घावटी
भाग::--पाचवा
गाडी भर्रकन शिटीच्या आवाजाची हवा सोडत स्थानकात थांबली,तसा सदा विचार तंद्रीतनं ताडकन उठला.त्या आधीच नलू मॅडम व आजोबा सामान घेऊन तयारच होते.धावपळ करत उतरत ते स्थानकाबाहेर आले व बस-स्थानकातून तालुक्याची गाडी पकडली.गाडीत तुरळक गर्दी असल्यानं जागा मिळताच सदा पहिले पाढे पंचावन्न पुन्हा विचारात गुंगला.पण त्या आधी समोरच्या सहा आसनी बाकावर समोर तोंड करून आजोबाजवळ बसलेली नलू मॅडम सारखी आपल्याकडंच पाहत असल्याचं सदाच्या लक्षात आलं.या जर राहिल्या नसत्या तर दिड वर्षात आपण जगलोच नसतो.खिडकीतनं उतरत्या प्रहराची थंड हवा येऊ लागली.सदा झर्रकन समाधीस्त होत उटीत जाऊन पोहोचला.
सलिताला सारा काळवंडलेला पट सांगुनही ती माघार घेत नाही म्हटल्यावर शाहु नांगरटीचं उन्हात तापलेलं ढेकळ मृगाच्या पावसानं विरगळत मऊ लोण्यागत व्हावं तीच गत सदाची झाली.तो सलिताच्या मृदगंधात विरघळला.चार पाच दिवस उटीत राहत दोघे परतले ते एकजीव होऊनच.
दत्ता सरांना अमरावतीला तीनेक महिन्यासाठी पाठवतांना अप्पांनी त्यास पोटतिडकीनं खाजगीत सांगितलं होतं. "दत्ता अमरातीचा तिढा लवकर मिटवून ये मग लगेच सलिताशी तुझं उरकून टाकू.म्हणजे माझ्यापेक्षा तुझी मामीही खुश.कारण तुझ्या मामीनंच ती राजी असल्याचं तिला विचारलंय."यानं दत्ता खुशीतच अमरावती ला गेला होता.दत्ताला ही सलिता हवीच होती.कारण त्यानं दोघांमधला वाद आपोआप संपुष्टात येणार होता.
मात्र तीन महिन्यात सलितानं सदा बरोबरचे आपले संबंध साऱ्या थरवाडीत स्वत:हून जगजाहीर केले.सदाला आता दुसरं काहीच सुचेना.पगार सुरू नव्हता.अप्पाकडनं तुटपुंजं मानधन मिळे.गायन ही बंद तरी सलिता त्याला पैशाची उणीव भासूच देत नव्हती.हायस्कुलचे पाच ते सात याच वर्गांना अनुदान आलेलं.त्यामुळं तिचा पगार सुरु.बाकी प्राथमिक , हायस्कुलचे वरचे वर्ग व काॅलेज नविन धोरणाचा फटका बसल्यानं विना अनुदानाच्या भोवऱ्यात अडकलेले.नलू मॅडम सुरूवातीला पाच ते सात वर्गावर असल्यानं पगार सुरु होता.त्यांच्याकडं फक्त प्राथमिकची जबाबदारी दिलेली.
तीन महिन्यानंतर दत्ता खुशीत परतला.पण या ठिकाणी वेगळंच प्रकरण.दत्ता आल्या आल्या सदानं भेट घेतली.
"दत्ता तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे मित्रा!"सदा आनंदानं म्हणाला.
"सद्या मी पण आनंदाची बातमी देणार आहे तुला!"
"अरे व्वा,मग सांग तू आधी!"सदा अधिरपणानं उद्गारला.
"नको आधी तू काय सांगत होता ते सांग मग मी सांगतो नंतर" दत्तानं सांगितलं.
सदालाही मनातून आधी आपणच आपल्या जिवापाड मित्राला आधी सांगावं असंच वाटत होतं.
