" चिंगळ्या " (काल्पनिक )
हि कथा आहे माझ्या आवडत्या कोयना या गावची.. कोयना म्हणले कि आपल्यासमोर येते ते कोयना धरण.. तिथला निसर्ग, घनदाट जंगल , मोठीच्या मोठी यशवंत राव चव्हाण साहेबांच्या नावाची बाग आणि त्या बागेतून विस्तृत असे दिसणारे कोयना धरण, रम्य परिसर लाल माती, आणि प्रसिद्ध असा नवजा धबधबा समोर येतो. फेसाळणारा पांढराशुभ्र धबधबा... बाजूने घनदाट जंगल.. कोण कोणते प्राणी आहेत याचे जागोजागी फलक.. आणि तो अरुंद निसरडा रस्ता... आपले रक्त शोषून घेणाऱ्या जळू किड्याची भीती.. आणि समोरून खुप उंचावरून पडणाऱ्या त्या फेसाळलेल्या पाण्याच्या धारा हे बघून मन किती तृप्त होते शब्दात सांगणे कठीण... आपण प्रत्येकाने कोठे ना कोठे कोणत्या ना कोणत्या धबधब्याखाली केलेली मस्ती प्रत्येकाच्याच लक्षात असेल पण कोयना धरण आणि नवजाचा धबधबा येथे केलेली मस्ती याची बातच वेगळी .. कोठेही फिरा पण आमच्या कोयनेला आणि नवजाला भेट दया असे तेथील कित्येक लोकं म्हणतात ते उगच नाही . त्या भागात गेले कि पुलावरच सगळ्या प्रकारचे विक्री साठी आलेले मासे बघायचे आणि तोंडाला पाणी सुटले कि कोणत्याही मस्त पैकी हॉटेल मध्ये जाऊन मासे खायचे त्याची चवच वेगळी.. कोणत्याही खाऱ्या पाण्याच्या माशाला जेवढी चव नसेल त्याच्या पेक्षा जास्त चवीचा मासा तुम्हाला कोयना धरणातील माश्यातील मिळणार असे मला कधी कधी इतर ठिकाणचे मासे खाताना वाटायचे..
पण ऐक दिवस ऐक घटना घडली आणि मला कोयना या गावची भीती वाटू लागली.. कृपया कथा वाचून कोणाला अस्वस्थ वाटत असेल तर कृपया त्यांनी कथा पूर्ण वाचू नये हि विनंती.
माझा आतेभाऊ राजेश कोयनेच्या जवळच्या हेळवाक गावचा कधी कधी चालत जाणे किंवा सायकल वरून जरी कोयनेला जायचा विचार केला तर पलांगभरच अंतर.. अवघे 7/8km चे शाळा कॉलेज कोयनेतच असल्यामुळे कोयना गाव त्यांना घरच असल्यासारखे वाटायचे. शाळा सुटली कि सशाची शिकार करणे आणि 4/5 पोरं शेकोटी करून त्या शेकोटी वरती तो पकडलेला ससा भाजून खाणे, कधी कधी खेकडे, तर कधी मोटा मासा भेटला तर तो मासा भाजून खाणे हा त्यांचा नित्याचाच नियम झाला होता.
त्यात स्वभावाला हि पोरं खुप धाडसी कोयना धरण किती पण भरूदे पण पैज लागली कि पुलावरून उडी टाकणार म्हणजे टाकणार एवढी धाडशी पोरं वाहून जाशिला... पाणी लय ओढतं... भूतं खेतं आपल्या कोकणात लय हायती... तुम्हाला काय झालं तर तुमच्या आय बानं काय करायचं असं कोणी त्यांना म्हणलं तर हि खुळी त्यांनाच खुळ्यात काडत होती. पण आपल्या पद्धतीनं जगत होती. पंचक्रोशीतील डांब्रट आणि वांड पोरं कोण तर यांची नावं लोकांना पहली सुचायची. पण काहीही असो कोणी काहीहि सांगितले आणि करू नको म्हणले तर त्याच्या पूर्ण खोलात घुसून सत्य काय आहे याची माहिती मिळवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसायची..
दीपावलीच्या रात्री हि सगळी शेकोटी भोंवती बसून खेकडे भाजत होती त्याच वेळी त्यांच्यातला अंदया राजाला म्हणाला.. व्हय महाराजा (राजा यांच्यात वयाने मोटा आणि t y चा पोरगा त्यामुळे त्याला त्याची दोस्त मंडळी कधी कधी महाराजा म्हणायची)... रात्रीचं पुलाखाली लय खेकडं भेटत्यात आणि मासे पण भेटत्यात असं ऐकलंय मी जायचं का तिकडं.. पण जरा रिस्क हाय..
