भसम्या ( पार्ट 4 )
5 वर्षा पूर्वी .....
" कसलं नीच कारट हाय हे .... माकडाची भूक च भागात नाय .... किती खाणार हाईस मूडद्या .... तुझ्या आई ला तर गिळून बसला हाईसच .... आता तुझ्या बा ला आन त्या म्हातारी ला भी खा ..... पोट शांत होईल तुझं ...." रामा तावातावान त्याच्या 15-16 वर्षाच्या मुलाला बोलत होता .
रामा आणि मीरा चा मुलगा किशोर ..... 8 व्या महिन्यात झालेला .... शरीराची व बुद्धीची व्यवस्थित वाढ न झालेला ...... त्याला जन्म देऊन मीरा लगेच देवाघरी गेली होती .... त्यात किशोर असा दिसायला जरा विचित्र ... त्यात भर म्हणजे त्याची भूकच भागात नसे .... किशोर लहान असताना त्याला व्यवस्थित प्रेम न मिळाल्यामूळे व त्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे तो जास्तच विचित्र वागू लागला होता . तो जसा जसा मोठा होत गेला तशी त्याची भूक पण जास्तच वाढत गेली .....
रामा आधीच परिस्थिती मूळे हवालदिल झाला होता त्यात त्याची बायको पण त्याचा साथ सोडून देवाघरी गेली होती . घरी म्हातारी आई आणि असा विचित्र जन्माला आलेला किशोर .... त्याच्या सततच्या भुकेमूळे त्याला सर्वजण भसम्या म्हणू लागले ....कितीही खाल्लं तरी त्याची भूकच भागत नसे .... रामा त्याच्या सवयीला खूप वैतागला होता .... मोठ पोट .... पुढे आलेले दात .... बटबटित डोळे ...... बोलताना अडखळत असणारा किशोर पहिला ना भीतच वाटत असे....
लोकांच्या शेतातील भाजीपाला खा ..... झाडावरून फळे चोरून खा ..... स्वतःच्या घरातील तयार केलेलं सगळं जेवण खाऊन पण भसम्याची भूक भागात न्हवती .... हल्ली हल्ली भसम्या लोकांच्या घरात जाऊन त्याच्या घरचे जेवण चोरून खात असे ..... हल्ली लोक पण त्याच्यावर लक्ष ठेवून होते ..... तो असं चोरून खाताना सापडला की लोक त्याला मारत होते ..... सगळं गाव त्याला वैतागल होत .....
भसम्याची आजी वारली ..... रामा चा शेवटचा आधार पण हरवला ..... काळाने केलेल्या आघातान रामा पूर्णपणे खचून गेला होता ..... जड अंतःकरणाने आई ला दहन देण्यासाठी रामा गावाबाहेर असलेल्या स्मशानात गेला . गावातील बाकीचे लोक पण होते .... भसम्या पण स्म्शानात आला होता .... रामाच्या आई ला दहन दिले .... जाड अंतःकरणाने रामा तिथून बाहेर पडला , बाकीचे लोक त्याच सांत्वन करत बाहेर पडले.... पण भसम्या स्म्शानात बसून होता ...... त्याच्या पोटात परत भुकेचा डोंब उठला .... समोर आजीची चिता जळत होती ..... मागचा पुढचा विचार न करता भसम्याने जवळ पडलेल्या लाकडान आगीत जाळणारे प्रेत खाली पाडले..... तो आजीचे प्रेत खाऊ लागला ..... स्म्शानात कुणीच नसल्याने त्याला आज कुणीच ओरडले न्हवते किंवा त्याला कुणीच मारलं न्हवत
त्याच्या बापानं म्हंटल्याप्रमाणे आज खरंच भसम्यान त्याच्या आजीला खाल्लं होत .... सगळं प्रेत खाल्ल्या नंतर तो स्म्शानातून बाहेर पडला . कमळाच्या तलावाच्या जवळ आला .... तलावातील पाणी पिले .... समोर भसम्याच घर होत ....
त्याच्या बापानं म्हंटल्याप्रमाणे आज खरंच भसम्यान त्याच्या आजीला खाल्लं होत .... सगळं प्रेत खाल्ल्या नंतर तो स्म्शानातून बाहेर पडला . कमळाच्या तलावाच्या जवळ आला .... तलावातील पाणी पिले .... समोर भसम्याच घर होत ....
