.....वरना मौत आ जाएगी
तसा माझा आणि भुतांचा एकदम जुना संभंद.अगदी अडीच हजार कोटी वर्षांपूर्वीपासूनचा तेव्हा आमच्यात एक डील झालं होतं.ते अस की मी माझ्या लेखणीतून ह्या भूतांना जिवंत ठेवायच,लोकांना त्रास देणाऱ्या भुतांवर कथा लिहून लोकांच्या मनात त्यांच्या बद्दल दहशत निर्माण करावी,भूतां वर चित्रित होणाऱ्या चित्रपटा वर विश्लेषण करावं आणि त्या बदल्यात ह्या भुतांनी मला उन्माद,त्रास देऊ नये वा झपाटून टाकू नये अशी डील होती आणि त्या प्रमाणे मी इमाने इतबारे कामाला ही लागलो छान छान सत्यघटना लिहून लोकां मध्ये भूतां बद्दल एक दरारा निर्माण करत गेलो.सर्व कस छान सुरळीत चाललं होतं पण घात झाला.मध्यंतरी रात्री दीड च्या सुमारास झोप येत नव्हती म्हणुन you tube वर horrer सिनेमे सर्च करत असताना एक पोस्टर वर नजर गेली,पोस्टर एकदम भयाण होत व त्यावर '' इस मुव्ही को अकेले मत देखना वरना मौत आ जायेगी '' अस हेडींग होत. आता कसय ना कोणी हे करू नको, इथे जाऊ नको म्हटलं की आपण नेमकं त्याच्या विरुद्ध करतो तसच मी केलं म्हटलं या हेडींग च्या नावाखाली भुताचाच चित्रपट आहे ना?? की दुसरंच काय निघायला नको मागे पण असाच एक हॉरर चित्रपट पाहण्यासाठी ओपन केला तर आत मध्ये मिथुन चा गंगा की सौगंध हा चित्रपट अपलोड केलेला होता, ह्या you tube वर मुव्ही अपलोड करणाऱ्यांच काही सांगू शकत नाही,आज्याबात इसवास ठेऊ नका त्या you tube चॅनेल वाल्यांवर मुव्ही च नाव असत एक पोस्टर असतो दुसराच आणि आत कुठला तरी भलताच चित्रपट अपलोड केलेला असतो.असो,बरयाच दा आपल्याला हवी असलेली दुर्मिळ मुव्ही पाहण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो ते अश्या लोकांमुळे,हा तर झालं असं की ये मुव्ही को अकेले मत देखना वरना मौत आ जायेगी अस हेडींग दिल होत पण मुव्हीच नाव काही दिल नव्हतं मी मुव्ही पहायला सुरुवात केली आणि अवघ्या पाच मिनिटांत खो-खो करत हसायला लागलो आता तुम्ही म्हणाल horrer फिल्म पहात होता की कॉमेडी...तर खरच ती हॉरर मुव्ही होती एक चांगला बेस होता कथेला एक बंद हॉस्पिटलमध्ये आत्म्यांचा मुक्त संचार असतो जी माणसं त्या हॉस्पिटलमध्ये मृत पावलेली असतात त्यांचे आत्मे तिथे वावरत असतात, काही परानोमल ऍक्टिवीटी चेक करणारी टीम त्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि ते हॉस्पिटल पाडून तिथे इमारत उभी करण्यात येणार असल्याने त्याची रेकी करण्यासाठी एक बिल्डर च्या कंपनीच्या वतीने एक माणूस त्या हॉस्पिटलमध्ये येतो आणि मग त्या लोकांना तिथे भयाण विचित्र अश्या आत्म्यांना सामोरं जावं लागतं वगैरे,वगैरे,,मग तुम्ही म्हणाल की यात हसण्यासारखं काय होत. अहो हसण्यासारखं होत ते त्या मुव्हीच हिंदी मध्ये केलेलं डबिंग.प्रवीण तरडेजीं च्या style मध्ये सांगायचं झालं तर 'आ रा रा रा रा,,खतरना......क.खरंच एक चांगल्या हॉरर मुव्हीला टुकार डबिंग देऊन पार बोऱ्या वाजवून टाकला होता बर त्या मुव्हीत इन मिन चार पाच क्यारेक्टर त्यातील दोघि मूली ज्या 22-25 वयोगटा तील असतील त्यांना 40-45वयोगट असलेल्या एकाच महिलेने वॉइस ओवर दिला होता व एक पुरूष करेक्टर ला ज्याने vioce dubb दिला होता त्याने तोंडात तंबाखूचा तोबरा भरला असावा अस वाटत होत,ज्या डबिंग कंपनीने त्या फ़िल्म चे डबींग राइट्स विकत घेतले होते त्यांनी कमी पैशात कुणाकडून ही डबींग करून घेतल होत. वाईट या गोष्टी च वाटत की एका चांगल्या हॉरर चित्रपटाच funny डबींग देऊन पार मातेर करुन टाकल होत. खरच चित्रपट पाहून हेडिंग प्रमाणे मौत आली नाही पण डबींग ऐकून हसून हसून जीव जायची वेळ आली होती केवळ भूतांशी केलेल्या डील मुळे वाचलो म्हणून सर्वांनी आपापल्या जबाबदारी वर अशे मुव्ही पहान्याची हिम्मत करावी नही तो ये मुव्ही अकेले मत देखना वरना मौत आ जायेगी.
हाहाहा
लेखन प्रथम वाडकर