पुलाखाली मासं आणि खेकडं पकडायला जायचं आणि ते बी रात्रीचं... एवढं ऐकल्याबरोबर राजा सोडून बाकीच्यांची चांगलीच टरकली... कुठं बी चला म्हणा दिवसभर तुमच्या बरोबर फिरतो पण रात्रीचं त्या पुलाखाली आम्ही येणार नाही असं म्हणाली.
ती जागा होतीच एवढी भयानक त्यात जुन्या जाणत्या म्हाताऱ्यानी तिथल्या खुप विचित्र घटना सांगितल्या होत्या त्यामुळे तिकडे यायला कोणच तयार नव्हते..
पण जस जशी संध्याकाळ होऊन रात्र होण्याला सुरुवात होयाची तस तसें तेथील वातावरणात अचानक बदल जाणवू लागायचा थंड बोचरी वाटणारी हवा अचानक आग ओकायला लागायची.. तिथे थोडावेळ थांबले तरी मन अस्वस्थ होऊन किती निरस आहे आयुष्य.. जगण्यापेक्षा मरणे बरे असे वाटायला लागायचे संध्याकाळनंतर ऐक विचित्रच वातावरण जाणवू लागायचे .. खुप जुना पूल होता तो इंग्रजांच्या काळापासून चा नवजा कडून जरासे पाणी आले कि लगेच बुडायचा एवढ्या उंचीचा जेमतेम दहा दहा ते पंधरा फूट उंची.. नंतर कोयना धरण झाले आणि पावसाळा आला कि हा पूल सतत पाण्याखालीच जायचा आणि नदीच्या पलीकडच्या लोकांचा संपर्क तुटायचा पण छोट्या छोट्या गावातील लोकांना कोयनेत आल्याशिवाय पर्याय नसायचा त्यामुळे तेथे बोटीचाच जास्त वापर व्हायचा.. तर असा हा पूल त्याचे नाव हि चिंगळ्या पूल असे विचित्र पाडण्याचे कारण म्हणजे तेथे पूल बांधत असल्यापासुनच तो पूल तयार करताना (बांधताना )कित्येक वेळा पडला होता व काही केल्या तो पूल बांधून तयारच होत नव्हता म्हणून तेथील गुरवांच्या सांगण्यानुसार तेथे खुप प्राणी आणि माणसांचा बळी द्यावा लागला होता. त्यानंतर हा पूल तयार झाला असे जुनी -जाणती लोकं म्हणत... विशेष म्हणजे तेथील पाणी शांत असूनही तेथे कधीच कोणाला मोटा मासा मिळत नसे पण छोटे छोटे मासे (चिंगळ्या )भरपूर प्रमाणात भेटतात त्यामुळेच त्याला "चिंगळ्या "पूल असे म्हणले जायचे. असा तो विचित्र पूल होता.
दिपावलीपासून एकदा तरी तेथे जाऊन खेकडे, आणि मोटे मासे पकडायचेच असा विचार राजा आणि अंदया करत होतीत पण दत्ता, रम्या आणि बाळ्या तिकडे जायला नको उगीचच वाघाच्या जबड्यात कशाला हात घालायचा असे म्हणत होती आणि तिकडे त्या पुलाकडं जायला आपल्या घरातील पण सोडणार नाहीत असं म्हणत होती...
पण ठरले...
राजा आणि अंदयाच्या हट्टामुळे सगळ्यांनी त्या पुलाखाली आज रात्री जायचेच असे ठरवले रात्री 9नंतर सगळे जेवून कट्ट्यावर जमा झाले प्रत्येकाने.. 'ससा धरलाय 'खाऊन लगेच येतो असे म्हणून घरी सांगून आली होती. रात्री नऊ च्या दरम्यान सगळी मंदिराजवळ जमा झाली. देवाचं दर्शन घेतलं आणि आमच्यावर कोणतंच संकट येऊ देऊ नको उद्या आल्यावर तुला कोंबडा कापतो असं देवाला म्हणाली आणि तेथून निघाली जाता जाता राजानं कोणाला न समजता देवाच्या समोरचा लिंबू उचलून खिशात टाकला आणि हळुवार सगळ्यांच्या मागुन मंदिराच्या बाहेर पडला. आता प्रत्येकाने आपापल्या सायकली काढल्या माचीस, जाळायला टायर, चाकू, पिशव्या, बॅटरी टॉर्च इत्यादी घेऊन त्यांचा प्रवास चालू झाला...