" किश्या कुठं हाईस रे .... ये घरी ..... काय तर खाऊन घे.... " समोरच्या घरातून रामा आपल्या मुलाला हाक मारत होता .... भसम्या घरी आला ....
रामा ने दोन जेवणाची ताटे केली . " आता कोण नाय रे आपल्याला .... तुझी आय तुला सोडून देवाघरी गेली आज माझी माय भी मला एकट्याला सोडून देवाघरी गेली . आता मी तुला आणि तू मला " असं म्हणत रामा रडू लागला पण किशोर जेवण करण्यात गुंग होता . आपला बाप रडत आहे आपल्या बापावर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची जाणीव पण त्या बिचाऱ्याला न्हवती . तो स्वतःचे जेवण करण्यात मग्न होता . रामाची अन्न खाण्याची वासनाच होत न्हवती . त्याच्या समोर ते ताट तसंच पडून होत .... आपला बाप जेवत नाही हे पाहून किशोर ने रामा पुढचं जेवणाचं ताट ओढून घेतलं व परत जेवण करू लागला . रामा किशोर कडे निर्विकार पणे पाहू लागला . स्वतःच अंधारात असणार भविष्य घरातील दिव्याच्या उजेडात बघत होता . आधीच बायकोच्या बाळंतपणा साठी व शेतीसाठी गावातील बँकेतून कर्ज काढलं होत . ते कस फेडायाचं याची चिंता त्याला लागून राहिली होती . पैसे नाही भरले तर बँके त्याच हे राहते घर जप्त करणार होती . जर घर जप्त केले तर कुठं जायचं , किशोर चे काय करायचं याची चिंता त्याला लागून होती .
भसम्याला आता नवीन खाद्यउद्योग मिळाला होता ....
.गावातील कुणी वारले की भसम्या स्मशानात जाऊन लपत असे ... सगळी लोक गेली की तो चिते वरून प्रेत काढून खात असे . हल्ली त्याला माणसाच्या मासाची चटक लागली होती . आणि ते मास खाल्ल्यावर त्याला लगेच भूक पण लागत न्हवती . पण गावात कोण रोज रोज मरत न्हवत मग पोटात उसळलेला भुकेचा डोंब शांत करण्यासाठी भसम्याचे बाकीचे उद्योग चालूच असायचे . कुणाच्या कोंबड्या पळव , भाजीपाला , फळे , बाकीचे अन्न पदार्थ तो चोरत असेच . हल्ली हल्ली तर तो भूक शांत करण्यासाठी कुत्री मांजरी पक्षी पण खात होता .....
.गावातील कुणी वारले की भसम्या स्मशानात जाऊन लपत असे ... सगळी लोक गेली की तो चिते वरून प्रेत काढून खात असे . हल्ली त्याला माणसाच्या मासाची चटक लागली होती . आणि ते मास खाल्ल्यावर त्याला लगेच भूक पण लागत न्हवती . पण गावात कोण रोज रोज मरत न्हवत मग पोटात उसळलेला भुकेचा डोंब शांत करण्यासाठी भसम्याचे बाकीचे उद्योग चालूच असायचे . कुणाच्या कोंबड्या पळव , भाजीपाला , फळे , बाकीचे अन्न पदार्थ तो चोरत असेच . हल्ली हल्ली तर तो भूक शांत करण्यासाठी कुत्री मांजरी पक्षी पण खात होता .....
रामा परिस्थितीला खूप वैतागला होता . त्याच्या आयुष्यात काहीच राहिल न्हवत . देवान पदरात असा विचित्र मुलगा दिला होता .... डोक्यावर असलेलं कर्ज .... कुणाची नसलेली सोबत .... रामाने एक पक्का निर्णय घेतला . जो चोच देतो तोच अन्नाची व्यवस्था करतो स्वतःच्या मनाची अशी समजूत काढून रामा आपल्या आई ला आणि बायकोला भेटायला निघून गेला . घरा मागच्या झाडाला त्यानं गळफास लावून घेतला . परिस्थितीच्या कच्याट्यातुन रामान स्वतःची सुटका करुन घेतली होती . आता भसम्या एकटा पडला होता .