"दत्ता तुझी सलिता मॅडम...."सदा गोड हसू लागला.
"सद्या लेका नीट सांग लवकर!जीव टांगणीला लावू नकोस!"
सदानं उटीला काय काय घडलं व पुढचं सारं सांगताच दत्ताला काळजात कुणीतरी सुरा खुपसून गरगर फिरवतंय असंच वाटू लागलं.महा मुश्कीलीनं भावनावर ताबा ठेवत तोंडावर पांढरंफट्ट हसू आणत तो सदाचं अभिनंदन करू लागला.
"दत्ता तू काय आनंदाची बातमी देणार होता ते सांग ना आता!"सदा आनंदानं विचारू लागला.
"हेच सांगणार होतो मी.कालच सलितानं मला हेच सांगितलं असं."
दत्तानं सदाला कटवत बाहेर जाणंच पसंत केलं.
बाहेर पडल्यावर दत्ता टेकडीकडं चालत निघाला.त्यानं विचार केला.सदा लहानपणापासुन प्रेमासाठी पारखा आहे.नाही आईचं प्रेम मिळालं त्याला तर सखीचं तरी मिळेल.आपलं काय! नाही तरी जी आपल्याशी सतत वाद घालत पाण्यातच पाहत होती तर संसार काय सुखाचा केला असता.शिवाय ती आपल्याजवळ बोललीच नव्हती.अप्पांनी सांगितलं नी आपण वाऱ्यावर भारे बांधायला निघालो होतो.जाऊ द्या पण आपल्या सदाचा संसार फुलेल हेच महत्वाचं.सद्या लेका तुझ्यासाठी असल्या छप्पन सलितावर मी पाणी फेरेल यार! मावळतीकडं सूर्यास काळ्या काळ्या मेघांनी ग्रासायला सुरूवात केली होती.
चार पाच दिवसांनी दत्ता अप्पांना भेटायला गेला.दत्ताला पाहताच अप्पांना आपला चेहरा लपवासा वाटू लागला.आपल्या चुलत बहिणीचाच मुलगा हा.आपण शब्द दिला याला पण त्या सलितानं मावशीला सांगितलं काय नी केलं काय! आता या पोराला कोणत्या तोंडानं सांगावं!.दत्तला काय सांगावं यासाठी अप्पा शब्दांची जुळवाजुळव करू लागले.पण त्यांना कोंडी फोडता येईना.
"अप्पा!मी काय म्हणतो,इथं सलिता व सदा सांभाळतील.मी अमरावतीलाच जायचं म्हणतोय.कारण आपण इतका पैसा ओतलाय पण अनुदान अजुन तिन्हही युनिटला नाही.इथले काही वर्गांना सोडलं तर.म्हणून मी अमरावतीलाच राहत तिथं प्रयत्न करतो तरसदा व सलिता इथलं पाहतील."
दत्ता असलं काही सांगेल याची अप्पांनी कल्पनाच केली नव्हती.त्यांना वाटलं दत्ता सलिताच्या लग्नाबाबत आपण दिलेल्या शब्दाबाबत विषय छेडेल.पण उलट त्यामुळं दत्ता अमरावतीला जायचं म्हणतोय तर बरच आहे. अप्पा राजीनं तयार झाले.व दत्ताची बदली अमरावतीला केली.दत्ता निघाला त्या वेळेस सदानं त्याला भेटत परोपरीनं विनवलं
"दत्ता मला बोलवून तुच निघून चालला.अप्पांना सांगून बदली रद्द कर ना!इथं मी कसा राह?"
"सदा नोकरी आहे मित्रा!जावं तर लागेलच.आणि तु इथं आता एकटा कसा काय!सलिता आहे ना तुझी काळजी घ्यायला,"दत्तानं मनातला कढ दाबत हसण्यावारी नेत सदाला समजावलं.
"दत्ता मी इथं आलो ते सलिता होती म्हणून नाही तर तुझ्यामुळं!"