मंदिरातून निघाल्यापासूनच प्रवासात दंगा मस्ती करणारी पोरं रस्ता कापत पुलाच्या दिशेने निघाली होती. पण सायकल चालवत असतानाच त्यांचे पाय भरून आले होते 7/8km चेच अंतर पण ते खुप लांबचे अंतर असल्यासारखे वाटत होते शेजारून छोट्या मोट्या गाड्या सुसाट जात होत्या रस्त्यावर सगळीकडे काळोख होता पुढचे स्पष्ट दिसत नव्हते म्हणून प्रत्येकाने बॅटरी काडून बॅटरीच्या उजेडात पुढे जायला सुरुवात केली... शेजारून कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज भयावह वाटत होता तर कधीकधी वटवाघूळ त्यांच्या डोक्यापासून उडून जात होते. दाट अंधारात किड्यांची किरकिर आणि घुबडांचा ओरडलेला आवाज..यामुळे आता कधी नाही ती यांना भीती वाटायला लागली आणि आपण येथूनच मागे जाऊ असे रम्या आणि बाळ्या म्हणू लागली पण राजा कोणाचं ऐकायला तयार नव्हता तुम्हाला जायचे असेल तर जावा मी दत्ता आणि अंदया जातो असे म्हणाला त्याचं बोलणं ऐकून बाळ्या आणि रम्या मागे घराकडं वळली आणि ह्या तिघांचा त्या पुलाकडं जायचा प्रवास चालू झाला...
खूप वेळ सायकल चालवल्यामुळे तिघांचेही अंग घामाने चांगलेच भिजले होते तिथं गेल्या गेल्या पाण्यात डुबकी मारायची असं दत्ताला म्हणाला ते ऐकून अंदया म्हणाला तुम्ही पव्हा पण मी काय पाण्यात येणार नाही.. मला सर्दी झाल्या. थोड्याच वेळात ते पुलावर पोहचले तेथे पोहचताच वातावरण त्यांना अगदी वेगळेच जाणवू लागले तेथील भयाण शांतता, दाट काळोख, पाण्याचा खळखळ आवाज, कुत्र्यांचा कोल्ह्यांचा रडण्याचा आवाज आणि काहीतरी विचित्र असल्याचा भास हे सगळं बघून खाली नदीवर जायचे यांचे धाडस होत नव्हते पण काय होतय..? पाण्यात ऐक डुबकी तरी मारून येऊ.. काही नाही घावले तर काही नाय... असा विचार करून सायकल तिथेच पुलावर लावून हि खाली नदीकडे पुलाखाली जाऊ लागले.. पण पुढे जाताच काहीतरी झाडीत पळून गेले असे त्यांना दिसले त्यांनी त्या दिशेने बॅटरी चा उजेड मारला पण त्यांना तिथे काही दिसेना पण काहीतरी विचित्र जनावर होतं असं तिघांनाही वाटले. ते तिथेच नदीच्या कडेला बसले पण एव्हडी गर्द झाडी असून, समोर खळाळती नदी असून हि त्यांना तेथे गरमी जाणवू लागली सायकल वरून आलोय त्यामुळे अंग तापले असेल असे त्यांना वाटले. खुप वेळ बसून चालायचे नाही आपल्याला लगेच घरी जायचे आहे नाहीतरी घरातली खुप मारतील असं म्हणून दत्ता आणि अंदया खेकडे शोधू लागले तर त्यांना लगेच मोठेमोठे खेकडे मिळू लागले राजा नं पण छोटे जाळे काढले आणि नदीत टाकले तर दोन तीन मोटे मासे त्याच्या जाळ्यात आले ते बघून सगळीच आनंदाने उडया मारू लागले आणि कोण म्हणतं इथे नुसत्या चिंगळ्या भेटतात हि बघा मोठं मोठं मासं अशी म्हणू लागली पण खुप मासे आणि खेकडे भेटतायत म्हणून त्यांचे वेळेकडे लक्ष च नव्हते खुप वेळ झाल्यानंतर आता इथंच मासं खेकड खाऊ आणि घरी निघू असं म्हणाली पण त्यांच्या या मस्तीत कोणतरी आपल्याकडं बघतय त्याला पण आपल्याकडून काहीतरी खायला पाहिजे हे त्यांच्या लक्षातच आले नाही...
