गाणं ऐकताच बिथरलेली डोस्की शांत झाली. गाणं ऐकून रहमत चाट पडला.त्याला सदात रामोजी दिसू लागला.रामोजीनं आपली लाईन लावली.हा आपल्या अन्वर ला पुढे आणल्या शिवाय राहणार नाही.रहमत मियानं सदाला एक दोन गायकाकडं स्वखर्चानं पाठवलं.काॅलेज करत संध्याकाळी सदा गाणं शिकू लागला.पण दोन महिन्यातच शिकणारेच त्याची गायकी पाहत थक्क होत."मियाॅ इसको क्या गाना शिकायेंगे हम.इससेच हबको शिकना चाहिये!"म्हणत सदास त्यांनी मोकळं केलं. नंतर अन्वर मियाॅच्या बंदिस्त गाडीत कुणाला दिसणार नाही अशा रितीनं सदा दोन तीन कव्वाल्या गाऊ लागला.पण त्याच्या आग्रहाखातर अन्वरनं गायक कोण हे पडद्यातच ठेवे.व नवनविन शहरात सुपारी घेऊ लागला.मास्टर सुरीला या बदलत्या नावानं कधी कुणाला न दिसणाऱ्या गायक धूम मचवू लागला.त्याच्या कव्वाली साठी लोक अन्वरच्या डिजेला साठ-साठ हजार मोजू लागले.सदा काॅलेज करत लग्न सिजनमध्ये सात आठ तारखाच घेई.तो नसेल तर अन्वरच्या ब्राॅस बॅन्ड वा डिजे पार्टीला दहा वीस हजार ही मिळेनात.सदाला वडिलांचे शेवटच्या दिवसातले शब्द आठवले की नको ही गायकी वाटे पण मधा व आपलं शिक्षण आणि आजी आजोबांना आधार करिता गायकीचाच आधार वाटू लागला.शिवाय ज्या गायकीनं वडिलांना आपलं कुटुंब सावरता आलं नाही.त्याच गायकीवर आपण काही तरी करून दाखवूच अशी जिद्द त्याने बांधली.पण सदा म्हणून उजेडात न येता पडद्यामागं राहत तो मास्टर सुरीला म्हणुनच गाऊ लागला.
बारावी नंतर काॅलेज बदलली नी त्याची ओळख दत्ताशी झाली .त्या दिवसापासून त्याचं जिणंच बदललं.आईमुळं घृणामय व तिरस्काराच्या नजरा झेलणाऱ्या सदास दत्तारूपी जिवलग मित्र मिळाला.तो त्याला दोन वर्षं सिनीअर पण त्यांची गट्टी जमली.एकमेकाकडे घरी जाणं येणं वाढलं.दत्ताची परिस्थिती ही जेमतेम .अशावेळी सदाचं गाणं अन्वर प्रमाणं दत्तालाही मदत करू लागलं.लग्न सिजन मध्ये सात आठ लग्नाच्या तारखा त्यांचा सारा खर्च पुरा करे.पुढे सदानं एम.एस्सी.राहुरी विद्यापिठात केलं.तो पावेतो दत्ता थरवाडीत लागला ही.सदानं मधाला कम्प्युटर सायंसचं शिक्षण ही केलं. व मग नंतर थरवाडीत आला.
.
.
.असा सारा जीवनपट आहे सलिता मॅम.माझ्या कलंकात होरपळून झालं.म्हणून हात जोडतो उद्या थरवाडीत परततांना हे सर्व इथेच विसरा व पुर्ववत वागण्यातच आपलं भलं आहे.
निलगिरीच्या थंड वाऱ्यात त्रयोदशीचा चांद चांदणं फेकत पहाटपर्यंत फिका पडला होता. तरी प्राचीची नवतेज आभा क्षितीजाकडं नव्या उमेदीनं उगवायला सुरूवात झाली होती.त्याकडं कुडकुडत्या अंगानं बोट दाखवत सलितानं सदास बिलगत "सदा फिकट डागाळलेला चांद विसर सलिता रुपी प्राची तुझी वाट पाहतेय जी तुझं जिवन उजळल्या शिवाय राहणार नाही.त्या थंडीत बोटीत सलिताचा उष्ण श्वास त्यास उबेचा वाटला व तो विरघळला.पण सदाला कुठं माहित होतं की सलिता रूपी प्राचीची दुपारी असह्य चटके देणार होती........

क्रमश:
✒वासुदेव पाटील.