"सदा आता जावं तर लागेलच.मित्रा आता एक कर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सलिताशी लग्न कर.नी काही अडलं तर मला कळव"
दत्ता निघाला.सदा उदास झाला.
काही दिवसांनी सदा सलितात रममाण झाला.प्रेमाचे धुमारे फुटू लागले ,धुरळा उडु लागला.एक वर्ष काळ लोटला.आता दत्ता परत येणार नाही ही सलिताला खात्री झाली.शिवाय थरवाडीत एका व्यक्तीचाचंचू प्रवेश झाला.
थरवाडीला लागून बडवानी या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात आमदारकीस रावसाहेब कदम उभे राहिले.त्याच्या मतदार क्षेत्रातील वीस पंचवीस गावं थरवाडीला लागून होती. त्यांच्याशी नदीमुळं तिकडनं रस्ता नसल्यानं संपर्क हा थरवाडीकडूनच होई.रावसाहेबांनी या गावाच्या प्रचाराची जबाबदारी आपल्या पहिल्या पत्नीचा मुलगा 'विक्रांत कदम'यावर सोपवली.कारण पुढे त्यालाही जिल्हा परिषदेवर उभं करायचंच होतं त्याची रंगीत तालीम व्हावी म्हणून या वीस-पंचवीस गावाची प्रचारधुरा व तेथल्या मतदाराची सर्व खातीरदारी विक्रांतनं थरवाडीत राहून करण्याचं ठरलं.अप्पा विंचुर्णीकराचा फर्टिलायझरचा उद्योग होता तेव्हापासून रावसाहेब कदमाची अप्पांशी ओळख होती.थरवाडीत अप्पांची खाजगी संस्था म्हटल्यावर या संस्थेतच विक्रांतला थांबवून सुत्र हलवायचे रावसाहेबांनी नियोजन आखलं.
विक्रांत तरणाबांड, उंचपुरा,गौरवर्णीय .खादी कपड्यातला राजबिंडा विक्रांतच अंगावर सोन्याचे दागिने मढवत थरवाडीत प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी नाराजीनंच आला.नर्मदा काठा काठानं बार्जवर उन्हातानात फिरणं,नको त्या लोकांना पाया पडत विनवणं,कार्यकर्त्यांना जेवणखानं,पिणं हे सारं करणं त्याला नको होतं.पण सावत्र भाऊ व आई विरोधात वडिलांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यानं जबाबदारी उचलत थरवाडीत अप्पाच्या संस्थेत येत प्रचारास लागला.
सकाळीच कार्यकर्त्यांना घेत तो पाड्यापाड्यात जाऊ लागला.रात्री थरवाडीत त्यांना जेवण देऊ लागला.
सकाळी सकाळी गाडीत बसुन निघतांना त्याची नजर सलितावर पडली. त्यानं गाडी थांबवत एकाच्या कानात काही कुजबुजला व प्रचारास निघाला.पण दिवसभर त्याचं चित्त भिंगार पाखरासारखं सारखं भिरभिरू लागलं.संध्याकाळी तो लवकर परतला.सकाळच्या माणसानं येताच त्याला सारी माहिती दिली.त्यानं वडिलांना निरोप पाठवला.रावसाहेबांनी अप्पाची मदत मागितली.दुसऱ्या दिवसांपासून अप्पाच्या संस्थेची माणसं प्रचारात उतरली.
विक्रांतनं सलिता मॅडमांना आपल्या गाडीत घेतलं.सलितानं ठरवलं असतं तर नकार देऊ शकली असती.पण काल तिनं ही विक्रांतला पाहिलं नी पाहतच राहिली होती.उंचपुरा तगडा,राजसरुप पाहताच जिवनात तिची नजर प्रथमच कुण्या पुरुषासमोर खाली झुकली होती.एव्हाना ती कोणत्याही पुरूषाच्या नजरेज आपली खडी अशी रूतवे की पाहणारा लटापटा होत चालू लागे.पण काल विक्रातच्या खडीनं तिलाच जमीन पहायला लावलं होतं.म्हणुन तिला पुसटशी माहिती होती तरी दिवस भरात कार्यकर्त्याकडुन विक्रांतची तिनंही इत्यंभूत माहिती काढली होती .म्हणुन अप्पांच्या सुचना येताच व आज विक्रांतनं त्याच्या गाडीतच बसायला लावताच ती निघाली.