आता गरम पण जास्त होतय तुम्ही तोपर्यंत तयारी करा... मी ऐक डुबकी मारून येतो असे म्हणून राजेश ने कपडे काढली आणि नदीत उडी मारली...
. ... क्रमशः...
हि कथा आहे माझ्या आवडत्या कोयना या गावची.. कोयना म्हणले कि आपल्यासमोर येते ते कोयना धरण.. तिथला निसर्ग, घनदाट जंगल , मोठीच्या मोठी यशवंत राव चव्हाण साहेबांच्या नावाची बाग आणि त्या बागेतून विस्तृत असे दिसणारे कोयना धरण, रम्य परिसर लाल माती, आणि प्रसिद्ध असा नवजा धबधबा समोर येतो. फेसाळणारा पांढराशुभ्र धबधबा... बाजूने घनदाट जंगल.. कोण कोणते प्राणी आहेत याचे जागोजागी फलक.. आणि तो अरुंद निसरडा रस्ता... आपले रक्त शोषून घेणाऱ्या जळू किड्याची भीती.. आणि समोरून खुप उंचावरून पडणाऱ्या त्या फेसाळलेल्या पाण्याच्या धारा हे बघून मन किती तृप्त होते शब्दात सांगणे कठीण... आपण प्रत्येकाने कोठे ना कोठे कोणत्या ना कोणत्या धबधब्याखाली केलेली मस्ती प्रत्येकाच्याच लक्षात असेल पण कोयना धरण आणि नवजाचा धबधबा येथे केलेली मस्ती याची बातच वेगळी .. कोठेही फिरा पण आमच्या कोयनेला आणि नवजाला भेट दया असे तेथील कित्येक लोकं म्हणतात ते उगच नाही . त्या भागात गेले कि पुलावरच सगळ्या प्रकारचे विक्री साठी आलेले मासे बघायचे आणि तोंडाला पाणी सुटले कि कोणत्याही मस्त पैकी हॉटेल मध्ये जाऊन मासे खायचे त्याची चवच वेगळी.. कोणत्याही खाऱ्या पाण्याच्या माशाला जेवढी चव नसेल त्याच्या पेक्षा जास्त चवीचा मासा तुम्हाला कोयना धरणातील माश्यातील मिळणार असे मला कधी कधी इतर ठिकाणचे मासे खाताना वाटायचे..
पण ऐक दिवस ऐक घटना घडली आणि मला कोयना या गावची भीती वाटू लागली.. कृपया कथा वाचून कोणाला अस्वस्थ वाटत असेल तर कृपया त्यांनी कथा पूर्ण वाचू नये हि विनंती.
माझा आतेभाऊ राजेश कोयनेच्या जवळच्या हेळवाक गावचा कधी कधी चालत जाणे किंवा सायकल वरून जरी कोयनेला जायचा विचार केला तर पलांगभरच अंतर.. अवघे 7/8km चे शाळा कॉलेज कोयनेतच असल्यामुळे कोयना गाव त्यांना घरच असल्यासारखे वाटायचे. शाळा सुटली कि सशाची शिकार करणे आणि 4/5 पोरं शेकोटी करून त्या शेकोटी वरती तो पकडलेला ससा भाजून खाणे, कधी कधी खेकडे, तर कधी मोटा मासा भेटला तर तो मासा भाजून खाणे हा त्यांचा नित्याचाच नियम झाला होता.
त्यात स्वभावाला हि पोरं खुप धाडसी कोयना धरण किती पण भरूदे पण पैज लागली कि पुलावरून उडी टाकणार म्हणजे टाकणार एवढी धाडशी पोरं वाहून जाशिला... पाणी लय ओढतं... भूतं खेतं आपल्या कोकणात लय हायती... तुम्हाला काय झालं तर तुमच्या आय बानं काय करायचं असं कोणी त्यांना म्हणलं तर हि खुळी त्यांनाच खुळ्यात काडत होती. पण आपल्या पद्धतीनं जगत होती. पंचक्रोशीतील डांब्रट आणि वांड पोरं कोण तर यांची नावं लोकांना पहली सुचायची. पण काहीही असो कोणी काहीहि सांगितले आणि करू नको म्हणले तर त्याच्या पूर्ण खोलात घुसून सत्य काय आहे याची माहिती मिळवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसायची..
