भसम्या ( पार्ट 2 )
इतक्यात तीला एक कल्पना सुचली . आपल्या घराच्या अंगणात पण छोटे कमळाचे तळे बनवलं तर किती छान होईल . ती लगेच कामाला लागली . फुले झाडांनसाठी म्हणून लागणारे साहित्य तिच्या कडे होतेच . तिने अंगणात एक जागा पक्की केली . तिने ठरवलं की अगदी छोट्या साईझ चा खड्डा खणायांचा आणि त्यात त्या कमळाच्या तलावातील वेगवेगळ्या कलर ची कमळाचे गड्डे लावायचे .तिने खड्डा खाणायाला सुरवात केली . जीमी जवळच बसून होता . थोड्या वेळात तिने एक छोटासा खड्डा खणाला . आता फक्त त्यात कमळाचे गड्डे लावायचे होते . ती सगळं साहित्य गोळा करत होती आणि अचानक तीला तिच्या उजव्या हातांच्या बोटाला खुरप लागलं . खूरप्याचे पाते एवढे धारधार होते की तिच्या बोटातुन रक्ताची धार लागली . तिने तिचे बोट तोंडात धरलं रक्ताची धार अजुन चालू होतीच . घरासमोर कमळाचा छोटासा तलाव करून तीला अनिल ला सरप्राईज द्यायचे होते . तिने ते सगळं सामान तिथेच ठेवले व ती कमळाच्या तलावाच्या दिशेने निघाली . जीमी तिच्या मागोमाग निघाला . ती तलावा जवळ पोहचली . जीमी परत जोरजोरात भुंकू लागला . तिने परत त्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष केले . ती तलावाच्या कठड्यावर आली . तिने तिचा उजवा हात पाण्याच्या आत कमळाचा गड्डा तोडण्यासाठी घातला . पाणी परत शहराल . तिच्या हातांच्या बोटावर झालेल्या जखमेतुन आलेलं रक्त पाण्यात मिसळल.....
त्याला जे हवं होत ते मिळालं ..... आता तो मुक्त होणार होता . त्याच्या पोटातील आग आता त्याला शांत बसू देणार न्हवती . ज्या संकटाला गावानं बंदिस्त केल होत त्या संकटाला गीतांन अनावधानाने मुक्त केल होत . आता गीता बरोबर अक्खा गाव संकटात होता . गावातील लोकांना खूप मोठया संकटाला तोंड द्याव लागणार होत . तो मुक्त झाला होता .... भसम्या मुक्त झाला होता ...
गीता घरी आली . त्या खड्ड्यात तिने कमळाचे गड्डे लावले . खड्यात पाणी घातले . ती संध्याकाळच्या तयारीला लागली . तीच लक्ष सहज तळ्याकड गेलं . तळ्याच्या काठड्यावर कोण तरी बसलं होत .... गीताला आश्यर्य वाटल ह्या आधी तीला तळ्याकाठी कुणीच दिसल न्हवत मग ती व्यक्ती कोण होती ती विचार करत होती लांबून त्या व्यक्तीचा चेहरा दिसत न्हवता पण साधारण 15-16 वर्षाच्या मुलासारखि त्याची शरीरयष्टी दिसत होती . त्याच्या डोक्यावर केस न्हवते बहुतेक , तो जो कोणी होता तो जाड होता ...टाकला होता .... आणि तो गीताच्या घराकडे बघत होता ...तो कोण आहे हे बघण्यासाठी गीता घराच्या बाहेर आली पण तिथं कुणीच न्हवत . असेल कुणी तरी मुलगा कमळ बघायला आला असेल असा तिने विचार केला ... जीमी पण बाहेर न्हवता . गेला असे जीमी कुठं तरी भटकायाला असा विचार करून ती घरात गेली . थोड्या वेळाने अनिल घरात आला . जीमी अजुन आला नाही म्हणून ती काळजीने घराबाहेर आली . तो मुलगा जो मगाशी तळ्याजवळ दिसली होता तो परत गीताला दिसला . ती तळ्याच्या दिशेने जाऊ लागली . वाटेत तीला जीमी दिसला त्याच्या बरोबर आणखी एक कुत्र्याच पिल्लू होती . जीमी आणि ते पिल्लू तलावाच्या दिशेने बघून जोरात भुंकत होते अनिल ने गीताला हाक मारली . हाक ऐकून गीता परत माघारी फिरली .