गाडी बार्जजवळ जाताच खाली उतरत सर्व बार्जवर निघाले.पण विक्रांत गेलाच नाही.
"प्रचाराला जायचं ना?मग बार्जवर का नाही गेलात?"सलितानं विचारलं.
"नाव काय तुझं?"
"प्रचाराचा व नावाचा काय संबंध?"खडीनं खडीत उतरत धुरळा उठवणारा प्रतिसवाल केला.
"प्रचाराचं काय!मी नाही गेलो तरी होईलच.पण ......"
"पण काय?"खडी खडीत खोल खोल उतरू लागली.
विक्रांतला जास्त प्रस्तावनेची गरज पडलीच नाही.एका तासातच गाडीतच विक्रांतनं राजकारणाचा फड नाही पण सलिताचा मनाचा फड जिंकला.
पुढचे आठ दिवस कार्यकर्तेच प्रचार करत राहिले.विक्रांत गेलाच नाही.तो व सलिता वेगळयाच निवडणूकीच्या फडात फिरले.सदा बिचारा अप्पांची सुचना म्हटल्यावर पाड्या पाड्यात फिरत राहिला.
निवडणूक संपली रावसाहेब कदम निवडून आले.सारा ताफा थरवाडी सोडून परतला.पण विक्रांतचं येणं-जाणं सुरु झालं.
मधा पुण्यात मोठ्या कंपनीत उच्च पदावर जाॅबला लागला.त्याच कंपनीत माधवी ही जाॅबला होती. दोघांचं सूत जमलं व त्यांनी लग्नाचं ठरवलं.मधानं सदाला निरोप पाठवत आजी- आजोबाकडं लग्नाचा विषय काढला.सदा मोठा असल्यानं आधी सदाचं मग मधाचं करू किंवा सोबतच करायचं आजोबांनी ठरवत सदासाठीही मुलगी पाहण्याचं ठरवलं.पण सदानंही सांगताच" तु ही मुलगी पाहिलीय तर लवकर ठरवा, दोघांचं एकसाथ उरकून टाकू!"
सदानं मधाला महिनाभर थांबायला लावत थरवाडीत परतला.
होळी जवळ येऊ लागली तशी होळीची थरवाडीत धूम उडू लागली. दोन दिवसावर होळी आली.सदानं रात्री जेवण करत सलिताला टेकडीकडं फिरायला बोलवलं.आकाशात पूर्ण गोलाई धारण करू पाहणारा चांद डोंगराआडून वर सरकत होता.पाडा मागं पडून घरं विरळ होऊ लागताच सदा चालता चालता सलिताचा हात हातात घेऊ लागला.पण आज सलिताचा हात हातात येतांना ओढ जाणवली नाही.
टेकडीवर चांदण्यात भल्या मोठ्या दगडावर दोघं बसली.सदानं लाडीकतेनं नेहमीप्रमाणं तिच्या मांडीवर डोकं ठेवत नभातल्या चांदाकडं पाहू लागला.आज त्याला चांदातला काळा डाग प्रकर्षणानं जाणवू लागला.पण त्यानं तिकडं पाहणं टाळलं.
"सले!घरी गेलो होतो!लहान भावाचंही लग्न ठरल्यासारखंच आहे!म्हणून आपलं व त्याचं दोन्ही सोबतच करायचं आजोबा सांगत आहेत"
तोच सलितानं त्याला उठवत ताडकन उठली.
