घावटी
भाग::-- सहावा
तालुक्याच्या एस टी.स्टॅण्डवर गाडी उलटी लावत ड्रायव्हर उतरला तशी सदाची समाधी पुन्हा भंग पावली.सारे उतरत थरवाडीकडं जाणारी जीप शोधू लागले.जीप भरायला अवकाश असल्यानं नलू मॅडमनं जागा ठेवायला लावत समोरच्या अन्नपूर्णा खानावळात आजोबा सोबत सदालाही चाऊ माऊ करायला लावलं.पोटातले कावळे शांत होताच सदाला तरतरी वाटू लागली.
जीप भरताच थरवाडीकडं निघाली. पुन्हा सोकावल्यासारखा सदानं स्वत:ला विचारात गाडून घेतलं.
निसरणीला लग्नानंतर मधा-माधवी दोन महिने रजा घेऊन आले होते. सलिताचं लग्न पाहणं नको व उन्हाळी सुट्या यानं सदा निसरणीला परतला.चार पाच दिवस शांततेत गेले.पण दररोज सकाळी उठून पिणं यानं माधवी घर डोक्यावर घेऊ लागली.नवी नवरीचं असली रूप लवकर उघडं पडलं.तिला वाटलं ,मधाच कमवून या साऱ्यांना पोसतोय. ती छोट्या छोट्या कारणांवरून भांडण उकरी.सदाला तर जेवणाचा ताट जोरात ठेवणं, आडपडद्यानं घालून पाडून बोलणं सुरू झालं.पण सदाचं दु:ख वेगळं असल्यानं व दारू यामुळं सदा दुलर्क्ष करी.मुकाट्यानं आजीकडून मिळेल ते दोन चार घास गिळे व बाहेर पडे.पण तरी पंधरा दिवसात सळो की पळो करुन टाकलं.शेवटी कंटाळून सदा थरवाडीत परतला.
रुमवर तर पिणं खूपच वाढलं.नलू मॅडम जेवणाचं ताट व उपदेशाचे डोस न चुकता पुरवू लागली.मध्यंतरी सुटीत लग्न होताच विक्रांत व सलितानं अप्पाची भेट घेत रावसाहेब आपल्या तिन्ही संस्थाचं अनुदानाचं काम करून देतील नाव तुमचंच चालेल.फक्त सर्व संस्था सलिताच्या नावावर(कारभार) करण्याची अट घातली.अप्पा काय ते समजले.एवढा पैसा ओतून ही केवळ आपल्या नावाचीच पाटी राहिल.पण असंही वय थकत चाललं.आपल्यानंतर हीच मालकीण .मग अनुदान मिळत असेल तर कारभार जातोय तर जाऊ देत.पण निदान सलितानं आपण आहोत तोपावेतो तरी थांबायला हवं होतं; याचं त्यांना दु:खं झालंच.अप्पांनी अमरावतीची संस्था दत्ताकडंच ठेवली व दोन्ही संस्था सलिताच्या नावावर केल्या. तद्नंतर पुढच्या पंधरा दिवसात अप्पांनी जगाचाच निरोप घेतला.सलिता व विक्रांतला आयतंच मोकळं रान मिळालं.रावसाहेब कदमांनी केवळ शिक्षीका असुन सलिताला होकार देण्यामागं ही हेच कारण होतं.
विक्रांत हा पहिल्या पत्नीचा मुलगा असल्यानं रेवती व त्याचं जमेचना.रावसाहेब तर रेवतीत अडकलेले.म्हणुन विक्रांतचं अलग साम्राज्य करुन द्यावं म्हणून त्यांना अप्पासाहेबांच्या तिन्ही संस्था हव्या होत्या.
