( मी सायली कुलकर्णी . तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद . भसम्या कथेचे फक्त 4 पार्ट लिहायचं असं ठरवलं होत ... 4 थ्या पार्ट मध्ये गीता ला पण भसम्या सारखी लक्षणें दिसू लागतात .... आणि भसम्या मुक्त होतो असा एन्ड केला होता .... पण बऱ्याच वाचकानी गीताचे पुढे काय होते या बद्दल विचारलं .... मग ठरवलं भसम्या चा 5 वा पार्ट लिहू ....... बघा आवडतो का ....... )
आधीच्या सर्व पार्टस च्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत
भसम्या ( पार्ट 5 )
अनिल आणि गीता दुसऱ्या गावी येऊन नव्याने संसार करू लागली . जीमी पण त्यांच्या सोबत नवीन गावात आला होता . गीता ला मातृत्वाची चाहूल लागली . खूप वर्षांनी त्यांच्या घरी छोटासा पाहुणा येणार होता . अनिल गीता चे सर्व लाड पुरवत होता .... गीता ला खूप कडक डोहाळे लागले होते . तीला सारखी भूक लागत असे . गीता च्या हातावर झालेली जखम लिबलिबित झाली होती . त्यांनी ती जखम डॉक्टराना दाखवली आणि गीताच्या सारख्या लागणाऱ्या भुके बद्दल पण विचारलं .
" यांना काहीतरी किरकोळ जखम झाली आहे पण त्या जखमेत सारखं पाणी गेल्या मूळ ती अशी दिसत आहे . बाई माणसाला कामे किती असतात घरी , सारखा हात पाण्यात जात असेल , आणि राहिला प्रश्न त्यांना लागणाऱ्या सारख्या भुकेचा तर त्या आता दोन जिवाच्या आहेत ... लागते अशी भूक प्रेग्नेंसी मध्ये ... यात काही विचित्र नाही .....जखम किरकोळ आहे काही टेन्शन घेऊ नका .... आणि तुमच्या बाळाला या जखमे चा काही धोका नाही . जखम तेवढी ड्रेसिंग करून घ्या ..... काही वाटल तर या परत दाखवायला ...." डॉक्टरानी अनिल ला सांगितले .
गीता ची भूक आणि गीता ची जखम यांची काळजी करण्याच कारण नाही हे ऐकल्यावर अनिल निर्धास्त झाला . पण त्या जखमेचा त्याच्या बाळाला किती धोका होता याची जाणीव अनिल ला न्हवती . डॉक्टरानी गीताच्या जखमेला ड्रेसिंग केले . गीता साठी औषध लिहून दिले...
डॉक्टराना आणि अनिल ला अंदाजच न्हवता ती जखम किती खोल वर पसरणार होती .... वर वर दिसणारी जखम गीता ला किती पोखरणार होती . त्यांना अंदाज तरी कसा येणार होता म्हणा भसम्या चा स्पर्श गीता ला जसा झाला होता तसा अनिल ला झालाच न्हवता . अनिल ने फक्त त्याला धक्का दिला होता पण गीताच्या हातात भसम्या च नख घुसलं होत .... त्याच्या शरीराचा लिबलीबित पणा कसा होता याची जाणीव फक्त गीता ला होती . भसम्या ची कोणतीच लक्षणें अनिल ला माहित न्हवती . भसम्या च अडखळत बोलणं , भसम्या च्या शरीराचा स्पर्श , भसम्याची अनैसर्गिक भूक याबद्दल तो अंधारातच होता ...अनिल दिवसभर कामाला गेला असल्यामुळे गीता ची विचित्र भूक अनिल च्या लक्षातच येत नसे .....
गीता ला 8 वा महिना चालू झाला होता .... डॉक्टरानी गीता ला 9 व्या महिन्याची तारीख दिली होती . डॉक्टरांच्या मते गीताला 9 महिने पूर्ण झाल्यावर बाळ होणार होत . गीता च्या डिलिव्हरी साठी अजुन 1 महिना बाकी असल्याने अनिल पण निवांत होता . बाळ झाल्यावर सुट्ट्या ची जास्त गरज असेल म्हणून त्यानं सुट्ट्या पण घेतल्या न्हवत्या . पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत ....
" गीता तुझ्या हाताला झालेली जखम बरी का होत नाहीये ... तुला सांगितले ना पाण्यात हात घालत जाऊ नकोस ....." अनिल काळजीच्या सुरात म्हणाला .
" अहो अ...... अ...... असं कस म्ह...... म्ह..... म्हणता..... पाण्यात हात जा ..... जा ....... जाणारच की ....... नेमकी उजव्या हा ..... हा .... हाताला जखम ......उजव्या हातानं का ..... का ..... कामे करायची म्हंटल की ...... थोड तरी पाणी ला ....ला ....लागणारच ना हा ....हा ..... हाताला ........ आणि डॉक्टरानी सांगितले आहे की ..... की ....... प्रेग्नेंसी मध्ये ..... जे .... जे .... जेवढी हालचाल जा .....जा .... जास्त असेल ......ते .....ते .....तेवढं चांगल..... असत . तुम्ही का ....का ....काळजी करू न ....न .....नका माझी . बाळ आणि मी म.....म..... मस्त आहोत . "
"गीता अशी अडखळत का बोलत आहेस ? काही त्रास होत आहे का ?" अनिल ने काळजीच्या सुरात विचारलं .