"का गं काय झालं बिचकून उठायला?"उभं राहत सदानं विचारलं.
"काही नाही रे!मांडीखालून काही तरी गेलं."
"विंचूकाटा असेल,उन्हाळ्याचं निघतात या वेळेस!"सदानं पुष्टी जोडली.
"सदा चल परतू या! भिती वाटतेय!"सलिता संधी साधत म्हणाली.
सदाचा हिरमोड झाला.परततांना सदानं पुन्हा सुरूवात केली.
"सलिता! घरात मी मोठा असल्यानं आधी आपलंच किंवा सोबत तरी करावं लागेल. म्हणुन तू आता घरात लवकर विचार म्हणजे मी आजी आजोबांना बोलवून घेईन."
सदानं पुन्हा तोच विषय काढला.
"बघू ना,काय घाई एवढी!"त्रोटकपणे बोलत सलिता टाळू लागली.
"तसं नाही सले.मला काहीच घाई नाही पण मधा माधवी थांबणार नाही व माझ्या आधी त्याचं उरकणं रितीला धरून होणार नाही.म्हणून तू घरी लवकर विचार".
पाडा आला नी सलितानं सुटकेचा श्वास टाकला.
रात्री सलिता नलूजवळ झोपतांना विक्रांतच्या विचारात गुंतली.पण उशीरानं सदाला काय नी कसं सांगावं पेक्षा कसं टाळावं याचाही विचार करू लागली.
"सदाजीराव शिंदे!ही सलिता तुमच्यावर प्रेम करण्या इतपत भोळी मनीमाऊ वाटली का आपणास?ही मनीमाऊ दत्ता, सदाला खेळवत होती हो!दत्ता अप्पाच्या विश्वासातला.त्याला बाजूला काढायचं होतं मला.नी नेमके तुम्ही टपकलात 'फेव्हीकाॅल का मजबूत जोड'होऊन मित्रप्रेम दाखवायला.तुमची हुशारी अप्पाला वळवत होती.मग मी तुम्हालाच वापरायचं ठरवलं.केला वापर तुमचा.तुम्ही उंदरासारखं अलगद अडकलात.तुमचा उंदीर अन दत्ताचा पोपट केलाय या मनीमाऊनं."
सलिता मनातल्या मनात हसू लागली.
तोच पुन्हा तिला विक्रांत आठवला.
"दत्ताला कटवल्यावर आपण सदाला खेळवत ठेवलं असतं आपल्या मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत.पण लगेच विक्रांत भेटला नी खरच आपल्याला जिवनात पहिल्यांदाच मनात कुणाविषयी चलबिचल व भवरी उठली.पण ती जरी उठली नसती तरी त्याची श्रीमंती,ऐश्वर्य उपयोगात आणून जिवनात पुढे जाण्यासाठी त्यालाही उंदरासारखं खेळवलंच असतं"ती पुन्हा हसली.
आता तिचं विक्रांत सोबत फिरणं वाढलं.
निसरणीला सदा व सलिताबाबत कळताच आजोबा व आजी एकवेळ मुलगी पाहू व पटली तर घरच्याची भेट घेत पक्कं करू म्हणून सदाला विचारून थरवाडीस आले.
सदाच्या खोलीवर आले तेव्हा सलिता विक्रांतसोबत बडवानीला न सांगता गेलेली.विक्रांतनं रावसाहेब व रेवती आईशी तिची भेट घडवून आणली.दोघांना ती अप्पा विंचुर्णीकरांची भाची म्हटल्यावर व सुस्वरुप असल्यानं आवडलीच.
आजी आजोबांना जेवण नलू मॅडमानंच केलं.सलिता चार दिवस आलीच नाही.सदाला वाटलं सलिता घरी विचारण्यासाठीच गेलीय.तो वाट पाहू लागला.नलू आजी आजोबांची सर्व सोय पाहू लागली.आजीला नलूचा स्वभाव वागणं खूप आवडलं.
