भसम्या ( पार्ट 3 )
पण गीताला विश्वास होता की नक्कीच काहीतरी विचित्र होत .... ती दिवसभरात झालेल्या गोष्टीचा विचार करू लागली . ह्या आधी तिथं तस काहीच झाले न्हवते ... मग आत्ताच असे अचानक 2 दिवसात काय घडले ती याचा विचार करू लागली . ती 2 दिवसात झालेल्या घटनाचा विचार करू लागली आणि मग तिच्या लक्षात आलं ह्या सर्व घटना त्या तलावाशी निगडित आहेत . पण आपण तर रोज तलावा जवळ जात होतो तेव्हा असं काहीच झाले नाही आणि आत्ताच असं अचानक काय झाले आहे . तो मुलगा कोण आहे तो का सारखा तलावा जवळ दिसतो आणि असा अचानक कुठं गायब होतो . तिने डोक्याला खुप ताण दिला तेव्हा तीला लक्षात आलं की ह्या सर्व गोष्टी तलावाचे कुलूप काढल्या पासून सुरु झाल्या होत्या ... त्या तलावाला लावलेले कुलूप .... त्या कुलूपाला बांधलेला तो धागा यांचा नक्कीच काहीतरी संबंध होता ... ती जी कोण व्यक्ती दिसत आहे ती नक्कीच जिवंत नाही याची तीला जाणीव झाली . उद्या तलावा जवळ जाऊन त्या जाळीला कुलूप घालायचं आणि त्याला तो धागा बांधायचा हे तिने पक्के केले .
सकाळ पासून अनिल ची तब्बेत ठिक न्हवती तो आज कामाला जाणार न्हवता . गीता ने तीच घरकाम आवरून घेतलं .... मागच्या अंगणात पिलाचे पडलेले रक्त तिने साफ करून घेतलं .... तिने मनाशी पक्का विचार केला ... ती तळ्याकडे जाणार होती .... जाताना तिने अनिल ला सांगितले .... ती तळ्याकडे जात आहे .... तिच्या मागून जीमी सुद्धा निघाला .... ती तळ्याजवळ पोहचली.... तळ्याच्या काठावर कुणीतरी पाठमोर बसलं होत .... तो साधारण 15-16 वर्षाचा मुलगा होता ... पण त्याचे पूर्ण शरीर फुगल होत .... तो पूर्ण पांढरा पडला होता .... पाण्यात पडून मेल्यावर शरीर जसं लिबलिबत होत तस त्याच्य शरीर दिसत होत .... त्याच्या डोक्यावर केस न्हवते .... हा तोच मुलगा होता जो गीताला तळ्याजवळ दिसत होता .... तळ्याजवळ अनेक पक्षी मरून पडले होते .... त्यांच्या शरीरातील मास गायब होते .... समोरील दृश्य पाहून गीता जोरात किंचाळली ..... जीमी जोर जोरात भुंकू लागला .... अनिल ने गीताची किंचाळी ऐकली .....
गीताची किचाळी आणि जीमी च्या भुंकण्याचा आवाज ऐकून त्या मुलाने मागे पहिले ...
मोठे बटबटित डोळे ..... मोठे ओठ ..... पूर्ण पांढरा पडलेला आणि भरपूर सुजलेला चेहरा .....चेहऱ्यावर लागलेलं रक्त ..... हातात धरलेला एक पक्षी असा एकंदरीत त्याचा अवतार होता .....
हा प्रकार पूर्ण पणे वेगळा आहे अमानवीय आहे याची जाणीव गीता ला झाली .
म...... म...... मी.....भसम्या ...... गेली 5 वर्ष इथं ..... इथं ..... त ..... त....... तलावाच्या ...... पो...पो...... पोटात राहतो ....... मला भू..... भू..... भूक लागली होती ...... म्हणून खा .... खा .... खात होतो..... त्या पक्ष्याचे मुंडके खात तो बोलला
तू ..... तू ..... चांगली ..... आ... आ... आहेस ..... मला बा ..... बा ..... बाहेर ..... काढलास ...... त.... त... तलावाच्या ....... पा .... पा.... पाच वर्षा पासून म....म.. मला खूप भूक ला ..... ला .... लागली होती ..... म.....म...... मला कायमच भू....... भू....... भूक लागते ..... त्या ..... त्या ..... नाम्या मात्रिकान ....म....म.....मला .....ह्या ....तळ्यात .....मंत्रुन ....ठे....ठे...ठेवल...होता.....त्या ....त्या .....कुलपाला .....धागा ....बा ....बा ....बांधला ....होता ....प...प....पण तू आलीस ....
तू ....ते ....कुलूप ....तोडलस..... म....म....मला ..... मोकळ ....केलस.....का..... का..... काल मी ते कुत्र्याच छो..... छो..... छोट पिल्लू खा .. खा .... खाल्लं ..... भू....भू....भूक लागते मला सारखी ......