" ना .... ना ....नाही माहित. तू ......तू ......तुम्ही काळजी करू नका . आपण डॉ.....डॉ..... डॉक्टराना विचारू . तुम्ही जा . ऑ......ऑ......ऑफिस ला उशीर हो .....हो ...होत असेल ना ......." गीता अनिल ला म्हणाली .
अनिल ऑफिस साठी निघून गेला . गीता ला आता अस्वस्थ वाटू लागले .....पोटात आगीचा डोंब उसळला ..... गीता च्या हाताची जखम भगभगु लागली ..... असं वाटत होत ती जखम पूर्ण शरीरभर पसरू लागलीय . शरीराचा प्रत्येक अवयव लिबलीबित झाला आहे . तोंडातुन लाळ गळत होती ... जीमी ला अपशकुनाची चाहूल लागली..... तो घरात आला ..... गीता कडे बघत भुंकू लागला ..... 8 व्या महिन्याचे आलेले पोट सांभाळत जीमी च्या दिशेने आली ... जीमी अजुन पण भुंकत होता .... गीता ने जीमी ला पकडलं . दोन मिनिटात जीमी चा आवाज जो बंद झाला तो कायमचाच ...... गीता जमिनीवर बसून जीमी ला खात होती . जीमी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . गीता मधील भसम्या तिच्या वर हावि झाला होता ..... आपल्याला काय होतंय हेच तीला समजत न्हवत ..... आख्ख जीमी च मास खाऊन पण तीला भूक लागली होती ..... तिच्या पोटातून कळा येऊ लागल्या ..... पण तीला तर डॉक्टरानी अजुन एक महिन्याची नंतर ची तारीख दिली होती .... मग तीला आताच कळा का येत होत्या ...... ????? कारण भसम्या पण आठव्या महिन्यात च जन्माला आला होता ..... गीता च्या प्रसव कळा वाढू लागल्या ...... थोड्या वेळानं घरात लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला .... गीताने घरीच बाळाला जन्म दिला होता ..... बाळाची नाळ पण तशीच होती ...... गीताने तिच्या बाळाला घेतले .... ते गोंडस बाळ बघून तिचे डोळे चमकले ......मनातील सुप्त इच्छा जागी झाली ...... गीता मधील भसम्या तिच्यावर पुन्हा हावी झाला .......
खूप वेळ बेल वाजवून पण गीता ने दार उघडले नाही हे पाहून अनिल ने स्वतःच्या किल्ली ने कुलूप उघडले .
" गीता ..... गीता ..... अग मी आता बाळा साठी एक मस्त पाळणा बघून आलो आहे ..... तुला पण नक्की आवडेल ...." अनिल गीता ला हाक मारत किचन मध्ये आला . समोरचे दृश्य पाहून गीता साठी आणलेला गजरा त्याच्या हातून गळून पडला ......
" म.....म....मला भूक लागली होती ...... " गीता च्या हातात नुकताच जन्माला आलेल्या बाळाचा पाय होता ..... बाळाचा खेळ कधीच संपला होता ...... जवळच जीमी च्या अंगावरील कातडी पडली होती .....
" बाळाच मा.....मा.... मास खूप छान लागते ..... "गीता बाळाच्या पायाचा लचका तोडत बोलली ......
अनिल चा सोन्या सारखा संसार उध्वस्त झाला होता ... भसम्या ची भूक किती भयानक आणि भयंकर होती याची त्याला आत्ता जाणीव झाली होती ..... गीताच्या हातावर झालेली जखम किती जहरी होती हे त्याला कळून चुकले . आता चूक दुरुस्त करण्याचा एकच उपाय होता ....
बाळाच्या उरल्या सुरल्या देहाकडे त्यांन प्रेमानं पहिले . बाळाच्या राहिलेल्या पायाला प्रेमाने स्पर्श केला . जीमी च्या कातडी वरून प्रेमानं हात फिरवला. जीमीच्या कातड्या ला पाहून हात जोडले जणू तो जीमी ची माफी मागत होता . बाळाच्या देहाला पाहून हात जोडले . मनात काहीतरी निश्चय करून तो उठला . जवळच पडलेली गीता ची साडी उचलली . गीताच्या पाठीमागे जाऊन उभारला . गीता बाळाला खाण्यात मग्न होती . गीताच्या पाठमोऱ्या शरीरा कडे त्यानं शेवटच प्रेमानं पहिले . आणि गीताच्या साडी ने गीताचा गळा आवळला . तिचा प्राण जास्त पर्यंत त्यानं पकड सैल होऊ दिली नाही . गीताचा प्राण गेला आहे याची खात्री होताच त्यानं साडी ची पकड सैल सोडली . गीता चा देह जमिनीवर पडला . अनिल च्या चेहऱ्यावर अपराधी पणाचे भाव न्हवते . गीता जवळच बसून तो धाय मोकलून रडला . गीता जवळ बाळाचा उरला सुरला देह ठेवला . जीमी चे कातडी पण गीता च्या जवळ ठेवली अनिल किचन मधील चाकू घेऊन आला . त्यानं स्वतःच्या हाताची नस कापली . व गीता च्या व बाळाच्या जवळ स्वतःचा प्राण सोडला . किचन मध्ये रक्ताचा पूर आल्या सारखी परिस्थिती होती . पूर्ण किचन रक्तान माखल होत . भसम्या मुळे सोन्या सारखा संसार उधळून गेला . निदान गीता मेल्यामुळे परत कुणाला धोका तरी न्हवता .