काॅलेज उघडलं.सदाला पहिल्याच दिवशी 'आपली वर्तणूक सहकारी महिला शिक्षीकेंशी बदफैली प्रकाराची' म्हणून.....हातात कागद मिळताच सदानं तो पुढे न वाचताच फाडून सलिताच्या हळद उतरू पाहत असलेल्या चेहऱ्यावर फेकला.सलिता संतापून काही बोलणार तोच विक्रांत पुढे होत तणफणला."सलिता कशाला असल्या तीनपट लोकांच्या नादी लागायचं.तो आधीच अर्धमेला झालाय.आता आपल्याला काहीच करायची गरज नाही तोच वडिलांचा आदर्श घेत आपोआप 'गाडी' पाहील.थरवाडीतलेच काय पण या जगातलेच त्याचे दिवस भरलेत"
सदा आपल्या वडिलांचा असा नामोल्लेख होताच बिथरला.सरळ बेडवाई पाड्यातल्या सिंगा सरदाराच्या भट्टीत तो रमला.दिड वर्ष तो कसा जगला त्याला काहीच कळलं नाही.
.

जीप थरवाडीची वळणं घेऊन गावात उभी राहिली.बाहेर सर्वत्र अंधार असल्यानं सदाच्या डोळ्याला लागलेल्या धारा कुणाला दिसल्या नाहीत.नलूनं आजोबाला आधार देत उतरवलं.सदा खाली उतरला.त्यानं मनातल्या मनात आराधना केली.
"हे अलक्षा!नियतीनं लहानपणापासून माझ्यावर अन्याय केलाय.माझ्या आपल्यांनी छळलं,माझंही चुकलं असेल पण या थरवाडीत आता सदा पुन्हा नविन रुपात आलाय.यश दे! दुसरं काहीच नको."
त्याला उभं पाहतांना नलू समजली.तिनं माघारी फिरत त्याचा हात हातात घेत मूकपणे 'मी तुझ्या साथीत आहे. तू एकटा नाहीस,एकटी तर मी होते!'मनात म्हणाली.तिचा मऊ मुलायम रेशीमस्पर्शानं तो उटीला शहारला तसाच शहारला.पण या स्पर्शात त्याला सर्वस्वाच्या निर्मोही दानाची अनुभुती झाली.
रात्री नलू पडल्या पडल्या विचारात गुंतली.या कुटुंबानं आपल्याला काहीच केलं नाही पण तरी आपण यांच्यासाठी कोणतंही नातं नसतांना का बिलगतो एवढं.की गतजन्माची ऋणानुबंधाची गाठ असावी?की सदा....? आता जीपमधून उतरतांना त्याचा हात पकडतांना किती आश्वासकपणा आपण दाखवला!नी त्यानं ही त्यास किती पावित्र्यमय ,मंगलमय प्रतिसाद द्यावा!वासनेचा कुठलाही लवलेश नाही.आजी गेली त्या आधी काही दिवस रात्री नशेत चूर सदा सलिता समजून बिलगला पण तरी त्यात ओरबाडणं नव्हतं तर समर्पणानं विरणं होतं! आपण विरलो नाही तो भाग अलविदा होता.पण आता आपल्यालाही हे टाळणं शक्य नाही.पण आपण आहोत का सलिताची जागा घेणारे?"
नलूला आपण कोण?आपला धर्म कोणता?आपली जात कोणती?काहीच ठावठिकाणा माहीत नाही.ती मागेमागे सरकू लागली व आपलं अस्तीत्व शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न सदाला मिळवण्यासाठी करू लागली.
कोठून सुरुवात करावी? केशव गुरुजीचं नगरपट्ट्यातलं गाव?की घाटातलं आपलं गाव शेवरी?की गुजरातमधील गणदेवी ऊस फॅक्टरी?....
.
.
.