आ.....आ.... आता तुला खा .... खा .... खाणार .. बा ....बा .... बाई च मा.... मा.....मास लई भा.... भा.....भारी लागतंय ..... मी ....मी ..... माझ्या आ....आ...... आजी ....ला .... पण .....खाल्लं .... होत तू .... तू ..... तुझं कुत्र पण..... खा .... खा .....खाणार ..... मग तुझा न .... न ..... नवरा खाणार ..... मग आ.... आ.... अख्खा गाव खाणार ....
गीता अजुन पण आश्यर्यचकित होऊन त्या मुलाकडे बघत होती ..... तीला समजतच न्हवत ..... त्या तलावाच्या काठड्या वरून तो खाली उतरला ..... जीमी जोर जोरात भुंकत होता .... जीमी तिच्या साडीचा पदर तोंडात धरून तील तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता ..... पण गीता पुतळ्या सारखी स्तब्ध उभी राहिली होती .... जसे तिचे पाय कुणीतरी एका जागी घट्ट चिटकवून ठेवले होते .
भसम्या तिच्या जवळ आला ..... त्याच्या अंगाला भयानक सडका वास येत होता ...... जीमी जोरात भुंकत होता ....जीमी भसम्या च्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता .... पण त्याची पण हिम्मत होत न्हवती .... अचानक भसम्याच्या लिबलिबित हाताचा ओंगळवाणा स्पर्श गीताला झाला ...... आता गीता भानावर आली ..... आपल्या समोर काय अभद्र संकट उभ आहे याची जाणीव झाली . भसम्या तीला खेचत तळ्या जवळ नेत होता ..... गीता स्वतःचा हात सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करत होती .... ती सारखी अनिल ला हाका मारत होती .... जीमी जोर जोरात भुंकत होता .... भसम्या तीला तलावाच्या दिशेने ओढत नेत होता .... तो ज्या प्रमाणे तलावाच्या पाण्यात बुडून मेला त्या प्रमाणे तो इतरांना मरणार होता ....... आणि ज्या कारणामुळे त्याला मरावं लागलं ते कारणच तो खाऊन संपवणार होता .... त्याच्या पोटातील आग माणसांच मास खाऊनच शमणार होती .... आणि आता तो परत मरणार सुद्धा न्हवता .... तो गीता ला तलावाच्या पाण्यात बुडवून मारणार होता .... व नंतर तिचे मास खाणार होता ..... आणि आत्ता त्याची भूक शमवण्यासाठी आख्खा गाव होता .... त्या गावातील लोकांनमुळे त्याला त्याचा जीव गमावावा लागला होता .....
जीमी जोर जोरात भुंकत होता .... गीता स्वतःचा हात सोडवून घेण्याच्या प्रयन्त करत होती .... पण तिचा हात त्याच्या लिबलिबित शरीरात आत रूतत होता ....गीताला तलावाच्या कठड्या जवळच पडलेले कुलूप दिसले ....त्या कुलूपाला बांधलेला धागा दिसला .....
भसम्या गीताचे तोंड तलावाच्या पाण्यात बुडवणार इतक्यात पाठीमागून एक दगड जोरात आला व भसम्या च्या डोक्याला लागला .... दगडाचा वेग इतका जोरात होता की भसम्याच्या लिबलीबित झालेल्या डोक्यात रुतून बसला . अचानक झालेल्या हल्ल्याने भसम्याला काही समजलं नाही . संधीचा फायदा घेत गीताने स्वतःचा हात सोडवून घेतला .... पण त्या झटापटीत भसम्याच नख गीतला जोरात लागलं ... त्यातून रक्त येऊ लागला ...अनिल ने मागून भसम्याला जोरात धक्का दिला ... भसम्या त्या धक्याने तलावात जाऊन पडला ....गीताने झटकन जाळी लावली व त्याला ते कुलूप नुसते अडकवले .....कुलूपाला तो मंतरलेला धागा तसाच होता त्यामुळं भसम्या ला तलावाच्या बाहेर येता येणार न्हवत ..... भसम्या परत तलावात कैद झाला होता .... अनिल ला गीता वर विश्वास न ठेवल्या बद्दल वाईट वाटत होतो .....
धोका तात्पुरता टळला होता .... पण भसम्या परत कधीही मुक्त होऊ शकतो याची जाणीव अनिल आणि गीता दोघांना पण होती . ती रात्र दोघांनी पण जागून काढली . दुसऱ्या दिवशी गीता आणि अनिल ने ते गाव सोडायचा निर्णय घेतला .... जाताना ते जीमी ला पण सोबत नेणार होते ......
क्रमश .....