सलिता आली.सदानं 'तिला आजी आजोबा आलेत तुला पहायला'म्हणून हसतच सांगितलं.
"अरे व्वा!मग पहावं त्यांनी मला वरून खालून!"ती म्हणाली.
"सले मस्करी सोड!जुन्या चालीरितीची आहेत ती.त्यांच्यासमोर व्यवस्थित वाग."
आजी आजोबांनी सलिताला पाहताच पसंद केलं.पण तरी आजीला मनाच्या तळाशी कुठं तरी नलूच आवडली होती.व पुसटसं सदानं नलूलाच निवडावं वाटत होतं.
सदानं सलिताला "आजी आजोबांना तु आवडली आहेस घरच्यांना कळव म्हणजे मग आम्ही येतो "सांगितलं.
"अरे सदा थांब आठ दिवसात आई वडीलच येणार आहेत इकडे"सांगत आणखी खेळवलं.
आठ दिवसात रावसाहेब व रेवतीचं अप्पा व सलिताच्या आई-वडिलांशी बोलणं झालं.आई वडिलांनी थरवाडीत यावं व इकडून कदम कुटुंबानेही थरवाडीत यावं असं ठरलं.अप्पाला आधी कळालं तेव्हा त्यांनी सलिताची आधी कान उघडणी केली.
"सले काय चालवलं हे!प्रेम म्हणजे खेळ वाटला का तुला?आधी दत्ता,मग सदा,नी आता विक्रांत?ती पोरं होरपळताहेत नी तू?"
"अप्पा दत्ताचं मी म्हटलंच नव्हतं.मावशीच भाचा भाचा म्हणत होती.सदाचं म्हटलं तर तो एक साधा कर्मचारी.संस्थेत अशांना हाताशी धरायचं असतं ना की प्रेम!"
"नी मग विक्रांत गं!"अप्पानी तिचा गळ काढला.
"अप्पा,तुमच्या संस्था माझ्या ताब्यात द्या याच्या मदतीनं एका वर्षात अनुदान आणते बघा तुम्ही!होणारे सासरे आमदार आहेत,ते केव्हा कामाला येतील!"
अप्पांनी सलिताची महत्वाकांक्षा पाहिली.वाढत्या वयात हिला समजावणं कठीण.शिवाय आपण पैसा ओतून संस्था उभारली पण अनुदान नाही आणू शकलो.आपलं नाव झालं पण राबणाऱ्यांच्या पोटाचं काय?रावसाहेब आमदारांनी अनुदान आणलं तर चांगलंच.म्हणून सदा विषयी किव वाटूनही त्यांनी नाईलाजानं होकार दिला.
आठ दिवसांनी आई वडील आले.सदा आजी आजोबांना घेऊन काॅलेजात गेला.नलू मॅमला महिन्यात बदललेलं वारं समजलं होतं.पण कसं नी काय सांगावं?शिवाय सलिता नेमकी काय करणार हे पत्तं उलघडत नसल्यानं ती ही शांत होती.
सदा काॅलेजात प्रवेशीत झाला त्याच वेळेला रेवती,रावसाहेब विक्रांतसोबत गाडीतून उतरत होते.रेवतीला पाहताच सदाला हा चेहरा धुंदला धुंदलासा ओळखीचा वाटू लागला.पण कुठं पाहिलाय नी कोण हे आठवेना.रेवतीचं लक्ष जाताच जवळपास वीसेक वर्षाचं अंतराळ व बदललेला सदा ओळख राहिलच कशी.पण आजी-आजोबांनी रेवतीला व रेवतीनं आई-वडिलांना ओळखलं.नजरानजर होताच आग उसळली.पण रेवतीनं डोळ्यावर काळा गाॅगल्स चढवत ओळखच नाही या अविर्भावात पुढं निघाली.आजी-आजोबांनी पोराच्या चांगल्या कामात घोळ नको म्हणून आग तशीच दाबत शांत झाले.पण तरी इटक्या वर्षात ही इथं कशी?हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला.