शेवरी गावातील मारत्या चव्हाण व कमली आपली बैलगाडी घेऊन नवसारी जवळ गणदेवी फॅक्टरीत टोळीबरोबर ऊस तोडायला गेलेले.पौष महिन्याची थंडी जीव घेत होती.ऐन पंचविशीतली कमली धन्याबरोबर राबत होती,पौषी थंडी पित होती पण पोट काही पिकेना! मनात सल होती तरी मारत्याच्या साथीत उभी होती.पहाटेच उठून रांधत फडावर जाणं,ऊस तोडणं,बांडी विकून परतणं, ऊस फॅक्टरीत टाकणं उशीरा जेवणं ,असं रहाटगाडगं सुरु.एक दिवस फड फॅक्टरीपासून लांब असल्यानं परतायला रात्र होऊ लागली. मारत्या भरलेली गाडी ओलकट शेतातून काढत होता.शेत निघेपर्यंत कमळी पायी चालत होती,बैलांना खालूनच मायेनं दमकावत होती. आजुबाजुला डोक्यापार वाढलेले ऊसाचे फड.नविन मुलूख.पण रानात खेटणारी माणसं भिऊन कसं पोट भरेल.रस्ता लागायला दोन तीन नंबर बाकी.तोच मागं चालणाऱ्या कमलीला फडातुन पोर रडल्याचा आवाज येऊ लागला.तिनं मारत्याला सांगताच "मुकाट्यानं चल उगीमुगी, कोल्हं- बिल्हं असेल". रात्र व नविन मुलूखाची जागा.काही जागा खंतड असतात म्हणून काही लचांड नको म्हणून मारत्या दुर्लक्ष करत होता.पण रडका क्षीण आवाज वाढू लागला तशी पोटी संतान नसलेली कमला विरघळली व अंधारात आवाजाच्या दिशेन फडात जाऊ लागली.झक मारून मारत्या गाडी थांबवत उतरला व कमळी मागोमाग फडात शिरला.फडात बांधापासून आठ दहा फुटावरच दोन अडिच वर्षाची उघडी नाघडी पोर केवळ गोधडीत गुंडाळलेली होती.पोर थंडीनं, भुकेनं अधमेली होऊन क्षीणपणे रडत होती.कमळीनं ही कुणाची?इथं कशी?कोणी ठेवली काहीच मागचा पुढचा विचार न करता तिला उचलून गाडीकडं आणलं.मायेची छाती मिळताच पोर शांत होत कमलीला बिलगली.साऱ्या तांड्यात कमलीला पोर सापडली म्हणून रात्रीच बोंबाबोंब झाली.चर्चेला ऊत आला.पण परिसरातूनही कोणीच आलं नाही.सारे समजून चुकले की टाकणाऱ्यांना ती नको असावी.मात्र कमली मारत्याला तर ती हवीच होती.टाकणाऱ्यानं तिच्या अंगावर कपडे ही ठेवले नसल्यानं जात, पात, धर्म याचा पत्ताच नव्हता व कमलीस त्याचं सोयर सुतक ही नव्हतं.नकोशी असणाऱ्या पोरीचं तांड्यानं नकोशी ऐवजी नलू नामकरण केलं.नलू मारत्या व कमलीची लेक म्हणून वाढू लागली.मारत्या व कमलीचं ही जगात कुणीच व काहीच नव्हतं.दरवर्षी ते नलूला घेत ऊस तोडायला जाऊ लागले.पण गणदेवीकडे जायचं त्यांनी टाळलंच.कमलीला भिती वाटे की न जाणो पोरीचे आई-वडील पुन्हा आले तर.म्हणून ते त्याऐवजी नगर ,नाशिक पट्ट्यात ऊस तोडायला जाऊ लागले.नलू सात वर्षाची झाली.नगरपट्टृयात जवळच्या वाडीतल्या केशव(दिना)गुरुजींची तांड्यावर साखरशाळेत नियुक्ती झाली.त्यांची नजर सात वर्षाच्या नलूवर पडली.नलूचं तर शेवरीलाही नाव दाखल नव्हतं.त्यांनी मारत्यास नाव दाखल करावयास लावलं.नलू साखरशाळेत पहिलीत दाखल झाली. एक महिना झाला.चुणचुणीत नलू गुरुजीची आवडती झाली.पण पुन्हा नलूचं दैव फिरलं.मारत्या कमली पहाटे अंधारातच नलूचं जेवण करून ऊस तोडायला निघाले.