कुणीतरी रामाच झाडाला लटकलेल प्रेत पहिले . गावात कळवलं . गावातील सर्वांनी पैसे जमवले . रामाच्या अंतसंस्कारा साठी . भसम्या स्मशानात लपून बसला होता . कुठून तरी त्याला एक कुत्र्याचं पिल्लू मिळालं होत त्यानं स्मशानात बसून त्याला मारलं आणि त्याचंच मास तो खात बसला होता . गावातील लोक स्मशानात येत आहेत हे पाहून तो लपून बसला . गावातील लोकांनी भसम्याला हुडकायचा प्रयन्त केला पण भसम्या कुणालाच सापडला नाही . शेवटी गावातील एका माणसाने रामाला दहन दिले . गावातील लोक निघून चाललेत हे पाहून भसम्या बाहेर आला . जवळ पडलेल्या लाकडाने त्यानं चितेतील प्रेत ढकलले . व तो प्रेत खाऊ लागला . रामा ने म्हटल्या प्रमाणे आज भसम्यान स्वतःच्या बापाला पण खरोखरच खाल्लं होत . अचानक गावातील एक माणूस स्मशानात आला आणि समोर भसम्याला स्वतःच्या बापाला खात असलेला पाहून त्यानं बोभाटा केला . सगळी लोक परत स्मशानात आली त्यांनी पण भसम्याला प्रेत खाताना पहिले .
" हे बेणं स्वतःच्या बापाला खात हाई , सैतानाची औलाद हाय ही ... आज मेलेली माणसं खात हाय .... उद्याच्याला जिती माणसं भी खायला मागे पुढ बघायचं नाय ये भूत , याचा काय तर सोक्ष मोक्ष लावायला हवा . नाही तरी असं भी समाधा गाव वैतागला हाय याला . उद्या आपली पोर बाळे भी गिळायला कमी करणार नाय . " जमावातील एक जण बोलला . आता आपल्याला मारणार याची जाणीव भसम्याला झाली . लोक त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले . त्याला मारू लागले . भसम्या कसाबसा त्यांच्या तावडीतुन सुटून पळू लागला . लोक त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे पळू लागले . भसम्या घरा जवळ आला . त्याला कुठं लपवा हेच लक्षात येत न्हवत . तो तलावाच्या दिशेने गेला . त्यानं तलावात उडी मारली . सगळा गाव आता तलावाच्या कडेला येऊन थांबला . भसम्या तसाच तलावात उभा होता . थोड्या वेळानी ही माणसे जातील व आपण बाहेर यायचं असं भसम्या ला वाटल होत . पण कुणीच तिथून जात न्हवत .
" भसम्या तलावात हाईस म्हणजे वाचलास असं नाय होत ... लई त्रास दिला हाईस तू गावाला .... आन आता तुझा बा भी जिता नाय .... आन तुझं घर भी जप्ती होणार हाय .... तुझा काय तो सोक्ष मोक्ष लावायलाच हवा .... "जमावातील एक जण बोलला .
" व्हय . ह्या मूडद्याला इथंच मरू द्या .... ही घाण गावाबाहेर च राहू द्या ..... सडू द्या त्याला ह्याच तलावात ...."
भसम्याला नक्की काय होणार आहे तेच कळत न्हवत . गावातून गवंडी बोलावून आणला . त्याला त्या तलावाला कठडा बांधण्यास सांगितले . थोड्या वेळाने कठडा बांधून झाला . गावातील वेल्डिंग वाल्याला बोलावून घेतल . त्याला त्या तलावाच्या मापाची जाळी बनवण्यास सांगितली .सगळा गाव आता तलावाच्या बाजूला जमा झाला होता . बऱ्याच वेळानी वेल्डिंग वाला तलावाच्या मापाची जाळी घेऊन आला .
भसम्या केविलवाण्या नजरेने गावातील लोकांन कडे बघत होता . कठडा बांधून झाला होता ... त्यावर जाळी पण बसवून झाली .... भसम्या बाहेर येऊ नये म्हणून जाळीला कुलूप लावण्यात आले .
" म.....म..... मला भूक लागली ......" भसम्या रडत होता
सगळा गाव बघत होता . खूप उशिरा पर्यंत गाववाले तळ्या जवळ बसून होतो त्यांना धास्ती वाटत होती भसम्या पळून जाईल याची . दुसऱ्या दिवशी गावात कोणीतरी सांगत आलं भसम्या च प्रेत तलावात तरंगत आहे . गावातील लोक परत तलावाच्या दिशेने आली . भसम्या च प्रेत पाण्यात तरंगत होत.