आजी-आजोबा वाट पाहत एक तास थांबले पण ना सलिता खाली येत होती ना आई -वडील.
सदा तिला भेटून विचारायला वर गेला तर हिरवी पैठणी नेसून बसलेली.आजूबाजूला गर्दी.
साऱ्यासमोर कसं विचारावं त्याला कळेना.विक्रांत कदम व रावसाहेब कदम प्रचारापासून ओळखीचे पण बाकी बरेच नवीन.शिवाय अप्पाही हजर.नेमकं काय चाललंय त्याला कळेना.त्याचा गोंधळ उडाला.तो त्याच स्थितीत तिथं उभा राहिला.सलिता पाटावर बसली.सुवासिनीने ओटी भरली. व नंतर विक्रांत नं रिंग....
सदाला कोडं उलगडलं...
तो कडाडला.
"सले !हा काय प्रकार चालवलाय?"
तोच आजी आजोबाही वर आले.
सलिता काहीच बोलेना.तिनं मात्र विक्रांतला याविषयी सांगितलं असावं .
म्हणुन विक्रांतच बोलला.
"मी सांगतोय ,सलिता व माझा वाङनिश्चय होतोय.दुसरं काहीच नाही."
सदा बेफाम संतापला.
"सले मला तुझ्याकडून ऐकायचंय"सदा नजरेत अंगार फुलवत म्हणाला.
"पोरी माझ्या नातवाशी तू लग्न करणार आहेस मग आणखी हा काय प्रकार?"आजोबा थरथरतच सलिताला काकुळतीनं विचारू लागला.
रेवतीच्या लक्षात आलं..ती सदाकडं पाहू लागली.ती सदात लहान्या सदा ची छबी आठवून पडताळू लागली.ओळख जुळू लागली.ती रावसाहेब कदमाच्या कानात काही कुजबुजली.कदमाचं पित्त ते ऐकून खवळलं.एकंदरीत रामोजीचं बेणं इतक्या वर्षात आपल्यासमोर दिसताच त्यांचा राग अनावर झाला.
"अप्पासाहेब काय चाललंय हे?आम्ही परतायचं का?असला अपमान नाही सहन होणार आम्हास!"
ते गरजले.
"सले सांग तूच!"
सलितानं उठत विक्रांतच्या बोटात अंगठी घातली .
सदा ते पाहून काय ते समजला.
"सले !काय मिळालं मला उध्वस्त करून!जन्मजात वैऱ्याच्या टोळीत तुही सामिल झालीस?"
आजी आजोबा रेवतीकडं पाहत कडाडले.
"पोटच्या पोराचाही संसार सुरू होण्याआधीच मोडला तू?आमच्या कुळाचा उद्धार केलास तू!व्वा!"
अप्पा झाल्या प्रकाराने सुन्न झाले.
सदाला सलिता व आई या दुहेरी धोख्याच्या धक्क्यानं गरगरू लागलं.रावसाहेब रेवतीनं आता तर माघार नाहीच या निश्चयानं पुढचं कार्य उरकलं.नलूनं आजी-आजोबांना सावरत घरी आणलं.सदा ढासळला,कोसळला.काळ्या डागानं घास घेतला आपला हे दु:ख करावं की सलिताचं?यासाठी तो नशेच्या काल कोठडीकडे वळला.....
आजी-आजोबानं मधाला बोलवलं.त्यानं ऐकून भावाला सावरण्या ऐवजी माधवीचं ऐकून परस्पर लग्न उरकवलं. सदावर घावाची मालिकाच कोसळू लागली.रेवती व राव कदमांनी मुद्दाम लग्न थरवाडीतच ठेवलं.हा सोहळा पाहावा लागू नये म्हणून सदा निसरणीला परतला पण तिथंही मधा माधवीनं सावरलं नाही.
.
.
क्रमश:

✒ वासुदेव पाटील.