दीपावलीच्या रात्री हि सगळी शेकोटी भोंवती बसून खेकडे भाजत होती त्याच वेळी त्यांच्यातला अंदया राजाला म्हणाला.. व्हय महाराजा (राजा यांच्यात वयाने मोटा आणि t y चा पोरगा त्यामुळे त्याला त्याची दोस्त मंडळी कधी कधी महाराजा म्हणायची)... रात्रीचं पुलाखाली लय खेकडं भेटत्यात आणि मासे पण भेटत्यात असं ऐकलंय मी जायचं का तिकडं.. पण जरा रिस्क हाय..
पुलाखाली मासं आणि खेकडं पकडायला जायचं आणि ते बी रात्रीचं... एवढं ऐकल्याबरोबर राजा सोडून बाकीच्यांची चांगलीच टरकली... कुठं बी चला म्हणा दिवसभर तुमच्या बरोबर फिरतो पण रात्रीचं त्या पुलाखाली आम्ही येणार नाही असं म्हणाली.
ती जागा होतीच एवढी भयानक त्यात जुन्या जाणत्या म्हाताऱ्यानी तिथल्या खुप विचित्र घटना सांगितल्या होत्या त्यामुळे तिकडे यायला कोणच तयार नव्हते..
"चिंगळ्या "भाग -2
दीपावलीच्या रात्री शेकोटी भोंवती बसूनच त्यांनी एकदा तरी रात्रीचं त्या पुलाखाली मासे, खेकडे पकडायला जायचेच आणि तिथे गेल्यावर काही होत नाही हे लोकांना पठवून द्यायचं.. लोकांची रात्री विषयी असणारी त्या पुलाची भीती घालवायचीच असं ठरलं. पण राजा आणि अंदयाला सोडून कोणच तिकडे त्या पुलाखाली यायला तयार नव्हते. होतीच ती खुप भयानक जागा दिवसा खूप चांगले प्रसन्न वाटणारे वातावरण कित्येक तास पुलाजवळ बसून कोयनेचे ते खळाळते पाणी बघत तेथेच रमणारे मन...समोरून खुप उंचावरून पडणारे कोयनेचे पाणी आणि बाजूची गर्द घनदाट झाडी.. . मासे पकडायला म्हणून यायचे आणि तेथेच तासंतास पोहत बसायचे हा कित्येक जणांचा छंद ... तर कॉलेज च्या किंवा ट्रिप साठी आलेल्या मुलामुलींचा आवडता पॉईंट.. कितीतरी जणांना त्या वातावरणात गेले तर तेथून येऊच नये असे वाटायचे असे हे मनाला हवेहवेसे वाटणारे वातावरन..पण जस जशी संध्याकाळ होऊन रात्र होण्याला सुरुवात होयाची तस तसें तेथील वातावरणात अचानक बदल जाणवू लागायचा थंड बोचरी वाटणारी हवा अचानक आग ओकायला लागायची.. तिथे थोडावेळ थांबले तरी मन अस्वस्थ होऊन किती निरस आहे आयुष्य.. जगण्यापेक्षा मरणे बरे असे वाटायला लागायचे संध्याकाळनंतर ऐक विचित्रच वातावरण जाणवू लागायचे .. खुप जुना पूल होता तो इंग्रजांच्या काळापासून चा नवजा कडून जरासे पाणी आले कि लगेच बुडायचा एवढ्या उंचीचा जेमतेम दहा दहा ते पंधरा फूट उंची.. नंतर कोयना धरण झाले आणि पावसाळा आला कि हा पूल सतत पाण्याखालीच जायचा आणि नदीच्या पलीकडच्या लोकांचा संपर्क तुटायचा पण छोट्या छोट्या गावातील लोकांना कोयनेत आल्याशिवाय पर्याय नसायचा त्यामुळे तेथे बोटीचाच जास्त वापर व्हायचा.. तर असा हा पूल त्याचे नाव हि चिंगळ्या पूल असे विचित्र पाडण्याचे कारण म्हणजे तेथे पूल बांधत असल्यापासुनच तो पूल तयार करताना (बांधताना )कित्येक वेळा पडला होता व काही केल्या तो पूल बांधून तयारच होत नव्हता म्हणून तेथील गुरवांच्या सांगण्यानुसार तेथे खुप प्राणी आणि माणसांचा बळी द्यावा लागला होता. त्यानंतर हा पूल तयार झाला असे जुनी -जाणती लोकं म्हणत... विशेष म्हणजे तेथील पाणी शांत असूनही तेथे कधीच कोणाला मोटा मासा मिळत नसे पण छोटे छोटे मासे (चिंगळ्या )भरपूर प्रमाणात भेटतात त्यामुळेच त्याला "चिंगळ्या "पूल असे म्हणले जायचे. असा तो विचित्र पूल होता.