" असच सडू द्या भसम्या ला ..... तस पण .... कोण पाण्यात जाऊन प्रेत आणणार .... आणि आता त्याचे कार्य करायला पण कोण नाही आहे..... तलाव गावापासून लांब आहे.... आणि नंतर सडून जाईल प्रेत पाण्यात ..... कुणाला काहीच कळणार नाही . फक्त नाम्या मांत्रीकाला बोलावून घेऊ..... कारण भसम्या ला दहन देत नाही आहे.... त्याचा आत्मा भटकत राहिला ..... परत त्रास नको व्हायला गावाला ..."
नामा मांत्रिक आला .... त्यानं तलावा जवळ पूजा घातली . आणि शेवट तो मंतरलेला धागा कुलुपाला बांधला .
नामा मांत्रिक आला .... त्यानं तलावा जवळ पूजा घातली . आणि शेवट तो मंतरलेला धागा कुलुपाला बांधला .
" लक्षात ठेवा हा धागा सुटता कामा नये ....
नाही तर अनर्थ होईल ..... त्याची भूक भयानक आहे.... आणि हा धागा सुटला तर ..... सगळं गाव धोक्यात येईल . "
नामा मांत्रिक सगळ्यांना उद्देशून बोलला .....
नाही तर अनर्थ होईल ..... त्याची भूक भयानक आहे.... आणि हा धागा सुटला तर ..... सगळं गाव धोक्यात येईल . "
नामा मांत्रिक सगळ्यांना उद्देशून बोलला .....
कोण यायचं नाही इथं .... रामा च घर जप्ती होणार आहे थोड्या दिवसात .... गर्दीतील एक जण बोलला ... तो पर्यंत भसम्या च्या बॉडी चा पण नायनाट होईल .
5 वर्षांनी भसम्याचे घर गीता आणि अनिल ला दिले गेले .
गीता ने ते कुलूप फक्त तसच अडकवलं होत.... त्याला बांधलेल्या धाग्या मूळे भसम्या आत अडकून होता .... तो जागा होता .... फक्त कुलूपाला असलेल्या धाग्यामूळे तो बाहेर येऊ शकत न्हवता ........
गीता ने ते कुलूप फक्त तसच अडकवलं होत.... त्याला बांधलेल्या धाग्या मूळे भसम्या आत अडकून होता .... तो जागा होता .... फक्त कुलूपाला असलेल्या धाग्यामूळे तो बाहेर येऊ शकत न्हवता ........
गीता आणि अनिल ने गाव सोडले
अनिल ती बदलीची नोकरी सुद्धा सोडली .
ते नव्याने नव्या गावात संसार करू लागले .
गीता ला मात्तृत्वाची चाहूल लागली होती .....
हल्ली गीता ला सारखी सारखी भूक लागत होती .....
तीच लक्ष सहज त्या जखमे कडे गेले जी जखम भसम्याच नख लागून झाली होती ...
अनिल ती बदलीची नोकरी सुद्धा सोडली .
ते नव्याने नव्या गावात संसार करू लागले .
गीता ला मात्तृत्वाची चाहूल लागली होती .....
हल्ली गीता ला सारखी सारखी भूक लागत होती .....
तीच लक्ष सहज त्या जखमे कडे गेले जी जखम भसम्याच नख लागून झाली होती ...
ती जखम लिबलिबित झाली होती .........
**************************************
त्या तलावाच्या जवळ एक चार चाकी मोटार येऊन थांबली .
"ते बघा ते समोर एक घर दिसतंय तिथं विचारा पत्ता ..."
त्या गाडीतील बाई बोलली .
त्या गाडीतील बाई बोलली .
"हा आलो थांब विचारून" ... तो माणूस बाहेर पडला
"आई ते बघ किती छान तळे आहे..... किती छान कमळे आहेत .... चल की तिकडं जाऊ .... मला एक कमळ हवयं ....."
असं म्हणतं ती मुलगी त्या तलावाच्या दिशेने गेली . तिची आई गाडीत बसून तिच्या कडे पाहत होती . इतक्यात तीला कुणाचा तरी फोन आला व ती फोन मध्ये व्यस्त झाली .
ती मुलगी तळ्याजवळ आली . जाळीला लावलेले बिना किल्ली चे कुलूप तिने काढून टाकले .... कुलूप काढताना जाळीची तार तीला लागली ... रक्त येऊ लागले त्यातून ... तिने तसाच हात पाण्यात घातला .....अचानक तलावातून तीला कुणीतरी आत ओढून घेतले .......
भसम्या जागा झाला परत .....
समाप्त ....