"नले सुरजी आजी अंघोळ करून देईन.वेळेवर शाळेत जा.दुपारी जेवण कर"गाढ झोपेतल्या नलूला कमली दररोजप्रमाणे मायेनं निर्वाणीचं सांगत होती. तिला माहित होतं नलू घोरतेय पण तरी पोट न पिकलेल्या मातेची पोरक्या लेकरूवरची अखेरची माया बोलत होती.कमलीनं झोपलेल्या नलूचे पटापट पापे घेतले.
"कमले झोपेतल्या पोराचे पापे घ्यायचे नसतात गं!माहीत नाही का तुला!दामा मेटेची म्हातारी सुरजी कमलीच्या झोपडीतच झोपे,ती कमलीला दटावू लागली.
कमली व मारत्या पहाटेच हायवेनं फडाकडं बैलगाडीनं निघाले.पुर्वेला तांबडं फुटायला अवधी होता.बैलगाडी इतर बैलगाड्यांपेक्षा बरीच पुढे निघाली.इतर गाड्या व मारत्याच्या बैलगाडीत अंतर होतं.गाड्या सुसाट धावत होत्या मोठ्या ट्राॅल्याला ओव्हरटेक करतांना ट्रकवाल्यास समोरच्या ट्रकच्या उजेडात साईडनं चालणारी मारत्याची गाडी दिसली पण तो पावेतो उशीर झाला होता.बैलासहित गाडी भरधाव ट्रक चेंडूसारखी हवेत उडवत जीव वाचवत पसार झाला.कमली मारत्याच्या हाडामासाच्या चिखलात बैलांच रक्त झिरत सकाळपावेतो थिजलं.कमळीच्या काळजास नलूसाठी धडधडायलाही अवधी मिळाला नाही.जागेवरच खेळ खल्लास.नलू झोपेतून उठताच काय झालं ते न कळताही मातलेल्या हुल्लड ,आक्रोशानं सुरजी आजीला बिलगू लागली.हाडामासाचा चिखल गावावर कसा न्यायचा व कुणासाठी न्यायचा?असा विचार करत सोबत्यांनी तिथंच मुठ माती दिली.नलूच्या कोऱ्या सातबाऱ्यावर मारत्या काहीच देऊन गेला नाही पण साखरशाळेतल्या दाखल्यावर नाव मात्र आयुष्यभरासाठी देऊन गेला.
नलू सुरजी आजीकडं- दामा मेटेकडं राहू लागली.पण जो दामा मेटे स्वत:च्या आईला वागायला का- कू करत होता तो या आई बापाचा पत्ता नसलेल्या पोरीला कसा वागवेल.पंधरा दिवसातच त्यानं म्हातारीला तंबी दिली. नलू तांड्यातच रडत कुडत फिरू लागली.पट्टा पडला तांडा शेवरीकडं परतण्यासाठी तयारी करू लागला.पण सुरजी आजीला नलूला सोडायचं कुठं हा प्रश्न पडला.आजीला एक धुगधुगती आशा दिसली.आजीनं नलूला घेतलं व साखरशाळा गाठली.पट्टा पडला म्हणून केशव गुरूजीही शाळा बंद करत मुळच्या शाळेवर परतायची तयारी करत होते.आजीनं नलूला पुढे केलं.अंगावर व चेहऱ्यावर रया नसलेली नलू भेसूर चेहऱ्यानं खालमानेनं गुरुजीसमोर उभी राहिली.