*************************************
" नालायक मॅनेजर , मला एवढ्या लांब ट्रान्सफर दिली ."
पण चिडून काय उपयोग , जॉब आहे करावाच लागणार . आज सेंडऑफ दिला सगळ्यांनी . सगळा कार्यक्रम पार पडला . बाहेर पडायला जवळ जवळ रात्रच झाली . तरी बर सगळे सामान घेऊन टेम्पो सकाळीच बाहेर पडला . आई पण त्या टेम्पो बरोबर गेली ते बर झालं . म्हणजे आई सामान उतरवून तरी घेईल .
आई वाट बघत असेल घरी . तीला पण बिचारीला माझ्या बरोबर गावे फिरावि लागतात . ह्या वेळी तर हे असलं गाव . गावातील लोक तर एकदम मूर्ख आहेत . आई ला कोण तर शेजारी सांगत होते की गावात भूत आहे . आई ने काळजी ने मला फोन केला आई सांगत होती एखादा माणूस त्या कमळा च्या तलावाच्या जवळ एकटा दिसला की एका खुळ्या माणसाचं भूत येत म्हणे आणि त्या भुताला नाव पण आहे बर का ..... काय बर नाव ...... काय बर ..... भस.......भस..... हा ...... भसम्या ..... हा भसम्या कायम उपाशी असतो म्हणे आणि जिवंत माणसाला त्या तलावात नेऊन मारून टाकतो आणि त्याच प्रेत खातो ...... मूर्ख असतात लोक कशावर पण विश्वास ठेवतात . आई पण लगेच कशावर पण विश्वास ठेवते . कोण कुठला शेजारी येतो आई ला काहीतरी सांगतो आणि आई बिचारी टेन्शन घेते आणि माझं डोकं खाते . मी अजुन पहिले नाही ते तळे कुठं आहे पण मी बघून येणारच . कुणीतरी काहीतरी अफ़वा उठवतात आणि सगळी लोक विश्वास ठेवतात .
"चला गावाची हद्द सुरु झाली . "
"आता अर्ध्या तासात घर . "
"आई वाट बघत असेल माझी . "
"अरे देवा आता या गाडीला काय झालं . अशी वाटेत कशी काय बंद पडली . "
"आई ला फोन करून सांगते टेन्शन मध्ये असेल . "
"छान रेंज पण नाही . "
"कसलं गाव आहे शीट ."
"समोर एक घर दिसत आहे तिकडे विचारते काही सोय होईल का ?"
"नशीब मोबाईल ची बॅटरी तरी डाउन झाली नाही . निदान टॉर्च चा उजेड तरी आहे . "
"अरे देवा कुलूप का ? "
" आज सकाळी नक्की कुणाचं तोंड बघितल कुणास ठाऊक . "
"ई.....ई .... इथं काहीतरी कुजल्या सारखा , सडल्या सारखा वास येतोय . "
इतक्यात मला काना जवळ कसली तरी हालचाल जाणवली . मोबाईल टॉर्च च्या उजेडात पाठीमागे वळून पाहिले . या गावातील लोक त्या खुळ्या भूतां बद्दल बोलतात ते खोटं नाहीये .
पुढे आलेले दात , .......बटबटित डोळे ,...... मोठं पोट , ....... लिबलीबीत अंग , असलेला काहीतरी विचित्र प्रकार माझ्या समोर .......
त्यानं मला ओरडयची पण संधी दिली नाही . मला काही कळायच्या आत त्यानं त्याची लांब सडक टोकदार नख माझ्या मानेत खूपसली....
मी खालती पडले ..... माझ्या पायाला धरून तो मला फरफटत घेऊन जात आहे ...... माझी शुद्ध हरपून जात आहे .....
तो त्या तलावाच्या कडे नेणार मला ..... डोळ्यासमोर अंधार येत आहे .
खरंच भसम्या आहे .... तो जिवंत झालाय ..... गावातील लोक खरंच सांगतात .
ह्या गावात खरंच भसम्या चे भूत आहे .
************************************
" मी भ.....भ...भसम्या ..... . मला सारखी भू......भू......भूक लागते .....आता ही .....ही .....हिला खातो ...... "
********************************
समाप्त .....