तिने सहज मागे वळून पहिले पण तिथे कोणीच न्हवते . तीला वाटल जीमी च्या भुंकण्याला घाबरून तो मुलगा तिथून निघून गेला असेल . ती घरी आली . संध्याकाळची तयारी करू लागली . रात्री जीमी ला व त्या छोट्या पिल्लाला तिने खायला वाढले . तीच लक्ष परत तलावाच्या दिशेने गेले कुणी तरी उभ होत बहुतेक तो 15-16 वर्षाचा मुलगाच असावा ... उद्या सकाळी आवरलं की तो मुलगा त्या तळ्याजवळ का उभा असतो या बद्दल त्याला विचारायचं असं गीता ने ठरवलं . रात्र झाली तशी गीता व अनिल झोपून गेले . साधारण 2 तासांनी जीमी व ते पिल्लू जोर जोरात भुंकू लागले होते . गीता ने दुर्लक्ष केले . तीला वाटल एखाद्या दुसऱ्या कुत्र्याला बघून ती दोघ भुंकत असतील . थोड्या वेळानी त्या छोट्या पिल्लाचा विव्हळण्याचा आवाज आला . जीमी भुंकत होताच .तरी सुद्धा गीताने लक्ष नाही दिले . थोड्या वेळानी जीमी च्या भुंकण्याचा आवाज पण येत न्हवता . जीमी करुण स्वरात रडत होता . कुत्र्याच रडणं म्हणजे अशुभ असत . ते ऐकून मात्र गीता बाहेर आली . अंगणातील लाईट चालू केली . जीमी बाहेर न्हवता . ती जीमी ला हुडकु लागली . ती घराच्या मागच्या दिशेने गेली . समोर जे पहिले ते पाहून ती जोरात किंचाळली . तिच किंचाळण ऐकून अनिल धावत बाहेर आला . घराच्या मागच्या दिशेने गेला . समोरचे चित्र पाहून तो पण दचकला . समोर सगळी कडे रक्त पडलं होत . तिथली जमीन पण ओली होती . जीमी घाबरून एका झाडामागे लपला होता . ते छोट पिल्लू तिथे दिसत न्हवते . गीता ने घाबरून तलावाच्या दिशेने पहिले . तिथं 15-16 वर्ष्याच्या मुला एवढ कुणीतरी उभी होती . गीताला बघून जीमी तिच्या बाजूला येऊन थांबला . गीतान जीमी ला जवळ घेतलं . ती अनिल ला तळ्याजवळ उभा असलेल्या मुलाला दाखवणार इतक्यात तिथे तो मुलगा न्हवता .
"अनिल तिथं तळ्याजवळ कोणी तरी उभे होते रे .... "
"आज सकाळी पण होती तो मुलगा तिथं ....."
"आज सकाळ पासून जीमी भुंकत होता ....."
"मी तळ्याकडे जाताना मला अडवत होता...."
"आणि मला वाटत तोच आता आपल्या घराजवळ आला होता आणि म्हणून जीमी व ते पिल्लू भुंकत असावं ." "त्याच मुलान पिल्लाला मारलं असावं ...."
गीता घाबरत तलावाच्या दिशेने बघत म्हणाली .
"आज सकाळ पासून जीमी भुंकत होता ....."
"मी तळ्याकडे जाताना मला अडवत होता...."
"आणि मला वाटत तोच आता आपल्या घराजवळ आला होता आणि म्हणून जीमी व ते पिल्लू भुंकत असावं ." "त्याच मुलान पिल्लाला मारलं असावं ...."
गीता घाबरत तलावाच्या दिशेने बघत म्हणाली .
" अग असं काही नसेल .... "
"इतके दिवस झाले आपण इथं राहत आहे आज पर्यंत असं वेड वाकडं काहीच झाले नाही ...."
"तुला भास होत असतील ....."
" आणि त्या पिलाला दुसऱ्या एखाद्या जनावराने मारलं असेल ....."
"आणि जीमी पण त्यालाच घाबरला असेल ......"
अनिल तीला समजावत म्हणाला .......
"इतके दिवस झाले आपण इथं राहत आहे आज पर्यंत असं वेड वाकडं काहीच झाले नाही ...."
"तुला भास होत असतील ....."
" आणि त्या पिलाला दुसऱ्या एखाद्या जनावराने मारलं असेल ....."
"आणि जीमी पण त्यालाच घाबरला असेल ......"
अनिल तीला समजावत म्हणाला .......
"आपण एक काम करू जीमी ला रात्री आपण आत घरात बांधत जाऊ .... " अनिल तिची समजूत काढू लागला .
क्रमश .....