"गुरुजी निमावतं पाखरू आहे.काहीही करा तुमच्या ओळखीनं कुणाच्या तरी पदरात घाला .तांडा गावाकडं चालला पण कुणीच कवेत घ्यायला तयार नाही.पोरीला कुत्र्यागत सुनं कसं सोडू?"सुरजी आजी दिलाच्या देठातून कारोण्या करू लागली.
गुरुजी स्तब्ध झाले.मारत्या गेला त्यानंतर नलू शाळेत येणं बंद झाल्यावर त्यांनी तांड्यातल्या दोन तीन लोकांकडं चौकशी केली तेव्हाच 'खायचे रहायचे जिथं वांधे, तिथं पोरीच्या शाळेचं काय घेऊन बसलात मास्तर!' गुरुजींना सुनावलं गेलं.हे ऐकून त्यांनी घरी विषय काढला होता.पण गडगंज श्रीमंती असुनही घरातून त्यांना स्पष्ट विरोध झाला होता.
"दुनियेत दररोज किती तरी पोरं अनाथ होतात.मग साऱ्यांनाच घरात आणून घरातच अनाथालय खोलणार का?मुळीच नाही.ही असली रिकामी ब्याद घरात नाही खपवणार मी".बाईनं गुरुजीला उडवून लावलं होतं.म्हणुन चुणचुणीत पोरीबाबत दयेचा सागर काळजात उचंबळत असतांनाही गुरूजीनं माघार घेतली होती.पण आता तर तांडा ही तिला टाकून जाणार तर मग पोरीचं काय? गुरुजी गलबलून मनात काही ठरवू लागले.
"आजे आजच्या दिवस पोरीला सांभाळ,पाहतो मी काय करायचं ते"सांगत गुरुजी निघाले.
दुसऱ्या दिवशी तांडा जात असतांना गुरुजीनं मायेनं नलूला सोबत नेलं. नलू गुरुजीसोबत जातांना मागे वळून वळून जाणाऱ्या तांड्यात कमलीला शोधत होती.पण तिला मागे जाणारी सुरजी आजी व पुढे हातात हात धरून चालणारे केशव गुरूजी शिवाय कोणीच दिसत नव्हतं.
गुरुजीनं मळ्यात राबणाऱ्या लखमनच्या खोपटात नलूची व्यवस्था केली.बदल्यात लखमनला गुरुजीकडून हवे तेव्हा हवे तेवढे पैसे मिळू लागले. लखमनकडे राहण्याची व्यवस्था लावत आपल्याच शाळेत गुरुजी नलूला शिकवू लागले.
पोटच्या लेकीप्रमाणं नलूला वाढवत गुरुजीनं नलूला सातवीपर्यंत नेल्यावर घरचा विरोध मावळला नी मग नलूला गुरुजीच्या घरात प्रवेश मिळाला.घरची कामं करत नलूचं शिक्षण झालं.नी गुरुजीनंच ओळखीनं अप्पाच्या संस्थेत लावलं.
गुरूजी थकले.बाई गेल्या.मुलं-मुली परदेशात स्थायिक झाले.आई गेल्यावर गुरुजींनाही परदेशातच घेऊन गेले.पुन्हा नलूचा बाप दुरावला पण तो पावेतो नलूला स्वत:च्या पायावर उभं करून गेला.
..नलूची उशी ओलिचिंब झाली.तोच आजोबा पाणी पिण्यासाठी उठले असावेत.नलूची हालचाल त्यांना जाणवली असावी.त्यांनी पायातीला पडलेली चादर नलूच्या अंगावर टाकताच मायेची ऊब मिळताच नलू निद्रादेवीच्या अधीन झाली.
दोन-तीन दिवसात अमरावतीहून दत्ता परतला.
दत्ता, सदा व नलू यांनी संगनमतानं पुढच्या प्रवासाची आखणी केली ज्यात थरवाडीत नव्या अध्यायाच्या ओनाम्याचा बिगुल वाजणार होता.

क्रमशः
✒ वासुदेव पाटील.